मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. 
हिंदी आहे की मराठी?
हिंदी आहे की मराठी?
मराठी
मराठी
चिंब भिजलेले, 'रूप' सजलेले
चिंब भिजलेले, 'रूप' सजलेले
बरसुनी आले, रंग 'प्रीती'चे
असं गाणं आहे हेच माहिती
असं गाणं आहे हेच माहिती नव्हतं. मस्तच श्रद्धा!
आणि काळ्या ढगांना चंदेरी किनार असते म्हणून चंदेरी चाहूल!
श्रवुचंही उत्तर छान होतं. मी तर ते गाणं वाचून असंही लॉजिक लावलं की रूपेरी वाळूत म्हणजे रूपाचे कपडे भिजलेत ते वाळवायचे वगैरे
बरोबर... श्रध्दा ताईंनी
बरोबर... श्रध्दा ताईंनी जिंकले आहे बक्षीस..

७/१६२
७/१६२
"मला विसरून जा आशा, आपलं लग्नं नाही होऊ शकत. माझ्या शिक्षणाकरता घेतलेलं भलंमोठं कर्ज चुकतं केल्याशिवाय मी लग्न नाही करू शकत." सात्विक सात्विक दुखा:नं म्हणाला.
"नाही रे सा, तुला सोडून मी नाही इतर कोणाशी लग्नं करू शकणार. आणि कर्जाचं काय घेऊन बसलास! मी नोकरी करतेय ना, आपण दोघं मिळून ते कर्ज सहज चुकवून टाकू. पण मला आता थांबायचं नाहीये. आपलं अफेअर आहे हे कळल्यावर घरचे खूप मागे लागले आहेत माझ्या लग्नासाठी. ते कोणाशी तरी माझं लग्नं लावून देतील. त्यापेक्षा, चल शेजारीच मंदिर आहे आपण जाऊन देवासमोर एकमेकांना हार घालून लग्नं करू. मग कोणीही आपल्याला एकमेकांपासून दूर करू शकणार नाही."
एकमेकांना हार घालून दोघांनी देवाला नमस्कार केला. इतक्यात आशाचा मोबाईल वाजला.
"अगं आहेस कुठे? केव्हाची बाहेर गेलीयेस. आधीच लफडी करून बसलीयेस आणि आमच्या जीवाला घोर. तुझ्या बाबांना कळलं ना की तू इतका वेळ घराबाहेर होतीस तर दोघींनाही ओरडा मिळेल."
"आई, मी सात्विकशी लग्नं केलं. आताच. देवळात."
"आँ! अगं काय म्हणतेस? कुठे आहेस आत्ता?"
"अजून देवळातच आहोत आम्ही."
"आणि कोण कोण आहे तिथे?"
यावर आशानं एक छान गाणं म्हणून आईला उत्तर दिलं.......
दिल है छोटा 'सा' छोटी सी 'आशा
दिल है छोटा 'सा' छोटी सी 'आशा' ?
नाही.
नाही.
क्लु: हिंदी गाणं पण सिनेमातील
क्ल्यु १: हिंदी गाणं पण सिनेमातील नाही.
क्ल्यु २ : एक नाव क्ल्यु आहे आणि एक नाव गाण्यात आहे.
क्ल्यु ३ : मुलाची सांपत्तिक स्थिती महत्त्वाची..
क्ल्यु ४ : मुलाच्या सांपत्तिक स्टेटसचं वर्णन पहिल्या शब्दात येतं.
सात्विक संख्यान चा गाणे आहे
सात्विक संख्यान चा गाणे आहे का ?
हे कोण आहेत गृहस्थ?
हे कोण आहेत गृहस्थ?
दिल एक मंदिर है
दिल एक मंदिर है
मराठी कि हिंदी
मराठी कि हिंदी
क्ल्यु वाचा
क्ल्यु वाचा
आशा भोसलेचं म्युझिक अल्बममधलं
आशा भोसलेचं म्युझिक अल्बममधलं गाणं आहे का?
येस्स
येस्स
सलोना (लोन असलेला) सा सजन है
सलोना (लोन असलेला) सा सजन है और मै हूं...
बरोबर श्र.
बरोबर श्र.
७/१६२
"मला विसरून जा आशा, आपलं लग्नं नाही होऊ शकत. माझ्या शिक्षणाकरता घेतलेलं भलंमोठं कर्ज चुकतं केल्याशिवाय मी लग्न नाही करू शकत." सात्विक सात्विक दुखा:नं म्हणाला.
"नाही रे सा, तुला सोडून मी नाही इतर कोणाशी लग्नं करू शकणार. आणि कर्जाचं काय घेऊन बसलास! मी नोकरी करतेय ना, आपण दोघं मिळून ते कर्ज सहज चुकवून टाकू. पण मला आता थांबायचं नाहीये. आपलं अफेअर आहे हे कळल्यावर घरचे खूप मागे लागले आहेत माझ्या लग्नासाठी. ते कोणाशी तरी माझं लग्नं लावून देतील. त्यापेक्षा, चल शेजारीच मंदिर आहे आपण जाऊन देवासमोर एकमेकांना हार घालून लग्नं करू. मग कोणीही आपल्याला एकमेकांपासून दूर करू शकणार नाही."
एकमेकांना हार घालून दोघांनी देवाला नमस्कार केला. इतक्यात आशाचा मोबाईल वाजला.
"अगं आहेस कुठे? केव्हाची बाहेर गेलीयेस. आधीच लफडी करून बसलीयेस आणि आमच्या जीवाला घोर. तुझ्या बाबांना कळलं ना की तू इतका वेळ घराबाहेर होतीस तर दोघींनाही ओरडा मिळेल."
"आई, मी सात्विकशी लग्नं केलं. आताच. देवळात."
"आँ! अगं काय म्हणतेस? कुठे आहेस आत्ता?"
"अजून देवळातच आहोत आम्ही."
"आणि कोण कोण आहे तिथे?"
यावर आशानं एक छान गाणं म्हणून आईला उत्तर दिलं.......
उत्तर : सलोना (लोन असलेला) 'सा' सजन है और मै हूं...
सवत्स धेनु दान करतात, आशानं स-लोना सा शी लग्नं केलं.
सलोना (लोन असलेला) >>>
सलोना (लोन असलेला) >>>
हे भारी होतं मामी!
हे भारी होतं मामी!
मानवदा घर घेण्यासाठी लोन
मानवदा घर घेण्यासाठी लोन घेतले असेल..किंवा लग्न करण्यासाठी पण घेतले असेल लोन.
मी आपकी आशा अल्बम बघितला आणि
मी आपकी आशा अल्बम बघितला आणि मग सोडून दिले..
सलोना
सलोना
हायला मी खुप लेट आले इथे, हे
हायला मी खुप लेट आले इथे, हे भारीए मामी.
धन्यवाद लोक्स!
धन्यवाद लोक्स!
सलोना (लोन असलेला) >>>
सलोना (लोन असलेला) >>>
7/163
7/163
मी मेडिकल दुकानवाल्याशी भांडायला गेले. "माझे पैसे परत द्या. हा कसला तकलादू मास्क दिलायत? एवढे पैसे घेतलेत, N95 म्हणे N95!!"
दुकानदार म्हणला, "अहो झालं काय ते तरी सांगा "
मी - "तो मास्क सारखाच हळूहळू खाली घसरतोय. मग काय हो त्याचा उपयोग?"
मी माझा प्रॉब्लेम गाण्यात सांगून दुकानदाराला पिडल्यावर त्याने माझे पैसे परत केले..
"हे घ्या तुमचे पैसे पण परत तुमच्या प्रॉब्लेम साठी इतक्या सुंदर गाण्याचं वाटोळं करू नका"!!
सरकती जाये है रुख से नकाब
सरकती जाये है रुख से नकाब आहिस्ता आहिस्ता...
श्रद्धा :claps:
श्रद्धा, बरोबर:G
7/163
7/163
मी मेडिकल दुकानवाल्याशी भांडायला गेले. "माझे पैसे परत द्या. हा कसला तकलादू मास्क दिलायत? एवढे पैसे घेतलेत, N95 म्हणे N95!!"
दुकानदार म्हणला, "अहो झालं काय ते तरी सांगा "
मी - "तो मास्क सारखाच हळूहळू खाली घसरतोय. मग काय हो त्याचा उपयोग?"
मी माझा प्रॉब्लेम गाण्यात सांगून दुकानदाराला पिडल्यावर त्याने माझे पैसे परत केले..
"हे घ्या तुमचे पैसे पण परत तुमच्या प्रॉब्लेम साठी इतक्या सुंदर गाण्याचं वाटोळं करू नका"!!
उत्तर: (श्रद्धा)
सरकती जाये है रुख से नकाब आहिस्ता आहिस्ता..
Pages