स्तोत्रांचा अनुभव

Submitted by Anvita on 26 October, 2013 - 10:04

जेव्हा आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतात त्यावेळेस आपण जे कोणी आपल्याला उपाय सांगतात ते करत असतो . त्यात मग स्तोत्र, जप , धार्मिक स्थळांना जाऊन येणे इ . गोष्टी असतात . ह्या सगळ्याने मनोबल वाढते . समस्येला तोंड देण्याची शक्ती येते . हे सगळे तर आहेच . पण एखाद्या गोष्ट करून समस्या/ संकट टळले ह्याचा कोणाला अनुभव आहे का ? उदा . मृत्युंजयाचा जप केल्यामुळे आयुष्य वाढले ,महलक्ष्मी अष्टक रोज म्हटल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली.
मला वाटते कि स्तोत्र म्हटल्याने किंवा जप केल्याने positivity येते आयुष्यात.
पण धन, संतती, आरोग्य इ. ह्या दृष्टीने काही कोणाला अनुभव आले आहेत का

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वासुदेवानंद सरस्वती स्वामींचे अघोर कष्ट नाशक स्तोत्र पण खूप छान आहे. अनामिक भिती,हुरहूर नाहीशी होते.
या धाग्यावर याबद्दल आधी लिहिले असेल तर प्रतिसाद संपादीत करेन.

<<गुरुचारित्राच्या 14 व्या अध्याय नित्य पठन केल्याने मला स्वताला<< +१
विशेषतः कामाच्या ठिकाणी होणारी बॉसची कटकट कमी होते.

>>खरोखरच वजन कमी करण्यासाठी व्यायामाच्या जोडीला कोणते स्तोत्र आहे का??

फक्त वजन कमी करण्यासाठी (व्यायामाव्यतिरिक्त) अमुक स्तोत्र, शुगर कमी करण्यासाठी (औषधाव्यतिरिक्त) अमुक स्तोत्र अशी स्तोत्रे नक्कीच नाहीत.
शारीरिक संतुलनासाठी कुठले स्तोत्र आहे का हे पहायला हवे. असे स्तोत्र असावे असा अंदाज आहे.

ललितापंचकम, ललितासहस्त्रनाम हृदयविकार कमी होण्यासाठी म्हणतात हे ऐकलं होतं. खखोदेजा!
तसं नामसाधनेने डीप्रेशन, डोकेदुखी, मनातला उद्वेग, नकारात्मकता, विकार कमी होतात हा स्वानुभव आहे.

कवच या प्रकारातल्या स्तोत्रांमधे त्या दैवताने माझ्या शरीराच रक्षण कराव या अर्थाची प्रार्थना असते. बहुतेकांना माहित असलेल उदाहरण : रामरक्षा. रघुवंशात जन्मलेला (राघव) राम माझ्या शिराच रक्षण करो, दशरथाचा आत्मज (पुत्र) राम माझ्या भालप्रदेशाच ( कपाळाच ) रक्षण करो, कौसल्येचा पुत्र राम माझ्या डोळ्यांच रक्षण करो, विश्वामित्रांचा प्रिय (शिष्य ) राम माझ्या कानांच रक्षण करो, यज्ञांच रक्षण (मखत्राता) करणारा राम माझ्या नाकाच सुमित्रेचे वात्सल्य मिळालेला राम माझ्या मुखाच रक्षण करो, विद्यानिधी असलेला राम माझ्या जिव्हेच जीभेच रक्षण करो भरत ज्याला वंदन करतो असा राम माझ्या कण्ठाच रक्षण करो, दिव्य आयुधे धारणकरणारा राम माझ्या खांद्यांच रक्षण करो, (शिव)धनुष्य भंग करणारा राम माझ्या भुजांच रक्षण करो, सीतापती राम माझ्या करांच (पंजा) रक्षण करो, परशुरामांना पराभूत करणारा राम माझ्या हृदयाच रक्षण करो, खर राक्षसाचा विनाश करणारा राम माझ्या शरीराच्या मध्य भागाच रक्षण करो, जांबुवंताला आश्रय देणारा राम माझ्या नाभीच रक्षण करो, सुग्रीवाचा प्रभु राम माझ्या कंबरेच रक्षण करो,........ अस पावलां पर्यंत शरीराच्या अवयवांच रामानी रक्षण कराव या अर्थाचे श्लोक आहेत. जो या स्तोत्राच पठण करतो तो... स चिरायू, सुखी, पुत्री (संतती असणारा),विजयी,विनयी भवेत (होतो) अशी फलश्रुती पुढे सांगितली आहे.

व.दा. भट ह्यांनी त्यांच्या 'पंचमस्थान ' ह्या पुस्तकात षष्टीदेवीचे स्तोत्र दिले आहे . त्यात त्यांनी असे दिले आहे कि जे लोक संतति प्राप्तीबद्दल पूर्ण निराश झालेले असतात किंवा ज्यांना वारंवार गर्भपाताचा त्रास होतो अशांना ह्या स्तोत्राचा उपयोग होऊ शकतो .

आपण करत असलेले विविध प्रयत्न वेगवेगेळ्या लेव्हल वर काम करतात. स्तोत्रं म्हणणारी लोकं मूर्खच असतात असा समज का बरं व्हावा? >>
स्तोत्र म्हणणे मूर्खपणाचे आहे असे अजीबात म्हणलेले नाहीये. आणि स्तोत्र म्हणायला कणभरही विरोध नाही. पण एकेका स्तोत्रामागे , मूल , पैसा , आरोग्य प्राप्तीसाठी अशी 'लेबले' जी लावली जातायेत त्याला फक्त विरोध आहे. सामन्य , गरजवंत माणसे ही फक्त या 'लेबल'वाल्या फलप्राप्तीसाठीच धडपडत असतात. आणि तिथून पुढे अशा श्रद्धा / अंधश्रद्धांची सुरवात होते.
कोणतेही लेबल न लावता मनःशांतीसाठी , मानसिक आधारासाठी स्तोत्र म्हणणे नक्कीच फायद्याचे आहे. अतिशय योग्यच आहे.

रच्याकने , हा माझ्या एका जवळच्या नातेवाईकाकडून आलेला स्तोत्राचा अनुभव :
आमच्या एक नातेवाईक बाई अतिशय भाविक , वेगवेगळी स्तोत्रे , जपजाप्य ई करणार्‍या अहेत. त्यांच्या मुलीला पहिली मुलगी झाल्यावर खेदाने म्हणाल्या , तिला पुत्र प्राप्तिसाठी एक स्तोत्र म्हणावयास सांगितले होते पण तिने खूप उशीरा म्हण्जे ७ वा महिन्या लागल्यावर म्हणयाल सुरवात केली, म्हणुन मुलगी झाली.
दुसर्‍या वेळेला मात्र या बाईंनी आणि त्या मुलीने देखिल दिवस राहिल्याचे कळताच रोज ते स्तोत्र नित्यनियमाने म्हणले आणि तिला खरोखरच पुत्र प्राप्ति झाली.
त्या स्तोत्राचे नाव माझ्या अत्ता लक्षात नाही परंतू वरील किस्सा १००% खरा आहे आणि माझ्या समोरच घडला आहे.

कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही पण काही शंका आहेत.

जे लोक स्तोत्र म्हणतात ते खरच त्याचा अर्थ समजून म्हणतात का केवळ म्हणायचे म्हणून म्हणतात?

स्तोत्र म्हणण्याचे कारण जर मनःशांती, मानसिक आधार हे असेल तर प्रत्येक problem साठी वेगळ्या स्तोत्राची गरज आहे? नुसत्या नामस्मरणाने हे साध्य होणार नाही का?

नुसत्या नामस्मरणाने हे साध्य होणार नाही का?>>>> नक्की होईल Happy

गर्भ राहतानाच लिंग ठरते. स्तोत्राने ते बदलू शकत नाही. आणि मला नाही वाटत की असा मुलगी मुलगा भेदभाव करणार्‍यांसाठी कुठलं स्तोत्र काम करेल.

ज्यांची खरंच ईश्वरावर श्रद्धा असेल, त्यांना हे ही मान्य असायला हवं की जरी आपली एक सामान्य मानव म्हणून कुठली साहजिक इच्छा असली तरी आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे त्या ईश्वरालाच माहित असतं आणि त्याला पुर्ण शरण असाल तर वैद्यकिय प्रयास आणि अध्यात्मिक प्रयासांची कितीही जीव तोडून आदळ आपट केली तरी योग्य असेल तरच तो देईल, अन्यथा देणार नाही. असण्यापेक्षा नसणे सुखाचे असेल तर तो देणारच नाही.

जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशिल खचित,
हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा

>>जे लोक स्तोत्र म्हणतात ते खरच त्याचा अर्थ समजून म्हणतात का केवळ म्हणायचे म्हणून म्हणतात?<<
अर्थ समजण्याच्या भानगडीत कोणी फारसे पडत नाही. आला मंतर कोला मंतर छू चा अर्थ समजण्याच्या भागगडीत कुणी पडते का? लहान मूल रडताना आपण याचा वापर करतो व तो थोड्या वेळाने आपल्या वेदना विसरुन हसायला लागतो. स्त्रोत्राचे तसे होत असावे.

>>स्तोत्र म्हणण्याचे कारण जर मनःशांती, मानसिक आधार हे असेल तर प्रत्येक problem साठी वेगळ्या स्तोत्राची गरज आहे? नुसत्या नामस्मरणाने हे साध्य होणार नाही का?<<
श्रद्धेने केलेल्या नुसत्या नामस्मरणाने देखील साध्य होते. प्रत्येक वेळी वेगळ्या स्त्रोत्राची गरज नाही असे नामस्मरण वाले म्हणतात.

अश्विनी के
//गर्भ राहतानाच लिंग ठरते. स्तोत्राने ते बदलू शकत नाही. आणि मला नाही वाटत की असा मुलगी मुलगा भेदभाव करणार्‍यांसाठी कुठलं स्तोत्र काम करेल.// अगदी बरोबर .
तुम्ही अगदी योग्य शब्दात सांगितले आहे.

डेलिया , जी स्तोत्र सांगितली आहेत ती पूर्वापार चालत आलेली आहेत आणि त्याच्या अनुभवातूनच मग तुम्ही म्हणता तशी 'लेबल' लावण्यात आली आहेत. ती लेबल आत्ताची नाहीत त्यामुळे अनुभवातून आलेले एखादे स्तोत्र जर कुणाच्या उपयोगी पडत असेल तर त्यात तुम्हाला काय प्रोब्लेम आहे? इथे चर्चा होणारी स्तोत्रे हि 'संतति प्राप्ती ' साठी आहेत . केवळ मुलगा / मुलगी असे नव्हे . उलट तुम्हीच अशी चुकीची उदाहरणे देऊन विषयाला फाटे फोडत आहात. व . दा भट ह्यांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकात 'संतति' प्राप्ती साठी स्तोत्र असे म्हटले आहे. पुत्र प्राप्ती नव्हे.
संतति ह्या शब्दाचा अर्थ ( मुलगा/ मुलगी) .

डेलिया,

>> सामन्य , गरजवंत माणसे ही फक्त या 'लेबल'वाल्या फलप्राप्तीसाठीच धडपडत असतात. आणि तिथून पुढे
>> अशा श्रद्धा / अंधश्रद्धांची सुरवात होते.

मग अशी सामान्य माणसे शोधून त्यांचं प्रबोधन करा. या बाफवर येण्याचं कारणच नाही मुळी.

आ.न.,
-गा.पै.

या बाफवर येण्याचं कारणच नाही मुळी.
<<
हाय्ला!
हे गापै यांचे खासगी मालकीचे पान आहे होय?!
अर्र! मग तर इथे लिहायलाच हवे. जरा बाफ वाचतो आधी मग पहातो Happy

डेलिया,
आपण समोरच्या व्यक्तीला गुड मॉर्निंग म्हटल्याने त्याची मॉर्निंग गुड होतेच का? गुड इव्हनिंग म्हटल्याने इव्हनिम्ग गुड होतेच का?
आपण बेस्ट विशेस दिल्याने समोरच्याचे सगळे मनोरथ पुर्ण होतातच का? तरी आपण हे सगळे म्हणतोच ना?
मग स्तोत्रांनी वाटत असेल बरं तर म्हणू दे ना लोकांना.. अंधश्रद्धा कुठे आली मध्ये? तसंही इथे जवळपास [रत्येकाला मान्य आहेच की नुसतं स्तोत्र म्हणून काही होणार नाहिये. पण बरेअचदा करण्यासारखे काही न्सतेच, तेव्हा हताशपणे बघत रहाणे असह्य होते लोकांना. अशा प्रसंगी स्तोत्र-पुजा-अर्चा माणसाला "मी काहीतरी करतोय परिस्थिती बदलण्यासाठी" हा दिलासा पुरेसा ठरतो.
तसं तर माणुस मनाला बरं वाटावं म्हणून अनेक उटपटांग उद्योग करतो, त्यापेक्षा हे बरेच.

काही लोकांना गरज नाही वाटत या सगळ्याची हे मी समजु शकते. पण अशा लोकांनी दुसर्‍याला सरसकट अंधश्रद्ध ठरवणे बरोबर नाही. प्रार्थना, शुभेच्छा, आशिर्वाद्/दुवा/ब्लेसिंग्स याचे महत्व सगळ्या जातीधर्मात सांगितलेय अन ते अनादि काळापासून फॉलो ही केल्या जातेय त्या अर्थी "कुछ तो बात है" पण आपल्याला गरज वाटली नाहिये/ कळली नाहिये अवढे मान्य करुन गप बसावे हे माझे अनुभवाने आलेले शहाणपण आहे.

इब्लिस,

>> हे गापै यांचे खासगी मालकीचे पान आहे होय?!

विषयांतर. या बाफचा विषय स्तोत्रांच्या अनुभवांचा आहे. अंधश्रद्धा कशा सुरू होतात हा नाही. तसेच काय कोणाच्या मालकीचे आहे हाही या बाफचा विषय नाही.

आ.न.,
-गा.पै.

>>सामन्य , गरजवंत माणसे ही फक्त या 'लेबल'वाल्या फलप्राप्तीसाठीच धडपडत असता
>>मनःशांतीसाठी , मानसिक आधारासाठी स्तोत्र म्हणणे नक्कीच फायद्याचे आहे

डेलिया, ऐहिक गोष्टींची इच्छा मनात असणं हे सामान्य आणि गरजू व्यक्तीचं लक्षण आणि मानसिक समाधान / आध्यात्मिक समाधान ह्याची इच्छा असणं हे असामान्य व्यक्तीचं लक्षण असं काही असतं का?

जनरली कोणत्याही स्तोत्राचे दोन भाग असतात 'देवाचीस्तुती' आणि फलश्रुती. त्यामुळे 'लेबलं' ऑलरेडी आहेतच. इथे लोकं लेबल आणि त्याला असाइन्ड स्तोत्रं अशी फक्त माहिती देताहेत.

मला अजूनही नक्की कशाला प्रॉब्लेम आहे ते कळत नाहीये.

--- 'लेबल' असलेलं कोणतच स्तोत्र म्हणायला
--- ठराविक 'लेबलं' असलेलं स्तोत्र म्हणायला
---सामान्य आणि गरजवंतांनी स्तोत्रं म्हणायला

देवाचं फक्त नामस्मरण करून त्याला आपली इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना करणं तुम्हांला उचित वाटतं, ती अंधश्रद्धा वाटत नाही पण तीच इच्छा संबंधित स्तोत्र म्हणून प्रार्थना करणं चूक वाटतं / अंधश्रद्धा वाटते...

मला अ‍ॅक्चुअली कळत नाहीये तुम्हांला काय म्हणायचय ते.

नताशा -

जी लोकं इच्छापूर्ती / प्रार्थना म्हणून स्तोत्रं म्हणत आहेत ती जनरली हिंदू आहेत, हिंदूंमधे बरेच देव आहेत आणि वेगवेगळ्या देवांची वेगवेगळी डिपार्ट्मेंट्स आहेत (बुद्धी - गणपती, ऐश्वर्य - लक्ष्मी इ. ) Happy त्यामुळे त्या त्या देवतांची स्तोत्रं आहेत.
आपल्याकडे विविध गुरूही आहेत आणि जनरली गुरू हे ठराविक मंत्र / स्तोत्रं रेकमेंड करतात.
कशानं मनःशांती मिळेल हे काही सायन्स नाही, व्यक्तीनुरूप / काळानुरूप ते बदलतं. मला स्वतःला डोळे बंद करून बसल्यानं अत्यंत अशांत वाटतं, देवळात गेल्यावर अशक्य रडायला येतं....पण म्हणून देवळात इतरांनी जाउ नये असं मी नाही म्हणू शकत, बहुतांशी लोकांना देवळांत जाउन बरं वाटतं.

अपर्णा व नताशा यांचे प्रतिसाद विचार करायला लावणारे आहेत.मला ते बर्‍याच अंशी पटलेले देखील आहेत. चर्चे निमित्त मला औषधे उतारे आणि आशिर्वाद या डॉ सुधीर कक्कर यांच्या पुस्तकाचे डॉ श्रीकांत जोशी यांनी केलेला अनुवाद आठवला. डॉ श्रीकांत जोशी हे मानसोपचार तज्ञ आहेत ज्यांनी मनोविकाराचा मागोवा हे एक मानसशास्त्रातील दस्ताऐवज असलेले पुस्तक लिहिले.
फक्त लिंक ही जाणीव पुर्वक देतो आहे. काही लोकांना अन्य संकेतस्थळावरील लेखन इथे टाकले की फारच मानसिक त्रास होतो असे पुर्वानुभवानेलक्षात आले आहे.

जी लोकं इच्छापूर्ती / प्रार्थना म्हणून स्तोत्रं म्हणत आहेत ती जनरली हिंदू आहेत, हिंदूंमधे बरेच देव आहेत आणि वेगवेगळ्या देवांची वेगवेगळी डिपार्ट्मेंट्स आहेत (बुद्धी - गणपती, ऐश्वर्य - लक्ष्मी इ. ) त्यामुळे त्या त्या देवतांची स्तोत्रं आहेत.>>> हे आवडले Happy

माझा अनुभव,

मी तर देवळात सुद्धा जात नाही.कारण मला आवडच नाही, मग इतर जातात तर जावु दे. चुकुन कधी कोणामुळे जावं लागलं तर जाते. पन म उगाच तणातण करत नाही आलोच आहे तर करुया जरा नमस्कार.

पण उन्हा पावसा मध्ये लहान तान्हं घेवून जेव्हा लांब रांगात उभं रहातात तेव्हा आश्च्र्य मात्र वाटतें व त्यांचा राग येतो की काय हे, इतकं कळत नाही. पण परत तो त्यांचा प्रश्ण आहे म्हणून सोडून देते.

आवड म्हणून एखाद स्तोत्र मात्र म्हणते कधी जेव्हा मन अशांत असतं तेव्हा.

आपण जे काही करतो ते मनापासून आणि सतत्याने करावे...श्रध्येने करावे....
<<<पण आपण म्हणता त्याप्रमाणे positivity निश्चित येते. मनोबल वाढते . त्यामुळे तार्किकता वाढून समस्या सोडवण्याचे उपाय आपणासच सुचु लागतात.
त्यातुनच यशाचा मार्ग दिसू लगतो.>>>+१

स्तोत्रे, त्यांचे अनुभव, त्याबद्दलच्या अंधश्रद्धा यावर हा धागा आलच्च का? अपेक्षितच होतं ते. आपण तेव्हढे हुस्शार, बाकीचे तेवढे मूर्ख अशी अंधश्रद्धा अनेकांकडे दिसून येते हल्ली. चालायचंच.

मला स्वतःला कित्येक स्तोत्रांमधील भाषा, तिचा वापर आणि ती स्तोत्रे म्हणतानाची चाल प्रचंड आवडते. अमुक एक गोष्ट व्हावी म्हणून कुठलेच स्तोत्र म्हटले जात नाही, पण तरीही दिवसातून एकदा वेळ मिळाला की गणपती स्तोत्र, सरस्वतीवंदना, राघवेंद्रस्तोत्र, राघवेंद्रमंगलाष्टका अवश्य म्हणते. मला आवडतं म्हणून. स्वतःला न म्हणता येणारी पण ऐकायला आवडणारी कितीतरी स्तोत्रं आहेत.

'संतति' प्राप्ती स्तोत्राचा अनुभव आला असे म्हण्ले तर ते पटतेय.
पण पुत्र प्राप्ती स्तोत्राचा अनुभव आला असे म्हण्ले तर ते पटत नाही , असे का बरे ? ( अश्वीनी यांनी सांगितलेला टेक्नीकल प्रॉब्लेम दूर करायचा झाल्यास गर्भ धारणे पुर्वीपासून स्तोत्रे म्हण्लेले असू शकते , अर्थात मला कल्पना नाही )
संतति होण्याइतकेच , पुत्र जन्मास येणेही अतिशय आवश्यक असे पुर्वी समजले जाई. त्यामुळे पुत्र प्राप्ती स्तोत्र असणार असा माझा अंदाज आहे. गूगल केल्यावर पण २-४ पुत्र प्राप्ती स्तोत्र मिळाली. त्यांनी कोणते म्हण्ले होते ते अत्ता माहित नाहीये.

मला स्वतःला कित्येक स्तोत्रांमधील भाषा, तिचा वापर आणि ती स्तोत्रे म्हणतानाची चाल प्रचंड आवडते. >> मलापण खरेच या सगळ्या गोष्टी आवडतात. त्यामुळे काही स्तोत्रे अजुनही पाठ आहेत.

नंदिनी ,
//स्तोत्रे, त्यांचे अनुभव, त्याबद्दलच्या अंधश्रद्धा यावर हा धागा आलच्च का? अपेक्षितच होतं ते. आपण तेव्हढे हुस्शार, बाकीचे तेवढे मूर्ख अशी अंधश्रद्धा अनेकांकडे दिसून येते हल्ली. चालायचंच.//

हा धागा खरोखरी ज्यांना दुसर्यांच्या अनुभवामुळे मदत होऊ शकेल ह्या उद्देशाने काढला आहे. कोणत्याही उद्देशाने स्तोत्र म्हणणे म्हणजे अंधश्रद्धा वगेरे ह्याची चर्चा करायला नव्हे . माझा स्वत: चा थोडा बहुत ज्योतिष शास्त्राचा अभ्यास आहे त्यामुळे बर्याच जणाच्या समस्या कळतात . त्यातून मार्ग काढायचा म्हटला तर मन शांत हवे . स्तोत्रांमुळे ते शक्य होते असे वाटते . म्हणून वाटले कि जर काही स्तोत्रे कशासाठी म्हणतात ह्याची माहिती मिळाली तर लोंकाना फायदा होईल. आपण ज्याला एक positive attitude आणि hope म्हणतो ती मिळेल.

>>मन एकाग्र व्हावे म्हणून काय स्त्रोत्र म्हणावे?<<
जे स्त्रोत्र आपल्या भावविश्वाशी निगडीत आहे. असे म्हणता येणारे कोणते ही स्त्रोत्र म्हणावे. हे एक प्रकारचे माईंड डायव्हर्टिंग टेक्निक आहे. अस्थिर करणार्‍या विचारापासून लांब नेण्यासाठी उपयोगाला येते.

मन एकाग्र करणे आणि माईंड डायव्हर्ट करणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नको असलेल्या विचारांपासून दूर जाण्यासाठी एखादी बिनडोक सिरियलही उपयोगी पडते.

गुरुचरित्र वाचताना काही पथ्य पाळायची असतात का? बायकांनी वाचणे ह्याबाबतही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. ह्याबद्दल कोणी सांगू शकेल का?

Pages