स्तोत्रांचा अनुभव

Submitted by Anvita on 26 October, 2013 - 10:04

जेव्हा आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतात त्यावेळेस आपण जे कोणी आपल्याला उपाय सांगतात ते करत असतो . त्यात मग स्तोत्र, जप , धार्मिक स्थळांना जाऊन येणे इ . गोष्टी असतात . ह्या सगळ्याने मनोबल वाढते . समस्येला तोंड देण्याची शक्ती येते . हे सगळे तर आहेच . पण एखाद्या गोष्ट करून समस्या/ संकट टळले ह्याचा कोणाला अनुभव आहे का ? उदा . मृत्युंजयाचा जप केल्यामुळे आयुष्य वाढले ,महलक्ष्मी अष्टक रोज म्हटल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली.
मला वाटते कि स्तोत्र म्हटल्याने किंवा जप केल्याने positivity येते आयुष्यात.
पण धन, संतती, आरोग्य इ. ह्या दृष्टीने काही कोणाला अनुभव आले आहेत का

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Namaskar maghchya ४ Versha pasun aajar ani hospital chalu ahe.. Mister la auto immune disease aahe. Karj khup jhal aahe . mula cha shikshan rahila aahe. Please kahi strotra suchava ..

Miaris, मला नेहमी अमोघ शिवकवचाचा उपयोग होतो. मला सकारात्मक वाटतं. औषधोपचारा बरोबर ते एक स्तोत्र म्हणुन बघा. संस्कॄत डॉक्युमेन्टस साईटवरती आहे.

मला मायबोली lockdown मध्ये surfing करताना सापडली आणि तेंव्हा पासून व्यसन लागलय रोज एकदा तरी इथे फिरकायचे, जास्त करून कथा वाचायला. आज मंत्र धागा पाहून एक विचारावेसे वाटते आहे. आम्ही नवीन घर घेतले ३ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये, छोटासा बंगला आहे रिसेल मध्ये घेतला आहे, थोडा जुन्या पद्धतीने बांधला आहे २० वर्ष जुना, बजेट मुळे नंतर दुरुस्ती करून घेता येईल म्हणून घेतला. घरात तसा काहीच प्रॉब्लेम नाही. खूप भयकथा वाचते म्हणून जसे कथेत सांगता तसे सुकलेली झाडे, पक्षी नाही असे काहीच नाही, छोटी बाग आहे त्यात छान फुलझाडे आहेत खूप पक्षी येऊन बसतात पण घरात थोडे उदास वाटत राहते किंवा फ्रेश वाटत नाही, नेहमी कोणाची तरी तबियत खराब असते. घर खूप छान आहे पण ते एन्जॉय करता येत नाही. नेहमी अस्ताव्यस्त असते, सफाई करावी असे खूप वाटते पण सफाई करायला घेतली की मी आजारी पडते किंवा खूप कंटाळा, थकवा, नाहीतर urgent काम येते आणी सफाई काम राहून जाते, असे वाटते या घरालाच अस्ताव्यस्त राहणे आवडते, आम्ही घर पहायला आलो तेंव्हा ही सफाई नव्हती पण मालक खूप वयस्कर असल्याने आम्ही जास्त लक्ष नाही दिले, नसेल होत काकू कडून सफाई म्हणून. इथे आल्यापासून नेहमी मी थकलेली असते. घरात आलो तेंव्हा छोटी पूजा केली होती, नंतर शांती पूजा करू म्हणून राहिले आणी लोकडोवन मुळे पूजा पोस्टपोन होते आहे.

तर घरात फ्रेशनेस वाटावे आणी घरात काही जुन्या वाईट आठवणी असतील तर त्या जाव्या या साठी काही मंत्र आहेत का जे मी घरात लावून ठेऊ शकते?

सुरवातीला तुम्ही स्वतः सफाई न करता बाहेरील एजन्सी कडून deep cleaning करून घ्या. नंतर नियमितपणे करण्याची सफाई कमी असेल ती करतांना तुम्हाला ताण / थकवा येणार नाही.

ह्म्म्म्म मला मंगलचंडिका स्तोत्राचे काहीच अनुभव नाही आले. मी वाचलेले बरेच दिवस. प्रत्येकाची इष्ट देवता वेगळी असते तसे काही असेल.

महालक्ष्मीस्तुतिः

आदिलक्ष्मि नमस्तेऽस्तु परब्रह्मस्वरूपिणि ।
यशो देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ १॥

सन्तानलक्ष्मि नमस्तेऽस्तु पुत्रपौत्रप्रदायिनि । सन्तानलक्ष्मि वन्देऽहं
पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ २॥

विद्यालक्ष्मि नमस्तेऽस्तु ब्रह्मविद्यास्वरूपिणि ।
विद्यां देहि कलां देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ ३॥

धनलक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्वदारिद्र्यनाशिनि ।
धनं देहि श्रियं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ ४॥

धान्यलक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्वाभरणभूषिते ।
धान्यं देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ ५॥

मेधालक्ष्मि नमस्तेऽस्तु कलिकल्मषनाशिनि ।
प्रज्ञां देहि श्रियं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ ६॥

गजलक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्वदेवस्वरूपिणि ।
अश्वांश्च गोकुलं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ ७॥

धीरलक्ष्मि नमस्तेऽस्तु पराशक्तिस्वरूपिणि ।
वीर्यं देहि बलं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ ८॥

जयलक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्वकार्यजयप्रदे ।
जयं देहि शुभं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ ९॥

भाग्यलक्ष्मि नमस्तेऽस्तु सौमंगल्यविवर्धिनि ।
भाग्यं देहि श्रियं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ १०॥

कीर्तिलक्ष्मि नमस्तेऽस्तु विष्णुवक्षस्थलस्थिते ।
कीर्तिं देहि श्रियं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ ११॥

आरोग्यलक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्वरोगनिवारणि । आरोग्यलक्ष्मि वन्देऽहं
आयुर्देहि श्रियं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ १२॥

सिद्धलक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्वसिद्धिप्रदायिनि ।
सिद्धिं देहि श्रियं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ १३॥

सौन्दर्यलक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्वालंकारशोभिते । सौन्दर्यलक्ष्मि वन्देऽहं
रूपं देहि श्रियं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ १४॥

साम्राज्यलक्ष्मि नमस्तेऽस्तु भुक्तिमुक्तिप्रदायिनि । साम्राज्यलक्ष्मि वन्देऽहं
मोक्षं देहि श्रियं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ १५॥

मंगले मंगलाधारे मांगल्ये मंगलप्रदे ।
मंगलार्थं मंगलेशि मांगल्यं देहि मे सदा ॥ १६॥

सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्रयम्बके देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥ १७॥

शुभं भवतु कल्याणी आयुरारोग्यसम्पदाम् ।
मम शत्रुविनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते ॥ १८॥

दीपज्योति नमस्तेऽस्तु दीपज्योति नमोऽस्तु ते

Pages