Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या संक्रांतीच्या धाग्यावरून
त्या संक्रांतीच्या धाग्यावरून तेच इथे पोस्ट करते.
वाण देण्यासाठी गेल्या १-२ वर्षांत आम्ही काही मैत्रिणींनी ठरवून नवीन प्रथा पाडली आहे. जवळच फूड बँक आहे जिथून होमलेस लोकांना, वृद्धाश्रमांना, आणि फोस्टर केअर सेंटरला अन्न पुरवठा होतो. तिथे काही डोनेशन देतो. आणि जमेल तसे कामही करतो. जितक्या मैत्रिणींना वाण द्यायचं असेल तेवढे पाउंड्स तांदूळ किंवा बीन्स, किंवा कॅन फूड असं जे जमेल ते देतो.
हकु ला येणार्या प्रत्येकीचं घर भरलेलं असतं. आपल्या त्या एवढ्याश्या वस्तूने असा काय फरक पडणार त्यांच्या जीवनात. मूठभर तांदूळाच्या ओटीपेक्षा तेच जर एखाद्या फोस्टर केअरला दिले तर लहान पोरे जेवल्याचं मानसिक समाधान तरी मिळते.
ए फु स.
काही प्रथा जशा चालू होत्या तशाच चालू ठेवू नयेत. विचारपूर्वक त्यात काही सकारात्मक बदल करावा.
लिंबे जास्त दिवस फ्रिजमधे
लिंबे जास्त दिवस फ्रिजमधे टिकण्यासाठी काय करावे? प्लॅ. पि मधे ठेवली, तर कुजतात, उघडी ठेवली तर वाळतात्...रस काढून ठेवला तर त्यातले सी विटॅमिन मरते. वरचेवर आणायला जमत नाहीये म्हणून महिन्यातून एकदाच आणून ठेवली तर असा विचार करते आहे पण टिकवायची तरी कशी?
लिंबे जास्त दिवस फ्रिजमधे
लिंबे जास्त दिवस फ्रिजमधे टिकण्यासाठी काय करावे? प्लॅ. पि मधे ठेवली, तर कुजतात, उघडी ठेवली तर वाळतात्...रस काढून ठेवला तर त्यातले सी विटॅमिन मरते. वरचेवर आणायला जमत नाहीये म्हणून महिन्यातून एकदाच आणून ठेवली तर असा विचार करते आहे पण टिकवायची तरी कशी?
लिंबं झाकणाच्या कोरड्या
लिंबं झाकणाच्या कोरड्या डब्यात ठेऊन डब्याचे झाकण लावून डबा फ्रिजात ठेवणे.
धन्यवाद मंजु, डबा प्लॅस्टीकचा
धन्यवाद मंजु, डबा प्लॅस्टीकचा का? की स्टीलचा?
कुठलाही चालतो, इकडे मुंबईत
कुठलाही चालतो, इकडे मुंबईत कुठल्याही डब्यात राहतात, पण लिंबं आणि डबा दोन्ही कोरडं पाहिजे. आणि कितीही काळजीपूर्वक हे सगळे केले तरी लिंबं फ्रिजमधे फारतर पंधरा ते वीस दिवस राहतात, त्याच्या वर राहत नाहीत.
लिंबू चवीसाठी खा. सी
लिंबू चवीसाठी खा.
सी व्हिटॅमिन मेले, तर सकाळी फ्रेश ऑरेंज ज्यूस प्या. असाही फार लिंबू रस आपण पीत नाही. व्हिटामिनांचा बाऊ करू नका जास्त. एक गोळी खाल्ली तर ५० एक लिंबांची भरपाई होऊन जाते
नैसर्गिक व्हिटामिन सोर्स
नैसर्गिक व्हिटामिन सोर्स सोडून अनैसर्गिक गोळी घ्यायला सांगताय? अरेरे!
मटकीला छान मोड आले आहेत पण
मटकीला छान मोड आले आहेत पण मधे मधे किंचीत बुरशी आल्यासारखा २-३ दाण्यांना जोडून कापूस आला आहे. फेकून द्यावी का?::अओ:
चिकट, बुळबुळीत झाली नाहीये. पण ते २-३ दाणे काढून टाकून बाकीचे खाण्यायोग्य असतील का? स्वच्छ धुवून वापरू का?
ते दाणे फेकून स्वच्छ धुवून
ते दाणे फेकून स्वच्छ धुवून वापरता येईल.
धन्स सायो. मी असाच विचार करत
धन्स सायो. मी असाच विचार करत होते. नेहमीच्या हमखास प्रोसेस्नेच मोड आणले आहेत तरी असे का झाले असावे?
ते २-३ दाणे काढून टाकून
ते २-३ दाणे काढून टाकून बाकीचे स्वच्छ धुवून वापरून टाका.
लिंबू चवीसाठी खा. सी
लिंबू चवीसाठी खा.
सी व्हिटॅमिन मेले, तर सकाळी फ्रेश ऑरेंज ज्यूस प्या. असाही फार लिंबू रस आपण पीत नाही. व्हिटामिनांचा बाऊ करू नका जास्त. एक गोळी खाल्ली तर ५० एक लिंबांची भरपाई होऊन जाते
आणि
नैसर्गिक व्हिटामिन सोर्स सोडून अनैसर्गिक गोळी घ्यायला सांगताय? अरेरे! >>>>
यावरून आठवलं. आई तिच्या नोकरीच्या सुरवातीच्या दिवसातला पीएसएम डिपार्टमेंटमधला एक किस्सा सांगायची. अंबाजोगाईच्या त्यावेळच्या (२५-३० वर्षांपूर्वीच्या) पीएसएम च्या हेडनी एकदा मुलांना गरीबांना परवडेल असा स्वस्तातला व्हिटॅमिन सी सोर्स कोणता म्हणून विचारलं होतं. मुलांनी लिंबू, आवळा अशी बरीच उत्तरं दिल्यावर सरांनी सांगितलं या सगळ्यापेक्षा स्वस्त व्हिटॅमिन सी च्या गोळ्या असतात.
मटकी चिकट होते मोड आणायला
मटकी चिकट होते मोड आणायला ठेवली की. उन्हाळ्यात तर मोड येइपर्यंत मी २-३ वेळा तरी धुवून पुन्हा झाकून ठेवते. नाही तर हमखास बुरशी लागते.
अल्पना ...लिंबू जाड
अल्पना ...लिंबू जाड प्लॅस्टीकच्या पिशवीत(पारदर्शक नको) फ्रिजमध्ये तळाशी ठेऊन दिल्यास महिना २ महिने टिकतात.
माखना सीड्स च्या पाककृती कुणी
माखना सीड्स च्या पाककृती कुणी सांगेल का?
मखान्यांची खीर करतात.
मखान्यांची खीर करतात. पनीरच्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा घालतात काही जण तळलेले मखाणे. माझ्या साबा बाळांतणीसाठीचा डिंकाचा पंजाबी प्रकार बनवतात त्यात पण मखाणे घालतात तळलेले.
माझी फेव्हरीट रेसेपी म्हणजे मखाणे तुपावर परतायचे आणि त्यावर मीठ आणि जीर्याची पुड भुरभुरायची.
माखना सीड्स मी अजुन पाहिल्याच
माखना सीड्स मी अजुन पाहिल्याच नाहीयेत.....
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/31689
http://www.maayboli.com/node/24273?page=82
http://www.maayboli.com/node/24273?page=4
इथे पुर्वी मखान्यांवर चर्चा झाली होती.
गीता,
गीता, http://www.maayboli.com/node/14636 हे बघा .
मनुस्विनीने पण लिहिली होती एक
मनुस्विनीने पण लिहिली होती एक मखाण्याच्या लाडवांची कृती.
अल्पना, तुझ्या पद्धतीने मखाणे करून खाण्यात येतील
मी मायक्रोवेवमध्ये भाजून त्यावर मीठ, मिरेपूड आणि ऑऑ शिंपडते. एकदा ज्वारीच्या लाह्यांना करतो तशी फोडणी करून पण खाल्ले होते.
सापडले
सापडले
http://www.maayboli.com/node/20772
मी डोश्यासाठी ३.५ वाट्या
मी डोश्यासाठी ३.५ वाट्या तांदुळ आणि १ वाटि मुगडाळ असे पिठ वाटले. ते चांगले फुगले देखिल!!! पण त्याचे डोसे दडदडीत झालेत!!! असं का झालं?? आता ते मऊ होण्यासाठी काय करु??? प्लिज सांगा!!!
मी नेहमीप्रमाणे ४:१ या
मी नेहमीप्रमाणे ४:१ या प्रमाणात तांदुळ-उडीद डाळ इडलीसाठी भिजवले. सकाळी अकराच्या दरम्यान मिक्सरमधुन काढले. आजचे तापमान ४० डी से होते त्यामुळे संध्याकाळपर्यंत पीठ छान फुलुन येइल असे वाटत होते. पण..... संध्याकाळी सातपर्यंत अजिबात हालले नव्ह्ते.......... नऊपर्यंत किंचित फुलले... येव्हढ्या उन्हाच्या दिवशी घरात चांगलेच गरम होत असताना पीठाने असा दगा का द्यावा? आता बाहेरच ठेवले आहे. सकाळपर्यंत अजून थोडे वर येइल असे वाटतेय. त्यात आता कुल चेंज आला आहे.
(माकाचु वर टाकायची पोस्ट इथे टाकली आहे याची जाणीव आहे. एक डाव माफ करा)
उडीद डाळ घ्यायला हवी होती का?
उडीद डाळ घ्यायला हवी होती का? डाळ चुकली.
४:१ प्रमाणात इडल्या होतात का?
४:१ प्रमाणात इडल्या होतात का? मी नेहमी २:१ घेते.
मी पण २:१ आणि ३:१ प्रमाण ऐकलं
मी पण २:१ आणि ३:१ प्रमाण ऐकलं आहे ४:१ माझ्यासाठी नविन माहिती आहे. ह्युमिडिटी कमी पडली असेल का?
चाराला एक? बहुतेक तांदूळ
चाराला एक? बहुतेक तांदूळ जास्त झाल्याने पीठ फुगत नाहीय. कुठल्या जातीचा तांदूळ घेतला होता?
उडीद डाळ वाटल्यावर तांदळामधे चांगले मिक्स केले होते का?
मी डोश्यासाठी ३.५ वाट्या
मी डोश्यासाठी ३.५ वाट्या तांदुळ आणि १ वाटि मुगडाळ असे पिठ वाटले. >> उडीद डाळ घातली नाही का? मग मुगडाळीचे प्रमाण वाढवायला हवे होते.
मी इडलीकरता तांदूळ न घेता
मी इडलीकरता तांदूळ न घेता इडली रवा आणि उडदाची डाळ घेते. प्रमाण दीड वाटी: पाऊण वाटी
Pages