..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७/१८३

वेणुगोपाल अय्यरला पायाला मोठी जखम झाली होती. त्यावर खपली धरली. पण कालांतराने ती खाजायला लागली. खाज असह्य झाल्याने वेणुगोपाल ती खाजवून काढू लागला. त्यामुळे जखम लवकर बरी होईना. शेवटी त्यात पू झाला. वैतागून त्याने एक दिवस हाताने घासून तो पू काढला. पण ते करताना इतक्या वेदना झाल्या, की आधी तो 'य' म्हणून जोरात ओरडला. त्यानंतर लहान मुलासारखा 'उ-उ' करून रडत बसला.

त्याचा आवाज ऐकून तिथे डॉ. मुरलीप्रसाद शर्मा आले. त्यांनी विचारलं, की काय झालं ह्याला? वेणुगोपालचा तो पराक्रम पाहत उभ्या असणार्‍या संकेश्वरने सर्व प्रकार डॉक्टरांना गाण्यात सांगितला, तेव्हा कुठे डॉक्टरांच्या डोक्यात प्रकाश पडला. ते कोणतं गाणं?

हाहा, sonalisl, हा विचार नव्हता केला.

बाय द वे, तुम्ही अवग्रह चिन्ह कसं टंकलं?

iPad मधे.. settings>keyboard> add new keyboard मधे Marathi keyboard हा पर्याय आहे. तो वापरते.

१८३ काय कोडं आहे! जखम काय, पू काय.. Proud

नॉन फिल्मी आणि अल्बममधलंही नाही.. त्यावरून एक रँडम गेस.

पू'रब' से सूर 'य' उगा... वगैरे राष्ट्रीय शिक्षा मिशनच्या जाहिरातीतलं गाणं आहे की काय?

भारीच श्रद्धा! clap clap!

हेच वाटतंय.
पू'रब' से सूर 'य' 'उ' गा (किंवा उगा , फैला 'उ' जियारा)

वाह!
मला तर हे कधीच सुचले नसते.

७/१८४:

माझा मुलगा अगदी शांत आहे. तरीही त्याच्या शाळेतून मुख्याध्यापकांचं पालकांना तक्रार आणि भेटायला बोलावल्याचं पत्र आलं. मुलाला विचारलं काय झालय, तर त्याने गाण्यात सांगितलं.

७/१८५:

त्या आदिवासी टोळीत नाग, सर्प हे सर्व पूजनीय होते. अगदी सापाची कात, सापळा, मृत साप, नाग इ. ची विधीवत पूजा करून त्यांना नदीत सोडलं जाई. हे काम टोळीची पुजारीण करत असे. पुजारीण आता खूप म्हातारी होत चालली होती. हे सर्व विधी आता आपल्या मुलाला शिकवून या कामातून रिटायर होण्याचं तिनं ठरवलं आणि तसं आपल्या मुलाला सांगितलं. मुलगाही तयार झाला.

एके दिवशी मुलगा कामासाठी जवळच्या शहरात गेला होता. जाताना त्यानं आईला सांगितलं की जर गरज लागली तर मी येईन चटकन. तू जस्ट मला मोबाईलवर फोन कर. नेमकं तसंच झालं. त्या दिवशी एका आदिवासीला जंगलात एक सापाची कात मिळाली. त्याने ते पुजारणीच्या कानी घातलं. तिनं विधीसाठी मुलाला बोलवण्यासाठी त्याला फोन लावला आणि एक गाणं म्हटलं........

७/१८४:

माझा मुलगा अगदी शांत आहे. तरीही त्याच्या शाळेतून मुख्याध्यापकांचं पालकांना तक्रार आणि भेटायला बोलावल्याचं पत्र आलं. मुलाला विचारलं काय झालय, तर त्याने गाण्यात सांगितलं.

उत्तर: (श्रद्धा)
उनको ये शिकायत है के हम कुछ नही कहते...

७/१८५
आज उनसे पहली 'मुला' 'कात' होगी?
किंवा पहली मुलाकात है

Pages