Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद तुपावर परतुन खऊन
धन्यवाद
.. खीर पण बरी लागेल असं वाटतयं..
तुपावर परतुन खऊन झालेत.. आता ग्रेवी ट्राय करेन ...
डोशाच्या पीठासाठी डाळी बरोबर
डोशाच्या पीठासाठी डाळी बरोबर दोन मुठी जाडे पोहे भिजत घालावे.
दळ ल्या नंतर पीठ लवकर आंबते, शिवाय चव पण मस्त होते.
लेकीच्या बोरन्हाणाला दडपे
लेकीच्या बोरन्हाणाला दडपे पोहे केले होते, ते बरेच उरलेत. कच्चा कांदा आणि नारळ म्हणजे फार टिकणार नाहीत, आणि घरातल्यांनी आजच यथेच्छ ताव मारलेला असल्यामुळे उद्या ते पोहे स्वरूपात खपणार नाहीत. त्याचं थालिपीठासारखं किंवा अजून काही बनवता येईल का? तेलकट नको, करायला किचकट नको.
गौरी, दडप्या पोह्यातले वाटीभर
गौरी, दडप्या पोह्यातले वाटीभर पोहे घेऊन आधी हा प्रयोग करून बघता येईल. व्यवस्थीत झाला तर उरलेले पोहे वापरता येतीलः
दडप्या पोह्यांना आंबट ताकात १० मिनिटं भिजवून, त्यात चमचाभर रवा घालून, ग्राईंडरमधून बारिक वाटून घ्यायचं. रवा कमितकमी अर्धा तास या मिश्रणात मुरू द्यायचा. नंतर मिश्रण घट्टं वाटलं तर थोडं पाणी घालून पातळ करायचं. आप्पेपात्रात घालून आप्पे करायचे. याच मिश्रणाची, नॉन्स्टिक तव्यावर, लहान आकाराची धिरडी लावता येतील. फक्त रव्याचं प्रमाण वाढवावं लागेल.
talkat nako mhanat ahat
talkat nako mhanat ahat tarihi ek suchvu ka? thode besan+paani ghalun vade karata yetil.
मृण्मयी, प्राची लगेच
मृण्मयी, प्राची लगेच सुचवल्याबद्दल धन्यवाद! आप्पे / धिरड्याची आयडिया आवडली. (नवरा बेळागावच्या दक्षिणेकडचा असल्याने कुठलाही पदार्थ `दोसा' या नावाने दिला तर तो नक्की आवडीने खाल्ला जातो!
)
हा प्रयोग फसला तर वडे करून बघते. तेही छान लागतील असं वाटतंय, पण जास्त खपणार नाही!
पोह्याची उकड करून बघता येइल.
पोह्याची उकड करून बघता येइल. मायबोलीवर आहे रेसिपी.
गौरी, मी नेहमी दडपे पोहे आहे
गौरी, मी नेहमी दडपे पोहे आहे तसेच नीट मळुन घेते (अजुन काहीही न घालता) व त्याचे तव्यावर थोड्या तेलावर पॅटीस करते. ए-वन होतात.
मृण्मयीने सुचवल्याप्रमाणे
मृण्मयीने सुचवल्याप्रमाणे दडपे पोहे मिक्सरमधून काढून त्यात आंबट दही आणि थोडा रवा मिसळला. त्याची धिरडी मस्त लागली. नॉनस्टिक तव्यावर केली अजिबात तेल घालावं लागलं नाही. एकदम हिट रेसिपी!
नीलमपरी, सुनिधी, दोन्ही कल्पना आवडल्या. पण हे वाचायच्या आधीच मी धिरडी करून टाकली. पुढच्या वेळी दडपे पोहे अजून जास्त उरवावे म्हणते ... वडे, पॅटिस, उकड असं सगळं करून बघायला!
भारतात स्किम मिल्क कुठे व
भारतात स्किम मिल्क कुठे व कुठले चांगले मि ळेल. फार पूर्वी अमूलचे मिळत असे. स ध्या गोकूळ चे फुल फॅट घेतो आहे ते नको आहे. तूप लोणी करत नाही. फक्त चहा पुरतेच दोन चमचे रोज लागते. कंडेन्स्ड नको आहे.
मी काल मटर पनीर केलं होत पण
मी काल मटर पनीर केलं होत पण भाजी तयार झाल्यावर मटारचा रंग फिका पडला .. तो हिरवाच दिसण्यासाठी काय करायचे? इथे मला रेसिपी नाही मिळाली
अमूलचे ताजा (१.५% फॅट) मिळते
अमूलचे ताजा (१.५% फॅट) मिळते की . आम्ही तेच वापरतो.
अमूलचेच लाइट स्लिम & ट्रिम मिल्कही (० % फॅट)त्यांच्या वेबसाइटवर दिसले.
टेट्रापॅकमधले दूध पॅक
टेट्रापॅकमधले दूध पॅक उघडल्यानंतर चार-पाच दिवस तरी फ्रिजमधे चांगले रहाते. एकदा ग्रोसरीबरोबर दूधाचे टेट्रापॅक आणले तर रोज दूधाची उस्तवार करायला नको. हे दूध न तापवता वापरता येते. इथे फक्त १लि.चे पॅक मिळतात मुंबईत कदाचित १/२, २५० मिली. चे मिळत असतील.
दुधाच्या पावडरीचे दाट दूध करून चहासाठी वापरता येऊ शकेल.
इथे मोठ्या स्वयंपाकाच्या
इथे मोठ्या स्वयंपाकाच्या अंदाजाविषयी धागा आहे का? जसे १०० बटाटेवडे करण्यासाठी किती बटाटे घ्यावेत किंवा ५० जणांसाठी पोहे/उपमा/सा खि इ साठी किती साहित्य लागेल अशी माहिती असलेला धागा आहे का?
धनश्री, निराळा धागा नाही.
धनश्री, निराळा धागा नाही. अशीच इथे तिथे चर्चा झालेली आहे. तुम्ही नवीन धागा काढू शकता.
मदत हवी आहे माझ्या मैत्रीणी
मदत हवी आहे
माझ्या मैत्रीणी आणि मी असं गेट टुगेदर आहे. साधारण आम्ही १४ जणी व प्रत्येकीचे एक पीलू याप्रमाणे आम्ही आहोत. मला एवढया जणांसाठी काय पदार्थ बनवता येईल हे सुचवा आणि हो गेट टुगेदर बागेत आहे त्यामुळे बनवलेला पदार्थ तिथे न्यावा लागणार आहे त्याप्रमाणे सुचवा
बागेत गेट्टुगेदर म्हणजे भेळ,
बागेत गेट्टुगेदर म्हणजे भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटिस, तिखट-मीठ लावलेले लाल-गुलाबी पेरू, खारे दाणे - फुटाणे, वेफर्स, आईस्क्रीम, बुढ्ढी के बाल, मिल्कशेक, ऊसाचा रस हेच पदार्थ येतात मनात!
याखेरीजचे पर्याय म्हणजे इडली चटणी / ढोकळा चटणी / सँडविचेस.
किंवा शाळेच्या ट्रीपचा मेन्यू
पुर्या, बटाट्याच्या काचर्या / बटाट्याची उकडून भाजी, आणि गोडाचा शिरा + आंब्याचे लोणचे, दहीभात. सोबत सॅलड म्हणून टोमॅटो, काकडी, मुळा, बीटाच्या चकत्या.
मंजुडी, आहो-जाहो नको ग.
मंजुडी, आहो-जाहो नको ग.
निराळा धागा नाही काढत कारण असा अंदाज देणं जरा अवघडच असतं. आणि बाकीच्या मेनुप्रमाणे, व्यक्तिसापेक्ष कमी जास्त क्वांटीटी लागेल. परत असा किती वेळा भरपूर माणसांचा स्वयंपाक करावा लागतो नाही का? त्यामुळे नवीन धागा फार चालणार नाही.
मला हळदी कुंकवा साठी करायच्या मेनुमधे मदत हवी होती म्हणून विचारलं.
मी एक वाटी मापाने शिरा/उप्पीट करून मूदी पाडून बघते मग मोठ्या प्रमाणाचा अंदाज घेता येईल.
बागेत गटगः व्हेज सँड्विच.
बागेत गटगः
व्हेज सँड्विच. अर्धी तयारी करून न्यायची. कोल स्लॉ, कापलेले ब्रेड बटर व सँ स्प्रेड ची बाटली. / चटणी
कापलेल्या भाज्या इत्यादी आणि तिथे जाऊन बनवायचे व सर्व करायचे. खात असाल तर उकडलेली अंडी,
अमुल बटर मीठ मिरेपूड केचप असे साधे सँडविच सर्वांना व मुलांना जास्त करून आवड्ते. न्यायला सोपे.
ऑरेंज मार्मालेड/ जॅम पण न्यावे छोट्या मुलांना.
टँग/ रसना प्याकेट नेउन तिथेच बनवायचे. कॉर्न पॅटीस/ पराठा ठेपला दही भात. कापलेली फळे.
नाहीतर फ्राइड चिकन , पटेटो सलाड. स्ट्रॉबेरीज विथ क्रीम, चिल्ड व्हाइट वाइन. कप केक्स. पास्ता.
सुके मटन/ खिमा पॅटिस करून नेल्यास पोळीत रोल करून मस्त लागते. / बिर्यानी/ डबल का मीठा इत्यादी मी हैद्राबाद झू मधे कितीतरी कुटुंबे असे खाताना बघितली आहेत.
उन्हाळा सुरू होत आहे तसे एकदम पिकनीक मूड आला.
अरुंद्ती अश्विनीमामी धन्यवाद
अरुंद्ती अश्विनीमामी धन्यवाद ..... सँडविचेस ची आयडीया आवड्ली
इडली चटणी / ढोकळा चटणी हे पदार्थ आधी झालेले आहेत
मुलांसाठी कस्टर्ड विथ स्ट्रॉबेरीजचा विचार आहे. टँग/ रसना ची आयडीयापण मस्त आहे...
अजून कही वेगळे जे गरम गरम नसले तरी चालेल असे सुचवाना....
अगं धनश्री, ती चर्चा अशीच इथे
अगं धनश्री, ती चर्चा अशीच इथे तिथे होते, आणि मग गरज असेल तेव्हा सापडत नाही, म्हणून निराळ्या धाग्याचं म्हटलं.
आता तू उप्पीटाचं म्हणालीस, तर तीही चर्चा अतिशय चित्तवेधक पद्धतीने इथे सुमेधाव्हीच्या पोस्टीपासून पुढे झालेली आहे, बघ वाचून. तुला गंमत वाटेल आणि उपयोगही होईल.
आंब्याची डाळ किंवा वाटली डाळ,
आंब्याची डाळ किंवा वाटली डाळ, पन्हे / कोकम [ह्याचे कॉन्सन्ट्रेट सोबत नेऊन तिथेच बनवायचे]. फळांचा मेवा - बोरं, द्राक्षं, संत्री, पेरू, फणसाचे गरे, अंजीरं, पेअर्स वगैरे वगैरे.
दडपे पोहे / मेतकूट पोहे / आलेपाक पोहे [पोहे फॅन क्लब बीबी संदर्भासाठी पाहा], सोबत ऊसाचा रस.
पालकपुर्या, एस पी डी पी, दही-भल्ले किंवा दही वडे, कॉर्न चाट.
पाकक पु. फार तेलकट होतील
पाकक पु. फार तेलकट होतील ...
अरुंदती हे एस पी डी पी काय आहे
तेजस्विनी१९.. spdp म्हणजे शेव
तेजस्विनी१९.. spdp म्हणजे शेव पुरी-दही पुरी.
मंजूडी, तुम्ही वर लिहिलंय ती चर्चा वाचली आत्ता उपम्याची.. धमाल आहे..
रविवारी एका फॅमिलीला जेवायला
रविवारी एका फॅमिलीला जेवायला बोलवणार आहोत दोन मुले आणि आई-वडील एवढेच आहेत. त्यांना मिसळच खायची आहे पण ते आल्या आल्या स्टार्टर म्हणूण काय द्याव हा प्रश्न पडला आहे.
आम्ही त्यांच्याकडे गेलेलो तेव्हा फार साग्रसंगित स्टार्टर, मेन कोर्स, डेझर्ट असा बेत होता. आता मला पण तसच करायच आहे पण मेन कोर्स त्यांना मिसळच हवी आहे.
खूप थंडी असल्याने नंतर स्वीट पण गार नको आहे. मला फक्त आंब्याचा शिरा सुचतो आहे. मिसळीला बरोबरीने / किंवा मिसळ खाऊन झाल्या नंतर अजुन काय देता येईल.
लस्सी
लस्सी
सूप / सार केलेत तर
सूप / सार केलेत तर ?(अॅपेटायझर / वेलकम ड्रिंक), खूप थंडी म्हणून.
पफ पेस्ट्री शीट्स वापरून गोड्/तिखट सारण भरून बेक्ड करंज्या / पॅटीस : स्टार्टर :
नंतर गुलाबजाम किंवा खीर किंवा ब्राऊनी विथ आइस्क्रीम अँड हॉट चॉकलेट सॉस
मिसळीबरोबर दही नसेल तर साध ताक ठेवा जीरेपूड, कोथिंबीर घालून, पोटाला बरं पडेल
सूप चांगल वाटतय. स्टार्टर फार
सूप चांगल वाटतय. स्टार्टर फार हेवी नकोय, मग मिसळ नाही जाणार.
टेंपरेचर मायनस आहे, शनिवारी बर्फ पडण्याची शक्यता आहे, म्हणून लस्सी/ताक नको वाटतय. किंवा ते ठेवल (रुम टेंपरेचर) तर सूप नको दोन्ही ड्रिंक होतील मग तस चांगल वाटेल का?
लेट्यूस रॅप्स स्टार्टर चा
लेट्यूस रॅप्स स्टार्टर चा अजून एक ऑप्शन. नेहमीचे यशस्वी पनीर टिक्का / ग्रील्ड स्कुवर्स / मसाला पापड / cherry-cheese-pineapple हे आहेतच.
स्टार्टर मोजकेच ठेवणे किंवा डिशमध्ये घालून सर्व्ह केलेत तर मिसळ पोटभर खाल्ली जाईल.
दीपचे फ्रोझन सामोसे. अमेरिकेत
दीपचे फ्रोझन सामोसे. अमेरिकेत सर्वत्र मिळतात.
Pages