मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या.
नाही मी बोलत, नाथा ???
नाही मी बोलत, नाथा
???
संगीत मानापमान - भामिनी
पण गाणं कदाचित चुकिचं आहे
चारच ओळी म्हणजे नाट्यगीत
चारच ओळी म्हणजे नाट्यगीत असावं
मला क्लूज वाचल्यावर फक्त
मला क्लूज वाचल्यावर फक्त रावसाहेबांचं "हे धैर्यधर काय, याच्यावर कुत्रं खुश होणार काय भामिनीचं. लुगडं धू की रे भामिनीचं" वगैरे वाक्येच आठवत आहेत गाण्यापेक्षा
पण त्या वाक्यांना कोणत्यातरी गाण्याचा संदर्भ दिसतोय.
नाही मी बोलत, नाथा
नाही मी बोलत, नाथा
???
संगीत मानापमान - भामिनी >> योग्य ट्रॅक झिलमिल. बाकीची गाणी शोध.
चारच ओळी म्हणजे नाट्यगीत
चारच ओळी म्हणजे नाट्यगीत असावं >> बरोबर.
फारएण्ड
फारएण्ड
मला क्लूज वाचल्यावर फक्त
मला क्लूज वाचल्यावर फक्त रावसाहेबांचं "हे धैर्यधर काय, याच्यावर कुत्रं खुश होणार काय भामिनीचं. लुगडं धू की रे भामिनीचं" वगैरे वाक्येच आठवत आहेत गाण्यापेक्षा Happy पण त्या वाक्यांना कोणत्यातरी गाण्याचा संदर्भ दिसतोय. >>
ऐकतेय.
धनराशी जात मुढापाशी
धनराशी जात मुढापाशी
धनराशी जात मुढापाशी >>> या
धनराशी जात मुढापाशी >>>
या गाण्याचा कोड्याशी काय संबंध सापडला? नाही हे नाही.
धिक्कार मन साहीना
धिक्कार मन साहीना
क्ल्यु ३ : गाण्याच्या पहिल्या
क्ल्यु ३ : गाण्याच्या पहिल्या किंवा दुसर्या (लिहिलेलं पाहिलं तर दुसर्या. गाताना पहिल्या.) ओळीतील केवळ ४ शब्द. आणि हे गाणं केवळ चार ओळींचं आहे.
>> हा क्ल्यु किंचित बदलला आहे. नेटवर पाहिलं तर लक्षात आलं.
धिक्कार मन साहीना >> नाही.
धिक्कार मन साहीना >> नाही.
एक शब्द एका इंग्रजी शब्दासारखा आहे.
मानापमानातील पदं बघा ना. आता
मानापमानातील पदं बघा ना. आता यायला हवं.
मामी मी तेच बघतेय..२० तरी
मामी मी तेच बघतेय..२० तरी गाणी आहेत..
क्ल्यु ५ : 'हे माझं काम नाही.
क्ल्यु ५ : 'हे माझं काम नाही.' असं भामिनीताई सांगतात.
सांगू का उत्तर?
सांगू का उत्तर?
सवतची भासे मला
सवतची भासे मला
Duty नसे ही माला
कर्रेक्ट झिलमिल. शाब्बास!
कर्रेक्ट झिलमिल. शाब्बास! जरा कठीण होतं हे.
७/२००
भामिनीताई गावाकडल्या असल्या तरी पक्क्या खमक्या होत्या. मुंबईत येऊन त्यांनी एका साडीच्या दुकानात विक्रेतीचं काम धरलं. एकदा दुकानाच्या मालकानं त्यांना दुकान झाडून काढायला सांगितलं तेव्हा आपला मान-अपमान समजून असणार्या भामिनी ताईंनी आपल्या गावच्या बोलीत त्याला चक्क एक मराठी गाणं गाऊन ठाम उत्तर दिलं.....
उत्तर : (झिलमिल)
Duty (दूती) नसे ही माला (मला) (ही माझी ड्युटी नाही)
चला आता त्या नव्या धाग्यावर
चला आता त्या नव्या धाग्यावर जाऊ. बाय बाय सातवा धागा!
झिलमिल दूती हे ड्युटी
झिलमिल दूती हे ड्युटी घ्यायचे मला कळलेच नसते कधी..
हायला संपली का दोनशे कोडी???
हायला संपली का दोनशे कोडी???
आत्ता आले मी.. 200वे तरी ट्राय केले असते. असो. नवीन बाफावर द्या शकुनाचं पैलं कोडं.
7व्या धाग्याच्या एशस्वी घोडदौडीनिमित्त सर्व लोकांचे अभिनंदन!
Pages