स्तोत्रांचा अनुभव

Submitted by Anvita on 26 October, 2013 - 10:04

जेव्हा आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतात त्यावेळेस आपण जे कोणी आपल्याला उपाय सांगतात ते करत असतो . त्यात मग स्तोत्र, जप , धार्मिक स्थळांना जाऊन येणे इ . गोष्टी असतात . ह्या सगळ्याने मनोबल वाढते . समस्येला तोंड देण्याची शक्ती येते . हे सगळे तर आहेच . पण एखाद्या गोष्ट करून समस्या/ संकट टळले ह्याचा कोणाला अनुभव आहे का ? उदा . मृत्युंजयाचा जप केल्यामुळे आयुष्य वाढले ,महलक्ष्मी अष्टक रोज म्हटल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली.
मला वाटते कि स्तोत्र म्हटल्याने किंवा जप केल्याने positivity येते आयुष्यात.
पण धन, संतती, आरोग्य इ. ह्या दृष्टीने काही कोणाला अनुभव आले आहेत का

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे ओटी भरणे त्या विवाहेच्छुक व्यक्तीच्या सहमतीने व्हायला हवे असा काहीतरी क्लॉज टाका, नाहीतर इथले लोक कोणाचेही लग्न लावून देतील. Happy

आता त्या व्यक्तीचे लग्न झाले नसल्यास ठीक, उगाच लग्न झालेल्याच्या नावाने ओटी भरली तर पंचाईत व्हायची. Proud

विवाह लवकर ठरावा म्हणून मुली रुक्मिणी स्वयंवर वाचतात.
मुलांसाठी असे काही स्तोत्र आहे का ते माहिती नाही.

कारण देवीला कोणाची इच्छा पूर्ण करायची व कोणाची नाही हे माहीतच असेल ना !

मग ओटी भरायची तरी काय गरज आहे?

खरेतर आजकाल मुलांना जास्त गरज आहे. मुलाची लग्न पटापट ठरताना दिसत नाहीत . मुली आजकाल खूप शिकतात त्यांना जॉब पण चांगले मिळतात अर्थातच त्याच्या अपेक्षा वाढतात . पण ज्या मुलाचे शिक्षण खूप नाही व नोकरी बेताची आहे त्यांचे लग्न ठरणे अवघड झाले आहे.
खरेतर स्तोत्र जास्त प्रभावी असतात पण बऱ्याच जणाचा कल स्तोत्र नका सांगू खडे वगेरे घालतो असा असतो . सोपा मार्ग हवा असतो. स्तोत्र म्हणायला वेळ नाही बऱ्याच लोकांना .
दिक्षितजी ,मुलीना नक्की उपयोगी पडेल कदाचित "रुक्मिणी स्वयंवर" कारण बऱ्याच मुलींचे पण 'हा नको तो नको 'करत वय वाढत असतेच . मंगळ असलेल्याची लग्न पटकन ठरत नाहीत . हे अजून चालूच आहे.

///मग ओटी भरायची तरी काय गरज आ///
तशी म्हटलं तर कशाचीच गरज नसते . पण तरीही नवरात्रात देवीची ओटी भरण्याकरता ( लग्नासाठी म्हणूनच नव्हे )लांबच लांब लाइन असते . ते कसे तर पद्धत , मानसिक समाधान किंवा काही त्यातून येणारे अनुभव ह्यापेकी काही कारण असेल . कोणतीही गोष्ट हि अनुभवातूनच टिकून राहते . तुमचा विश्वास नसेल तर त्या गोष्टी करू नयेत . देव सुद्धा मानायची सक्ती नाही. तो प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे .

मुलांसाठी देवी सप्तशतीतला हा श्लोक आहे. तो रोज म्हणावा.

"पत्नी मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम् |
तारिणी दुर्ग संसारसागरस्य कुलोद्भवाम् ||

मी हनुमान वडवानल स्त्रोत्राबद्दल खूप ऐकलं आहे. या स्त्रोत्राचा किंवा पंचमुखी हनुमत्कवचा चा नित्य पाठ केल्यानं संकंटातून मार्ग निघतो, ग्रहदशा वाइट असेल तर तरून जायला मदत होते.

लग्न होण्यासाठी मुली नवनाथ कथासार अध्याय २८ पण वाचतात.

वैवाहिक सौख्यसाठी कोणते स्तोत्र आहे का ? आजकाल घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.जोडीदारकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत किंवा आता स्त्रिया पण independent आहेत त्यामुळे पटले नाही तर विभक्त होण्याचा मार्ग स्वीकारतात . कदाचित एखाद्या स्तोत्राचा मानसिक स्थिती चांगली राहण्याच्या दृष्टीने फायदा होईल . सामंजस्य वाढेल असे वाटते . कोणाला असे काही स्तोत्र माहित असल्यास सांगावे .

माझ्या माहितीप्रमाणे, स्त्रीयांनी यासाठी जास्तीत जास्त कुलदेवतेची उपासना करावी म्हणतात.
कुलदेवतेच्या टाकवर कुंकुमार्चन विधी करत दुर्गा स्तोत्र, दुर्गा कवच, अर्गलास्तोत्र रोज म्हणतात.

प्.पु. रंगावधुत स्वामीरचीत 'दत्तबावनी'चे मला स्वतःला अतिशय चांगले अनुभव आलेत.
कुठलीतरी अनामिक भिती असेल, संकटाची चाहुल लागताच, प्रवासात वगैरे कुठेही म्हटले तर चालते.
खुप जणांना दत्तबावनी म्हणताना हा अनुभव येतो की अगदी झोपेतसुद्धा ते चालु असते असं म्हणतात.

माझा अनुभव असा: २००९ मधे आमचे मोठे काका सिरियस अस्ल्याचा सकाळी फोन आला.आम्ही लगेच सुमो गाडी करुन निघालो. १०.३०ला राजगुरुनगरला ड्रायव्हरला नाष्टा करायचा असल्याने एका हॉटेलजवळ थांबलो. मनातुन माझा दत्तबावनीचा पाठ सुरु होता... १०-१२ श्लोक झाले असतील. ऊन वाढत होते म्हणुन आम्ही गाडीतच बसुन एक मोठी स्प्राईटची बॉटल मागवली. माझ्या मोठ्या भावाने डायरेक्ट तोंडाला लावुन स्प्राईट घेतले, ते पाहुन मी ही तसच करायचा प्रयत्न केला. त्याचा पहिला घोट पोटात गेला आणि दुसरा घोट गिळतांना घशातच अडकला. मला सुरवातीला काय झालं कळलच नाही. डोळ्यापुढे अंधारी आली, पोट खोलखोल जात होते. आणि ,"आई मला कसंतरी होतय गं" असं म्हणत मी शेजारी बसलेल्या आईच्या खांद्यावर मान टाकली. नंतरचं काही आठवलं नाही. पण २-३ मिनिटात शुद्धीवर आले तेव्हा आई मला वारा घालत होती आणि माझ्या मनातुन दत्तबावनीचा पुढचा श्लोक सुरु होता.नंतर मग मुलाने मी मग कसं करत होते त्याची अ‍ॅक्शन करुन दाखवली. मी डोळे वर फिरवले होते आणि मान मागे आणि तोंड उघडे टाकुन झटके देत होते, असं कळलं. मग पुढे लांबचा प्रवास होता म्हणुन नारायणगावला हायवेवरच एका हॉस्पीटल मधे जाउन जरा इंजेक्शन वै. घेतलं. डॉक्टरांना सर्वांनी डीटेलवार सांगितलं तर डॉक्टरांचे म्हणणे की मेंदुला २-३ सेकंद रक्तपुरवठा झाला नव्हता त्यामुळे हा प्रकार घडला.

मला व्यंकटेश स्तोत्राचा बराच अनुभव आहे. इच्छित फळ मिळण्यासाठी संकल्प सोडुन व्यंकटेश स्तोत्र रात्री १२ वाजता वाचल्याने फायदा होतो. त्याची रात्रीची पारायणेही करतात. ३ दिवस रोज ७ वेळा, ७ दिवस रोज ३ वेळा किंवा एकाच दिवशी २१ वेळा. अशी पारायणे केल्याने काहीनाकाही अनुभव तर नक्कीच येतात. दर्शन मिळते. पाण्याचा वै. आवाज येतो. मागे कुणीतरी असल्याचा अनुभव ही येतो. जरी रात्री १२ ला अंघोळ करुन बसलो तरी न घाबरता वाचन चालु ठेवावे.

दत्तबावनी मीपण दर गुरुवारी म्हणते. अनुभव नाही सांगता येणार पण प्रसन्न वाटते. रंगावधूत स्वामींना माझी आई प्रत्यक्ष बऱ्याचदा भेटली आहे, माझी आई बडोद्याची म्हणून जवळच त्यांचे सर्व कुटुंब बऱ्याच वेळा रंगावधूत स्वामींना भेटायला जायचे.

व्यंकटेश स्तोत्राचा अनुभव माझ्या बहिणीच्या मैत्रिणीला खूप चांगला आला. तिच्या आर्थिक, मानसिक परिस्थितीत खूप फरक पडला आता भाड्याच्या जागेतून डोंबिवलीसारख्या ठिकाणी स्वतःच्या बंगल्यात राहायला गेली. ती सतत व्यंकटेश स्तोत्र वाचायची, हा अनुभव तिनेच आम्हाला सांगितला.

आज लंच सुरु होताना अचानक दत्तदर्शनाची इच्छा झाली आणि ती पुर्णही झाली. सकाळी हेवी नाश्ता झाल्यामुळे भूकही नव्हती. लंच अवर संपताना परतही आले. तिकडे गेले तेव्हा दत्तबावनीच चालू होती. दत्तबावनीचा विषय चालू आहे म्हणून सहजच लिहिलं.

अर्पणा, 'हनुमान वडवानल स्तोत्र' आपल्या संग्रहात दिसत नाहिये. http://www.maayboli.com/node/13468 इथे जाऊन लिहू शकाल का?

इथे वाचून मी हनुमान वडवानल स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. संपूर्ण चातुर्मास ह्या पुस्तकात आहे हे स्तोत्र.

दत्तबावनीतला ही ओळ मला खुप भावते. असे वाटते की आपण दत्तप्रभूंना अगदी जिवाच्या आकांताने हाक मारतोय.

"आव्यो शरण बाल अजाण | ऊठ दिगंबर चाल्या प्राण ||"

नामस्मरणदेखील झोपेत चालू असण्याचा अनेकांना अनुभव येतो.

गमभन +१००००

<<आज लंच सुरु होताना अचानक दत्तदर्शनाची इच्छा झाली आणि ती पुर्णही झाली<<
अश्विनी Happy

एका बड्या धेंडाच्या मोठ्या कंपनीत काम करतांना ऑफीसच्या राजकारणाचा बळी होत असतांना मी माझ्यावर येणारं बालंट दुर करु शकले..., . दत्त बावनीचं सारखी घोकत होते म्हणुन!
खुप मोठा किस्सा आहे त्यामुळे इथे सांगु शकत नाही.

मी -आर्या , अंजू धन्यवाद !
अश्विनी- के तुम्हाला तर मोठा धन्यवाद स्तोत्रांच्या संग्रहाचा
धागा काढल्याबद्दल .
गमभन आपण आपले अनुभव वेळोवेळी ह्या धाग्यावर मांडलेत त्यामुळे तुम्हाला पण धन्यवाद !

नामस्मरणदेखील झोपेत चालू असण्याचा अनेकांना अनुभव येतो.>>> रोजचा अनुभव आहे हा. हल्ली अपराधक्षमापन स्तोत्राचा सीझन आहे माझ्याकडे बहुतेक Wink जागी होते तेव्हा कुठलाही श्लोक सुरु असतो स्मृतीत.

अन्विता... श्रीराम Happy

आमच्या गुरुंच्या बोधः
"सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पुर्ण मनोरथ" असे संतांचे सांगणे आहे मग आपण काळजी का करा? सदिच्छा जरी असली तरी तिच्या पाठीमागे देवावर दृढश्रद्धेचा आणि तपश्चर्येचा जोर असावा लागतो.या दोन गोष्टींचा अभाव असल्यास देव आपली इच्छा पुरी करण्यास त्वरा करीत नाही. म्हणुन धीर धरुन राहणेस शिकावे.
आपला हेतु पुर्ण व्हावा म्हणुन देवाच्या पाठीशी सारखा तगादा लावणे म्हणजे भक्ती नसुन देवाला त्रास देणे आहे.
सकाम तपश्चर्येत दृढ श्रद्धा नसते त्यामुळे त्यात जोर नसतो. सकाम म्हणजे संसारातील काही ना काही उणीव भरुन काढण्याचा हेतु. पण निर्हेतुक तपश्चर्येशिवाय देवाला खुश करता येत नाही. यासाठीच संत निष्काम सेवा करण्याबद्दल इषारा देतात. आपण काही ना काही हेतु धरुन जरी देवाकडे वळत असलो तरी आपण एकसारखे देवाजवळ संसारातील तक्रारी सांगणे सोडले नाही तर आपली भक्ती खरी नसुन वरपांगी आहे म्हणुन देव आपली तक्रार ऐकुन घेण्यास तयार होत नाही.
याकरिता आपल्यात प्रगती झाली पाहिजे म्हणजे आपले मुख्य कर्तव्य काय हे आपण जाणले पाहिजे म्हणजे दयामय प्रभु आपल्याला कोणत्या वेळी काय हवे ते बिनचुक पुरवितो.

mansmi18 , अगदी बरोबर आहे . निष्काम भक्ती हीच खरी भक्ती परंतु सर्वसामान्य माणसे हि संसारात गुरफटलेली असतात स्वत: साठी नव्हे पण आपल्या जोडीदाराबाबत किंवा मुलांबाबत , आई , वडील , भावंडे ह्या सगळ्यामध्ये अडकलेला असतो . त्यामुळे देवाची भक्ती तो बहुतेक वेळेस स्वार्था मुळेच करत असतो. ह्या सगळ्यामध्ये स्तोत्रांचा उपयोग मानसिक बळ वाढवण्यासाठी होत असतो. जो माणूस ह्या सगळ्यांच्या पलीकडे पोहचतो त्याला मग आपण संत म्हणतो .

विवाह लवकर ठरावा म्हणून कोणते स्तोत्र आहे का माहित नाही. कोणाला त्या बाबत अनुभव असल्यास सांगावे .पण

स्त्रोत्र नाही रुख्मीणी स्वयंवर चे संकल्पपुर्वक केलेले पाठ ( शात्र अस सांगत हे पुस्तक व त्यानुसार ) मी अनेकंना सुचवले आहेत. खास करुन पत्रिकेत विवाहयोग उशीरा असताना देखील याचे चांगले अनुभव आलेले अनेक लोक माझ्या परिचयात आहेत.

>> हल्ली अपराधक्षमापन स्तोत्राचा सीझन आहे माझ्याकडे बहुतेक
अश्विनी,
देव्यापराधक्षमापनस्तोत्र ना? आहेच ते नितांतसुंदर.
अर्थ तर किती सुरेख आहे त्याचा...

आदि शंकराचार्यांसारखा वेद-वेदान्त-मीमांसा इत्यादींत अधिकारी आणि अद्वैतवेदान्ताचा पुरस्कर्ता इतकी भावगहन रचना करू शकतो हे कितीही तर्क केला तरी पटत नाही.
खरेतर 'रचना करणे' हाही शब्दप्रयोग चूकच म्हणावा लागेल... किती सहजभाव आहे आचार्यांच्या सगळ्याच स्तोत्रांत...

संतती सौख्या साठीही काही स्तोत्र आहेत का?
मी स्तोस्त्र संकलनाच्या धाग्यात शोधले पण नाही सापडले.

Pages