स्तोत्रांचा अनुभव

Submitted by Anvita on 26 October, 2013 - 10:04

जेव्हा आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतात त्यावेळेस आपण जे कोणी आपल्याला उपाय सांगतात ते करत असतो . त्यात मग स्तोत्र, जप , धार्मिक स्थळांना जाऊन येणे इ . गोष्टी असतात . ह्या सगळ्याने मनोबल वाढते . समस्येला तोंड देण्याची शक्ती येते . हे सगळे तर आहेच . पण एखाद्या गोष्ट करून समस्या/ संकट टळले ह्याचा कोणाला अनुभव आहे का ? उदा . मृत्युंजयाचा जप केल्यामुळे आयुष्य वाढले ,महलक्ष्मी अष्टक रोज म्हटल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली.
मला वाटते कि स्तोत्र म्हटल्याने किंवा जप केल्याने positivity येते आयुष्यात.
पण धन, संतती, आरोग्य इ. ह्या दृष्टीने काही कोणाला अनुभव आले आहेत का

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> स्नान करून पाटावर बसून वाचल्यास उत्तम. >>>> सुंदर. मी संधीवातामुळे, खुर्चीवर बसूनच वाचते. पण ज्यांना जमते त्यांनी पाटावर बसून वाचावे. जितकी आदरपूर्वक पोथी वाचाल तितकं उत्तम. नामस्मरण अगदी कुठेही करता येतं. स्तोत्र व पोथी मात्र आदरपूर्वक, निगुतीने वाचावे.

ज्ञानेश्वरी वाचून पूर्ण झालेय. रोज गणपती स्तोत्र आणि बावनश्लोकी गुरूचरित्र वाचते. पण प्रेगनन्सीच्या ९ व्या महिन्यात देवासमोर पाटावर बसवत नाही. त्रास होतो. त्यामुळे रुममधे बेडवर बसून वाचते. तसंही माझा जास्त वेळ जिथे जातो आणि पुढे बाळ जिथे जास्त वेळ राहणार आहे त्या खोलीत हे मंत्रोच्चार वगैरे व्हावेत असं मला वाटतं. योग्य आहे का?

धन्यवाद कारवी , सनव , सामो. आज पहिले २ वाचले . एक वाचून ठेवणार होते , पण ठेववेना , म्हटलं आणखी एक वाचूया .
जसे जमेल तसे २-२ वाचत जाईन .

अगदीच सकाम असं नाही , पण गेले काही दिवस चित्त थार्यावर नाही .
ऑफिसच्या कामाचा ताण , घराबाहेर पडता न आल्यामुळे होणारी चिडचिड , घरकाम , ईतर काही अडचणी ई. ई. मुळे प्रचंड अस्वस्थता आहे.

आम्ही गेली ३ वर्श जून महिन्यात शेगावला जाउन आलो होतो . या वर्शी जाता आलं नाही म्हणून फारच रूखरूख लागली होती.
एका गुरुवारी पूर्ण पोथीवाचनाचा विचार आहे . महाराजांच्या आशिर्वादाने सिद्धीस जाईल याचा विश्वास आहे .

शुभेच्छा,
मला १६ वा अध्याय सर्वात जास्त आवडतो Happy
जय गजानन महाराज

गजानन विजय almost पाठ आहे, ४तासांत पूर्ण वाचून होते माझी..
महाराजांच्या कृपेने ४थी त असतानापासून वाचायला मिळाली

चित्त थार्यावर नाही ..... नवीन Submitted by स्वस्ति on 23 July, 2020 - 21:07 >>>>
ते कळतय की त्यांना सगळं..... चित्तातच वसले आहेत ना.....
जितके जमेल तितके वाचा. १ की २ / हा की तो अध्याय असे काही बंधन ठेवायचे नाही.
वाचायला घेतले, नाही लक्ष लागले, पोथी ठेवून जप करायचा.
रात्री निजानीज झाल्यावर / पहाटे जमेल तेव्हा शांत वेळेला हातपाय धुऊन, उदबत्ती लावून नुसते भरल्या डोळ्यांनी बघितलेत त्यांच्याकडे तरी पुरेल त्यांना.
दरवर्षी जूनला शरीर जाते शेगावला. या वर्षी जीव तगमगला म्हणजे मन गेले की तिथे. त्यांना प्रेम / मनच हवे असते आपले. मग झाली की यात्रा. कुठे बाकी राहिली?
तिथे जाऊन जे करता, पूजा / अभिषेक / प्रदक्षिणा --- ते सारे मानसपूजा करूनही करता येईल. म्हणजे आपण जे विधी शरीराने करतो त्याचीच मनाने साग्रसंगीत कल्पना करायची. माथा टेकून डोळे उघडायचे आणि कामाला लागायचे.

हो चिन्मयी, तुला जमेल तसं सुरू ठेव. बेडरूममध्ये वाचायला काहीच हरकत नाही.
लहान मुलं असल्यास/गर्भवती असल्यास रामरक्षा देखील म्हणावी/वाचावी. मुलांवर पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. भक्तीसागरमध्ये असंही दिलंय की सुर्यास्तानंतर उदबत्ती लावून रामरक्षा म्हणून ती विभूती बाळाला लावल्यास नजर लागणे इत्यादींवर अमृतवल्ली उपाय आहे.

गोपाल सहस्रनाम सुद्धा वाचायला सांगतात गरोदर पणात.
माझ्या आईने वाचलेले माझ्या वेळी आणि त्यामुळेच मी सुखरूप राहिले अशी तिची श्रद्धा आहे. कारण मी रडतच नव्हती नाळेचा फास बसल्याने इ. असं आईसांगते.

>>>>>ते कळतय की त्यांना सगळं..... चित्तातच वसले आहेत ना.....>>>>>>

आमच्याकडे देव्हारा नाही. सामानाने गच्च लहानशा घरात, देवांकरता जागाच नाही. पण मध्यंतरी माझ्या काँप्युटरवरती एक गणेश मूर्ति मी ठेवली (स्थापना वगैरे काही नाही) व रोज स्नानानंतर व झोपण्याआधी नमस्कार करते, संध्याकाळी जेव्हा कॉम्प्युटरवरती स्तोत्रे वाचते तेव्हा मूर्ति समोरच असते.
पण हे सुरु केल्यापासून खूप फरक जाणवला. म्हणजे विचार सकारात्मक झाले, अधिक पेशन्स जाणवु लागला, एकंदर बराच पॉझिटिव्ह परिणाम जाणवला.
तेव्हा खरे आहे, देवाला लहानात लहान हाकही पोचते.
चींटीके पग मे घुंगुर बाजे तो भी साहिब सुनता है!! .............. हेच खरं.

गजानन विजय almost पाठ आहे, ४तासांत पूर्ण वाचून होते माझी..
महाराजांच्या कृपेने ४थी त असतानापासून वाचायला मिळाली

Submitted by किल्ली on 23 July, 2020 - 11:42

वाह किल्ली कित्ती छान..

योग्य आहे का?
Submitted by मी चिन्मयी on 23 July, 2020 - 19:46 >>>> परिस्थितीप्रमाणे नियम शिथील होतात. देव सर्वत्र आहे असे मानतो तर कुठेही बसून केले तरी तो असणारच की. त्रास झाल्यामुळे लक्ष न लागण्यापेक्षा, आरामात बसून केल्याने एकाग्र चित्ताने वाचता येईल. बाळ सद्ध्या अभिमन्यू मोडमध्ये ऐकतेय, तेव्हा तुमच्या सोयीने बसा. टेबलावर / बेडवर जास्तीचे स्वच्छ कापड / चादरीची घडी घेऊन त्यावर पोथी / पुस्तक ठेवून वाचायचे. वाचताना नीरांजन उदबत्ती लावत असाल तर ते देव्हार्‍यापाशीच ठेवायचे.

कारवीशी सहमत...
जिथे आरामदायी वाटेल तिथेच करा चिन्मयी त्यामुळे मन शांत राहील , आपोआपच प्रसन्न वाटेल. कुठे पाठीतून कळ , पायातून कळ आली की लक्ष तिकडे जाईल. म्हणून आराम महत्त्वाचा आहे. तुम्हाला शुभेच्छा.
सध्या पाठदुखीमुळे झोपून ध्यान करत आहे ....माझ्या पोझिशनपेक्षा ध्यान महत्त्वाचे म्हणून!!

कारवी , फारच छान प्रतिसाद. सामो , खरयं.
किल्ली , खरचं छान .
लहानपणी , श्लोक , स्तोत्र खूप पाठ होते.
बाबा रोज संध्याकाळी रामरक्षा म्हणायला लावायचे.
गीताई, भगवदगीतेतले अध्याय , बालोपासना वगैरे खूप म्हणायचे.आता सवय गेली.
चिन्मयी अभिनंदन . काळजी घे.

"सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली" ही आरती पूर्ण स्वरुपात हवी आहे.
मायबोली आता पूर्ण पणे बदलली आहे, नेमका धागा शोधणे अधिक अवघड बनले आहे. म्हणुन इथे.
कदचित आम्हिच आउट डेटेड झालेले असू. असो.
शक्य झाल्यास माझ्या फेसबुक पेज वर दिली तरी चालेल.
माझे पुन्हा इथे येणे अवघड आहे.

श्रीकृष्ण सुप्रभातम ची लिंक शेअर कराविशी वाटत आहे.

https://www.youtube.com/watch?v=Gct6Smi-WNg&t=100s

( जर्मनीच्या एका गुरूंच आहे. त्यांचा आश्रम आहे तिकडे. रोजच्या प्रात: पुजेमधून ट्रिम केलेल आहे )

व्यंकटेश सुप्रभातम वेगळ आहे!

फिमेल व्हर्जन देखील आहे माझ्या कड
आवडल्यास कळविणे
मी ड्राइव्ह वर अपलोड करून त्याची लिंक शेअर करेन !

श्री गुरुचरित्र पारायण करायचे आहे. पोथी मधले नियम वाचले आहेत. परंतु एक शंका आहे उपवासा बद्दल ती अशी की, रोजचे अध्याय वाचुन संपेपर्यंत उपवास करावा की पारायण समाप्त होईपर्यंत एक वेळा उपवास करावा?

राम बापट हे पुरोगामी विचारवंत. पुरोगामी चळवळींचे आधारस्तंभ. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात मानसिक स्वास्थ्यासाठी रामरक्षा स्त्रोत्र म्हणत असत.ते विद्रोही चळवळीतील एका कार्यकर्तीने पाहिले व त्यावरुन फेबुवर त्यांच्या कारकिर्दीवर पाणी फिरवले. हे कसले पुरोगामी वगैरे. बराच वाद्विवाद झाला
https://www.loksatta.com/lokrang-news/ram-bapat-sir-dd70-2199258/

इथे कोणी श्रीपाद वल्लभ यांच्या पोथीचे पारायण करते का? कधी केलेले आहे का? काय अनुभव?

खूप खोलात जाउन सप्तपाताळ, अनेकानेक लोक - भू:, भुवः. स्वः, जन, तप, मह तसेच राष्याधिपतीलोक,विविध लोक, वैकुंठ, कैलास वगैरेंचे वर्णन आहे. अद्भुत आणि रोचक वाटते वाचायला.

पारायण नाही पण मी दोनदा वाचले आहे. मी रोज पाच दहा ओळी करत वाचत असल्याने वर्ष वर्ष लागायचे मला. इंटरेस्टिंग आहे, अनुभव नाही सांगता येणार. माझ्या मनाला बरं वाटलं आणि तेच माझ्यासाठी महत्वाचे.

ह्म्म्म धन्यवाद अन्जू. मी सध्या यु ट्युबवर ऐकते आहे.
४ सप्टेंबर ते गणेश चतुर्थी असा सप्ताह करावासा वाटतोय पण .... कसं जमणार/होइल का वगैरे...

ते पुस्तक (पोथी) खूप मोठं आहेना. मनाला वाटत असेल तर प्रयत्न करून बघायला हरकत नाही. जास्त वेळ द्यावा लागेल, शुभेच्छा.

Pages