निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अणुस्कूरा घाट माझ्या आजोळला जातो. पण फारसा रहदारीचा नाही. त्या घाटात एक मोठा धबधबा लागतो, असे मामा नेहमी सांगत असतो.
कोल्हापूरहून गोव्याला जायला अंबोली, अनमोड, चोर्ला, फोंडा, गगनबावडा ( करुळ ), भुईबावडा, तिलारी असे अनेक मार्ग आहेत. प्रत्येक घाटातून रहदारी आहे आणि प्रत्येकाचे सौंदर्य वेगळे आहे.

मी एकदा ,गगनबावडा घाटातून, गौरी जेवणाच्या दिवशी चालले होते. तिथले ते निसर्ग सौंदर्य, धुके, उतरलेले ढग पाहून, न राहवून मी प्रज्ञाला फोन केला. ती गौरी जेवणाचा स्वयंपाक करण्याच्या घाईत होती. तरी माझे ऐकून (नाईलाजाने) Proud
" छान छान! मजा करून ये. मी आता कामत आहे. " असं सांगून फोन ठेवला. मग वाटलं अरेरे उगीच हीला फोन केला . Happy

शोभा, प्रज्ञा कुठे आहे ? तिचा पण वाढदिवस आहे ना या आठवड्यात ?>>>>>>>>>>>>>>.रविवारी. दिनेशदा, तुमच्या स्मरणशक्तीला _____________/\_____________.माझ्यासाठी पाठवा की थोडी. Proud

यापैकी एखादा घाट मायबोलीकरांसोबत पायी उतरायची फार इच्छा आहे मला. खास करून तिलारी.
( हा घाट एवढा अवघड आहे कि तिथल्या विमा कंपन्या त्या घाटातून जाणार्‍या वाहनांची जबाबदारी घेत नाहीत. ) एस्टीचे जिगरबाज चालक मात्र त्या घाटातून गाड्या नेतात. दुर्मिळ असा सोनेरी सोनटक्का त्या घाटात आहे.

चोर्ला घाट, हणजूणे धरणाच्या काठाकाठाने जातो. तिथे दुर्मिळ पिवळा करमळ आहे.

यापैकी एखादा घाट मायबोलीकरांसोबत पायी उतरायची फार इच्छा आहे मला. खास करून तिलारी.>>>>>>>>>>>>>ठरवा मग. Happy

यापैकी एखादा घाट मायबोलीकरांसोबत पायी उतरायची फार इच्छा आहे मला. खास करून तिलारी.>>>>>>>>>>>>>ठरवा मग.::स्मित:>>>>>शोभा तो बोल्ड केलेला शब्द वाच. Happy आणि पुढे "( हा घाट एवढा अवघड आहे कि तिथल्या विमा कंपन्या त्या घाटातून जाणार्‍या वाहनांची जबाबदारी घेत नाहीत. ) " हे पण वाच. Happy

जिप्स्या, कितीही शब्द बोल्ड केलेस तरी मी ’कोकणकन्या’ आहे हे विसरू नको. लहानपण यातूनच गेलयं. आता तुमच्या सारख्या माकड ऊड्या नाही मारता येणार पण म्हणून मला जमणार नाही असं समजू नको. Happy (हा मला कटवतोय का? Uhoh :फिदी:)

शोभा, त्या घाटात १०० मीटर्स सरळ रस्ता नाही. सतत चढ आणि वळणे आहेत. पण उतरायला सोपा आहे. तिलारी धरणाच्या परीसरात झुळझुळ वाहणारी नदी आहे.

बेळगावला गेलात तर चोर्ला घाटातही जाता येईल. कर्नाटक सरकारची बस पकडून चोर्ला गावात उतरायचे आणि चालायला सुरवात करायची. ( मोठा ग्रुप हवा ) दमलात तर हात दाखवून एस टी थांबवता येईल. या घाटात रॉक क्लाईंबींग वगैरे चाललेले असते. एक बाजूने हणजूणे धरणाचा जलाशय सतत दिसत असतो.
पावसाळ्यात मात्र धबधब्याखाली टिपीकल बियरवाली गर्दी असते.

आंबोलीला जाण्याचा प्लान ठरतच असेल तर १५, १६, १७ आणि १८ ऑगस्ट ठरवा. १५ ते १७ सुट्टी आहे आणि १८ ची एक दिवस सुट्टी घ्यावी लागेल. Happy

६-७ जण असतील तर मुंबईहुन गाडी करूनच जाऊया (पुणेकरांना पुण्यात पिक अप करून), म्हणजे पाहिजे तेथे गाडी थांबवता येईल आणि मनसोक्त फोटो काढता येतील. Proud

अंबोलीला एक दोन दिवस पुरतात. रात्रीच्या बसने निघायचे, पहाटे सावंतवाडीला पोहोचलात कि तासाभरात अंबोली गाठता येते. फिरायचे ते दिवसाउजेडीच. रात्री अस्वलांचे आणि "बाहेर"चे भय असते. रात्री मुक्काम करून दुसर्‍या दिवशी दुपारी निघून रात्रीच्या बसने परतही येता येते. पण असे सुट्टीच्या दिवशी गेलात तर अचकट विचकट नाच बघावे लागतील.

. पण असे सुट्टीच्या दिवशी गेलात तर>>>>पण नंतर सुट्टी नाही ना मिळणार Sad जुलै मध्ये लाहौल स्पितीसाठी ८ दिवसांची रजा टाकलीय, त्यामुळे लगेचच ऑगस्टमध्ये रजा मिळण्याचे चान्सेस कमी. Sad

मग एक सोमवारची रजा टाक फक्त. ही जी गर्दी असते ती फक्त धबधब्यावरच असते. बाकीच्या पॉंईट्सवर फारच कमी लोक जातात.

खरं तर मेचा शेवटचा आठवडा चांगला. धबधबा सुरु झालेला नसतो ( त्यामूळे गर्दी नसते ) पण हवा मस्त. सगळीकडे ढग असतात. कावळेसाद वर तर जादूई वातावरण असते. त्यातून ढग बाजूला झाले तरच ती दरी दिसणार. टोपली कारवी पण या वर्षी फुलणार का ? ती तिथेच आहे. त्या दिवसात रेडे करवंद पण मिळू शकतील.

अरे वा.....बेळगाव आणि अंबोलि घाटाचच्या गप्पा...... आय रियलि मिस्स Sad
बेळगावहून आंबोलि ला गाड्या आहेत. जो पर्यंत मि तिथे होते (६ -७ वर्षापूर्वी),कोकणातल्या बर्याच गावांना बेळगाव हून बस आहेतच.मला जी नावं आठवतात ती म्हणजे, अंबोलि,फोण्डा,शिरसि,कारवार्,कुमठा (गोकर्ण ला जाण्यासाअठी) वगरे.....

अवांतर : आणी 'सागर - मिरज' हि गाडि माझा माहेरी (जे बेळगाव्हून ७० कि.मि. आहे) सकाळी सात वाजता उभी असते (मिरज कडे जाण्यासाठि). आणी मिरज हून बहुतेक दुपारि आसते .आता नाहि आठवत.आणी दोनी वेळेस बेळगाव हे लागतच.हे एवढ्या करता लिहिल कि सागर हून वरदहळ्ळि खूपच जवळ (श्रि श्रीधर स्वामि यांचा मठ आहे तिथे)

आंबोलीला जाण्याचा प्लान ठरतच असेल तर १५, १६, १७ आणि १८ ऑगस्ट ठरवा. १५ ते १७ सुट्टी आहे आणि १८ ची एक दिवस सुट्टी घ्यावी लागेल.
>> १८ ला दहीहंडी आहे रे जिप्स्या हक्काची सुट्टी नाही का तुला.

दिनेशदा - तुम्ही असणार का ईथे त्यावेळी हो आणि अस्वल आणि बाहेरची भीती
हे बाहेर कोण आहे.

तूम्ही गेलात तर मी (मनाने ) असणारच ना !>>>>>>>>>>.हे नाही चालणार. तुम्हाला आलचं पाहिजे. हो कि नाही निगकर? Happy

अंबोलीत मोजून ४/५ पॉईंट्स. कुठलाही रिक्षावाला आनंदाने फिरवून आणेल. शिरोडकर पाँईटला आणि हिरण्यकेशीच्या उगमाकडे पायी जाण्यातच मजा आहे. ( रस्ता चुकायची भितीच नाही. )
या दिवसात मोठी फुलपाखरे पण दिसतील. कावळेसादला जायला आता शेवटपर्यंत रस्ता आहे. कठडा पण आहे.

पण असे सुट्टीच्या दिवशी गेलात तर अचकट विचकट नाच बघावे लागतील.

ते पुर्ण पावसाळा चालु असते आता, त्यामुळॅ जसे बाहेरच्याकडे दुर्लक्ष करयचे तसे यांछ्याकडेही करायचे... Happy

आणि तसेही 'बाहेरचे' काही उरले नाही. जे संध्याकाळी सातच्या आत घरात असायचे तेच आता रात्री १२-१२ पर्यंत बाहेर असतात, मग हे 'बाहेरचे' बिचारे बाहेर पडणार तरी कधी??

आमचे एक घर एस्टी स्टँडच्या बाजुला तर दुसरे गावात. सकाळि उठुन गावातल्या घरात जायचे आणि रात्री १२ वाजता स्टँडवरच्या घरी परतायचे हा उद्योग चालतो गावी गेले की, मीच निशाचर झाल्यावर बाहेरचे काय भिती दाखवणार मला???? Happy

व्वा काय मस्त गप्पा रंगल्या आहेत...

खरच कोकणाला निर्सगाच भरभरुन देण आहे... आम्ही सलग मागिल चार वर्षा पासुन उन्हाळयात
सुट्टी घालवायला कोकणातच जातोय... फार काय नाही पण, चिपळुण, रत्नागीरी, गणपती-पुळे,पावस,
डेरवण्,दिव्य आगर, गुहागर, अलिबाग एवढा परिसर पाहिला आहे... तरी परत परत तिथेच जावेसे वाटते...

या वर्षी धाकटया भावाची घणसोली हुन पुण्याला बदली झाली आहे... तेव्ह्य कदाचित जुन मधे ५,६ दिवसांठी
पुण्यात असेन.. राणीची बाग नक्की बघीन... निगकरां पैकी कोणाला भेटता आले तर दुधात साखर......

साधना, इथे येऊन वाचतील ना ते !
पण ज्यावेळी मी जात होतो, त्यावेळी गावातले लोकच रात्रीचे बाहेर पडू नका असे सांगत असत.
आणि तो कुठला मठ ? एका पॉइंटला जायच्या आधी डाव्या हाताला एक वाट लागते. त्या कड्याला वळसा घालून खाली एका मठात जाते. तिथे वाटेवर एक झरा पण लागतो. मी पाणी प्यायलोय त्या झर्‍याचे.

हे आज नेट वर पाहिले... इथे शेयर केल्या शिवाय राहु नाही शकत...
ही फुलं हिमालयात २० वर्षात एकदाच येतात... हुबेहुब हनुमानाचे मुख वाटते...
असे खरच असेल का? कोणाला माहिती आहे का?
hanuman flowers.jpghanuman flowers 1.jpg

फोटो अंतरजालाहुन सभार....

हे आज नेट वर पाहिले... इथे शेयर केल्या शिवाय राहु नाही शकत...
ही फुलं हिमालयात २० वर्षात एकदाच येतात... हुबेहुब हनुमानाचे मुख वाटते...
असे खरच असेल का? कोणाला माहिती आहे का? >>>>>> सायली, हा फोटो गुगलून पाहिल्यावर ही खालील माहिती मिळाली ........ खूपच गंमतीशीर आहेत ही फुले ..... Happy

This species of orchid, aptly named the Monkey Face Orchid (Dracula simia), was created after Mother Nature decided to do a bit of monkeying around (hah!). These rare orchids only grow in the cloud forests of southeastern Ecuador and Peru at elevations of 1,000-2,000 meters on the side of mountains. In the scientific name, “simia” refers to the monkey face and “Dracula” refers to the two long spurs that hang down, almost like fangs.

Pages