युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए,सगळ्यांची खूप आभारी आहे. मंजूडी ने दिलेल्या लिन्केत ते बार्ली असल्याचं सांगतायत. शेतीची जनावरं आणि घोड्यांनाही खाऊ घालतात म्हणे...
मला चालेल... धावेल Happy
असो... अग्रज म्हणून दुकानं आहेत भारतात तिथे मिळतय अशी बातमी आहे. मिळालं की खाऊन (मगच) सांगेन इथे... तेच ते का काय ते.
हे सातूचं पीठ आणि कोकणातल्या आजोळच्या आठवणींची सुरेख पेड आहे मनात... कधीपासून खुणावतेय... म्हणून हे डोहाळे Happy

आत्ताच महाराष्ट्र व्यापारपेठेतून सातू आटा आणि सातूचे लाडू आणले.
सातू आटाच्या पाकिटावर दिलेली माहिती. Sattu atta is primarily made roasting barley (हिंदीत जौ) at even temperature and mixing with other flour.
Ingredients : Barley wheat, sprouted moong, Dale

http://madhumitafoods.in/FLOURS.html

माझ्याकडे एमडीएचचा बटर चिकन करी मसाला आहे. मसाला नवऱ्याने चिकन करायला आणला आणि एकदा करुन त्याचा उत्साह संपला. मी चिकन बनवत नाही. तर आता हा मसाला व्हेज पदार्थात कुठल्या वापरता येईल का?

चिकन मसाल्यामध्ये काही नॉनव्हेज इन्ग्रेडिअंट्स नसतात त्यामुळे साध्या भाजी, रस्श्यात घालता येइल.
पराठ्याच्या सारणात घालता येइल.

इथले वाचून मी काल किन्वा आणले. पण ३४० ग्राम ला ६०० रु? हे घरी आल्यावर वाचून बघितले तेव्हा कळले. हे भगवान त्यात किती किलो साबुदाणा आणि बेसन आले अस्ते. मी शेंगदाणा देखील पावकिलोच आणते. तर आता तो नीट संपवायला पाहिजे. प्रॉडक्ट ऑफ पेरू एस्पोर्टेड बाय सम कंपनी इन न्यूयॉर्क इंडीड. किन्वा किती भिजवायचा, खिचडी शिवाय अजून काय करता येइल ?

अश्विनीमामी .... किन्वा इतक महाग आहे भारतात
तो १/२ तास पाण्यात भिजवुन पाणी फेकुन देणे त्याने ते पचायला खुप सोपे होते. मागे मनुस्विनीने लिहिले होते याबद्दल बरेच.. शोधायचा प्रयत्न केला पण सापडत नाहिये.
मी भिजलेले किन्वा रात्रभर ठेऊन द्यायचे . मोड येतात छान त्याला सकाळी. पचायला अजुन सोपे Happy
किन्वा पॅटीस, पुलाव, किन्वा उपमा, किन्वा चिकन पुलाव, डोसा जे आवडेल ते करु शकता.

अमा., बहुतेक गणेशोत्सव स्पर्धेत 'किन्वा पॅटीस'ची पाककृती आली होती. केली नाही अजुन पण छान वाटली होती.
केशर, चांगली माहिती. मोड आणुन पहावे लागेलच आता.

शेंगोळे तळतांना फुटत आहेत. उपाय सांगा प्लीज.
तांदळाच्या पीठात ति. मि. आणि तीळ, पाणी घालून मिक्स करून तळायचे होते. माकाचु?

तिळगूळ करायचा आहे पहिल्यांदाच करणारे पण ज्या रेसीपी वाचल्या त्या सगळ्या किलोच्या प्रमाणात आहेत. मी १ किलो तीळ आणि १ किलो चिक्कीचा गुळ आणलाय पण एवढा एकदम करायचा धीर होत नाही. मला प्लीज कोणितरी त्यातल्या वाटीच्या प्रमाणातली कृती सांगा ना.

सोप्प आहे ते जितका गूळ तितकेच तीळ......गेल्या वर्षी पहिल्यांदा केले तेव्हा या प्रमाणाने लाडु कडक झाले होते.....एक वाटी गूळ असेल तर एक वाटी तीळ आणि अजुन अर्धा वाटी किंवा ३/४थ वाटी दाणे व सुक खोबरं घाला....त्यात अर्धा चमचा तुप घाला...लाडु फसणे शक्यच नाही.....

चिन्नु, कोणता पदार्थ करत होतीस??? मकरसंक्रातीची तयारी चालू झाली वाटत Happy
बंगारू लड्डू, अरीसालू, मुरुक्कु काय काय बनवलस???

आरती या सगळ्य उकारान्तातले मुरुक्कु माहीत आहे. सहज मिळते.
अरीसालू शोधले तर अनारश्यांचे भाईबंद वाटले.
पण बंगारू लड्डू काय आहे? गुगलला बंगारू नावाची फक्त माणसेच माहीत आहेत.

इथे विचारणे बरोबर की नाही माहिती नाही..
पण युक्ती सांगा .. अथवा दुसरा योग्य धागा सांगा..
संक्रांतीला लुटायला कुठली वस्तु द्यावी?
दुसरीच आहे.. पहिल्या वेळी प्लास्टिक डब्बे दिले होते ...
२० जणींना द्यायचे आहे... ३०-५० रु. किंमती पर्यंत चालतिल...
मदत..

स्टील चे चमचे (मोठे जेवण बनवायचे)....साबण वडी....साखर......प्लास्टिक बॉटल.....काचेची बरणी.....मुंबईत राहत असाल तर सरळ लिंकींग, फॅशन स्ट्रीट ला जा आणि मनी पर्स्/क्लच ५० पर्यंत मिळतात,..... फेस वॉश,....

मयेकर, बंडारू लड्डू (Bandaru Ladoo) म्हणजे बुंदीचे लाडू. आंध्रमध्ये मकरसंक्रांतीला बुंदीचे लाडू मस्ट आहेत. अजून काही पदार्थ म्हणजे निपट्टू (Nippattu), करंजी, मेदू वडा, खारा पोंगल, गोड पोंगल. हे सर्व पदार्थ मकरसंक्रांतीला ईकडे बनवतात. मजा असते. आता माझ्याच तोंपासु. Uhoh
अरीसालू शोधले तर अनारश्यांचे भाईबंद वाटले. << बरोबर चवीत थोडा फरक आहे. Happy

संक्रांतीच्या वाणाची चर्चा सर्वांनीच वाचावी अशी आहे.

त्याच बाफवरची मेधा यांची पोस्ट वाचा, तसेच अनुश्री यांचीही पोस्ट वाचा आणि त्यावर जरूर विचार करा.

गेल्यावर्षी हाऊस किपींग च्याच सवाष्ण नसलेल्या बायकांना ही वाण दिले होते.>>>+१
माझ्या साबानी २० वर्षांपुर्वी फक्त सवाष्णीना वाण द्यायची प्रथा आमच्यापुरती डिसकार्ड केली.>>>+१
मेधाची पोस्ट आवडली.

Pages