निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(चालेल ना स्निग्धा? ) >>>> हाहा हवतर आधी चष्मा लाव आणि मग काढ फोटो हाहा>>>>>हो. मास्तरीण बाई! Proud

सुप्रभात! Happy
आले परत त्रास द्यायला. Wink
कोण म्हणतयं ते, "आज काय काढलं हातातून? " Proud
आता पहा फोटो. जरा नीट काढलेत. (स्निग्धा, फोटो चष्मा न लावूता पण, बर्‍यापैकी लांबून काढलेत. :फिदी:)
१. photo0244.jpg

२.photo0246.jpg

३.photo0247.jpg

शोभे कच्चे चिक्कू तोडलेस काय? >>>>>>>>नाही ग. Sad Happy
मलाही आता रुद्राक्षच आहेत की काय असं वाटतयं. कारण मी रुद्राक्षाचं फळ आधी कधी पाहिलच नाही . Uhoh

गुगलले तर ती फळे निळी दिसताहेत.
तुझ्या वरच्या फोटोत पण (नं. दोन) निळी झाक आहे. आकारही थोडा तसाचे.
तुला मिळाले कुठे पण हे फळ? कोणी दिलेय का, की तु कुठुन उचलुन आणलेस?
आठवत असेल तर अजुन क्लू मिळेल.

आठवत असेल तर अजुन क्लू मिळेल.>>>>>>>>>>>>अग, मी कणकवलीला गेले होते. तिथे एका देवाचे दर्शन घेऊन येताना ही पडलेली दिसली आणि फोटो काढण्यासाठी मी उचलली. (अजून जपून ठेवलेत):स्मित:

तुझ्या वरच्या फोटोत पण (नं. दोन) निळी झाक आहे.>>>>>>>>>.ती कॅमेर्‍याची करामत आहे. पण मी आत्ता नीट न्याहाळून पाहिली तर वरची डिझाईन साधारण रुद्राक्षांसारखीच वाटतेय. Happy

दिनेशदा, साधना, जागू, शांकली, शशांक ...... धावा................ Happy

रुद्राक्ष असायची शक्यता फार कमी आहे, देवळासारख्या वर्दळीच्या जागी, अशी मौल्यवान वस्तू झाडाखाली पडलेली असेल आणि कुणाचे लक्ष जाणार नाही याची शक्यता फार कमी आहे.
जर वरची साल मऊ असेल तर खरवडून निघायला हवी.. खरेच रुद्राक्ष असेल तर ... शोभा नवा बिझिनेस सुरु करायचा Happy

रुद्राक्ष नसावं ते शोभा. मी पाहिलंय नाशिकला http://www.maayboli.com/node/2402 यांच्याकडे जाउन रुद्राक्षाची झाडं आणि फळं.
रुद्राक्षाची पानं आपल्या सोनचाफ्यासारखी पण अजुन पातळ असतात. आणि फळं जांभळासारखी असतात, म्हणजे पिकल्यावर जांभळी-काळी होतात. ती वाळली की फोडुन त्याचं बी म्हणजे 'रुद्राक्ष'. नंतर त्याला खुप साफ करावा लागतो म्हणजे त्या बी वरच्या रेषांमधे अडकलेला गर काढण्यासाठी ब्रश घेउन साफ करावा लागतो.

रुद्राक्ष असायची शक्यता फार कमी आहे, देवळासारख्या वर्दळीच्या जागी, अशी मौल्यवान वस्तू झाडाखाली पडलेली असेल आणि कुणाचे लक्ष जाणार नाही याची शक्यता फार कमी आहे.>>>>>>>>>>..दिनेशदा, तिथे देऊळ नव्हतं ते नक्की आठवत नाही. पण झाडाझुडपातच एका मोठ्या दगडाला टेकवून उभे केले देव होते. (म्हसोबा वगैरे सारखे) . तिथल्या माणसाने गार्‍हाणे पण घातले. सगळी झाडेच होती तिथे. Happy

त्यातलं एक फळ फुटलयं. पण फोटो नीट आला नाही म्हणून दाखवला नव्हता. Uhoh
photo0250.jpg

रुद्राक्ष नसावं ते शोभा. मी पाहिलंय नाशिकला>>>>>>>>>.लवकर उगवलीस. मला तेच आठवलं होतं म्हणून तुलाच शोधत होते. Happy

नाही, ते रुद्राक्ष नाही.
इथेच मायबोलीवर एका सभासदाने घरी वाढवलेल्या रुद्राक्षांच्या झाडांचे फोटो पाठवले होते.
डॉ. शिरोडकर गरोदर बायकांच्या उपचारात रुद्राक्षांचा वापर करत असत असे मी वाचले होते. नेमका काय वापर होता ते मात्र आठवत नाही.
त्यांनी लिहिलेले एखादे पुस्तक आहे का ? त्यांचा उल्लेख अनेक पुस्तकात येतो. टिकलीएवढं तळं, स्नेहांकीत मधे ते आहेत. गायनिक च्या अभ्यासक्रमातही ते आहेत. त्यांचे क्लीनीकही चौपाटीवर होते. तिथे पण मी गेल्याचे आठवतेय.

शोभाताई, ह्यावेळेचे कोडे कोणालाच सोडवता येत नाहीये, ग्रेट.

ठंडा, ठंडा, कुल, कुलची खरंच गरज आहे आता.

खरा रुद्राक्ष रात्रभर पाण्याच्या भांड्यात टाकुन ते पाणी सकाळी पितात म्हणे बीपी नॉर्मल रहाण्यासाठी... असं मी वाचलय कुठेतरी! खखोदेजा!!

आज काय फक्त सायली कडून सुप्रभात. नो गप्पा, फोटो महिती. चुकल्या चुकल्या सारख वाटतय. माझ्याकडून हा शुभरात्री चा फोटो.

From mayboli

Pages