युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भजी....
कशी?
>>>

त्या मिसळलेल्या पीठात जीरं-मिरची वाटण, मीठ, कोथिंबीर, दाण्याचं कूट वगैरे लाड करून भज्यांसारखे सैलसर पीठ भिजवून त्यात गरम तेलाचे मोहन घालून नीट मिसळून गरम तेलात भजी तळणे.

मी नुकतेच अंड्याचे दोन पदार्थ (खारे) बनवून पाहिले. छान जमले, आवडले पण त्याला येणारा अंड्याचा वास नाही लपला. ते नाही आवडते. तो झाकायला काय काय करता येईल?

हसरी, हे वाचल का? <स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.>
चपला घालून स्वैपाक्घरात नै याय्च Happy

सहेली, दालचिनी पूड / हळद / अन्य मसाल्याचे पदार्थ घालून अंड्याचा वास कमी होतो. पण तरी ज्यांचे घ्राणेंद्रिय खूप तीक्ष्ण / संवेदनशील आहे अश्या लोकांना तो वास येतोच!

सहेली ,lemon rind (लिंबाच्या सालीचा फक्त पिवळा भाग) वापरुन बघा. केकच्या क्लास मध्ये सहसा वॅनिला किंवा lemon rind वापरायला सांगायचे.
पण अरुंधती म्हणते तस सेन्सिटिव्ह असेल नाक तर येतोच अंड्याचा वास. (मला येतो)

सहेली, माझी आई गॅस बंद करायच्या जस्ट आधी गरम मसाला घालून थोडं सारखं करून अंड्याचे पदार्र्थ (म्हणजे ती फक्त बुर्जीसाठीच हे करताना मी पाहाते) झाकते. त्याने पण वास कमी होतो. पण शक्यतो जातोच असं नाही.
रच्याकने, तुम्ही कुठले खारे पदार्थ करून पाहिले? मला खारे पदार्थ वगैरे म्हटल्यामुळे उगाच काय नवीन असेल बरं असं केव्हापासून लागून राहिलंय Wink Proud

हो काढले

रचाक्याने
चटनी नेमकी कशी करायची
चिंच्+खजुर
१> शिज वुन की
२> रात्र भर भि जवुन ??

धन्यवाद ग सगळ्यांना!
माबोवरच वाचलेल्या रेसिपी आहेत त्या. विक्रमसिंह यांनी दिलेली व्हेजिटेबल केकची आणि मामींनी दिलेली होल व्हीट बन्सची. (त्या रेसिपिंच्या लिंक्स कशा द्यायच्या इथे?)

नेटवर मोरावळ्याची कृती पाहिली याबबत...
१. मोरावळा तयार झाल्यावर मीठ टाकलच पाहिजे का ?
२. मोरावळा थंड झाल्यावर बरणीत भरल्यावर फ्रिजमध्ये न ठेवता बाहेर राहू शकेल का ? किती दिवस ?

धन्यवाद Happy

जुयी मोरावळा बाहेरच ठेवायचा असतो. तो जितका जूना तितका औषधी. पण आमच्याकडे घरी बरणीला कायम दादरा असायचा,

मोरावळ्यात मीठ घालतात्?:अओ:

दक्षिणा बरोबर सान्गतेय. जेवढा जुना तेवढा औषधी.

एक दक्षिणेकडच्या मैत्रिणीने सांगितले डोसे-इडली पीठ भिजवताना १ चमचा खायचा-सोडा घालयचा कारण इथे परदेशी temp ४-५ degree सुरु आहे.

तसे पीठ करून , आंबवणेपण झाले आहे पण खाताना २-३ डोसे खाल्ले कि बस वाटते. खरच सोडा टाकायची गरज आहे का ?? सोडा चे काय वाईट परिणाम ?? ऐकून आहे सोडा टाकू नये पण का ते माहित नाही ??

गुलमोहोर सोडा टाकल्याने पदार्थ नीट आंबण्यास मदत होते. पुरेशी उष्णता नसल्यास सोडा वापरणे योग्य. पदार्थ हलका आणि खुसखुशित होतो. सोड्याचे दुष्परिणाम म्हणजे पोटात गॅस होतो.

मला नक्की माहित नाही, कारण मी एवढ्या कमी टेम्पमधे कधी राहिले नाही, पण आम्च्या समोरच्या आंटींनी एकदा त्यांच्या नातसुनेला सल्ला देताना सांगितलं होतं की एवढी थंडी असेल तर पीठाचं जे भांडं आहे ते गरम ओव्हनमधे ठेवून दे. पीठ व्यवस्थित आंबेल.

सोडा घातल्याने पीठ आंबलं तरीही ते नेहमीसारखी चवीचं लागत नाही. शिवाय सोड्याने बर्‍याचदा पदार्थ दडदडीत होतो.

नन्दिनी इज राईट. हो ते पीठाचे भान्डे ओव्हन ५ मिनिटे गरम करुन नन्तर बन्द करुन त्यात ठेवावे. आतल्या उबेने मस्त फुगते. स्वानुभव.

जास्त सोडा पोटास हानिकारक.

मला हे सांगा हॉट चॉकोलेट आणि कोल्ड कॉफी नक्की कशी बनवायची? माझ्याकडे कॅडबरीची कोको
पाव्डर आहे. त्यात साखर व गरम दूध घातले कि झाले का ? कोल्ड कॉफीत बर्फ घातला कि ती पाणचट होईल
का? प्लीज टुबी टेलिन्ग.

amaa! barf ghalayachi garaj naahI tyaevaji ice-cream ghala ..mast laagel..

अमा, कोको पावडर, कॉफी, साखर, थोडा बर्फ, दुध, व्हिप्ड क्रिम इत्यादी ब्लेंडरमधून फिरवायचे. व ग्लासात ओतून परत थोडं व्हि.क्रिम व कोको पावडर्/नेस्क्विक भुर्भुरायचे. Happy आईसक्रिमही मस्त! Happy

हॉट चॉकलेट इकडे पाणिदार देतात गरम गरम. व वरून व्हिप्ड क्रिमचा गोळा. Happy

अमा,
हॉट चॉकलेट साठी २टे स्पून कोको + २ टे.स्पून साखर + १/४ कप पाणी मावेत गरम करायचे. त्यात दीड कप दूध आणि आवडत असेल तर अगदी थोडासा(१/८ टी स्पून) वॅनिला घालून नीट ढवळायचे आणि मावेत गरम करायचे. मग मधे ओतून वर विप्ड क्रिम!

कोल्ड कॉफी करताना व्हनिला आइसक्रीमचा स्कुप घालायचा असं विपूतपाककृतीनिपूणकाकूंनी सांगितलं होतं. फार मस्त क्रीमी लागते कोल्ड कॉफी.

Pages