मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. 
हो, मीच दिलं होतं काही
हो, मीच दिलं होतं काही दिवसांपूर्वी.
मी त्याला नकली च्युइंग गम खायला घालून (गम विकताना फसवणे) रुग्णायलात धाडलं आणि तिथं त्याचे हाल विचरायला मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं.
७ / १७१
७ / १७१
संजू रोज रोजंदारीवर काम करायला जात असे. एके दिवशी त्याला एका जंगलात लाकूडतोडीचं काम मिळालं. तिथं पोचल्यावर त्याला उमगतं की हे जंगल तर बाभळीचं आहे - अर्थात जिकडेतिकडे बोटबोटभर लांब काटे. पण आता इलाज नव्हता. काम तर घेतलं होतं आणि ते पूर्ण न करणे हे संजूच्या तत्त्वात बसत नसे. त्यामुळे त्याने गुमान झाडं तोडायला सुरुवात केली. पण जसे जसे तो झाडं तोडायला लागला तशी एक नवीच अडचण त्याला भेडसावू लागली आणि ती म्हणजे त्या बाभळींचा चीक. त्या जंगलातल्या बाभळींना अभूतपूर्व डिंक होता. प्रत्येक घावासरशी तो डिंक त्याच्या सगळ्या अंगावर उडून उडून संजू त्यात पूर्ण माखून गेला. अश्यात एक ताकदीचा घाव घालताना संजूचा तोल गेला. शेजारीच जवळ जवळ असलेली दुसरी दोन झाडे होती. संजू नेमका त्या दोन झाडांच्या बुंध्यांच्या मध्ये अडकला. झालं! आधीच डिकांची अंघोळ झालेली त्यात त्या दोन बुंध्यांची अरुंद फट. तिथे संजू घट्ट चिकटून बसला! त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. आक्रोश करू लागला. पण काही उपयोग नाही. बिच्चारा खूप दु:खी झाला. संजू स्वतःची सुटका करून घ्यायचा जीव तोडून प्रयत्न करू लागला. असाच काही वेळ गेला. शेवटी लांब कुठेतरी मानवी बोलण्याची त्याला चाहून लागली. तो संयमाने (किंवा अक्षरशः चिकाटीने म्हणू
) ती माणसे इकडे यावीत अशी आशा करत वाट बघू लागला. आणि काय! त्याचे नशीब जोरावर होते. ती माणसे त्याच्याकडेच येत होती. ती जवळ आली आणि हा नेमका काय प्रकार आहे हे त्यांना कळेना. संजूने त्यांना सगळे सांगितले. यावर त्या माणसांनी त्याची त्यातून सुटका केली. संजूने त्यांचे आभार मानले. संजूने त्यांना विचारले आपण कोण आहात? तर काय! ते तर राज्याचे खुद्द मुख्यमंत्री होते आणि वनाधिकार्यांबरोबर ते जातीनं जंगलाची पाहणी करण्यास आले होते! त्यांनी संजूची सुटकाच केली नाही तर त्याची परिस्थिती पाहून त्याला वनखात्यात एक छोटीशी कायमस्वरूपी नोकरीही दिली. संजूने मनोमन त्या भल्या माणसाचे आभार मानले. त्याच्या मनात एक गाणे जन्मास येते. कोणते असेल बरे ते गाणे?
उत्तरः मानव
गम का फ़साना बन गया अच्छा, एक बहाना बन गया अच्छा
सरकार ने आके मेरा हाल तोह पुछा, गम का फ़साना बन गया अच्छा
एक सोपं
एक सोपं
७ / १७२
एका समांतर विश्वात महाराष्ट्राचे विद्यमान मुमं दोन पिढ्या आधीच जन्मतात. त्याप्रमाणे ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतात आणि मुंबईसह महाराष्ट्र घडवण्यात सर्वात महत्त्वाची भुमिका बजावतात. महाराष्ट्र स्थापनेच्या दिवशी त्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्यासाठी एक खास गाणं म्हणण्यात येतं. ते कोणतं?
क्ल्यु : मराठी गाणं पण
क्ल्यु १: मराठी गाणं पण सिनेमातील नाही.
क्ल्यु २ : जसं कार्य तसंच जोषपूर्ण गाणं हवं, नाही का?
उद्धवाने उद्धार केला
उद्धवाने उद्धार केला
नाही झिलमिल.
नाही झिलमिल. असं गाणं आहे?
उठाsssss उठाsssss राष्ट्रवीर
उठाsssss उठाsssss राष्ट्रवीर हो!!
बरोबर श्रद्धा.
बरोबर श्रद्धा.
७ / १७२
एका समांतर विश्वात महाराष्ट्राचे विद्यमान मुमं दोन पिढ्या आधीच जन्मतात. त्याप्रमाणे ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतात आणि मुंबईसह महाराष्ट्र घडवण्यात सर्वात महत्त्वाची भुमिका बजावतात. महाराष्ट्र स्थापनेच्या दिवशी त्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्यासाठी एक खास गाणं म्हणण्यात येतं. ते कोणतं?
उत्तर :
उठाsssss राष्ट्रवीर हो!!
७ / १७३
७ / १७३
अश्याच दुसर्या एका समांतर विश्वात भारताच्या 'रॉ' या गुप्तहेरखात्याचे प्रमुख केशव सीताराम अंधारे यांच्या हाताखाली तरुण, तडफदार असे महाराष्ट्राचे विद्यमान मुमं काम करत असतात. एका कामगिरीवर बॉसबरोबर ते पाकीस्तानात जातात. तिथल्या जनरलच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रं शिताफीनं घेऊन येण्याचं काम असतं. त्या जनरलच्या घरी पार्टी असते आणि त्यात जुन्या हिंदी श्वेतधवल काळातील गाण्यांसाठी एक ऑर्केस्ट्रॉ भारतातून बोलावलेला असतो. मुमं पार्टीतील एक पाहुणे बनून फिरत असतात. त्यांच्या बॉसनं त्यांना सुचना दिलेली असते की 'मी स्वत: जनरलच्या कागदपत्रं ठेवलेल्या खोलीवर नजर ठेऊन असेन. जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मी तुला कोणत्या न कोणत्या मार्गानं तुझं काम उरकण्याची आज्ञा देईन. तू त्यावेळी पटकन त्या खोलीत जाऊन कागद घेऊन यायचे. हीच आज्ञा आहे आणि ती मीच दिली आहे हे कळण्यासाठी त्या आज्ञेनंतर माझं नावंही असेल.' मुमं तयारीत असतात पण कोणताही संदेश येत नाही. पार्टी, ऑर्केस्ट्रा सुरू असतो. अशातच स्टेजवरची गायिका पुढचं गाणं सुरू करते. पहिली ओळ म्हटल्याक्षणी मुमंना संदेश मिळतो ..........
तुम बिन झिया जाए KSA (कैसे)?
तुम बिन झिया जाए KSA (कैसे)?
नाही मानव.
नाही मानव.
क्ल्यु १ : मेसेज अगदी साधा सोपा सरळ आहे. इतरांना कळू नये म्हणून बॉसनं आपल्या नावात जरा बदल केलाय पण बॉसही मराठी , मुमं पण मराठी म्हणून मुमंना लगेच कळलं.
तुम्हे और क्या दू मैं दिल के
तुम्हे और क्या दू मैं डील के सीवा (केशवा)
नाही मानव.
नाही मानव.
क्ल्यु २ : गाणं हिंदी असलं म्हणून काय झालं मेसेज चक्क मराठीतून आहे.
के सीवा (केशवा) >> हा छान
के सीवा (केशवा) >> हा छान प्रयत्न होता मानव.
अजून एक- हे सोपे आहे..
अजून एक- हे सोपे आहे..
७ / १७4
भीम काम्यक वनातून शिकार घेऊन घरी परतला तेंव्हा सांयकाळ झाली होती.. आज त्याला वनात एक झरना दिसला होता ज्याचे पाणी हिऱ्यासारखे चमकत होते.. घरी पोहचला तर मशालीच्या प्रकाशात त्याला दिसले की हिडीम्बा छोट्या घटोत्कचाला झोपवायचा प्रयत्न करत होती...
भीम काही बोलण्यासाठी तोंड उघडणार तेवढ्यात तिने shhhh असा इशारा केला.. मशाल विझवायची खुण केली...त्याने पटकन मशाल विझवली..भीमाला घाई होती कारण दिवस संपत आला होता आणि त्याला भावांकडे जायचे होते.. पण आता ती वेळ निघून गेली होती.. आता त्याला इथेच थांबणे भाग होते.. सकाळपर्यंत.. हिडीम्बा हे पाहून खुश झाली की आज रात्रभर मनमोकळेपणाने बोलता येईल.. भीमाला कधी त्या झरन्याबद्धल सांगू असे होतेय...
थोड्या काळानंतर तिने भीमाला इशारा केला की घटोत्कच झोपले आहेत.. मात्र गाढ झोपले नाहींयत...
कोणते गाणे म्हणेल हिडीमबा?
मामी -
मामी -
कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे
उदासी भरे दिन कभीं तो ढलेंगे??
किंवा
गया अँधेरा हुआ उजाला
चमका चमका सुबह का तारा
नाही च्रप्स.
नाही च्रप्स.
"उठा"ये जा उन के सी तम
"उठा"ये जा उन के सी तम
के सी (केशव सीताराम) तम म्हणजे अंधार
"उठा ये जाऊन" हा मराठी संदेश.
कर्रेक्ट मानव. शाब्बास!
कर्रेक्ट मानव. शाब्बास!
७ / १७३
अश्याच दुसर्या एका समांतर विश्वात भारताच्या 'रॉ' या गुप्तहेरखात्याचे प्रमुख केशव सीताराम अंधारे यांच्या हाताखाली तरुण, तडफदार असे महाराष्ट्राचे विद्यमान मुमं काम करत असतात. एका कामगिरीवर बॉसबरोबर ते पाकीस्तानात जातात. तिथल्या जनरलच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रं शिताफीनं घेऊन येण्याचं काम असतं. त्या जनरलच्या घरी पार्टी असते आणि त्यात जुन्या हिंदी श्वेतधवल काळातील गाण्यांसाठी एक ऑर्केस्ट्रॉ भारतातून बोलावलेला असतो. मुमं पार्टीतील एक पाहुणे बनून फिरत असतात. त्यांच्या बॉसनं त्यांना सुचना दिलेली असते की 'मी स्वत: जनरलच्या कागदपत्रं ठेवलेल्या खोलीवर नजर ठेऊन असेन. जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मी तुला कोणत्या न कोणत्या मार्गानं तुझं काम उरकण्याची आज्ञा देईन. तू त्यावेळी पटकन त्या खोलीत जाऊन कागद घेऊन यायचे. हीच आज्ञा आहे आणि ती मीच दिली आहे हे कळण्यासाठी त्या आज्ञेनंतर माझं नावंही असेल.' मुमं तयारीत असतात पण कोणताही संदेश येत नाही. पार्टी, ऑर्केस्ट्रा सुरू असतो. अशातच स्टेजवरची गायिका पुढचं गाणं सुरू करते. पहिली ओळ म्हटल्याक्षणी मुमंना संदेश मिळतो ..........
उत्तर :
उठाये जा उन के सीतम = "उठा" ये जाऊन - के सी 'तम' ( केशव सीताराम अंधारे)
"उठा" ये जाऊन >> बेस्ट!
"उठा" ये जाऊन >> बेस्ट!
174 -
174 -
रात अकेली है..
बुझ गये दिये.. (मशाल विझवली)
आके मेरे पास, कानो मे मेरे (कारण घटोत्कच गाढ झोपला नाहीये)
जो भी चाहे कहिये...
हे आहे का उत्तर?
नसल्यास क्लु आवश्यक!
हे बरोबर वाटतंय श्र.
हे बरोबर वाटतंय श्र. पण तो झरना दोनदा आलाय कोड्यात. तो यात बसत नाहीये.
कोड्यात हिडिंबा घटोत्कचाचा आदरार्थी उल्लेख का करते ते कळेना. फार फनी वाटतंय ते. जणू काही जुळे आहेत आणि दोघांचीही नावं घटोत्कच आहेत.
श्रीभीमा भीमसेना,
उठवशील चुकून तू रे
तुझी घटोत्कच बाळे.
श्रद्धा एकदम बरोबर...
श्रद्धा एकदम बरोबर...
मामी - झरना मिस डायरेक्ट करायला टाकला होता
मामी, पुढे हिडिंबा म्हणते ना
मामी, पुढे हिडिंबा म्हणते ना गाण्यात-
तुम आज मेरे लिये रुक जाओ
रुत भी है, फुरसत भी है... (भीम आज थांबलाय, उशीर झाल्याने!)
७ / १७4
७ / १७4
भीम काम्यक वनातून शिकार घेऊन घरी परतला तेंव्हा सांयकाळ झाली होती.. आज त्याला वनात एक झरना दिसला होता ज्याचे पाणी हिऱ्यासारखे चमकत होते.. घरी पोहचला तर मशालीच्या प्रकाशात त्याला दिसले की हिडीम्बा छोट्या घटोत्कचाला झोपवायचा प्रयत्न करत होती...
भीम काही बोलण्यासाठी तोंड उघडणार तेवढ्यात तिने shhhh असा इशारा केला.. मशाल विझवायची खुण केली...त्याने पटकन मशाल विझवली..भीमाला घाई होती कारण दिवस संपत आला होता आणि त्याला भावांकडे जायचे होते.. पण आता ती वेळ निघून गेली होती.. आता त्याला इथेच थांबणे भाग होते.. सकाळपर्यंत.. हिडीम्बा हे पाहून खुश झाली की आज रात्रभर मनमोकळेपणाने बोलता येईल.. भीमाला कधी त्या झरन्याबद्धल सांगू असे होतेय...
थोड्या काळानंतर तिने भीमाला इशारा केला की घटोत्कच झोपले आहेत.. मात्र गाढ झोपले नाहींयत...
कोणते गाणे म्हणेल हिडीमबा?
उत्तर - श्रद्धा. ( मानला तुम्हाला)
रात अकेली है,बुझ गये दिये...
७/१७५
७/१७५
श्रीराम, लक्ष्मण, आणि समस्त वानरसेना एक फ्लाय ओव्हर बांधून श्रीलंकेत पोहीचली सुद्धा! कुंभकर्णाला ह्याचा पत्ताच नव्हता. तो झोपेत होता. रावणाने वेगवेगळी रणवाद्यं, डी जे, स्पीकरची भिंत वगैरे पाठवली त्याला उठवायला. वज्रज्वाला तर त्याच्या झोपेला वैतागली होती. महत्प्रयासाने तो जागा झाला, तेव्हा वज्रज्वालेने त्याची चांगलीच कानउघाडणी केली: 'एवढं झोपतात का कुणी? युद्धाची धगधगती ज्वाला आता तूच सांभाळायला हवी! थांब आता उठलाच आहेस तर मी तुला ओवाळते. तीच ज्योत तू घेऊन जा आणि युद्धाची ज्वाला सगळीकडे पसरव'.
ती कुठलं गाणं म्हणेल?
ज्योत से ज्योत जगाते चलो
ज्योत से ज्योत जगाते चलो
नाही.
नाही.
क्लू देऊ का?
क्लू देऊ का?
क्लु को हम कभी ना नही कहते.
क्लु को हम कभी ना नही कहते.
द्या.
Pages