स्तोत्रांचा अनुभव

Submitted by Anvita on 26 October, 2013 - 10:04

जेव्हा आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतात त्यावेळेस आपण जे कोणी आपल्याला उपाय सांगतात ते करत असतो . त्यात मग स्तोत्र, जप , धार्मिक स्थळांना जाऊन येणे इ . गोष्टी असतात . ह्या सगळ्याने मनोबल वाढते . समस्येला तोंड देण्याची शक्ती येते . हे सगळे तर आहेच . पण एखाद्या गोष्ट करून समस्या/ संकट टळले ह्याचा कोणाला अनुभव आहे का ? उदा . मृत्युंजयाचा जप केल्यामुळे आयुष्य वाढले ,महलक्ष्मी अष्टक रोज म्हटल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली.
मला वाटते कि स्तोत्र म्हटल्याने किंवा जप केल्याने positivity येते आयुष्यात.
पण धन, संतती, आरोग्य इ. ह्या दृष्टीने काही कोणाला अनुभव आले आहेत का

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मल्टिटास्किंग करताना प्र त्येकच कामात इक्वल कॉन्संट्रेशन लागते कुठेच कमी पडून चालत नाही.
ते कसे साध्य व्हावे?

>>मन एकाग्र करणे आणि माईंड डायव्हर्ट करणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. <<
सैरभैर विचारांपासून डायव्हर्ट झाल्या शिवाय मन हव्या त्या गोष्टीवर एकाग्र करता येत नाही. असो..

. . हे एक प्रकारचे माईंड डायव्हर्टिंग टेक्निक आहे. अस्थिर करणार्‍या विचारापासून लांब नेण्यासाठी उपयोगाला येते...... माझ्यापुरते म्हणाल तर अगदी खरयं!

मुलगा पाहिजे मुलगाच होईल अशा टाईपच्या जाहीराती वा मजकूर प्रसारित करणे गुन्हा आहे. मुलगा हवा म्हणुन कोणी कोठलेही स्त्रोत्र वा मंत्र सांगु नयेत. नुकतच या कारणामुळे विधिलिखित मासिकाचे संपादक ज्योतिषी आदिनाथ साळवी यांनी तसा एका ज्योतिषाचा लेख आपल्या मासिकात छापल्यामुळे ते अडचणीत आले आहेत.

http://www.loksatta.com/pune-news/brahma-likhit-adinath-salvi-crime-pmc-...

http://www.loksatta.com/pune-news/action-on-aadinath-salwi-after-explana...

अगदी बरोबर घाटपांडेजी , ह्या धाग्यावर पण आधी हेच मत व्यक्त केले होते कि फक्त मुलगा व्हाव म्हणून कोणतेही स्तोत्र म्हणू नये मुलगा मुलगी भेदभाव नकोच आणि नसावा
फक्त ज्यांना मुल होत नाहीये अशांसाठी काही स्तोत्र असेल तर ( म्हणजे त्यांची मानसिक स्थिती चांगली राहण्या करता कारण अशी बहुतेक जोडपी खूप निराश झालेली असतात . ) काही स्तोत्रांमुळे जगण्यात उभारी येऊ शकते . मानसिक positivity वाढली कि आपोआपच घेत असलेली treatment पण जास्त चांगल्या पद्धतीने उपयोगी पडते असे वाटते .
स्तोत्रांमुळेच मुल होईल किंवा होतात असे अजिबात म्हणणे नाही ( हे clear केले कारण आधी ह्यावरून बर्याच पोस्टी आहेत ) त्यामुळे confusion होउन वाद वाढू नयेत असे वाटले .

कुणाला काय अनुभव येईल ते ज्याच्या त्याच्या वरच अवलंबून आहे म्हणा.

माझ्या पुरते बोलायचे तर मन एकचित्त करण्याचा अभ्यास करायला एक साधन म्हणून मी काही स्तोत्रे पाठ केली व मनात म्हणतो. इतर काही विचार तरी मनात येत नाहीत. अगदीच लक्ष लागेनासे झाले तर मोठ्याने पण म्हणतो.
उपयोग होतो आहे, म्हणून चालूच ठेवले आहे.
स्तोत्रे म्हणण्याने इहलोकी सुख व परलोकी गति प्राप्त होते वगैरे कसलाहि उद्देश नाही. पण चित्त एकाग्र करता आले तर कामे नीट होतील नि सुख लागेल हे सत्य आहे. परलोकाचे कुणि पाहिले आहे?
स्तोत्राशिवाय इतरहि कशाने असे मन एकाग्र होऊ शकेल, पण मला एव्हढाच एक उपाय माहित आहे नि तो पुरेसा आहे.

ज्यांना विश्वास नाही त्यांनी कॄपया या धाग्यावर येऊन रसभंग करु नये.
तो या धाग्याचा विषय नाही. असो.
--------------------------------------------------------------------------------------

इतरांना एक प्रश्न:
श्री हनुमान वडवानल स्तोत्राचा कुणाला काही अनुभव आला आहे का?

झक्की आपल्या मताशी मी सहमत आहे. स्त्रोत्रांचा अजून एक उपयोग मी व्हाईस कल्चर विषयातील तज्ञांकडून ऐकला तो म्हणजे जीभेला वळण लागते. कठीण शब्द देखील स्वच्छ व शुद्ध उच्चारात म्हणता येतात.

काही दिवसांपूर्वी रामरक्षा नेट वर शोधताना हि लिंक सापडली . खूप छान वाटते ऐकायला . रोज संध्याकाळी दिवा लावला कि लावते . Download केलीच आहे . तेवढेच मुलांच्या पण कानावर पडते . मला स्वत: ला रामरक्षा आवडते . कोणाला ऐकायची असल्यास हि घ्या लिंक:

http://www.youtube.com/watch?v=JOStVby1xNk

अन्विता, रामरक्षा हा माझ्या गतायुष्याचा अविभाज्य घटक आहे. आमचे गावी राममंदीर आहे व त्या राममंदिराचा इतिहास अयोध्येच्या राममंदिरासारखाच कोर्ट कचेर्‍यांनी ग्रस्त होता.रामनवमी दणक्यात केली जायची. असो मूळ मुद्दा हा कि माझ्या भावजीवनात रामरक्षेचे स्थान मोठे आहे.आपण दिलेल्या लिंकवरील रामरक्षा मी पुर्वीच ऐकलेली आहे. त्यात श्रीरामचंद्रप्रित्यर्थे श्रीरामरक्षा स्तोत्र जपे विनियोगः | असे लिखित आहे पण म्हणताना नुसतेच श्रीरामचंद्र प्रित्यर्थे जपे विनियोगः असे म्हटले जाते. ही त्रुटी मला जाणवली. माझ्या पाठांतरात लिखिताप्रमाणेच शब्द आहेत.त्यामुळे ऐकताना ती त्रुटी जाणवली.

त्यात श्रीरामचंद्रप्रित्यर्थे श्रीरामरक्षा स्तोत्र जपे विनियोगः | असे लिखित आहे पण म्हणताना नुसतेच श्रीरामचंद्र प्रित्यर्थे जपे विनियोगः असे म्हटले जाते. >>>> बरोबर.

माझ्याकडे साधना सरगम्,रवींद्र साठे यांनी म्हटलेले रामरक्षा स्तोत्र व अथर्वशीर्षाची कॅसेट होती.डॉ. सरदेसाई यांचे उच्चारांत मार्गदर्शन होते.त्यात बहुदा श्रीरामचंद्रप्रित्यर्थे असा उच्चार आहे.

स्तोत्रांचा अनुभव नक्की येतो. काही लोक अरत्यांवर dance वगेरे करतात . पण स्तोत्रांवर मात्र कधी dance वगेरे करू नये. स्तोत्र म्हणण्याचे काही नियम असतात . आणि प्रत्येक स्तोत्राचा उद्देश हि वेगवेगळा असू शकतो. मंत्रांचे नियम आणखी कडक असतात . मंत्र कोणीही कसेही म्हणायचे नसतात . मृत्यंजय मंत्र हा मंत्र आहे. धाग्यात उल्लेख केल्याप्रमाणे ते स्तोत्र नव्हे . मृत्युंजय मंत्र हा अकाल मृत्यू (नैसर्गिक नव्हे ) टाळण्यासाठी हमखास उपयोगी आहे . माझ्या आजीचा भारी अनुभव आहे.

आदिनाथ साळवी १ नंबरचा लुच्चा माणूस आहे . कोणी विश्वास ठेवू नका. आणि मी खात्रीने सांगते मुलगा व्हावा म्हणून कोणताही स्तोत्र किवा मंत्र नाहीयेत. मुल व्हावं म्हणून आहेत

>>पण स्तोत्रांवर मात्र कधी dance वगेरे करू नये. स्तोत्र म्हणण्याचे काही नियम असतात .<<
का बरं करु नये? स्त्रोत्रमंजरी या कविता व धनंजय खरवंडीकर यांच्या कार्यक्रमात काही स्त्रोत्रावर उत्तम नाच बसवला होता . फार उत्तम कार्यक्रम होता.

का बरं करु नये? स्त्रोत्रमंजरी या कविता व धनंजय खरवंडीकर यांच्या कार्यक्रमात काही स्त्रोत्रावर उत्तम नाच बसवला होता
वरती स्तोत्रांवर dance का करू नये हे मी सांगितलं आहे. ज्याला करायचा असेल त्याने खुशाल करावा . मंत्र सुधा स्वताच्या मनाने कधीही कुठेही म्हणू नयेत. ज्याला म्हणायचे असतील त्याने खुशाल म्हणावेत .. पुढे काय होईल हे ज्याच त्याला कळेलच कि

मंत्र सुधा स्वताच्या मनाने कधीही कुठेही म्हणू नयेत.>>>>>>>>>>>.काही मंत्र असे असतात कि १२ महिने १३ काळ कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळेस म्हटले तरी चालतात उदा :श्रीराम जय राम जय जय राम परंतु काही मंत्रांना शुचिऱ्रभूतता हि पाळावीच लागते उदा :महा मृत्युंजय मंत्र

>>काही मंत्र असे असतात कि १२ महिने १३ काळ कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळेस म्हटले तरी चालतात उदा :श्रीराम जय राम जय जय राम <<
होय! हे मला आमच्या तपस्वी गुरुजींनी लहानपणीच सांगितले होते.हा मंत्र असा आहे की शौचाला बसले असताना देखील तुम्ही म्हणु शकता.
माझ मत विचाराल तर वर मी नमूद केले आहेच की मंत्र हे माईंड डायव्हर्टिंक टेक्निक म्ह्णुन खूप उपयोगी आहे.

वाईट स्वप्नं पडायची बंद व्हावीत म्हणुन एखादं स्त्रोत्र आहे का? रामरक्षा येत नाही मला.

रात्री झोपताना हनुमानचलिसा किंवा रामरक्षा म्हणायची/वाचायची. रामरक्षेचं छोटं पुस्तक मिळतं ते आणून वाचायचं. कधीतरी पाठ होईलच रोज वाचल्यावर.

मंत्र सोडुन दुसरे कोणते चांगले माईंड डायवर्टींग टेक्निक नाहीय का ?

आधुनिक काळात तसे नविन काही तरी असेलच, मग त्या जुन्या मंत्रांच्या मागे जाण्याच कारणच नाही.

तसाही भावच नाही मंत्र म्हणण्यास मग " मां.डा.टे " च कारण द्यायची गरज काय ?

तसाही भावच नाही मंत्र म्हणण्यास मग " मां.डा.टे " च कारण द्यायची गरज काय ?>>>>>>>>>>>
तुमची मुळीच श्रद्धा नसली तरी रामनामाचा अनुभव आल्या शिवाय राहणार नाही ६ एक महिने जप करून बघा

तुम्हाला अनुभव नाही आला तर आपण या विषय वर पुन्हा बोलू

>>मंत्र सोडुन दुसरे कोणते चांगले माईंड डायवर्टींग टेक्निक नाहीय का ?<<
पाढे म्हणा, कविता म्हणा. गाणे म्हणा, डे ड्रीमिंग करा, संगीत ऐका कोणतही असे कृत्य करा कि ज्यामुळे तुमचे मन चिंतेपासून विचलीत होईल.

>>आधुनिक काळात तसे नविन काही तरी असेलच, मग त्या जुन्या मंत्रांच्या मागे जाण्याच कारणच नाही.<<
न्यूटनचे नियम म्हटले तरी ते आधुनिक काळात चालते. अधिक माहिती सायकोथेरपीस्ट देउ शकतील.

>>तसाही भावच नाही मंत्र म्हणण्यास मग " मां.डा.टे " च कारण द्यायची गरज काय ?<<
भाव असणे गरजेचे नाही म्हणुन त्याला टेक्निक म्हटले आहे. ज्यांना आपले मन मरेपर्यंत कायमस्वरुपी सशक्त, सुदृढ,निरोगी राहील याची खात्री वाटते त्यांना असल्या फालतू (!) गोष्टींची अजिबात गरज नाही.ज्यांना मानवी मेंदुचे संपूर्ण आकलन झाले आहे असे वाटते त्यांनाही याची गरज नाही.

खरे तर हे स्तोत्र २१ दिवस म्हणजे २१ रात्री २१ वेळा वाचावे. म्हणजे प्रत्येक दिवशी / रात्री २१ वेळा असे २१ रात्री वाचावे असे म्हणलेय. पण हे प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे काही जण ११ वेळा हे स्तोत्र म्हणतात. माझ्या आजीने ( वडिलांची आई) ३ दिवस रात्री ११ वेळा वाचले होते, तिला चांगला अनूभव आला होता)

दत्तबावनी बद्दल वाचले, ते म्हणण्याची इच्छा आहे. गुरूचरित्र स्रियांनी वाचु नये असं म्हणतात म्हणुन वाचले नाही कधी. पण दत्तबावनी करता काही ठराविक पद्धत किंवा नियम आहेत का?

Pages