स्तोत्रांचा अनुभव

Submitted by Anvita on 26 October, 2013 - 10:04

जेव्हा आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतात त्यावेळेस आपण जे कोणी आपल्याला उपाय सांगतात ते करत असतो . त्यात मग स्तोत्र, जप , धार्मिक स्थळांना जाऊन येणे इ . गोष्टी असतात . ह्या सगळ्याने मनोबल वाढते . समस्येला तोंड देण्याची शक्ती येते . हे सगळे तर आहेच . पण एखाद्या गोष्ट करून समस्या/ संकट टळले ह्याचा कोणाला अनुभव आहे का ? उदा . मृत्युंजयाचा जप केल्यामुळे आयुष्य वाढले ,महलक्ष्मी अष्टक रोज म्हटल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली.
मला वाटते कि स्तोत्र म्हटल्याने किंवा जप केल्याने positivity येते आयुष्यात.
पण धन, संतती, आरोग्य इ. ह्या दृष्टीने काही कोणाला अनुभव आले आहेत का

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुरुचत्रित्र स्त्रियांनी वाचू नये या मागे काय तर्कशास्त्र आहे ते मला अद्याप समजले नाही. मी कधी गुरुचरित्र वाचले नाही. कुणी सांगू शकेल का?

माझ्या माहिती नुसमाझ्या माहिती नुसार संस्कृत भाषा आणि त्यातील सर्व स्तोत्र मंत्रांचा आपल्या मनावर आणि शरीरावर परिणाम होत असतो. कुठलेही स्तोत्र म्हणताना किंवा वाचताना त्याच्या विशिष्ठ अशा रचने मुळे एक विशिष्ठ अशी ऊर्जा किंवा vibrations निर्माण होतात. त्याची योग्य माहिती नसल्यास चुकीच्या म्हणण्या मुळे किंवा योग्य ते प्रमाण नसल्या मुळे, तेवढी क्षमता नसल्यामुळे त्या ऊर्जेचा कधी कधी त्रास होऊ शकतो. या गोष्टींचा विचार करून कुठलं स्तोत्र किंवा ग्रंथ कुणी वाचावं किंवा वाचू नये याचे काही संकेत सांगितले आहेत,

गुरु चरित्र हा वैराग्य प्रधान ग्रंथ आहे. त्याचे सतत पारायण केल्यास वाचणाऱ्याच्या मनात वैराग्य वाढू शकते . संसारात असताना जर स्त्री ला किंवा पुरुषाला वैराग्य आले तर संसारावर परिणाम होऊ शकतो . म्हणून ठराविक वया नंतर स्त्रियांनी सुद्धा गुरु चरित्र वाचलं तरी चालू शकत.

या विषयी अजून सखोल माहिती साठी स्वामी सवितानंद यांचे 'स्तोत्र मंत्रांचे विज्ञान ' हे पुस्तक जरूर वाचावे.

ज्यांच्या पत्रिकेत विवाह योग नसेल तरी असे काही स्तोत्र आहे का ज्याने दैवी क्रुपा होऊन विशेषतः मुलांचे लग्न होईल . मुलीन साठी अशी अनेक स्तोत्र आहेत मुलांसाठी काही असेल तर ते सांगावे .

लहान मुलांना एकाग्रता वाढवायला कोणतं स्तोत्र चांगलं?-- मला पण याविषयी माहिती हवी आहे

लहान मुलांना एकाग्रता वाढवायला कोणतं स्तोत्र चांगलं?-->गायत्री मंत्र आणि गणपती स्तोत्र उपयुक्त आहेत. गायत्री मंत्राच्या अर्थामध्ये 'तो परमेश्वर माझ्या बुद्धीला योग्य चालना देवो/ मार्ग दाखवो' असे आवाहन आहे. त्याचप्रमाणे गणपती ही विद्येची देवता आहे. गणपती स्तोत्राच्या फलश्रुती मध्ये 'विद्यार्थी लभते विद्या' असे म्हणले आहेच ज्यामुळे एकाग्रता किंवा बुद्धीचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.

मँगोजी, तसे सर्वच स्तोत्रांचे फलित म्हणजे मानसिक शांती. परंतु मानसिक शांती आणि मनातील भीती कमी करण्यासाठी रामदासस्वामींनी रचलेले मारुती स्तोत्र म्हणावे. त्यात उल्लेख आहे- 'भूतप्रेत संबंधादि रोगव्याधी समस्तही...नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने'. स्तोत्र म्हणण्यापूर्वी श्रीरामाचे स्मरण नक्की करावे.

रोज संध्यासमयी देवा समोर देवा व उदबत्ती लावून हातात भस्म व उदबत्तीची रक्षा घेऊन प्रथम भीमरूपी व नंतर रामरक्षा एकाग्र चित्ते म्हणावी सर्वांना घरात हा अंगारा लावून उर्वरित रक्षा घरात फुंकावी ...
रोज सकाळी स्नान केल्यावर हनुमान चालीसा म्हणावे..

पण दत्तबावनी करता काही ठराविक पद्धत किंवा नियम आहेत का? >>> नियम वगैरे माहीती नाही पण मी दोन वर्ष रोज म्हणायचे एकदा, मूळ गुजराथी.

'आल इज वेल" >> होईल की. ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान इतकंच आल इज वेल भंपक आहे. Proud

'आल इज वेल" आस बोलणे मंत्रासमान होईल का?>>>> होईल ना! रिपीटेटिव्ह झाल की झाला मंत्रचळ! म्हणजे मंत्रच!

व्यंकटेश स्तोत्र 21 दिवस 21 वेळा म्हणजे एक मंडळ होते का?
आणि रात्री 12 ला जर नसेल जमत वाचायला तर सकाळी 21 वेळा वाचले तर चालतं का?

मी engineering complete केले आहे.job शोधत आहे. Job लागण्यासाठी एखादा स्तोत्र आहे का????? खूप प्रयत्न झाले पण यश काही मिळत नाही..

मी engineering complete केले आहे.job शोधत आहे. Job लागण्यासाठी एखादा स्तोत्र आहे का????? खूप प्रयत्न झाले पण यश काही मिळत नाही..>>> सुश्या जॉब लागण्यासाठी म्हणून स्त्रोत्र असा विचार न करता प्रयत्न करुन जॉब लागत नाही म्हणून जे मन सैरभैर होते त्यामुळे सुयोग्य प्रयत्नात बाधा येते. आपण सश्रद्ध असल्याने कोणतेही स्त्रोत्र जे आपल्याला भावते ते म्हणा त्यामुळे मन स्थिर रहाण्यास मदत होईल. मन शांत व स्थिर झाले कि आपल्या कडून प्रयत्न अधिक सकारात्नक होतील जेणे करुन आपल्याला जॉब लागण्याची शक्यता अधिक वाढेल. जॉब मिळण्यासाठी शुभेच्छा!

@सुश्या
सूर्योपासना हा एक मार्ग आहे .. आता ग्यारंटी तर मी किंवा कोणी देऊ नाही शकत पण तुमची इच्छा आहे म्हणून खालील उपाय करून पहा . साधना उपासनेत बरेच बारकावे असतात पण उगाच गोंधळ नको म्हणून सोपेच सांगतोय
रविवारी सुरु करून ४३ दिवस करून पहा ..
रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळेस किंवा ८. ३० च्या आत ठराविक वेळ फिक्स करा. फिक्स वेळ महत्वाची आहे ... ४३ दिवसात खाडा नका करू .. सूर्याला समंत्रक अर्घ्य द्या .. पाण्याने भरलेल्या तांब्यात लाल फुल टाकायचा नियम आहे पण २१ मिरचीच्या बिया टाकून केल्यास उत्तमच . सूर्याचा "ओम घृणी सूर्य आदीत्योम " हा वेदोक्त मंत्र आहे . अर्घ्य देताना डोक्याच्या वर हात नेऊन त्या उंचावरून द्या जेणेकरून त्या धारेत सूर्यबिंब तुम्हाला दिसेल . सूर्यदर्शन नसेल शक्य होत तरीही पूर्वेकडे तोंड करून द्या . मग हात जोडून तुम्हाला काय प्रार्थना करायची ती तुमच्या भाषेत करा . पण रोज वेगळे मागणे नका मागु आणि शब्द तेच असूद्यात .
या नंतर रावन वधाच्या प्रसान्गतिल आदित्यहृदय स्तोत्र म्हणा किंवा महाभारतातील अष्टोत्तरशतनाम स्तोत्र म्हणा . त्याच्या आधी काही समंत्रक सूर्यनमस्कार घातल्यास उत्तम
https://sanskritdocuments.org/doc_z_misc_navagraha/sUryAShTottarashatanA...

यावर एक आमच्या मित्राचाच विडिओ आहे युट्युब वर तो जरूर पहा .
https://www.youtube.com/watch?v=kLQXVqiBxOE

बाकी काहीही होऊ पण ज्योतिषी(खरे आता दुर्मिळ झालेत) किंवा बाबाबुवांकडे(जे बहुतेक ढोंगीच असतात )जाऊन पैसे आणि वेळ वाया घालू नका कारण फक्त निराशाच हाती येईल

मी जिद्दू आणि घाटपांडे सरांचे आभार मानतो. कारण दोघांनीही चांगले मार्गदर्शन केले आहे.
धन्यवाद जिद्दू तुम्ही दिलेल्या उपायाबद्ल,, मी अजूनतरी ज्योतिषाकडे गेलो नाही...पण problem काय होतो. माझ्या बरोबर च्या मुलांना चांगल्या ठिकाणी job लागल्या आहेत. आणि मला अजून job नाही. त्यामुळे depress होतो..आणि घाटपांडे सर बोलले त्याप्रमाणे मी मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करीन..

सुश्या - हो त्यासाठीच मी सूर्योपासना सुचवली आणि स्वतःचा अनुभव आहे पण शेवटी तुमचा अनुभव कृपया दोन महिन्याने तुमीच इथेच येऊन लिहा .
याने तुमचा आत्मविश्वास दृढ होऊन चित्त तर स्थिर होईलच शिवाय व्यक्तिमत्व विकासात चांगली मदत मिळेल .बाकी तुमीच सांगा दोन महिन्याने काय वाटतंय कारण मी कितीही सांगितल तरी स्वतःच्या अनुभवाशिवाय ते सर्व बोलाचा भात अन बोलाची कधी ठरेल . या काळात रविवारी शक्य असेल तर बिन मिठाचा आहार घ्या आणि लाल कपडे वापरा जमल्यास

या धाग्यावर गमभन यांनी एक स्तोत्र दिले आहे. मुलांनी लग्न ठरण्यासाठी म्हणावयाचे आहे. मी 2 महिन्यापूर्वी ते एका सहकर्मी ला सुचवले. त्याने ते म्हणणे सुरू केले. योगायोगाने की काय पण बरेच दिवस न जमलेले त्याचे लग्न मागच्याच आठवड्यात जमले.

घरात सतत विनाकारण धूसफूस, भांडण, एकमेकांचा पराकोटीचा द्वेष होत असेल तर काही स्तोत्र आहे का ? एका जेष्ठ नागरिक काकूंना हवे आहे. त्या जप करून शकतील पण मोठा उपाय करणे त्यांना अवघड आहे. घरी त्या आणि त्यांचे यजमान असे दोघेच आहेत. देवदयेने बाकी सर्व उत्तम आहे. पण घरी शांतता आणि समाधान नाही. कृपया काही उपाय सुचवा.

<<घरात सतत विनाकारण धूसफूस, भांडण, एकमेकांचा पराकोटीचा द्वेष होत असेल तर काही स्तोत्र आहे का ? >>

शाबरी कवचाचा संकल्प करून पाठ करतात

मनिमाऊ, हा पाठ त्या घरातील व्यक्तीनेच करायला हवा कि इतर कोणी त्यांच्याकरता संकल्प सोडून करू शकतो

धन्यवाद मनिमाऊ. मी त्या काकूंना सांगते. संकल्प करणे याबद्दल जास्त माहिती द्याल का?

Pages