..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही गप्प नको बसूस. फार फार तर एक दोन तास इतर कोणी प्रयत्न करत आहे का याची वाट पाहून मग उतर मैदानात Happy

७/१७९
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अचानक हुकुमशाही जाहीर करतात.
मी म्हणेन ती पूर्व दिशा. कुणी विरोध केला की खल्लास. दहशत बसते लोकांमध्ये. तर घाबरून अमेरिकेचे लोक कुठले गाणे म्हणतील?

7/179
जो तुमको हो पसंद, वो ही बात कहेंगे
???

बिंगो झिलमील!

७/१७९
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अचानक हुकुमशाही जाहीर करतात.
मी म्हणेन ती पूर्व दिशा. कुणी विरोध केला की खल्लास. दहशत बसते लोकांमध्ये. तर घाबरून अमेरिकेचे लोक कुठले गाणे म्हणतील?

उत्तर: Joe तुम को हो पसंद वही बात कहेंगे
तुम दिन को अगर रात कहो तो रात कहेंगे.

7/179
(मनमोहना) तू जो भी दे खुशी हो या ग़म
तेरे प्यार की कसम है मंजूर हमें

?

अरे एकदम ठप्प? बरं हे घ्या सोपे असावे

७/१८०
मोसंबी ताजी आहेत, ती घेउन बिया विखरून टाका असे म्हणणार्‍या शेतकरी कम फेरीवाल्याचे गाणे

7/181

एक फळविक्रेता केवळ सफरचंद आणि मोसंबी विकत असे. अतिशय उत्तम ताजी फळं. शिवाय त्याचं वैशिष्ट्य असं की तो सफरचंद अर्धं कापून विकत असे आणि त्याची मोसंबी सीडलेस असे. विकताना या फळांच्ं वर्णन तो एका गाण्यातून करत असे....

7/181

क्ल्यू 1: गाण्यातील हिरोच्ं नुकतंच निधन झालं.
क्ल्यू 2 : त्याच्या गाजलेल्या चित्रपटातील गाजलेलं गीत

बरोबर झिलमिल.

7/181

एक फळविक्रेता केवळ सफरचंद आणि मोसंबी विकत असे. अतिशय उत्तम ताजी फळं. शिवाय त्याचं वैशिष्ट्य असं की तो सफरचंद अर्धं कापून विकत असे आणि त्याची मोसंबी सीडलेस असे. विकताना या फळांच्ं वर्णन तो एका गाण्यातून करत असे....

उत्तर (झिलमिल)

सुहाना सफर (चंद नाही कारण अर्धं कापलेलं सफरचंद) और ये मोसम (बी नाही कारण सीडलेस) हसीन

७/१८०
मोसंबी ताजी आहेत, ती घेउन बिया विखरून टाका असे म्हणणार्‍या शेतकरी कम फेरीवाल्याचे गाणे

उत्तर (झिलमिल)
धरती कहे पुकार के, बीज बिछा ले प्यार के
मौसम बीता जाय, मौसम बीता जाय ("मौसंबी ताजाय")
Happy

एक महासोपं

7/182
"काय बनवतोयस रे ? किती पसारा केलायस." ताईबाई धाकट्या भावावर करवादल्या.
"शाळेच्या प्रोजेक्टकरता पुठ्ठयाचा वाडा करतोय. झालाच आहे. आता हा दरवाजा फक्त लावायचाय. आता रंगवून ठेवतो म्हणजे सकाळपर्यंत सुकेल. मग तो लावेन." कौतुकानं आपल्या वाड्याकडे बघत भाऊसाहेब वदते झाले.
पण सकाळी उठून बघतात तो काय! दरवाजा गायब होता. हे नक्की ताईटलीचं काम. लपवून ठेवला असणार.
भाऊसाहेब ताईला जोरजोरात हलवून उठवू लागले अन गाऊ लागले....

बरोबर मानव आणि श्र.

उत्तर (मानव, श्र)
दी, दार दे
दी, दार दे

Pages