मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. 
7/168
7/168
अजून एक सोप्पं..
एका बाईचं मोत्याचं कानातलं हरवलं. खूप शोधलं पण सापडलं नाही. त्या रात्री तिला ते कुठे असेल ते स्वप्न पडलं. सकाळी उठून त्याच जागी पाहिल्यावर सापडलं! आनंदाने हे गाणं म्हणू लागली!!
मस्त कोडं सपा...
मस्त कोडं सपा...
सपने मे मिलती है, हो 'कुडी' मेरी सपने मे मिलती है..
१६८: सपने में मिलती है ओ कुडी
१६८: सपने में मिलती है ओ कुडी मेरी सपने में मिलती है!
ग्रेट!
ग्रेट!
अरे श्रध्दाचं उत्तर आधीच आलं
अरे श्रध्दाचं उत्तर आधीच आलं होतं वाटतं!
7/168
7/168
अजून एक सोप्पं..
एका बाईचं मोत्याचं कानातलं हरवलं. खूप शोधलं पण सापडलं नाही. त्या रात्री तिला ते कुठे असेल ते स्वप्न पडलं. सकाळी उठून त्याच जागी पाहिल्यावर सापडलं! आनंदाने हे गाणं म्हणू लागली!!
उत्तर: श्रद्धा आणि वावे
सपने मे मिलती है, हो 'कुडी' मेरी सपने मे मिलती है..
आता मीच देते कोडं.
कोडं दिलं होतं पण डिलीट केलं. नंतर देते जरा, मॉडिफाय करून.
सपने मे मिलती है, हो 'कुडी'
सपने मे मिलती है, हो 'कुडी' मेरी सपने मे मिलती है..>>>>>सही,
खतरनाक आहे श्रद्धा.. हा धागा
खतरनाक आहे श्रद्धा.. हा धागा मी आज पाहिला आणि वाचतच गेलो.. जबरदस्त...
आता माझ्यातर्फे एक...
7/169 - जय गुजरात मधल्या एका
7/169 - जय गुजरात मधल्या एका गावात राहणारा एक युवक.. लहानपणी जंगलात गेला आणि त्याच्यावर तरस नि हल्ला केला.. प्रतिकार करताना तरस मारले गेले पण त्या तरसाचे एक लहान पिल्लू जय ला सापडले.. जय च्या चेहऱ्यावर एक व्रण मात्र कायम राहिला...
जय त्या तरसाचया पिल्लाला घरी घेऊन आला आणि त्याने ठरवले की याला वाढवायचे.. हळू हळू ते मित्र झाले... जय त्याच्या जवळ आला की ते पिल्लू त्याचा व्रण चाटु लागी... पुढे जय ला अमेरिकेला जायची संधी मिळाली.. एक वर्षासाठी जाऊ म्हणून तो तब्बल दहा वर्षे परत आला नाही... अमेरिकेत त्याने प्लास्टिक सर्जरी करून व्रण देखील घालवला...
दहा वर्षानंतर जेंव्हा तो परत आला ते पिल्लू मोठे तरस झाले होते.. मात्र ते जय ला ओळखेच ना...
जय ला देखील वाईट वाटले... करू तर काय करू?
अचानक त्याच्या मनात एक युक्ती आली.. त्याने चेहऱ्यावर तो जुना व्रण एका पेन ने बनवला आणि अहो आश्चर्य... तरस त्याला बघून खुश.. परत येऊन तो व्रण चाटु लागला...
यावर जय काय गाणे म्हणेल???
भरपूर हिंट दिल्या आहेत आणि बऱ्याच मिस डायरेक्शन हिट्स देखील आहेत... करा प्रयत्न
७/१६९-
७/१६९-
'हाईना' मुझसे मेरी पेहली सी सूरत मांगे...
चांगलं होतं कोडं!
जबरदस्त
जबरदस्त
कोडे अवघड,गाणं अज्ञात
कोडे अवघड,गाणं अज्ञात
7/169 - जय गुजरात मधल्या एका
7/169 - जय गुजरात मधल्या एका गावात राहणारा एक युवक.. लहानपणी जंगलात गेला आणि त्याच्यावर तरस नि हल्ला केला.. प्रतिकार करताना तरस मारले गेले पण त्या तरसाचे एक लहान पिल्लू जय ला सापडले.. जय च्या चेहऱ्यावर एक व्रण मात्र कायम राहिला...
जय त्या तरसाचया पिल्लाला घरी घेऊन आला आणि त्याने ठरवले की याला वाढवायचे.. हळू हळू ते मित्र झाले... जय त्याच्या जवळ आला की ते पिल्लू त्याचा व्रण चाटु लागी... पुढे जय ला अमेरिकेला जायची संधी मिळाली.. एक वर्षासाठी जाऊ म्हणून तो तब्बल दहा वर्षे परत आला नाही... अमेरिकेत त्याने प्लास्टिक सर्जरी करून व्रण देखील घालवला...
दहा वर्षानंतर जेंव्हा तो परत आला ते पिल्लू मोठे तरस झाले होते.. मात्र ते जय ला ओळखेच ना...
जय ला देखील वाईट वाटले... करू तर काय करू?
अचानक त्याच्या मनात एक युक्ती आली.. त्याने चेहऱ्यावर तो जुना व्रण एका पेन ने बनवला आणि अहो आश्चर्य... तरस त्याला बघून खुश.. परत येऊन तो व्रण चाटु लागला...
यावर जय काय गाणे म्हणेल???
उत्तर- श्रद्धा
(ह)आईना मुझसे मेरी पहली सी सूरत मांगे
मेरे अपने मेरे होने की निशानी मांगे
छे...हे गाणंही माहिती नाही.
छे...हे गाणंही माहिती नाही. मी आधी 'मैं तरसता रहा' वगैरे विचार करून पाहिला. मग 'है ना.. (हाईना) बोलो बोलो' वगैरे
मग सोडून दिलं.
https://youtu.be/uxafr0eirZo
https://youtu.be/uxafr0eirZo
डॅडी सिनेमातील आहे हे गाणं! गाजलेला सिनेमा आणि गाणंसुद्धा.
गेल्या काही कोड्यांमधली गाणीच
गेल्या काही कोड्यांमधली गाणीच माहीत नव्हती, त्यामुळे तितकं वाईट वाटलं नाही. गाणी माहीत असून येत नाहीत तेव्हा जास्त त्रास होतो
ओह हे गाणं! बघितल्यावर आठवलं.
ओह हे गाणं! बघितल्यावर आठवलं. टीव्हीवर पाहिलं आहे तेव्हा खूप वेळा. पण शब्द आठवणं शक्यच नव्हतं.
ह. पा., करेक्ट आहे
मला तर बै गाणं पण माहीत
मला तर बै गाणं पण माहीत नव्हते आणि सिनेमा पण..
ओह मला हे गाणं माहीत नव्हतं.
ओह मला हे गाणं माहीत नव्हतं. मी थोडासा तरस आणि जख्म बद्दल विचार केला.
कडव्यातली ओळ कोड म्हणून घालू
कडव्यातली ओळ कोड म्हणून घालू शकते का? तर मला एक कोडं घालायचय
7/170 राखीचं जेव्हा लग्न ठरलं
7/170 राखीचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा ती ही ओळ म्हणाली असेल.
(खुप च सोप्पं) राखी सावंत नाही हं
राखीचं माहीत नाही, पण
राखीचं माहीत नाही, पण मधुबालाने त्यांच्याशी लग्न केलं असतं तर लोक म्हणाले असते, गुलजार नार ही मधुबाला
देणार्याला कोडं नेहमी सोप
देणार्याला कोडं नेहमी सोप वाटतं.सोडवणार्यासमोर आलं कि अवघड होतं. स्वानुभव
१७० : दुनिया मेरी गुलजार हुई?
१७० : दुनिया मेरी गुलजार हुई?
(रातकली एक ख्वाब में आई)
बिंगो वावे बरोबर
बिंगो वावे
बरोबर
7/170 राखीचं जेव्हा लग्न ठरलं
7/170 राखीचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा ती ही ओळ म्हणाली असेल.
(खुप च सोप्पं) राखी सावंत नाही हं
उत्तर : वावे -
जब से ये मुखडा दिलं में खिला है, दुनिया मेरी गुलजार हुई!
७ / १७१
७ / १७१
संजू रोज रोजंदारीवर काम करायला जात असे. एके दिवशी त्याला एका जंगलात लाकूडतोडीचं काम मिळालं. तिथं पोचल्यावर त्याला उमगतं की हे जंगल तर बाभळीचं आहे - अर्थात जिकडेतिकडे बोटबोटभर लांब काटे. पण आता इलाज नव्हता. काम तर घेतलं होतं आणि ते पूर्ण न करणे हे संजूच्या तत्त्वात बसत नसे. त्यामुळे त्याने गुमान झाडं तोडायला सुरुवात केली. पण जसे जसे तो झाडं तोडायला लागला तशी एक नवीच अडचण त्याला भेडसावू लागली आणि ती म्हणजे त्या बाभळींचा चीक. त्या जंगलातल्या बाभळींना अभूतपूर्व डिंक होता. प्रत्येक घावासरशी तो डिंक त्याच्या सगळ्या अंगावर उडून उडून संजू त्यात पूर्ण माखून गेला. अश्यात एक ताकदीचा घाव घालताना संजूचा तोल गेला. शेजारीच जवळ जवळ असलेली दुसरी दोन झाडे होती. संजू नेमका त्या दोन झाडांच्या बुंध्यांच्या मध्ये अडकला. झालं! आधीच डिकांची अंघोळ झालेली त्यात त्या दोन बुंध्यांची अरुंद फट. तिथे संजू घट्ट चिकटून बसला! त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. आक्रोश करू लागला. पण काही उपयोग नाही. बिच्चारा खूप दु:खी झाला. संजू स्वतःची सुटका करून घ्यायचा जीव तोडून प्रयत्न करू लागला. असाच काही वेळ गेला. शेवटी लांब कुठेतरी मानवी बोलण्याची त्याला चाहून लागली. तो संयमाने (किंवा अक्षरशः चिकाटीने म्हणू
) ती माणसे इकडे यावीत अशी आशा करत वाट बघू लागला. आणि काय! त्याचे नशीब जोरावर होते. ती माणसे त्याच्याकडेच येत होती. ती जवळ आली आणि हा नेमका काय प्रकार आहे हे त्यांना कळेना. संजूने त्यांना सगळे सांगितले. यावर त्या माणसांनी त्याची त्यातून सुटका केली. संजूने त्यांचे आभार मानले. संजूने त्यांना विचारले आपण कोण आहात? तर काय! ते तर राज्याचे खुद्द मुख्यमंत्री होते आणि वनाधिकार्यांबरोबर ते जातीनं जंगलाची पाहणी करण्यास आले होते! त्यांनी संजूची सुटकाच केली नाही तर त्याची परिस्थिती पाहून त्याला वनखात्यात एक छोटीशी कायमस्वरूपी नोकरीही दिली. संजूने मनोमन त्या भल्या माणसाचे आभार मानले. त्याच्या मनात एक गाणे जन्मास येते. कोणते असेल बरे ते गाणे?
परत गम का फसाना गाणं वाटतंय.
परत गम का फसाना गाणं वाटतंय.
अर्र.....! झालंय का मानव हे?
अर्र.....! झालंय का मानव हे? हो तेच आहे.
Pages