स्तोत्रांचा अनुभव

Submitted by Anvita on 26 October, 2013 - 10:04

जेव्हा आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतात त्यावेळेस आपण जे कोणी आपल्याला उपाय सांगतात ते करत असतो . त्यात मग स्तोत्र, जप , धार्मिक स्थळांना जाऊन येणे इ . गोष्टी असतात . ह्या सगळ्याने मनोबल वाढते . समस्येला तोंड देण्याची शक्ती येते . हे सगळे तर आहेच . पण एखाद्या गोष्ट करून समस्या/ संकट टळले ह्याचा कोणाला अनुभव आहे का ? उदा . मृत्युंजयाचा जप केल्यामुळे आयुष्य वाढले ,महलक्ष्मी अष्टक रोज म्हटल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली.
मला वाटते कि स्तोत्र म्हटल्याने किंवा जप केल्याने positivity येते आयुष्यात.
पण धन, संतती, आरोग्य इ. ह्या दृष्टीने काही कोणाला अनुभव आले आहेत का

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असा काही अनुभव नाही. पण आपण म्हणता त्याप्रमाणे positivity निश्चित येते. मनोबल वाढते . त्यामुळे तार्किकता वाढून समस्या सोडवण्याचे उपाय आपणासच सुचु लागतात. त्यातुनच यशाचा मार्ग दिसू लगतो.

स्तोत्र हा शब्द स्तुती या शब्दापासून आला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वराची स्तुती केली तर तो खुश होउन आपल्याला मदत करेल अशा भावनेने मनोबल वाढते.परमेश्वर ही शेवटी आपलीच निर्मिती आहे. त्यामुळे त्याला भावभावना या आल्याच. राग लोभ मत्सर द्वेष प्रेम भक्ती या भावनाही आल्याच. परमेश्वर समजा नुसताच निर्गुण निराकार आहे तर मला त्याचा काय उपयोग? माझ्या अडचणी संकटे दूर करण्यासाठी त्याचा काही उपयोग नसेल तर असा परमेश्वर असला काय आन नसला काय सारखेच. म्हणुन आपण त्याला सगुण साकार केल आहे. पुढे त्याला भक्तवत्सल करुणाघन ही केल. आता तो आपल्या उपयोगाला येईल.
अवांतर- स्तोत्र मंजरी हा कविता खरवंडीकर व धनंजय खरवंडीकर यांचा कार्यक्रम फार छान आहे. लयबद्द स्तोत्रे ऐकताना फार छान वाटते.

माझा अनुभव असा आहे कि स्तोत्र हे स्वतःम्हणत असताना ते मोठ्याने म्हणजे किमान स्वत: ला ऐकू येईल असेच म्हणावे. याचे कारण असे आहे कि स्तोत्र हे सकारात्मकता उत्पन्न करते .समजा घरातील उपद्रवी प्राणी(नकारात्मकता) हाकलून द्यावयाचा आहे तर हळू किंवा मनातल्या मनात म्हणून तो जात नसतोच तसेच दारात कोणी परिचित आले(सकारात्मकता) तर मनातल्या मनात त्यांचे स्वागत करता येत नाही त्यांना अत्यंत आदराने या म्हटले तरच येण्याचे सार्थक होईल त्यामुळे स्तोत्र हे एकाच वेळी दोन्ही कामे करते म्हणजे नकारात्मकता घालवणे व सकारात्मकता वाढवणे म्हणून ते मोठ्याने म्हणूनच अनुभव घ्यावा

स्त्रोत्रांच्या पठणाने अनुभव निश्चितच येतात. अनेकांना ते आले असतील, पण अश्या पब्लिक फोरमवर आपल्याला आलेले आध्यात्मिक अनुभव उघड करणे उचित वाटत नसावे.

स्तोत्रांच्या पठणाने अनुभव निश्चितच येतात. अनेकांना ते आले असतील, पण अश्या पब्लिक फोरमवर आपल्याला आलेले आध्यात्मिक अनुभव उघड करणे उचित वाटत नसावे. >>> +१

स्तोत्र पठण केल्याने एक प्रकारे आगळेच तेज आल्यासारखे वाटते.सकारात्म दॄष्टीकोन राहतो. !

अनुभव कळले तर ते इतर लोकांसाठी मार्गदर्शन पर ठरतील असे वाटते आणि तसेही बरेच लोक स्व: ताचे नाव username म्हणून वापरत नाहीत त्यामुळे खरी identity तशीही कळत नाही . कोणते स्तोत्र म्हटल्याने कोणत्या बाबतीत फायदा होतो हे कळेल . स्तोत्रांचे अनुभव येत असावेत ह्या बद्दल काही दुमत नाही.

माझ्या ओळखीत एका बाईला काही दिवसापूर्वी रात्री भयानक स्वप्न पडायची नंतर ते स्वप्न आठवत नसे . तेव्हा तिला रामरक्षा झोपण्यापूर्वी ऐक असे सांगितले . त्यामुळे ते स्तोत्र नियमित रात्री ऐकल्यामुळे तिचा त्रास खूपच कमी झाला .

///पण अश्या पब्लिक फोरमवर आपल्याला आलेले आध्यात्मिक अनुभव उघड करणे उचित वाटत नसावे.///
अध्यात्मिक पातळीवर पोहचण्यास तर खूप वेळ
लागत असेल पण भौतिक गोष्टी मधल्या समस्या
सोडवण्याकरता जर कोणाच्या अनुभवाचा फायदा झाला तर ते चांगलेच आहे.

ॠणमुक्तिस्तोत्राचा अनुभव - जेव्हा गृहकर्ज घेतले, तेव्हा छोट्या छोट्या गरजांसाठी पैसे खर्च करताना त्रागा व्हायचा, पण स्त्रोत्र पाठ सुरु केल्यावर अनेक जोड उत्पन्नाचे मार्ग, बचतीचे मार्ग सुचत गेले. बर्‍यापैकी बचत होऊ लागली. मनावरचे कर्जाच्या रकमेचे दडपण खूपच कमी झाले.

कुंजिका स्तोत्र - मनातली अनामिक भिती कमी होते. या स्तोत्राच्या पाठात एकदम उर्जा लाभते, भय दुर होते.

नवग्रहातील बुधाचा मंत्र - एका व्यक्तीला मी पाचू वापरु का म्हणून विचारले, त्यांनी मला त्याऐवजी हा "प्रियांगूकलिका..." हा मंत्र म्हणायला सांगितला. या मंत्राने देखील बराच फरक जाणवला.

गणपतिस्तोत्र - "प्रणम्य शिरसा देवं.."
अनेकदा काही समस्या आली की काही सुचेनासे व्हायचे. या स्तोत्राच्या पठणाने संकटांना तोंड द्यायचे धैर्य, मार्ग सुचतात.

रोज संध्याकाळी दिवा लावल्यावर शुभं करोति म्हटल्याने अगदी प्रसन्न वाटते. मला हे रोज जमत नाही, पण जेव्हा ऑफिसातून लवकर येतो तेव्हा, सुट्टीच्या दिवशी म्हणतोच म्हणतो.

मला वाटते ही दोन्ही स्तोत्रे स्तोत्रांच्या बाफावर असावीत. नसेल तर मी जमेन तशी टाकीन तेथे आणि ती लिंक इथे चिकटवीन.

अश्विनी के , स्तोत्रांच्या बाफवर बरीच स्तोत्र आहेत. स्तोत्रांचा संग्रह हा उपक्रम प्रशंसनीय आहेच परंतु त्यात वर्गीकरण केलेले नाही. म्हणजे ठराविक समस्येकरता कोणते स्तोत्र चांगले . उदा. जर एखाद्याला संतती संबंधी किंवा धन संबंधी काही समस्या असतील तर कोणते स्तोत्र म्हणावे ? स्तोत्रांचा अनुभव बऱ्याच लोकांना आहे असे त्या संग्रहावरून वाटते . त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले तर इतरांना पण फायदा होईल असे वाटते. बाकी public फोरम वर स्वतःची identity इथे तशीपण कोणी देत नाहीये . त्यामुळे तसा प्रश्न नसावा .

. उदा. जर एखाद्याला संतती संबंधी किंवा धन संबंधी काही समस्या असतील तर कोणते स्तोत्र म्हणावे ? >> कोणते म्हणू नये ते पण खर तर लोकांच्या लक्षात आलेले असते पण सांगणार कोण?! Sad

मागे माझे मन अशांत होते त्यावेळी फेरी मारताना 'धरणीभूगर्भ संभूतं...' हा श्लोक म्हणायची.हळुहळू शांत व्हायला व्हायचे.मन बहुतेक त्यामधे गुंगल्याने बाकी विचार मागे पडत असावेत.बाकी रामरक्क्षा ऐकायला
आवडते.तिच्यात नादमाधुर्य आहे.

अन्विता, मी त्या बाफवर देखिल 'फल' माहित असल्यास लिहावे असे म्हटले आहे पण कुणी लिहित नाहिये. सगळीच स्तोत्रे किंवा उपासना ह्या काम्यभक्ती ह्या सदरात मोडत नाहीत. काही स्तोत्रांच्या नावावरुनच ते कशासाठी म्हणत असावेत हे कळते. काही स्तोत्रे नित्य उपासना म्हणून किंवा देवाचं आपल्याला जे रुप आवडतं त्याच्यावरच्या प्रेमापोटी म्हटली जातात. काही स्तोत्रांच्या नावावरुन हे नक्की कश्यासाठी हे कळत नाही पण एखादी अधिकारी व्यक्ती ते स्तोत्र/मंत्र काही कारणासाठी उपासना म्हणून आपल्याला देऊ शकते. एखादी अधिकारी व्यक्ती (टू बी स्पेसिफिक 'सद्गुरु') आपल्याला अचानक काही उपासना देऊ शकतात, ज्याचं कारण आपल्याला ज्ञात झालेलं नसलं तरी सद्गुरुंना माहित असतं. असं म्हणतात, संकटा आधीच सद्गुरु त्याच्या निवारणाची योजना करुन ठेवतात. ती योजना, तो प्लॅन आपण स्वीकारायचा की नाही हे आपल्याला मिळालेल्या कर्मस्वातंत्र्यावर सोडलेलं असतं Happy

एखादं स्तोत्र एखाद्या हेतूसाठी जरी असलं तरी ताप आला की क्रोसिन घ्यायची इतकं ते सहज नसतं. ह्याच्यासाठी श्रद्धाही तितकीच महत्वाची असते. सुरुवातीला श्रद्धा नसेल तरी काम्यभक्तीपुरती तळमळ तरी हवीच.

अश्विनी के , छान सप्ष्टीकरण दिले आहे . तरी पण आजकाल लोक बऱ्याच समस्यांनी ग्रस्त असतात . हल्लीचे जीवन मला जास्त असुरक्षित आणि अस्थिर वाटते लोकांना त्यामुळे जर कुठे आधार मिळाला तर हवाच असतो .
त्यामुळे फक्त कोणते स्तोत्र कशाकरता म्हणावे एवढे जरी कळले तरी खूप आहे आणि कोणी आपला त्या बाबतचा अनुभव सांगितला तर ते म्हणताना थोडा हुरूप येईल . त्याचा अनुभव त्या व्यक्तीला स्वत: ला आला कि आपोआपच श्रद्धा दृढ होते .
अध्यात्मिक अनुभावाकरता उपासना करणारे लोक माझ्यामते थोडे असावेत . ते फार कमी लोकांना जमते . परंतु सर्वसामान्य माणूस हा भौतिक सुखाकारातच हे सर्व करतो .
./////ह्याच्यासाठी श्रद्धाही तितकीच महत्वाची असते. सुरुवातीला श्रद्धा नसेल तरी काम्यभक्तीपुरती तळमळ तरी हवीच.//// हे अगदी पटते .

देवकी , धरणीभूगर्भ संभूतं...' हा श्लोक मंगळाचा आहे ना .
तुम्हाला तो कोणी म्हणायला सांगितला आहे का तुम्हीहुनच म्हणता . मला पण नवग्रह स्त्रोत्र म्हणायला आवडते .

गमभन Happy +१
मी सध्या लाईफमधे एक स्टॅबीलिटी फील करत आहे सगळ्याच फ्रंटवर पण वर म्हटल्याप्रमाणे एक अनामिक हुरहुर आहे मनात कारण इतकं सगळ चांगल आयुष्यात काही पाहीलं नाही. वयाच्या ३६ वर्षापर्यंत छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्ट्रगल करावं लागलय अन आता सगळं निवांत चाललय. कधी कधी वाटते की मला स्वतःला कायम टेन्शनची सवय झाल्यामुळे असे वाटत असेल का? एक अनामिक भिती - कसली मला माहीत नाही. उगीच अ‍ॅक्सीडेंट झाला , प्रियजनांपैकी कोणाला काहीतरी झालय मला फोन आला असले विचार मनात येतात Sad मी मेंटल झालोय की काय असे वाटायला लागलेय. इतके दिवस फुल्ल पॉजिटीव्हीटीनी भरलेला मी!! माझ्या मनात असले विचार का येत असतील?
कुंजिका स्त्रोत्र उपयोगी पडेल का?
(कृपया सायकॅट्रीस्ट, काउन्सलींग असले सल्ले देणेचे न करावे. सगळं कळतय पण वळत नाही अशी स्थिती आहे)

देवकी , धरणीभूगर्भ संभूतं...' हा श्लोक मंगळाचा आहे ना . होय.तोही २० वर्षांपूर्वी नात्यातल्या एकानेम्हणायला सांगितले होते. मी चुकून हा श्लोक लिहिला.मी म्हणायची तो श्लोक पुढीलप्रमाणे आहे.

ॐ त्रंबकं यजामहे सुगंधीपुष्टी वर्धनं उर्वारुकमिव बंधनान।
मृत्योर्मुक्षियमामृतात ॐ नमः शिवाय।।

Anvita हा श्लोक मला एकाने रोज २१ वेळा म्हणायला सांगितले होते.विश्वास वगैरे नव्हता.तरी म्हणता म्हणता मनाची सैरभैरता कमी व्हायची.

कधी कधी वाटते की मला स्वतःला कायम टेन्शनची सवय झाल्यामुळे असे वाटत असेल का? एक अनामिक भिती - कसली मला माहीत नाही....सख्या तुमचे मन हळवे झाले असेलही.निदान तुमच्या कुल /आवडत्या दैवताचे नामस्मरण चालू ठेवा.मन शांतावते..यासाठी फार वेळ काढावा लागत नाही.प्रवासात किंवा इतर तयारी करताना म्हणा.ही एक प्रकारची सायकोलॉजिकल ट्रीटमेंटच आहे,मन खंबीर व्हायला.(माझ्यापाठी कोणीतरी आहे.मी हे रोज म्हणतो.असा सबकॉन्शस माईंडमधे विचार येत असतीलही.)
माझा या प्रकारांवर विश्वास नसतानाही वरीलप्रमाणे अनुभव घेतला.तुम्ही आस्तिक असाल तर उत्तमच आहे.बाकी
स्तोत्र वगैरे Anvita व इतर सांगू शकतील.

मंत्र आपली मनोबल वाढवायला मदत करते. चमत्कार वगैरे माहित नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलत नाही.(मायबोलीवर माहित नसलेल्या वर बोलणे चालते काहींचे माहितीय.. तरी... :फिदी:)
माझ्याच्याने अगदी रोजचे वाचणे, संकल्प सोडणे होणे, यय वेळा मंत्र, स्त्रोत्र वाचणे शक्यच नाही.
तर असेच एकदा कठिण काळात मला लहानपणीचा एक स्त्रोत्र आठवले जो आजोबा म्हणायचे, ते अतिशय सुंदर आवाजात म्हणताना नाद जाणवायचा. पण एक दिवस हेच स्त्रोत्र तोंडात आले व त्या नादाची( जो कर्णमधूर नाद) इतका बिंबलाय ह्याची जाणीव झाली... व बस तोच रोज म्हणायला लागायचे आपोआप. ... कधीही कठिन समय वाटला की.
तर मतितार्थ हा माझ्यासाठी की, ज्याने तुम्हाला गोडी वाटेल, नाद जाणवेल.. एक लय जाणवेल तोच म्हणायचा, जो मनात पटकन बसेल... त्याने तुम्हाला बरे वाटले तर तोच योग्य तुमच्यासाठी असेच समजावे. कुठलेही पथ्य न पाळता( सकाळी ३ वाजता उठा, अंघोळच करा, दिवा लावा,भटांन बोलवून पूजा वगैरे वगैरे)..

मला आवडलेलम स्त्रोत्र... मला मराठीत लिहिता येणार नाही...
पण प्रयत्न करते,
सुमुख एकदंतस्य कपिलो गजकर्णकः....
त्याचा फायदा किती झाला पेक्षा.... वाईट विचार दूर होतात... शांत वाटते. नाहीतर मन तसेही वाईट विचारांचे जाळं असते कठिण काळात....

देवकी , हा
ॐ त्रंबकं यजामहे सुगंधीपुष्टी वर्धनं उर्वारुकमिव बंधनान।
मृत्योर्मुक्षियमामृतात ॐ नमः शिवाय।।
मृत्युंजयाचा जप आहे असे वाटते .

हो अन्विता हा मृत्युंजयाचा मंत्र आहे. पण शक्यतो कुठलेही मंत्र संकल्प केल्याशिवाय अथवा गुरुचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जपु नये. याला अपवाद आहेच. पण मनाला जे भावते, प्रसन्न वाटते तेच योग्य होय.:स्मित:

श्री टेंबेस्वामींचे श्रीपादश्रीवल्लभ हे स्तोत्र म्हणल्यावर मला अतर्क्य अनूभव आलेत. त्याने माझे ब्लडप्रेशर पण कमी झाले आणी मन शांत झाले. बाकी मंत्रांविषयी दुपारी लिहीनच.

रश्मी , झम्पी धन्यवाद.
तुमच्या अनुभवांचा कदाचित बऱ्याच जणांना फायदा होऊ शकतो.

कुंजिका स्त्रोत्र उपयोगी पडेल का?

>>
मी मला आलेले अनुभव वर टाकले आहेत. कोणाला स्तोत्र म्हणायला सांगण्याएवढी माझी पात्रता नाही. कुंजिका स्तोत्र हे सहसा एखाद्या अदृश्य, अनिष्ट शक्तीपासून वाटणारी भिती, दडपण घालवण्यासाठी म्हटले जाते.
तुम्हास वाटणारी भिती ही जीवनातील अनिश्चितता, चिंता यातून आलेली आहे असे दिसते, तरीही तुमची इच्छा असल्यास म्हणू शकता.

Pages