पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे तर लयीच झ्याक झालं ! कंपनी चे नाव सांगाल का दिनेशदा. रसोई मॅजिक चे पाहिलय दुकानात ...ते कसय?

दीपाकुल : कॉफीचा फ्लेवर आवडत असेल तर कॉफीचे द्रावण घालून करा... फक्त, कडवट होणार नाही या बेताने!

ही कृती मी कुठे वाचली आठवत नाही बहुतेक क्रॅकर्सच्या पॅकवर होती:
१ कॅन कन्डेन्स्ड मिल्क, अर्धा कप ड्राइड पपई (टुटी-फ्रुटी म्हणतात देशात) ह्यात जेमतेम मावेल तेव्हढा बिस्किटांचा/क्रॅकर्सचा चुरा हे सगळं एकत्र करुन हव्या त्या आकाराच्या पॅनमध्ये (लोफ शक्यतो) थापायचा आणि २-३ तास रेफ्रिजरेट करायचा. नो कूक फ्रूट केक तय्यार.

इथे दुधी भोपळ्याची भाजी होती लिहिलेली दगडु तेली मसाला वापरुन केलेली, ती कुठे दिसत नाहिये... प्लीज कोणी सांगाल का?

ढेमश्याची भाजी कशी करायची ते सांगाल का कुणी प्लीज.. मी काल पहील्यांदाच ढेमसे आणले आहेत्. ही भाजी छान लागते अस ऐकलय.. पण कृती माहीत नाही..

मला पण हविये चांगली पाककृती ढेमसे उर्फ दिलपसंदची. कधीच केली किंवा खाल्ली ही नाहिये भाजी. हल्ली भाज्या कमी दिसताहेत, रोज त्याच त्या भाज्या खाण्यापेक्षा ही भाजी करुन बघावी असा विचार करतेय १-२ दिवसांपासून.

तोषवी, तेच. रसोई मॅजिकचे. आणखीही एकदोन ब्रँड आहेत बाजारात.

ढेमसे / टींडे ची भाजी साध्या फोडी करुन, दूधी भोपळ्याची करता तशी करता येईल, किंवा
देठाकडून ती पोखरुन, आतला सर्व गर काढून, त्यात भाजलेले बेसन, मीठ, तिखट, कोथिंबीर, हींग, व थोडी चिंच घालून मंद आचेवर झाकण ठेवून शिजवायची आणि मग तेलात परतून खरपूस करायची. यात सारण भरायचे ते कोरडे भरायचे आणि दाबून नाही भरायचे कारण कोरडे सारण थोडे फूगते.
कुठलेही आवडीचे सारण, जसे उकडलेला बटाटा, हिरवे वाटाणे वगैरे भरता येईल. सारण जरा मसालेदार करायचे.

थँक्यू दिनेशदा.. सकाळी डब्यासाठी करायचीय त्यामुळे फोडी करुन करीन.. पाणी कमी टाकाव लागत का दुधी भोपळ्याप्रमाणेच?

ढेमसे म्हणजेच टिंडे ना? Uhoh

कुसुमिता, अल्पना, दिनेशदांनी मागे भरल्या मिरच्यांची रेसिपी दिली होती, तेच सारण वापरून ढेमश्याची भाजी करता येईल. http://www.maayboli.com/node/21921

आणि ही तरला दलालची मसाला टिंड्याची रेसिपी

दुकानात त्या कमळांच्या सुकवलेल्या बिया व्हाईट मश्रुमसारख्या दिसणार्‍या पॅकेटमध्ये येतात त्यांना काय म्हणतात ? त्याची रेसिपी काय आहे ?

कुसुमिता१२३४, इथली नागपुरची मंडळी तुला ढेमश्याची एकदम ऑथेंटिक रेस्पी देतील, तोपर्यंत ही जुन्या मायबोलीतली लिंक वाच - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/59974.html?1120061597

जागू,
त्याना मखाणा ( उच्चार नक्की नाही) म्हणतात. कढईत थोडे तुप-जिरे घालून अगदी मंद आचेवर परतायचे. वरुन मीठ , साखर हवे तसे. कुरकुरीत झाले की छान लागतात. (नुसते अजिबात चांगले लागत नाहीत) खूप पौष्टीक असतात, मुलांसाठी चांगले.

ही एकच पद्धत मला माहिती आहे. आणखी काही असेल तर सांगा.

जागू मखाणे पनीरच्या वैगरे भाजीत घालतात ड्रायफ्रुटसारखे. त्यांची खीर पण करतात.
आणि वर अश्विनीने सांगितल्याप्रमाणे कढईत किंवा माय्क्रोव्हेवमध्ये थोड्या तुपात परतून मीठ -जीरेपुड घालून खाल्ले की मस्त लागतात.
दिनेशदा, मंज्ञ, अरुंधती टींड्यांच्या रेसेपीसाठी धन्यवाद.

माझ्याकडे सध्या टोमॅटो भरपुर आहेत.

टोमॅटोची प्युरी करुन फ्रिजमध्ये ठेवायचा बेत आहे. आइसट्रेच्या क्युब्समध्ये प्युरी भरुन त्याचे क्युब्ज करुन ठेवण्यासाठी आधी प्युरी शिजवुन घ्यावी लागेल ना? ही प्युरी करतात कशी?

साधना,
साधारणपणे प्युरी अशी करतात - टोमॅटो उकळत्या पाण्यात घालायचे. साल सुटायला लागलं की गॅस बंद करायचा. मग जराश्याने सालं काढून मिक्सरमधे प्युरी करायची, आणि त्या पेस्टला उकळी आणून ती थंड करून फ्रिजमधे ठेवायची. पण वर्षभर वगैरे टिकवण्यासाठी त्यात काही इतर पदार्थ घालतात का ते माहीत् नाही.
ह्या लिंकचा काही उपयोग होतो आहे का बघ http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103145.html?1181708793

मंजू, गुगल केले. पण एका मैत्रिणीने डबल बॉयलर सारखी एक पद्धत सांगितली होती. ती गुगलवर नाही सापडली. म्हणून इथे विचारले. Happy

प्राची, हो तु म्हणतेयस तेच मला माहित आहे. तु जुली अँड जुलिया मुवी बघ त्यात दाखवलय ते.

साधना, आता तिथे कडक उन असेल ना ? टोमॅटोचे उभे चार तूकडे करुन, किंचीत मीठ लावून वाळवताही येतील (देसी सन ड्राईड टोमॅटो ) हे वाळलेले टोमॅटो हवे तर मिक्सरमधून भरड वाटून ठेवायचे. भाजी, आमटी कशातही वापरता येतील. या तूकड्यांचे लोणचेही चांगले लागते.

प्राजक्ता, मी राजगिरा पिठात थोडं शिंगाडा पीठ, साबुदाणा पीठ पण मिसळते. शक्य असेल तर वरी तांदूळ पीठ पण. उपास भाजणीतही हेच घटक असतात. ही पिठं मिसळली की जिरेपावडर घालायची. आवडत असेल तर दह्यात/ ताकात किंवा नेहेमीसारखी पाण्यात भाजणी/पीठ भिजवायचं. आवडीप्रमाणे मिरची-कोथिंबीर वाटून घालायची. मीठ घालायचं आणि तुपावर थालिपीठ लावायचं.

यात वेरिएशन म्हणून किसलेला बटाटा किंवा भिजवलेला साबुदाणा(जर सा.पीठ नाही वापरलं तर) घालता येतो. गार झाली तरी मऊ रहातात. शिंगाडापीठ जास्त झालं तर कडक होऊ शकतात.

Pages