स्तोत्रांचा अनुभव

Submitted by Anvita on 26 October, 2013 - 10:04

जेव्हा आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतात त्यावेळेस आपण जे कोणी आपल्याला उपाय सांगतात ते करत असतो . त्यात मग स्तोत्र, जप , धार्मिक स्थळांना जाऊन येणे इ . गोष्टी असतात . ह्या सगळ्याने मनोबल वाढते . समस्येला तोंड देण्याची शक्ती येते . हे सगळे तर आहेच . पण एखाद्या गोष्ट करून समस्या/ संकट टळले ह्याचा कोणाला अनुभव आहे का ? उदा . मृत्युंजयाचा जप केल्यामुळे आयुष्य वाढले ,महलक्ष्मी अष्टक रोज म्हटल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली.
मला वाटते कि स्तोत्र म्हटल्याने किंवा जप केल्याने positivity येते आयुष्यात.
पण धन, संतती, आरोग्य इ. ह्या दृष्टीने काही कोणाला अनुभव आले आहेत का

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

I read parallels listen the YouTube recitation.There is a specific method. One is supposed to read 1-6 chapters first day. 7-12 chapters the second day etc.

माझा न चुकता येणारा अनुभव असा आ हे की थोडी ज री दत्तस्तोत्रे म्हटली तरी वाईट्ट स्वप्नं पडते.काय ते सांगणार नाही. आता काल पारायण केले ताबडतोब १२:३० वाजता स्वप्न पडुन जाग आली.
This is literally 15-16th time I am experiencing it over past 8 years. At least 15-16 th time.
I always used to get scared. But not this time. काल पोथीत वाच्ले कि तुमचे कर्मफल स्वप्नात भोगवुन दत्तमहाराज तुमचि कर्मफळे जाळतात. ही त्यान्ची लीला असते. अजुन एक इतका कन्सिस्टन्त अनुभव कि हि माझी प्रचितीच आहे. हे दैवी तत्व जाग्रूत असल्याची.

गुरु चरित्रात एका मान्त्रिकाला इन्गळ्या विन्चवान्चे स्वप्न पाडुन नरसिन्ह सरस्वतीनी शिक्षा दिल्याचा दाखला अहे. पणंमला वाटते की लोण्यासमान ह्रुदय असलेले सद्गुरु फक्त भीती दाखवतात आणि त्या भीतीआड ते क्रुपाच करतात. मार्गावर आण्तात.

श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्र पठण नित्य नक्षत्र नुसार अध्याय असे बहुतांश केले जाते आणि ते अधिक सोपे पारायण होते.
आता सुरु असलेली तारिखवार माहिती खालील प्रमाणे -

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये

दिवस 1
*चित्रा नक्षत्र - 13 ऑगस्ट 07:59 AM (सकाळी सुरुवात ) ते 14 ऑगस्ट 06:56 AM (सकाळी संपणार )*
*अध्याय 1 आणि 2*

दिवस 2
*स्वाती नक्षत्र - 14 ऑगस्ट 06:56 AM (सकाळी सुरुवात) ते 15 ऑगस्ट 05:44 AM (पहाटे संपणार)*
*अध्याय 3*

दिवस 3
*विशाखा नक्षत्र - 15 ऑगस्ट 05:44 AM (पहाटे सुरुवात) ते 16 ऑगस्ट 04:26 PM (पहाटे पर्यंत)*
*अध्याय 4 आणि 5*

दिवस 4
*अनुराधा नक्षत्र  - 16 ऑगस्ट 04:26 AM (पहाटे सुरुवात) ते 17 ऑगस्ट 03:02 AM (पहाटे पर्यंत)*
*अध्याय 6*

दिवस 5
*ज्येष्ठा नक्षत्र - 17 ऑगस्ट 03:02 AM (पहाटे सुरुवात) ते 18 ऑगस्ट 01:35 AM (मध्य रात्री पर्यंत)*
*अध्याय 7*

दिवस 6
*मूळ नक्षत्र - 18 ऑगस्ट 01:35 AM (मध्य रात्री सुरुवात) ते 19 ऑगस्ट 12:07 AM (मध्य रात्री पर्यंत)*
*अध्याय 8*

दिवस 7
*पुर्वा आषाढा नक्षत्र- 19 ऑगस्ट 12:07 AM (मध्य रात्री सुरुवात) ते 19 ऑगस्ट 10:42 PM (रात्री पर्यंत)*
*अध्याय 9*

दिवस 8
*उत्तरा आषाढा नक्षत्र - 19 ऑगस्ट 10:42 PM (रात्री सुरुवात) ते 20 ऑगस्ट 09:25 PM (रात्री पर्यंत)*
*अध्याय 10*

दिवस 9
*श्रवण नक्षत्र - 20 ऑगस्ट 09:25 PM (रात्री सुरुवात) ते 21 ऑगस्ट 08:21 PM (रात्री पर्यंत)*
*अध्याय 11 आणि 12*

दिवस 10
*धनिष्ठा नक्षत्र - 21 ऑगस्ट 08:21 PM (रात्री सुरुवात) ते 22 ऑगस्ट 07:39 PM (रात्री पर्यंत)*
*अध्याय 13*

दिवस 11
*शतभीषा नक्षत्र - 22 ऑगस्ट 07:39 PM (रात्री सुरुवात) ते 23 ऑगस्ट 07:26 PM (रात्री पर्यंत)*
*अध्याय 14 आणि 15*

दिवस 12
*पुर्वा भाद्रपदा नक्षत्र - 23 ऑगस्ट 07:26 PM (संध्याकाळी सुरवात) ते 24 ऑगस्ट 07:47 PM (रात्री पर्यंत)*
*अध्याय 16*

दिवस 13
*उत्तरा भाद्रपदा नक्षत्र - 24 ऑगस्ट 07:47 PM (रात्री सुरुवात) ते 25 ऑगस्ट 08:48 PM (रात्री पर्यंत)*
*अध्याय 17*

दिवस 14
*रेवती नक्षत्र - 25 ऑगस्ट 08:48 PM (रात्री सुरवात) ते 26 ऑगस्ट 10:29 PM (रात्री पर्यंत)*
*अध्याय 18*

दिवस 15
*अश्विनी नक्षत्र - 26 ऑगस्ट 10:29 PM (रात्री सुरुवात) ते 28 ऑगस्ट 12:47 AM (मध्य रात्री पर्यंत)*
*अध्याय 19*

दिवस 16
*भरणी नक्षत्र - 28 ऑगस्ट 12:47 AM (मध्य सुरुवात) ते 29 ऑगस्ट 03:35 AM (पहाटे पर्यंत)*
*अध्याय 20*

दिवस 17
*कृतिका नक्षत्र - 29 ऑगस्ट 03:35 AM (पहाटे सुरुवात) ते 30 ऑगस्ट 06:39 AM (सकाळ पर्यंत)*
*अध्याय 21,22*

दिवस 18
*रोहिणी नक्षत्र - 30 ऑगस्ट 06:39 AM (सकाळी सुरुवात) ते 31ऑगस्ट 09:44 AM (सकाळ पर्यंत)*
*अध्याय 23,24,25*

दिवस 19
*मृगशीर्ष नक्षत्र - 31 ऑगस्ट 09:44 AM (सकाळी सुरुवात) ते 01 सप्टेंबर 12:34 PM (दुपार पर्यंत)*
*अध्याय 26,27,28,29,30*

दिवस 20
*आद्रा नक्षत्र - 01 सप्टेंबर 12:34 PM (दुपारी सुरुवात) ते 02 सप्टेंबर 02:57 PM (दुपार पर्यंत)*
*अध्याय 31,32,33*

दिवस 21
*पुनर्वसू नक्षत्र - 02 सप्टेंबर 02:57 PM (दुपारी सुरुवात) ते 03 सप्टेंबर 04:42 PM (दुपार पर्यंत)*
*अध्याय 34,35*

दिवस 22
*पुष्य नक्षत्र - 03 सप्टेंबर 04:42 PM (दुपारी सुरुवात) ते 04 सप्टेंबर 05:45 PM (संध्याकाळ पर्यंत)*
*अध्याय 36,37*

दिवस 23
*आश्लेषा नक्षत्र - 04 सप्टेंबर 05:45 PM (संध्याकाळी सुरुवात) ते 05 सप्टेंबर 06:07 PM (संध्याकाळ पर्यंत)*
*अध्याय 38.39.40*

दिवस 24
*मघा नक्षत्र - 05 सप्टेंबर 06:07 AM (सकाळी सुरुवात) ते 06 सप्टेंबर 05:51 PM (संध्याकाळ पर्यंत)*
*अध्याय 41,42,43*

दिवस 25
*पुर्वा फाल्गुनी नक्षत्र - 06 सप्टेंबर 05:51 PM (संध्याकाळी सुरुवात) ते 07 सप्टेंबर 05:05 PM (संध्याकाळ पर्यंत)*
*अध्याय 44,45*

दिवस 26
*उत्तरा फाल्गुनी नक्षत्र - 07 सप्टेंबर 05:05 PM (संध्याकाळी सुरुवात) ते 08 सप्टेंबर 03:56 PM (दुपार पर्यंत)*
*अध्याय 46,47,48*

दिवस 27
*हस्त नक्षत्र - 08 सप्टेंबर 03:56 PM (दुपारी सुरुवात) ते 09 ऑगस्ट 02:31 PM (दुपार पर्यंत)*
*अध्याय 49,50,51,52,53*

>>>>काल पोथीत वाच्ले कि तुमचे कर्मफल स्वप्नात भोगवुन दत्तमहाराज तुमचि कर्मफळे जाळतात.
माफ करा परंतु हे विधान मला आता सापडत नाही. कदाचित मी बिटवीन द लाईन्स वाचले असेल. Sad

Happy आहे सामो, अगदी सुरूवातीला नाहीये. पुढच्या / थोड्या नंतरच्या अध्यायात येईल. पण मला अध्याय क्रमांक आठवत नाही.

नानबा _/\_ हा अनुभव कॉमन दिसतोय कारण अजुन एका आय डी ने पूर्वी तो शेअर केलेला मला आठवतोय.

'घोरकष्टोद्धारण स्तोत्र' वासुदेवानंद सरस्वतीरचित नित्य पठण करावे. >>> मी दर गुरुवारी वाचते. डेस्कटॉपवर डाऊनलोड करुन ठेवलेलं आहे, ते पुर्वी रोज लावायचे. हल्ली लावलं जात नाही. लावायला हवं.

>>>>>वासुदेवानंद सरस्वती
ग्रेटच होते ते. त्यांचे अन्नपूर्णा स्तोत्र सापडले तर देते. काय अफलातून आहे.
>>>>घोरकष्टोद्धारण स्तोत्र
आज पहील्यांदा मी ते वाचलं कारण क्लिष्ट असल्या कारणाने टाळत होते. कॄष्णा यांना क्रेडिट जाते.
----------------------
बरेचदा एखाद्या मैत्रिणीशी फक्त तासन तास अध्यात्मावर, स्तोत्रांवर बोलत बसावेसे वाटते. आपली पॅशन असते पण कोणी भेटत नाही. नणंदेशी बोलायचा प्रयत्न केला तर ती म्हणते अच्छा गणपतीला २१ दूर्वा वाहतात का? मला नाही माहीत ते काही. क्वचित मला म्हणालेली अमकी / अमका संसारी आहेत पण पूर्ण वेळ अध्यात्मावर बोलत बसतात. संसाराकडे दुर्लक्ष काय एकेक नमुने असतात.
मग असं काही ऐकलं की बोलणच खुंटतं.

माबोवर या बाफवरती छान माहीती मिळते. आणि एक अश्विनीचा बाफ.

http://ioustotra.blogspot.com/2013/04/shree-annapurna-stotram.html

श्रीअन्नपूर्णास्तोत्रम्
श्रीदेवि दर्शनीयेऽशा ऐद्याद्या अंबिके तव ।
भव्ये दत्ताभये ताभिर् र्‍हीं बीजेन नतानव ॥ १ ॥
गत्ये मात्रे नमस्तेऽस्तु श्रीगाये पूर्णसंविदे ।
वस मे योगिनि स्वांते क्लींमयेऽर्णेश्र्वरेश्र्वरि ॥ २ ॥
दक्षे सहस्त्रवक्त्रस्ते न वेत्ति सकलान्गुणान् ।
वदेत् कोरिःष्टदे सर्वान् मोक्षसंदात्रि ते गुणान् ॥ ३ ॥
धूताद्ये कृपया पाहि भगवत् पूज्य पादुके ।
तमः पूष्ण इवाविद्या गतापर्णे तवेक्षणात् ॥ ४ ॥
पतिता उध्दृतास्ते हि वरदे शंकरप्रिये ।
दयाजन्महराचेत्ते तिष्ठेद्धि कथमावृतिः ॥ ५ ॥
कस्ते चित्तार्तिहे वेत्ता मान्येऽमऽर मनोतिगे ।
मम ज्ञानं कियत्प्राज्ञि हे शंभुप्राणवल्लभे ॥ ६ ॥
लसद्वेदनुते द्वास्थश्र्ववद्गणय मामुमे ।
भ्रमप्रदार्थवादाऽयेरिप्राया वञ्चितोस्मि तेः ॥ ७ ॥
मर्त्योर्भोय इहांबाया अंके संल्लभतेर्थितम् ।
रक्षिता कः च मे ह्यार्ये नतेर्भो भेद दर्शिनि ॥ ८ ॥
वासना मुक्तिकृद्देवि पूर्णविज्ञानदायिनि ।
सुखदे नित्यमांगल्येऽर्णेशे ध्यानमुपाविश ॥ ९ ॥
देवा अर्दितशांत्यर्थमलं तेवैत्वदीरिताः ।
वासनागंधो मे मास्तु मानादेरार्तिदोत्र यः ॥ १० ॥
नंदिनी बलिनी ब्राह्मी भिक्षाभाग्यविवर्धिनी ।
दयाब्धिरोजस्विनीड्या लक्ष्मीस्त्वं सिद्धिरुपिणी ॥ ११ ॥
सत्येऽस्यंऽबा कृपांभोभिषिञ्चात्रघ्यधिपालके ।
रक्ष्यो बालः स्वको मात्रा तत्वतोर्थ ब्रवीमि ते ॥ १२ ॥
स्वल्पज्ञोऽपि शठोऽदांतो मंदो वाभिमतोऽपि वा ।
तीव्रमाशापरो वायं न चोपेक्षां शिवेर्हति ॥ १३ ॥
भिया नचोक्तवांन्शब्दान्देवेड्ये देहि कांक्षितम् ।
क्षुच्छांत्यै ज्ञानभिक्षात्रं हितज्ञे हि तमर्पय ॥ १४ ॥
कृपयाऽनस्तमितया देहि ते चरणे रतिम् ।
तपोदे सादरं याचे हितं मे पारदे कुरु ॥ १५ ॥
स्तवे तेगह्यशक्तं मां स्वान्ते शर्वप्रिये स्मर ।
वर्ये वरः स एवार्थो हार्दज्ञेऽतिथिवल्लभे ॥ १६ ॥
इति प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचित अन्नपूर्णास्तोत्रं संपूर्णम् ॥

स्तोत्राची अधिक विस्मयकारक माहितीः
हे स्तोत्र एकंदर सोळा श्र्लोकांचे आहे.
त्यातील प्रत्येक श्लोकांतील पहिले अक्षर घेतले तर तयार होणार्‍या वाक्यांत श्री टेंब्येस्वामीनी आपले नांव गुंफले आहे. तयार होणारे वाक्य खालील प्रमाणेः
॥ श्रीभगवतअवधूतपदकमलभ्रमर वासुदेवानंद सरस्वतीभिक्षुकृत स्तव ॥
अशा प्रकारे आपले नांव गुंफले आहे.
प्रत्येक श्लोकांतील चवथे अक्षर घेतले तर,
दत्तात्रेयो हरिः कृष्ण उन्मत्तानंददायकः ।
मुनिदिगंबरो बालः पिशाचो ज्ञानसागरः ॥
असा मंत्रयुक्त श्लोक तयार होतो.
प्रत्येक श्लोकांतील नववे अक्षर घेतले तर,
ऐं र्‍हीं श्रीं क्लीं नमो भगवति माहेश्र्वरि अन्नपूर्णे, ममाभिलषितमनन्देहि देहि स्वाहा ।
(मम अभिलषितं अनंते देहि देहि स्वाहा ।) असा श्री अन्नपूर्णादेवीचा बीजयुक्त मंत्र तयार होतो.
प्रत्येक श्लोकांतील बारावे अक्षर घेतले तर,
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥
असा मंत्रयुक्त श्लोक तयार होतो.
अशा प्रकारच्या स्तोत्राला 'मंत्रगर्भस्तोत्र' असे म्हणतात.
या स्तोत्राचा पाठ केल्याने स्तोत्रांतर्गत सर्व मंत्रांचा अभिनव पद्धतीने आपोआप पाठ होऊन अन्नपूर्णादेवीची कृपा होते.

प्रत्येक श्लोकांतील बारावे अक्षर घेतले तर,
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥
असा मंत्रयुक्त श्लोक तयार होतो.>>> हे माहीत नव्हतं. फक्त हे छोटं स्तोत्र माहीत होतं. माझ्याकडे किचनच्या टाईल्स वर हे लावलेलं आहे . एक मैत्रिणीने सगळ्यांना दिलेल्या याच्या चिकटवायच्या पट्ट्या.

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥>> हा श्लोक
श्रीशंकराचार्य कृत अन्नपूर्णा स्तोत्रातील आहे.

अन्नपूर्णा स्तोत्र :
नित्यानन्दकरी वराभयकरी सौन्दर्यरत्नाकरी
निर्धूताखिलघोरपावनकरी प्रत्यक्षमाहेश्वरी ।
प्रालेयाचलवंशपावनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥१॥
नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरी
मुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी ।
काश्मीरागरुवासिताङ्गरुचिरे काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥२॥

योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मार्थनिष्ठाकरी
चन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी ।
सर्वैश्वर्यसमस्तवाञ्छितकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥३॥

कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमा शङ्करी
कौमारी निगमार्थगोचरकरी ओङ्कारबीजाक्षरी ।
मोक्षद्वारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥४॥

दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरी
लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाङ्कुरी ।
श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥५॥

उर्वीसर्वजनेश्वरी भगवती मातान्नपूर्णेश्वरी
वेणीनीलसमानकुन्तलहरी नित्यान्नदानेश्वरी ।
सर्वानन्दकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥६॥

आदिक्षान्तसमस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरी
काश्मीरात्रिजलेश्वरी त्रिलहरी नित्याङ्कुरा शर्वरी ।
कामाकाङ्क्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥७॥

देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुन्दरी
वामं स्वादुपयोधरप्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी ।
भक्ताभीष्टकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥८॥

चन्द्रार्कानलकोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरी
चन्द्रार्काग्निसमानकुन्तलधरी चन्द्रार्कवर्णेश्वरी ।
मालापुस्तकपाशासाङ्कुशधरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥९॥

क्षत्रत्राणकरी महाऽभयकरी माता कृपासागरी
साक्षान्मोक्षकरी सदा शिवकरी विश्वेश्वरश्रीधरी ।
दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥१०॥

अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥११॥

माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।
बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥१२॥
- श्री शङ्कराचार्य कृतं

माझ्याकडे एवढाच फोटो आहे सध्या जीड्राइवला. इथे अन्नपूर्णेचा उल्लेख पाहून हा इंटरेस्टिंग होता म्हणून टाकला. उरलेला भाग नगरला गेल्यावर शोधावा लागेल पुस्तकात. आत्ता कोणाकडे असल्यास त्यांनी बाकीचे टाकावे.

@जिद्दु, ही शंकराचार्य विरचित अन्नपूर्णा स्तोत्राची सुरूवात असेल तर ते स्तोत्र नाही माहिती.
पण हाच श्लोक त्यांच्याच देवी-अपराध-क्षमापन स्तोत्रातही येतो शेवटी.
अन्नपूर्णे सदापूर्णे ............. स्वदेशो भुवनत्रयम् हाही येतो.
देवी = पार्वतीच आहे.
मौखिक परंपरेत पाठभेद येतात, तसे काही असावे.

खूप खूप खूप सुंदर माहिती मिळते या धाग्यावर. .
तुम्हा सर्वांचे किती सखोल वाचन आणि चिंतन आहे! !
लिहीत रहा. .

>>>>>>>>आहे सामो, अगदी सुरूवातीला नाहीये. पुढच्या / थोड्या नंतरच्या अध्यायात येईल. पण मला अध्याय क्रमांक आठवत नाही.
@कारवी कालच आले माझ्या वाचनात. ७ वा अध्याय.

शंकराचार्यांच्या प्रत्येक स्तोत्रामधे एकदम विलक्षण मंत्रमूग्ध करून टाकणारी लय असते. नितांत सुंदर !

Pages