मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. 
जबरी गाणे आणि श्र चे उत्तरही
जबरी गाणे आणि श्र चे उत्तरही
७/१६४ एक अति सोपे गाणे
मंडईतून पालेभाजी घेउन निघालेला एक मुलगा एका वळणावर प्रेमात पडतो.
१६४ -
१६४ -
मै निकला 'गड्डी' लेके...
(No subject)
परफेक्ट
मी विचारते आता...
मी विचारते आता...
७/१६५ गाणे सोपे आहे , अंडररेटेड
तू म्हंजी जणू अत्तराचा फाया
नाव घेतल्या बरोबर
वास लागला घुमाया अन्
जाऊ लागल्या झोकांड्या
१६५ -
१६५ -
के तेरा जिक्र है, या इत्र है...?
बरोबर.
बरोबर.
७/१६५ गाणे सोपे आहे , अंडररेटेड
तू म्हंजी जणू अत्तराचा फाया
नाव घेतल्या बरोबर
वास लागला घुमाया अन्
जाऊ लागल्या झोकांड्या
उत्तर , श्रद्धा....
७/१६५ के तेरा जिक्र है, या इत्र है.
मै निकला 'गड्डी' लेके. >>
मै निकला 'गड्डी' लेके. >>
श्रद्धा....म्हणजे गाण्यांचा
श्रद्धा....म्हणजे गाण्यांचा encyclopedia आहे!
मला एक गाणं धड आठवत नाही......!!
निकला 'गड्डी' लेके
निकला 'गड्डी' लेके
७/१६६
७/१६६
कोकणात फिरायला आलेला रोहन एका घरगुती खानावळीत जेवायला जातो. तिथल्या आजी, रोहनला जेवणाचं कौतुक सांगत असताना, त्यांच्या नातीने म्हणजेच रागिणीने बनवलेल्या गोल गरगरीत भाकऱ्या म्हणजे चंद्रच, असं वर्णन करतात. जेवणाचं ताट पाहिल्यावर रोहनला त्याची खात्री पटते. रागिणीच्या हातची भाकरी खाऊन जणू तो सगळं जगच विसरतो. रात्री समुद्रकिनारी फेरफटका मारायचा बेत विसरून, तो रागिणीचाच विचार करत राहतो.
दुसऱ्या दिवशी येऊन, तो रागिणीला कोणतं गाणं ऐकवेल?
काही clue द्या ना..
काही clue द्या ना..
कल चौहदवी की रात थी शब भर रहा
कल चौहदवी की रात थी शब भर रहा चर्चा तेरा
किसने कहा ये चांद है किसने कहा चेहरा तेरा
?
मला तर रागिणी मुख चंद्रमा हे
रागिणी मुख चंद्रमा ?????
नाही वावे.
नाही वावे.
रागिणीच्या चेहऱ्याचं वर्णन नाहीये. आणि त्या भाकरीमुळे रोहन काहीतरी विसरला. ते सांगतोय तो गाण्यातून.
रागिणी भूक चंद्रमा
रागिणी भूक चंद्रमा
#चुकीचीऐकूआलेलीगाणी
ह पा.. तुम्हाला नेमके काय
ह पा.. तुम्हाला नेमके काय म्हणायचंय रागिणीला भूक लागली आहे.. कि चंद्राच्या आईला. ?
मला ते रागिणी मूक चंद्रमा असे
मला ते रागिणी मूक चंद्रमा असे वाटायचे..
गाणं मराठी कि हिंदी?
गाणं मराठी कि हिंदी?
जब से देखा है तेरे हाथ का
जब से देखा है तेरे हाथ का चान्द
मैने देखा नही रात का चान्द
बिंगो झिलमिल....
बिंगो झिलमिल....
७/१६६
कोकणात फिरायला आलेला रोहन एका घरगुती खानावळीत जेवायला जातो. तिथल्या आजी, रोहनला जेवणाचं कौतुक सांगत असताना, त्यांच्या नातीने म्हणजेच रागिणीने बनवलेल्या गोल गरगरीत भाकऱ्या म्हणजे चंद्रच, असं वर्णन करतात. जेवणाचं ताट पाहिल्यावर रोहनला त्याची खात्री पटते. रागिणीच्या हातची भाकरी खाऊन जणू तो सगळं जगच विसरतो. रात्री समुद्रकिनारी फेरफटका मारायचा बेत विसरून, तो रागिणीचाच विचार करत राहतो.
दुसऱ्या दिवशी येऊन, तो रागिणीला कोणतं गाणं ऐकवेल?
उत्तर : जब से देखा है तेरे हाथ का चान्द
मैने देखा नही रात का चान्द
वाह मस्त. मला हे गाणं माहीत
वाह मस्त. मला हे गाणं माहीत नव्हतं.
मला पण माहीत नव्हते मी आपले
मला पण माहीत नव्हते मी आपले सागरकिनारे गाणी शोधत होते
माहितीच नाही हे गाणं
झिलमील यांनाही प्रचंड गाणी
झिलमील यांनाही प्रचंड गाणी माहीत आहेत.
मुझे कुछ केहना है.. मधलं आहे.
मुझे कुछ केहना है.. मधलं आहे. खूप पूर्वी 1857 मध्ये तुषार कपूरने सोलो हिरो म्हणून debut केला होता सिनेमात तो सिनेमा.
खूप पूर्वी 1857 मध्ये तुषार
खूप पूर्वी 1857 मध्ये तुषार कपूरने सोलो हिरो म्हणून debut केला होता सिनेमात तो सिनेमा. >>>
त्या वेळेस ईस्ट इण्डिया कंपनीच्या मिटिंग मधे ते राष्ट्रीय उठावाचे नंतर बघा. आधी हा पिक्चर पाहा अशी चर्चा चाले.
फारएण्ड
फारेंड
फारेंड
Time travel झाले... डब्बा
Time travel झाले... डब्बा मेरे डब्बा डब्बा, मैने कोई जादू नही किया तूही मेरे पिछे आया पिया...
हे एकेकाळी फार आवडायचे हे खेदाने नमूद करते.
Pages