युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इडलीचे पीठ आंबण्यासाठी स्टॅबिलायझर किंवा चक्क इनव्हर्टरवर ठेवते मी भांडे. पीठ चांगले आंबून येते.

प्रिभी तापवलेलं दुधाच भांड फ्रीजमध्ये ठेवावं. दोन तासानी घट्ट साय काढून फेटून वापरावी. दूध फुलक्रीम घ्यावे

आज ईड्लि चे मिश्रण भिजवले आहे.. रात्री बारीक करणार आहे..पण थंडी मुळे आंबणार नाही. स्पंजी होण्या साठी काय करावे(मावे पण नाही) उद्या सकाळी करायच्या आहे.

दळताना शिजलेला भात घालावा. ओव्हन असल्यास आधी थोडा तापवून त्यात तापवताना मोठ्या परातीत पाणी ठेवावं. मग हे दळलेलं पीठ झाकणबंद भांड्यात ठेवून ओव्हनमधे ठेवावं. ओव्हन बंद करायचाय.
गरम अन दमट ही गंमत असते पीठ नीट अंबून वर यायला.
नाहीतर यीस्ट वगैरे आहेच.

आयत्यावेळी पाहुणे आले किंवा आलेले जेवणाच्या वेळेपर्यंत थांबले आणि घरात भरपूर दही असल्यास... मस्तपैकी लस्सी बनवून आधी पिऊ घालावी. रूह आफझा असल्यास गुलाब, केसर पिस्ता, नुस्तीच वेलची-बिलची घालून किंवा जिर्‍याची पुड घालून खारी...
थोडक्यात काय तर त्यांचे पोटोबा भरून आपल्याला विचार तरी करायला वेळ मिळावा.

मग मसालेभात, खिच्डी बिचडी कायपण धावतं... असा नुक्ताच आलेला अण्भव आहे.
फक्तं प्रॉब्लेम इतकाच झाला की...
दोन दिवसांनी अजून एक मित्रं दांपत्यं... तो तुझा फेमस (??) लस्सी-मसालेभात मेन्यू जेवायला आलो असं म्हणतच घरात शिरले.... वर आणखी... फार चटकन जमतो तुला.... आयत्यावेळचा छानच मेन्यू हं...:)

आता घ्या... Happy

मी घरी तूप कढवलं ते जरा जास्त वेळ गॅसवर ठेवलं गेलं, रंग वेगळा आलायं आणि चवही बिघडल्ये , मुलीला नाही देते, आम्ही वापरू शकतो का फेकून द्यावं लागेल ? म्हणजे खाऊन अपाय नाही ना होणार काही ?

चव बिघडली म्हणजे कडवट झाले की तुरट की जळकट? त्यात खायचे पान टाकुन थोडा वेळ कोमट करा. पान काढुन टाका वास जाईल. आणी मुलीला नका देऊ, पण फेकता कशाला लगेच खराब होत नाही ते. कढी, खिचडी करताना वापरुन टाका.

जरा जळकट चव आली आहे, रवा भाजायला वगैरे वापरेन Happy , @ अश्विनीमामी - वाती भिजवलेल्याच आणतो तरी थोडं त्यात वापरता येईल , धन्यवाद Happy

प्राजक्ता_शिरीन, थंडीच्या दिवसांत कोरड्या पडलेल्या त्वचेला लावता येऊ शकतं असं तूप.
तुपाच्या दिव्यासाठी (निरांजन/ समई) वापरता येईल.

सांझ, इडलीचे पिठ लवकर वर येण्यासाठी सुकलेल्या लाल मिरच्या वाटलेल्या पिठावर ठेवाव्यात. पण भांड्याच्या खाली परात ठेव. कधी कधी पिठ एवढे फरसफसते की खाली सांडते.
मी आता तुझा मेसेज पाहीला. एव्हाना तुझ्या इडल्या करुन झाल्या असतील.

न चिरलेला अर्धा कांदा? श्रोडिंजर्स कॅट का?>>>>>>.. एक कांद्याचे २ भाग करुन पिठात ठेवावे...( मी बारिक न चिरलेला असे लिहायला हं होतं Happy )

ऑरेंज फ्लेवर पण ऑरेंजची चव अगदीच कमी किंवा न आलेली ग्लास भरुन जेली आहे. त्याचे काय करु? कशी संपवु?
रेडी केक मिक्स आणलेले आहे. त्यात वापरता येईल का? की वेगळा काही पर्याय?
मला फालुदा सुचलेला पण कोणी खाणार नाहीये.

जेलो सलाड??

* मला तूरडाळ शिजवल्यावर तिचा जो उग्र वास येतो तो घालवण्यासाठी काहीतरी युक्ती हवी आहे. नेटवर डाळ अगोदर अर्धा तास भिजवून ठेवा, शिजताना हळद घाला इत्यादी सांगितले आहे, जे नेहमीच केले जाते. तरी डाळ शिजवल्यावर तिचा उग्रट वास राहतोच. ह्यावर कोणाकडे काही उपाय / युक्ती असेल तर प्लीज शेअर करा.

कुकर उघडल्यावर येतो तो शिजलेल्या तूरडाळीचा उग्र वास की खाताना येतो तो म्हणत आहेस?

खाताना येत असेल तर गुळ घालायचा. की कमी वाटतो वास. शिजताना (हिंग-हळदीसोबत) मेथ्या घातल्यास तरी उग्रपणा कमी होतो.

मी अनेकदा तुरडाळ कोणतीतरी भाजी घालूनच शिजवते. उदा. सालीसकट लाल भोपळा, मेथी-पालक, दुधी, कोबी वगैरे जे असेल ते. नंतर हवं असल्यास आमटी-सांबार करावी किंवा नुसतिच खावी.

डाळीत हिंग >> हो घालते शिजवताना.

खाताना येणार्‍या उग्र वासाबद्दल उपाय हवाय. डाळीचे बहुदा वरणच केले जाते, त्यामुळे गूळ घालते. आता डाळ शिजताना मेथ्या घालून बघेन. थँक्स शर्मिला. Happy

Can somebody tell me how can I use enfamil formula powder? My daughter didn't like its taste ...she is 8months old..plz tell me ways to finish it

बाळाला जे सॉलीड फूड द्याल ( खिमटी, मॅश केलेल्या भाज्या/ फळं) त्यात फॉर्म्युलाचे दूघ घालता येइल.नाहीच खाल्ले तर उरलेला फॉर्म्युला कुणा गरजूला दान करा.

तुरीमधे मूग मिक्स करून वरण >> हो, तेव्हा तुरीचा वास इतका जाणवत नाही. पण फक्त तूरडाळीचे वरण असले की जास्त जाणवतो.

माझी कोथींबीरी ची चटणी नेहेमी थोडी कडवट होते. मी कोथींबीर, मिरच्या, आलं, लसूण, मीठ हे सर्व मिक्सर मधून काढ्ते. यात काही चुकते का? Sad Please help.

मला पण युक्ती हवीये भाज्यांचे कटलेट हाटेलात मिळतात तसे घट्ट तरीही खरपूस, खुसखुशीत बनवण्यासाठी.
माझे वरुन कुरकुरीत होतात, चव छान पण अगदी नाजुक होतात. हातातुन तोंडात नेइपर्यंत तुटतील का भिती असते. त्यात बटाटा जरा कमी व इतर भाज्या जास्त असतात. पावचुर्‍यात घोळवुनच परतते. युक्ती सांगाल.

Pages