स्तोत्रांचा अनुभव

Submitted by Anvita on 26 October, 2013 - 10:04

जेव्हा आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतात त्यावेळेस आपण जे कोणी आपल्याला उपाय सांगतात ते करत असतो . त्यात मग स्तोत्र, जप , धार्मिक स्थळांना जाऊन येणे इ . गोष्टी असतात . ह्या सगळ्याने मनोबल वाढते . समस्येला तोंड देण्याची शक्ती येते . हे सगळे तर आहेच . पण एखाद्या गोष्ट करून समस्या/ संकट टळले ह्याचा कोणाला अनुभव आहे का ? उदा . मृत्युंजयाचा जप केल्यामुळे आयुष्य वाढले ,महलक्ष्मी अष्टक रोज म्हटल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली.
मला वाटते कि स्तोत्र म्हटल्याने किंवा जप केल्याने positivity येते आयुष्यात.
पण धन, संतती, आरोग्य इ. ह्या दृष्टीने काही कोणाला अनुभव आले आहेत का

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संतती सौख्या करता गुरुचरित्र वाचतात . त्यातला कोणता अध्याय माहित नाही . स्त्रिया गुरुचरित्र वाचत नाही . असे ऐकले आहे. जाणकार खुलासा करू शकतील .

सन्तती सौख्याकरता गणपती स्तोत्र आहे ते जमल्यास परवा देते. देवीचे पण आहे, नाव लक्षात नाही, ते सा.न्गते आठवले की.

@पिन्कि८०, संतती सौख्यासाठी व्यंकटेश स्तोत्राचा अनुभव आलेला पाहिला आहे. व्यंकटेश स्तोत्र सोपे असल्याने सतत म्हणल्यास पाठ होते आणि लयबद्ध असल्याने दिवसभर गुणगुणता येते.

खुप खुप धन्यवाद सर्वांचे.
@प्रिंसेस, मी व्यंकटेश स्तोत्र गेली 3 वर्ष नित्यनियमाने म्हणते आहे.

बालाशिष स्तोत्र स्त्रोत्रांच्या धाग्यात नाही आहे. सध्या माझ्या जवळ नाही आहे. कोणी टंकू शकेल काय?

अरे वा , इतके सगळे फायदे करून देणारी स्तोत्रे आहेत , तर मग एखादे वजन कमी ़करणारे स्तोत्र नाहीये का? मला वजनाची समस्या आहे. स्तोत्राने पोर होत असेल तर वजन ़कमी व्हायला ़काहीच अवघड नसावे, नाही का? Proud

प्रयत्न करणाऱ्यांनाच स्तोत्रांचा अनुभव येतो . तुम्ही पण प्रदक्षिणा मारत स्तोत्र म्हणा . किंवा तहान भूक विसरून तल्लीन होऊन म्हणा नक्कीच वजन कमी होईल .

प्रयत्न करणाऱ्यांनाच स्तोत्रांचा अनुभव येतो . >> अरे मग स्तोत्राची मला काही गरज नाही. तसेही पुर्वी मी जिम आणि डाएट करून स्तोत्राशिवाय खूप वजन कमी केलेच होते. अता परत वाढलेय तेव्हा त्या उपायांनी करेनच कमी. पण इथे स्तोत्रानी धन , संतती आणि आरोग्य मिळण्याचे अनुभव बघितले म्हणुन विचारले.
बाकी कोणत्याही गोष्टीत प्रयत्न करणार्‍यालाच यश मिळत असते , हेच आणि एव्हढेच खरे आहे.

प्रत्येक वेळेस प्रयत्नांना यश येतेच असे नाही .
अशी बरीच उदाहरणे देत येतील . जसे कि infertility treatment घेणे हे संततीच्या दृष्टीने प्रयत्न असतातच पण
त्यात दर वेळेस यश येतेच असे नाही. स्तोत्र वगेरे ती treatment यशस्वी होण्याच्या दृष्टीने माझ्या मते एक
positivity आणतात . फक्त स्तोत्रांमुळे मुले होतात असे नाही (तसा बहुतेक तुमचा ' गैर 'समज झाला असे वाटले )
तर प्रयत्न आणि स्तोत्र ह्याचा दोन्हीचा effect असतो .
त्याला नशिबाची पण साथ लागते .
अर्थात वजन कमी करण्याचा आणि स्तोत्रांचा संबंध तुम्ही लावला म्हणून सांगितले .

सुमुख एकदंतस्य कपिलो गजकर्णकः....

हे काय गजकर्णनाशक स्तोत्र आहे काय?

सुमुख एकदंतस्य कपिलो गजकर्णकः....

हे काय गजकर्णनाशक स्तोत्र आहे काय?

>>

हा एक श्लोक आहे. मंगलाचरणातला. मंगलाचरण हे कोणत्याही पूजेच्या आधी गणपतीचे ध्यान, आवाहन करताना म्हटले जाते.

हा पूर्ण श्लोक असा आहे.

सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णकः |
लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ||
धुम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः |
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ||
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा |
संग्रामे संकटे चैव विघ्नतस्य न जायते ||

प्रत्येक वेळेस प्रयत्नांना यश येतेच असे नाही . >>
प्रयत्न करणाऱ्यांनाच स्तोत्रांचा अनुभव येतो . >>
तर प्रयत्न आणि स्तोत्र ह्याचा दोन्हीचा effect असतो .
त्याला नशिबाची पण साथ लागते .>>> नक्की काय काय लाग्ते ते सग्ळे लिहा पाहू , प्रयत्न का स्तोत्र का नशिब !!
रच्याकने शेकडा ७०- ८० % लोकांना कोणतेही स्तोत्र न म्हणता केवळ प्रयत्नानीच मुले होतात बरे. पण असे एक तरी जोडपे दाखवा ज्याला केवळ स्तोत्र म्हणुन (इतर काहीही न करता) पोर झालेय Proud

फक्त स्तोत्रांमुळे मुले होतात असे नाही (तसा बहुतेक तुमचा ' गैर 'समज झाला असे वाटले ) >>> हेहे नाही हो, स्तोत्रामुळे मुले होतात हा माझा गैर्समज नसून , 'गर्भ धारणा' होण्यात इतर प्रयत्नांबरोबरच स्तोत्राचाही हात असतो हा गैरसमज तुम्ही इथे पसरवता आहात. स्तोत्र म्हणा अजुन काही कर्म कांडे करा पण असे गैरसमज का पसरवाता आहात तुम्ही धर्माच्या नावाखाली? नुसता 'स्तोत्रे' असा धागा होता तोपर्यंत ठीक होते. पण स्तोत्रांचे अनुभव या नावाखाली तुम्ही सरळ सरळ अंधश्रद्धा पसरवण्याचे काम सुरु केलेले दिसते.

स्तोत्र वगेरे ती treatment यशस्वी होण्याच्या दृष्टीने माझ्या मते एक positivity आणतात >> ही positivity मानसिक का शारिरीक ? फक्त मानसिक असेल तर तसे स्पष्ट लिहा ना. कोणत्याही संकटात भक्कम मानसिक आधार आणि सकारत्मक दृष्टीकोन हा स्तोत्राने मिळू शकतो. आणि त्यासाठी स्तोत्रे म्हणावी असे म्हणा की. पण याने मुले होतात , त्याने कर्ज फिटते असले प्रकार कशाला?

'प्रत्येक प्रयत्न करणाऱ्याला यश मिळतेच असे नाही '
हा मुद्दा तुम्हाला 'infertility treatment ' च्या उदाहरणावरून पटला आहे असे मी समजते .
'स्तोत्र positivity आणतात' ह्या मध्ये मी positivity हा
शब्द लोक मानसिक दृष्टीने वापरतात असे गृहीत धरले होते परंतु तुमच्या सारखे अजून हि लोक असतील जे त्याचा अर्थाबाबत confuse होऊ शकतात . त्यामुळे 'मानसिक positivity आणतात ' असे म्हणू .
स्तोत्रांमुळेच मुले होतात असे मी कुठेही म्हटलेले नाही.
परंतु ज्या जोडप्यांना मुले होण्यासाठी medical treatment करून पण यश येत नाही . ती जोडपी बर्यच ताणाखाली असतात . त्याच्यासाठी मन शांत राहण्याकरता किंवा stress येऊ नये म्हणून कोणी काही स्तोत्र सुचवली तर त्याचा अर्थ स्तोत्राने मुले होतात असा नसून स्तोत्राने मानसिक स्थिती चागली राहून treatment चा जास्त उपयोग होऊ शकतो असा आहे.
त्यामुळे ' स्तोत्रांचा अनुभव ' मधून तुम्ही अंधश्रद्धा पसरवत आहात हा गंभीर आरोप तुम्ही करू नये.
एखाद्या चांगल्या हेतूने स्तोत्रांची माहिती देत असणाऱ्या लोकांची ' वजन कमी करण्यासाठी स्तोत्र द्या ' असे म्हणून टर उडवणे बंद करा .
मला वाटते मी ह्यात आता सगळे नीट explain केले आहे.

@डेलिया,
संतती सौख्यासाठी स्तोस्त्रे, अजुन काही स्तोस्त्रे वैगरे ई. गोष्टी या मानसिक समाधानासाठी असतात.
कोणत्याही गोष्टीची टर उडवायलाच हवी का? आपण नामस्मरण वैगरे हे आत्मिक समाधानासाठी करत असतो. आणि कुणीही इतके मूर्ख नक्कीच नसते की नुसत्या स्तोस्त्र पठण करून संतती होण्याची वाट बघत बसेल. दुसर्‍यांच्या भावना दुखवू नये ही विनंती.

>> पण असे एक तरी जोडपे दाखवा ज्याला केवळ स्तोत्र म्हणुन (इतर काहीही न करता) पोर झालेय फिदीफिदी<<

डेलिया, अन्विता ह्यांनी कुठे म्हटले का की 'केवळ' स्तोत्रांमुळेच मुले होतात काहीही न करता?

>> तसेही पुर्वी मी जिम आणि डाएट करून स्तोत्राशिवाय खूप वजन कमी केलेच होते. अता परत वाढलेय तेव्हा त्या उपायांनी करेनच कमी<<

तुम्हाला तुमचा खात्रीशीर उपाय माहीती आहे ना? आणि त्याचा अनुभव सुद्धा आहे ना मग उगाच ज्याच्यावर विश्वास नाही अश्या नवीन गोष्टी करण्यात शक्ति खर्च होवून मानसिक त्रास होइल वजन कमी न झाल्याने आणि उगाच स्तोत्र शोधावे लागेल. (फु. स. प्रेमाने देतेय... वजन नाही वाढणार पण ह्या प्रेमाने). Happy
--------------------------------------
स्तोत्र फक्त आपल्यापुरती मानसिक शांती साठी म्हटली व दुसर्‍याला कोणाला त्याचा त्रास नसेल व पैसे नाहक खर्च होणार नसतील तर वाईट काय ?
इथे जर कोणी इतर बुवाबाजी, कर्मकांडे( हि पूजा करा, ती पूजा करा, इतकी देणगी द्या वगैरे ) करायला सांगितली तर मग आरोप करा. ह्या ब्राम्हणाला भेटा, त्या ब्राम्हणाला भेटा तर बोलणे ठिक आहे.

जाता जाता असेच सांगावेसे वाटले, मुल होत नसलेल्या जोडप्यांना भेटल्यावर कळेल की, इतके पैसे खर्च करायला तयार असतात जेव्हा त्यांना नीट माहीत हि नसते की खरेच हे यश्स्वी होइल म्हणून. आणि ह्या अश्या चिंतेने उलट परीणाम होत असतो... शरीरावर.

जाता जाता असेच सांगावेसे वाटले, मुल होत नसलेल्या जोडप्यांना भेटल्यावर कळेल की, इतके पैसे खर्च करायला तयार असतात जेव्हा त्यांना नीट माहीत हि नसते की खरेच हे यश्स्वी होइल म्हणून. >>> IVFचे रिपिटेड अटेम्प्ट्स फेल गेलेली पण कितीतरी जोडपी असतात. सगळी पुंजी खर्च करतात मूल व्हावं म्हणून कसलीही गॅरंटी दिली गेलेली नसताना. डॉक्टर्स त्यांचं कौशल्य पणाला लावतात पण यश येणं न येणं त्यांच्या हातात नसतं. नेटवर सक्सेस रेट्स मिळू शकतात. अनसक्सेसफुल केसेससाठी ते १००% फेल्युअर आहे. त्यांच्या मानसिक त्रासाची तर कल्पनाच करवत नाही.

मूल होणंच नव्हे, तर सगळ्याच बाबतीत योग्य मार्गाने प्रयास करणं एवढं आणि एवढंच मनुष्याच्या हातात १००% करण्याजोगं असतं आणि ते केलंच पाहिजे.

>>मूल होणंच नव्हे, तर सगळ्याच बाबतीत योग्य मार्गाने प्रयास करणं एवढं आणि एवढंच मनुष्याच्या हातात १००% करण्याजोगं असतं आणि ते केलंच पाहिजे. + १

स्तोत्रं म्हणणारी लोकं इतर काहीही प्रयत्न न करता फक्त हातावर हात धरून स्तोत्रंच म्हणत असतात असं का बरं वाटावं? आपण करत असलेले विविध प्रयत्न वेगवेगेळ्या लेव्हल वर काम करतात. स्तोत्रं म्हणणारी लोकं मूर्खच असतात असा समज का बरं व्हावा?

इथे प्रत्येक जण आपापले अनुभव लिहितोय, एखाद्याला आलेला सकारात्मक अनुभव लगेच अंधश्रद्धा म्हणून लगेच मोडीतच का काढायचा? हे अनुभव आहेत, इतरांना केलेली सक्ती नाही.

स्वत:च्या उन्नतीसाठी / इच्छापूर्तीसाठी कायदेशीर रित्या उपलब्ध असणारे पर्याय वापरून बघायला काय हरक्त आहे. स्त्रोत्र्पठण, ज्योतिष, घरगुती औषधे इ. बरच काही यांत येतं.

पिंकी८० , झम्पी, अश्विनी के , अर्पणा, माझा मुद्दा अधिक चांगल्या पद्धतीने explain करण्यासाठी धन्यवाद !
कोणतेही काम चांगल्या उद्देशाने जेव्हा आपण करतो तेव्हा 'डेलिया' सारखे प्रतिसादांनी नक्कीच मन दुखावते . अर्थात टर उडवणे हे सोपे आहे .
पिंकी८० , झम्पी, अश्विनी के , अर्पणा,तुमच्या सारख्या लोकांच्या प्रतिसादामुळे पुन्हा हुरूप येतो .
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद !

तुम्ही पण प्रदक्षिणा मारत स्तोत्र म्हणा . किंवा तहान भूक विसरून तल्लीन होऊन म्हणा नक्कीच वजन कमी होईल .>> छान उत्तर अन्विता. Happy

गुरुचारित्राच्या 14 व्या अध्याय नित्य पठन केल्याने मला स्वताला खुप फायदा झाला तसेच रोज संकटनाशन स्तोत्र व गजानन बावनी स्त्रोत्र रोज म्हणावे

Pages