Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुर्या चांगल्या
पुर्या चांगल्या टप्पारवेअरच्या डब्यात घालून ठेवा. आठपंधरा दिवस काही होत नाहीत.
@प्राडी आणि भरत मयेकर -
@प्राडी आणि भरत मयेकर - धन्यवाद. फ्रूट सॅलडची आयडिया छान वाटतेय.
@ पेट थेरपी - पुर्या आधीच तळलेल्या असल्याने पुन्हा ब्रेड्क्रम्ससारख्या वापरणे कसे होईल याची शंका आहे. पण करून पहायला हरकत नाही. धन्यवाद.
@नंदिनी - टपरवेयर म्हणजे (पुर्यांचे) आजचे मरण उद्यावर! त्यापेक्षा संपवून टाकणे उत्तम. धन्यवाद!
sunilt > एखाद्या
sunilt > एखाद्या पाणीपुरीवाल्याशी बोलून लागेल तेवढ्याच ( सुट्ट्या ) पुर्या आणता येतील का ते पहा.
BTW, रोज ते सोफे कशाने पुसले
BTW, रोज ते सोफे कशाने पुसले म्हणजे नव्यासारखे दिसतील?>> व्हाईट व्हिनेगरने (dilute) पुसून पहा.
@ sunilt - मुंबईच्या दमट
@ sunilt - मुंबईच्या दमट हवेत, कितीही स्टेपल्स वगैरे मारले तरी पुर्या नरम पडतातच. - पुऱ्या पापड प्लास्टिक पिशवीत ठेवून फ्रीज मध्ये ठेवून बघ . तशाच कुरकुरीत राहतात. माझा अनुभव पुण्याचा आहे . बघ ठेवून एकदा.
पाणीपुरी परत करायचीच नसेल तर वर उपाय आहेतच
पुर्या एका बशीत घेऊन मिनिटभर
पुर्या एका बशीत घेऊन मिनिटभर मायक्रोवेव करायच्या. थंड झाल्या की छान कुरकुरीत होतात.
@रावी - धन्यवाद. पण सुट्ट्या
@रावी - धन्यवाद. पण सुट्ट्या पुर्या आणणे शक्य वाटत नाही. एकतर त्या पॅकबंद पिशवीतूनच मिळतात. खेरीज, प्रत्येकाच्या नेमक्या भुकेचा अंदाज वर्तवणे कठिण. आणायच्या आणि कमी पडायच्या!
@म्रुणाल १ आणि प्राडी - धन्यवाद. प्रयोग करून बघायला हवा.
पाणीपुरीचा बेत केला की मला
पाणीपुरीचा बेत केला की मला बोलवत जा. हाकानाका.
नेक्स्ट टाईम, 'पाणीपुर्या कमी पडतात, अर्जंट बेसिसवर कुठून आणू?' अशी युक्ती इथे विचाराल
शेवपुरी, मसाला पुरी, एसपीडीपी
शेवपुरी, मसाला पुरी, एसपीडीपी हे चाट आपण फ्लॅट पुऱ्या वापरुन करतो. त्याऐवजी पाणीपुरीच्या गोल पुऱ्या वापरुन पण हे चाट करता येतात. बाकी पध्दत तीच पण पुरी फक्त वेगळी. अगदी सेम चव येत नाही पण पुऱ्या संपवायला बरं पडतं.
बारीक चिरलेला कांदा, उकडून कुस्करलेला बटाटा, कोथिंबीर, गोड चटणी, हिरवी चटणी, शेव असं पाणीपुरीच्या पुरीत घालायचं. आणखी चव येण्यासाठी मीठ, लाल तिखट, चाट मसाला घालावा हवं तर. यात वरती फेटलेलं दही पण घालता येतं. त्या दह्यातच मीठ, तिखट, चाट मसाला मिक्स करता येतो.
हा प्रकार ’झटपट चाट’ म्हणून खूप सोयीचा पडतो. जर चटण्या तयार असतील आणि बटाटे उकडून ठेवले असतील तर आयत्या वेळी करायला काहीच वेळ लागत नाही. आमच्याकडे घरचेच लोक जमले एकत्र तरी वीसेक माणसं सहज होतात. मग मुद्दाम यासाठी पुऱ्या आणून आम्ही हे चाट करतो
इब्लिस +१
इब्लिस +१
>> तर पाणीपुर्याच्या
>> तर पाणीपुर्याच्या पुर्यामंध्ये हा प्रसाद भरून वाटावा.
कुठे फेडाल हे पाप भरत?! तो सत्यनारायण जहाजं वगैरे बुडवण्यात एक्स्पर्ट देव आहे बरं का.
माझ्याकडे नेहेमी हनी बंचेस ऑफ
माझ्याकडे नेहेमी हनी बंचेस ऑफ ओट्स सिरियलचा भुगा तळाशी उअरतो. ती पावडर दुधात घालून खायला मुलिंना अजिबात आवडत नाही मग ती टाकून द्यावी लागते. ह्या प्रॉबलेम ला आहे का सोल्यूशन?
तो भुगा नुसता खायला छान
तो भुगा नुसता खायला छान लागतो. मी तरी खाते.
ते शक्य दिसत नाहीये सिंडे.
ते शक्य दिसत नाहीये सिंडे.
खजूर थोड्या तुपावर भाजून
खजूर थोड्या तुपावर भाजून त्यात तो भुगा मिसळून वरून आक्रोडाचे तुकडे लावून फॅन्सी फज बनव
बनाना ब्रेड, कप केक्स, कॉफी
बनाना ब्रेड, कप केक्स, कॉफी केक असे करताना वरुन शिंपड
नॉट अ बॅड आयडिया.. ते खपलं
नॉट अ बॅड आयडिया.. ते खपलं नाहीतर परत इथे येउन विचारते त्याचं काय करू म्हणून
इथे येण्यापेक्षा परस्पर खाऊन
इथे येण्यापेक्षा परस्पर खाऊन टाक की.
तो भुगा कणीक भिजवताना तीत
तो भुगा कणीक भिजवताना तीत मिसळ. मग पुढे काय होतं त्याच्या कारुण्यपातळीनुसार त्याबद्दल इथे किंवा ललितात लिही.

चिडलीस तर गझल लिही.
ललितासाठी एवढी यातायात नको बै
ललितासाठी एवढी यातायात नको बै
पॅटिस करताना ब्रेडच्या
पॅटिस करताना ब्रेडच्या भुग्याऐवजी हा भुगा वापर.
मला कामाला लावू नका..
मला कामाला लावू नका..
भुगाच उरु नये म्हणून सिरियल
भुगाच उरु नये म्हणून सिरियल आणल की बॉक्स मधुन पिशवी काढुन upside down आत घालायची मग ओपन ़केली कि सिरियल आणि भुगा दोन्ही खाल्ल जाईल..ना रहेगा भुगा...
प्राजक्ता , छान आहे आयडिया.
प्राजक्ता , छान आहे आयडिया.
आमच्याकडे पण भुगा उरतच नाही. सिरिअल , कंटेनर मध्ये काढल्यावर अधून मधून वर खाली हलवत राहिला कि भुगा उरत नाही. (मुलगी , कंटेनर सारखा नाचवत असते त्यामुळ हे आपोआप झालय आमच्या घरी.)
माझ्याच्याने काही ते उरलेल्या भुग्याच काही करण होणार नाही.
माझ्याच्याने काही ते उरलेल्या
माझ्याच्याने काही ते उरलेल्या भुग्याच काही करण होणार नाही.
>> माझ्याच्यानेही नाही... मी सिरियल खात नाही त्यामुळे भुगा हा माझा प्रॉबलेम नाही असं घरी अनाउन्स करणार आहे.
आधीच नाही का करायचंस? एवढे
आधीच नाही का करायचंस? एवढे महनतीने सल्ले दिले वायाच की
तसं नाही काही माझ्या
तसं नाही काही माझ्या आवाक्यातलं कोणी सांगितलं असतं तर केलं असतं कदाचित पण इथे नालेसाठी घोड्याची गत. केक करा, फज करा नाहीतर गझल करा...
केक करा, फज करा नाहीतर गझल
केक करा, फज करा नाहीतर गझल करा >>> तू यातलं एक काही न करता घोडा कशाला आणायला गेलीस?
शूम्पे, प्रसाद म्हणून रोज
शूम्पे, प्रसाद म्हणून रोज चमचाभर भुकटी खायला लाव.
प्रसाद म्हणून देणारेस तर
प्रसाद म्हणून देणारेस तर पाणीपुरीत घालून दे
Pages