स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा स्मित ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद स्मित आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तोत्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र १२६) श्री दत्तात्रेय स्तुती

पान १६

१२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन

Submit to kanokani.com

कुणाकडे करूणाष्टकांची आणि चर्पटपंजरीची ऑडिओ सिडी असेल तर कृपया सांगा.
मी बरेच दिवस शोधतेय.

छान बाफ आहे. मी याच विषयावर कानोकानी मधे एक ब्लॉग ची लिंक शेअर केली होती..
ती इथे परत देतो.

जवळ-जवळ सगळ्या स्तोत्रांचे एकत्रित संकलन आहे.. ऑडिओ फाइल्स पण तिथे मिळतिल. jpeg फॉरमॅट मधे ते सेव्ह करुन प्रिंट आउट्स पण काढता येतात.

http://ioustotra.blogspot.com/

गायत्री मंत्र - विश्वाची मूळ माता गायत्री हिचा हा मंत्र आहे.

दत्तगुरुंनी इच्छा गायत्री (आत्मरुपी चित्कला) आणि सविता (आत्मरुपी प्रकाश) यांच्या माध्यमातून विश्वाचा पहिला स्पंद प्रसवला तो म्हणजे ॐ कार / परमात्मा. त्यानेच त्याच्या मातेचा हा मंत्र प्रथम जपला. नंतर कलियुगात श्रद्धावानांच्या रक्षणासाठी विश्वामित्रांनी तपश्चर्या करुन तो सिद्ध करुन मुक्त केला. हा ध्वनी प्रगटण्या आधी जो प्रकाश पसरला तो म्हणजे आदिगुरू दत्तात्रेय (जसे, वीज चमकल्या नंतर काही वेळाने ध्वनी ऐकू येतो). म्हणून दत्तात्रेय हे परमात्म्याचे वडिलबंधू.

गायत्री हे आदिमाता चण्डिकेचे तरल रुप. हीच जेव्हा सुक्ष्म रुप धारण करते तेव्हा ती महिषासुरमर्दिनी म्हणून येते (कारणानुसार आकार घेणारे तेज) व तिच्या सोबत परमात्मा येतो तिचा देवीसिंह, वाहन बनून. हीच जेव्हा स्थूल रुप धारण करते तेव्हा अनसुयामाता बनून येते व तिच्या सोबत परमात्मा येतो तो तिचा छोटा भाऊ कपिलाचार्य बनून आणि दत्तात्रेय येतात ते तिच्या पुत्राचा देह धारण करुन.

ॐ भूर्भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यम्
भर्गो देवस्य धीमहि।
धियो यो नः प्रचोदयात्॥

हा मंत्र त्रिपदा गायत्री रुपातही जपता येतो (त्रिपदा म्हणजे तीन ठिकाणी ॐकार असतो) -

ॐ भूर्भुवः स्वः
ॐ तत्सवितुर्वरेण्यम्
भर्गो देवस्य धीमहि।
धियो यो नः प्रचोदयात् ॐ॥

(मी त्रिपदा गायत्री जपते).

दत्तबावनी
-------

मुळचे मराठी पण महाराष्ट्राबाहेर कार्य केलेल्या संतांपैकी एक म्हणजे रंगावधूतस्वामी (अजून एक म्हणजे संत नामदेव). यांनी मूळ गुजरातीत लिहिलेली पण देवनागरीत उपलब्ध असणारी बावन श्लोकांची दत्तबावनी यांनीच लिहिली. काही दत्तभक्त याचे पठण सलग ५२ गुरुवार (सोवळं ओवळं, मासिकधर्म नाही पाळलं तरी चालतं), प्रत्येकी ५२ वेळा म्हणतात.

जय योगिश्वर दत्त दयाळ
तुज एक जगमा प्रतिपाळ ||1||

अत्र्यनसुया करी निमित्त
प्रगट्यो जगकारण निश्चित् ||2||

ब्रम्हा हरिहरनो अवतार
शरणागतनो तारणहार् ||3||

अन्तर्यामि सतचितसुख
बहार सद्गुरु द्विभुज सुमुख् ||4||

झोळी अन्नपुर्णा करमाह्य
शान्ति कमन्डल कर सोहाय ||5||

क्याय चतुर्भुज षडभुज सार
अनन्तबाहु तु निर्धार ||6||

आव्यो शरणे बाळ अजाण
उठ दिगंबर चाल्या प्राण ||7||

सुणी अर्जुण केरो साद
रिझ्यो पुर्वे तु साक्शात ||8||

दिधी रिद्धि सिद्धि अपार
अंते मुक्ति महापद सार ||9||

किधो आजे केम विलम्ब
तुजविन मुजने ना आलम्ब ||10||

विष्णुशर्म द्विज तार्यो एम
जम्यो श्राद्ध्मां देखि प्रेम ||11||

जम्भदैत्यथी त्रास्या देव
किधि म्हेर ते त्यां ततखेव ||12||

विस्तारी माया दितिसुत
इन्द्र करे हणाब्यो तुर्त ||13||

एवी लीला क इ क इ सर्व
किधी वर्णवे को ते शर्व ||14||

दोड्यो आयु सुतने काम
किधो एने ते निष्काम ||15||

बोध्या यदुने परशुराम
साध्यदेव प्रल्हाद अकाम ||16||

एवी तारी कृपा अगाध
केम सुने ना मारो साद ||17||

दोड अंत ना देख अनंत
मा कर अधवच शिशुनो अंत ||18||

जोइ द्विज स्त्री केरो स्नेह
थयो पुत्र तु निसन्देह ||19||

स्मर्तृगामि कलिकाळ कृपाळ
तार्यो धोबि छेक गमार ||20||

पेट पिडथी तार्यो विप्र
ब्राम्हण शेठ उगार्यो क्षिप्र ||21||

करे केम ना मारो व्हार
जो आणि गम एकज वार ||22||

शुष्क काष्ठणे आंण्या पत्र
थयो केम उदासिन अत्र ||23||

जर्जर वन्ध्या केरां स्वप्न
कर्या सफळ ते सुतना कृत्स्ण ||24||

करि दुर ब्राम्हणनो कोढ
किधा पुरण एना कोड ||25||

वन्ध्या भैंस दुझवी देव
हर्यु दारिद्र्य ते ततखेव ||26||

झालर खायि रिझयो एम
दिधो सुवर्ण घट सप्रेम ||27||

ब्राम्हण स्त्रिणो मृत भरतार
किधो संजीवन ते निर्धार ||28||

पिशाच पिडा किधी दूर
विप्रपुत्र उठाड्यो शुर ||29||

हरि विप्र मज अंत्यज हाथ
रक्षो भक्ति त्रिविक्रम तात ||30||

निमेष मात्रे तंतुक एक
पहोच्याडो श्री शैल देख ||31||

एकि साथे आठ स्वरूप
धरि देव बहुरूप अरूप ||32||

संतोष्या निज भक्त सुजात
आपि परचाओ साक्षात ||33||

यवनराजनि टाळी पीड
जातपातनि तने न चीड ||34||

रामकृष्णरुपे ते एम
किधि लिलाओ कई तेम ||35||

तार्या पत्थर गणिका व्याध
पशुपंखिपण तुजने साध ||36||

अधम ओधारण तारु नाम
गात सरे न शा शा काम ||37||

आधि व्याधि उपाधि सर्व
टळे स्मरणमात्रथी शर्व ||38||

मुठ चोट ना लागे जाण
पामे नर स्मरणे निर्वाण ||39||

डाकण शाकण भेंसासुर
भुत पिशाचो जंद असुर ||40||

नासे मुठी दईने तुर्त
दत्त धुन सांभाळता मुर्त ||41||

करी धूप गाये जे एम
दत्तबावनि आ सप्रेम ||42||

सुधरे तेणा बन्ने लोक
रहे न तेने क्यांये शोक ||43||

दासि सिद्धि तेनि थाय
दुःख दारिद्र्य तेना जाय ||44||

बावन गुरुवारे नित नेम
करे पाठ बावन सप्रेम ||45||

यथावकाशे नित्य नियम
तेणे कधि ना दंडे यम ||46||

अनेक रुपे एज अभंग
भजता नडे न माया रंग ||47||

सहस्त्र नामे नामि एक
दत्त दिगंबर असंग छेक ||48||

वंदु तुजने वारंवार
वेद श्वास तारा निर्धार ||49||

थाके वर्णवतां ज्यां शेष
कोण रांक हुं बहुकृत वेष ||50||

अनुभव तृप्तिनो उद्गार
सुणि हंशे ते खाशे मार ||51||

तपसि तत्वमसि ए देव
बोलो जय जय श्री गुरुदेव ||52||

|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

माझा खुपच छान अनुभव आहे श्री दत्तबावन्नीचा!

(१) नेणे मी तव नाम गुण अथवा रुपादी हे साकडे,
नेणे कोण कुठुन वास घडला जाणे कुठे यापुढे.
नेणे मी तुझिया पदांस नमणे कर्तव्य ते याविणे,
संरक्षी जगदंबिके भगवती हे त्वत्पदी मागणे.

(२) आदौ राम तपोवनादीगमनम हत्वां मृगम कांचनम
वैदेही हरणं जटायु मरणं सुग्रीव संभाषणम
वाली निर्दलम समुद्र तरणम लंकापुरीम दाहनम
पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतध्य रामायणम.

असे छोटे श्लोक इथे टाकावेत का? अजुन काही टाकु शकते. म्हणतानाच अर्थ कळतो.

श्रुती, नक्कीच टाक गं श्लोक स्मित

चांगल केलत हो अश्वीनीताइ
आर्या ताइ तुमचा अनुभव सांगनार का आम्हालापन म्हनजे काही लोक सन्मार्गी लागु शकतील
मी गणेश स्तोत्र म्हनते गेले ८-९ महीने पन मला काहीच अनुभव आला नाही

अतिशय घोर संकटात खालील पाच श्लोक असलेल्या, श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचित अघोरकष्टोद्धारण स्तोत्राचा पाठ करतात.

||अघोरकष्टोद्धारणस्तोत्रम||

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव| श्री दत्तास्मान पाहि देवाधीदेव||
भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते| घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते||

त्वं नो माता त्वं पिताप्तो दिपस्त्वं| त्रातायोगक्षेमकृसद्गुरुस्त्वम||
त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते| घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते||

पापं तापं व्याधीमाधींच दैन्यम| भीतिं क्लेशं त्वं हरा$शुत्व दैन्यम||
त्रातारंनो वीक्ष इशास्त जूर्ते| घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते||

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता| त्वत्तो देवं त्वं शरण्योकहर्ता|
कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते| घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते||

धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिं| सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं
भावासक्तिंचाखिलानन्दमूर्ते| घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते||

श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम|
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत||

||इति श्रीमत्वासुदेवानंदसरस्वतिविरचितं अघोरकष्टोद्धारणस्तोत्रम सम्पूर्णम||

आर्या स्मित माझ्या वर्धमानव्रताचं व्रतपुष्प हे घोरकष्टोद्धरण स्तोत्रच आहे. संस्कृत शब्दांच्या नीट संधी सोडवून म्हटलं की अगदी सोप्पं आहे म्हणायला. एकदा पाठ झालं की ट्रेनमधे / बसमधे येताजाता सहज १०८ वेळा म्हणून होतं.

टेंबेस्वामींनी (वासुदेवानंदसरस्वतींनी) देह ठेवायच्या आधी दत्तभक्तांसाठी हे लिहून ठेवलं होतं. श्रीगुरुचरित्राच्या शेवटी हे स्तोत्र दिले आहे.

अगदी बरोब्बर..! स्मित मी सुद्धा दत्तबावन्नी सतत म्हणत असते! अस म्हणतात की दत्तबावन्नीसाठी स्थळ, काळ वगैरे काहीच बंधने नाहीत!

(१)
आदौ देवकीदेवी गर्भ जननं गोपीगृहे वर्धनम
माया पूतन जिवीताप हरणं गोवर्धनोद्धारणं
कंसच्छेदन कौरवादी हरणम कुंती तनु जायनम
एतद भागवतं पुराण कथितं श्रीकृष्ण लीलामृतम.

(२)
गुरूरब्रह्मा गुरूरविष्णु गुरूर्देवो महेश्वरा,
गुरू: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः

(३)
सप्ताश्विरथ दिव्य शोभतो जिथे, श्रीमारूती सारथी
ऊर्मिलापती जानकी सती ऊभी ती चामरे ढाळिती
दो हाती धरीली सुरेख कमळे दिव्यांबरे शोभती
ऐसे राम ऊभे सुहास्य वदनी भक्तांसी सांभाळिती.

(४)
वसुदेवसुतं देवम कंसचाणूरवर्धनम
देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगत्गुरूम

कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने

(४)(रात्री झोपण्याआधी)
डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो,
जीव्हेने रस चाखतो मधुरही वाचे आम्ही बोलतो
हातांनी बहु साल काम करीतो विश्रांती ही घ्यावया घेतो झोप सुखे
फिरून उठतो ही ईश्वराची दया.

श्रुती, मस्तच. पहिला आणि तिसरा माहित नव्हता. राम कृष्णांचे मस्त वर्णन आहे स्मित

माझ्याकडे एक दुर्मिळ तुळजाष्टक ( तुळजाभवानी स्तोत्र ) आहे! उद्या टाकेन ते इथे!

तुळजा हे नाव का पडले कुणाला माहित असेल तर कृपया इथे लिहा. तुळजापुरची म्हणून तुळजा नाहिये ते. तुळजाभवानीमुळे त्या गावाला तुळजापूर नाव पडले आहे.

श्री भवानी अष्टक -

न तातो न माता न बन्धुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता ।
न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ १ ॥

भवाब्धावपारे महादु:ख्भीरू पपात प्रकामी प्रलोभी प्रमत्त: ।
कुसंसारपाशप्रबध्द: सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ २ ॥

न् जानामि दानं न च ध्यानयोगम् न जानामि तन्त्रम् न च स्तोत्र स्तोत्रम्न्त्रम् ।
न जानामि पुजाम् न च न्यासयोगम् गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ ३ ॥

न जानामि पुण्यं न जानामि तिर्थम् न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित् ।
न जानामि भक्तिं व्रतं वापि मातर्गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ ४ ॥

कुकर्मी कुसड्गी कुबुध्दी: कुदास्: कुलाचारहीन्: कदाचारलीन्: ।
कुदृष्टी: कुवाक्यप्रबन्ध्: सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ ५ ॥

प्रजेशम् रमेशम् महेशम् सुरेशम् दिनेशम् निशीधेश्वरं वा कदाचित् ।
न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ ६ ॥

विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये ।
अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ ७ ॥

अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणदीन: सदा जाङ्घवक्र: ।
विपत्तौ प्रविष्ट: प्रनष्ट: सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ ८ ॥

॥इति श्रीमदादिशंकराचार्य् विरचिता भवान्यष्टकं समाप्ता ॥

श्री साईसच्चरित
-----------

शिर्डी संस्थानच्या ऑफिशियल साईटवर मराठीत उपलब्ध आहे.

http://www.shrisaibabasansthan.org/main_marathi/saibaba/E-books/SAISATCHARITRA(marathi)/mainpage.htm

अश्विनी खुपच छान धागा काढलास.
जर कुणाला श्लोकाच विश्लेशण मराठीत येत असेल तर तेही टाकल तर बर होइल. कारण कधि कधी आपण स्त्रोत्र पाठ करतो पण त्याचा अर्थ कळ्त नाही.

व्वा चांगला संग्रह होत आहे इथे... अश्विनी छान धागा सुरु केलास

श्री शिवपन्चाक्षरस्तोत्र
===========
ॐ (जवळ जवळ प्रत्येक शुद्धमंत्राच्या सुरुवातीला लावला जातो)
नमः शिवाय - ही पाच अक्षरे असलेला हा मंत्र नंदी ऋषींनी सिद्ध केला व महादेवास प्रार्थना केली की त्याच्या कृपेचे वहन श्रद्धावानांपर्यंत नंदी ऋषींच्या माध्यमातून होऊदे. आपण जे शिवाचे वाहन नंदी पाहतो ते नंदी ऋषी आहेत. नंदी हे वृषभ रुपात का आहेत ते कुणास ठाऊक असल्यास कृपया इथे लिहावे.

खरे तर परमात्म्याला इथून तिथे जायला वाहनाची (जसे आपल्याला कार, रिक्षा, ट्रेन, बसची गरज पडते) गरज नसते. पण त्याची कृपा श्रद्धावानांपर्यंत पोहोचवण्याचे / वहन करण्याचे काम जे जीवात्मा करतात त्यांना त्याचे वाहन म्हणतात.

महाशिवरात्रीचा मध्य घेवून आधीचा एक सप्ताह आणि नंतरचा सप्ताह मिळून नंदी पंधरवडा असतो, ज्या दिवसांमधे नंदी ऋषींनी ॐ नमःशिवाय हा मंत्र सिद्ध केला.

----

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय
भस्माङरागाय महेश्वराय |
नित्याय शुद्धाय दिगम्बराय
तस्मै 'न'काराय नमःशिवाय || १ ||

मन्दाकिनीसलिलचन्दनचर्चिताय
नन्दीश्वरप्रमथनाथमहेश्वराय |
मन्दारपुष्प्बहुपुष्पसुपूजिताय
तस्मै 'म'काराय नमःशिवाय || २ ||

शिवाय गौरीवदनाब्जवृन्द
सूर्याय दक्षाध्वरनाशकाय |
श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय
तस्मै 'शि'काराय नमःशिवाय || ३ ||

वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य
मुनीन्द्रदेवार्चितशेखराय |
चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय
तस्मै 'व'काराय नमःशिवाय || ४ ||

यक्षस्वरुपाय जटाधराय
पिनाकहस्ताय सनातनाय |
दिव्याय देवाय दिगम्बराय
तस्मै 'य'काराय नमःशिवाय || ५ ||

पञ्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ |
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते || ६ ||

इति श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं सम्पुर्णम |

अश्विनी खुप छान लिहितेस.

अश्विनी खरच मस्त लिहिलय्स.. स्मित नि किती स्त्रोत्रं माहिती आहेत गं तुला.. छानच !!

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामिमहाराज रचित श्री़करुणात्रिपदी
याच्या नियमित पठणाने मन अगदी प्रसन्न आणि शांत होते.

============================================

।।श्रीकरुणात्रिपदी।।

शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आतां।।ध्रु०।।

तूं केवळ माता जनिता। सर्वथा तूं हितकर्ता।।

तूं आप्त स्वजन भ्राता। सर्वथा तूचि त्राता।।

भयकर्ता तूं भयहर्ता। दंडधर्ता तूं परिपाता। तुजवाचुनि न दुजी वार्ता।

तूं आर्ता आश्रय दत्ता।। शांत हो श्रीगुरुदत्ता.. ।।१।।

अपराधास्तव गुरुनाथा। जरि दंडा धरिसी यथार्था।।

तरि आम्ही गाउनि गाथा। तव चरणीं नमवूं माथा।।

तूं तथापि दंडिसी देवा। कोणाचा मग करूं धावा? सोडविता दुसरा तेव्हां।

कोण दत्ता आम्हां त्राता? शांत हो श्रीगुरुदत्ता.. ।।२।।

तूं नटसा होउनि कोपी। दंडितांहि आम्ही पापी।

पुनरपिही चुकत तथापि। आम्हांवरि नच संतापी।।

गच्छतः स्खलनं क्वापि। असें मानुनि नच हो कोपी। निजकृपालेशा ओपी।

आम्हांवरि तूं भगवंता।। शांत हो श्रीगुरुदत्ता.. ।।३।।

तव पदरीं असता ताता। आडमार्गीं पाऊल पडतां।

सांभाळुनि मार्गावरता। आणिता न दूजा त्राता।

निजबिरुदा आणुनि चित्ता। तूं पतीतपावन दत्ता। वळे आतां आम्हांवरता।

करुणाघन तूं गुरुनाथा।। शांत हो श्रीगुरुदत्ता.. ।।४।।

सहकुटुंब सहपरिवार। दास आम्ही हें घरदार।

तव पदी अर्पुं असार। संसाराहित हा भार।

परिहरिसी करुणासिंधो। तूं दीनानाथ सुबंधो। आम्हां अघलेश न बाधो।

वासुदेव प्रार्थित दत्ता।। शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आतां।।५।।

2

श्रीगुरुदत्ता जय भगवंता। तें मन निष्ठुर न करी आता।।ध्रु०।।

चोरें द्विजासी मारीतां मन जें। कळवळलें तें कळवळो आतां।। श्रीगुरुदत्ता।।१।।

पोटशूळानें द्विज तडफडतां। कळवळलें तें कळवळो आतां।। श्रीगुरुदत्ता।।२।।

द्विजसुत मरता वळलें तें मन। हो कीं उदासीन न वळे आतां।। श्रीगुरुदत्ता।।३।।

सतिपति मरता काकुळती येतां। वळलें तें मन न वळे कीं आतां।। श्रीगुरुदत्ता।।४।।

श्रीगुरुदत्ता त्यजि निष्ठुरता। कोमल चित्ता वळवी आतां।। श्रीगुरुदत्ता।।५।।

3

जय करुणाघन निजजनजीवन। अनसूयानंदन पाहि जनार्दन।।ध्रु०।।

निजअपराधें उफराटी दृष्टी। होउनि पोटीं भय धरूं पावन।।१।।जय०।।

तूं करुणाकर कधीं आम्हांवर। रुसशी न किंकर-वरदकृपाघन।।२।।जय०।।

वारी अपराध तूं मायबाप। तव मनीं कोपलेश न वामन।।३।।जय०।।

बालकापराधा गणे जरी माता। तरी कोण त्राता देईल जीवन।।४।।जय०।।

प्रार्थी वासुदेव पदिं ठेवी भाव। पदीं देवो ठाव देव अत्रिनंदन।।५।।जय०।।

============================================

श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी यांनी मुख्यतः मराठी आणि संस्कृत भाषांतून आपल्या दिव्य आणि चतुरस्र प्रतिभेचे दर्शन घडविले आहे. श्रीदत्तप्रभू आणि त्यांचे कलियुगांतील दोन अवतार श्रीपादश्रीवल्लभ व श्रीमन्नृसिंहसरस्वती यांची चरित्रे, स्वरूप, तत्त्वज्ञान, कार्य आणि मुख्य म्हणजे उपासना हेच या वाङ्मयाचे विषय होते.

गेय भक्तिरस पूर्ण अशी मराठी पदे जशी त्यांनी केली तशाच अतिशय सुबद्ध आणि विविध अलंकारांनी सजलेल्या संस्कृत रचनाही केल्या.

त्यांच्या सर्व वाङ्मयाचा अतिशय सुंदर असा संग्रह खालील संकेतस्थळावर मिळेल.
http://shrivasudevanandsaraswati.org/vadmaya.htm

सही केदार स्मित करुणात्रिपदीची चाल इतकी शांत, सात्विक आणि आर्त आहे की ती म्हणताना अर्थही आतपर्यंत उतरतो. बरे झाले इथे लिहिलीस ते.

अप्रतिम बाफ उघडलाय. धन्यवाद!

अगदी अगदी आशु स्मित

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सदगुरु रायाची.. एक नितांत सुंदर भजन..

==========================================

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सदगुरु रायाची,
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
सर्वही तीर्थही घडली आम्हा आदिकरुनी काशी ||

मृदंग-टाळ-ढोल-भक्त भावार्थ गाती
नामसंकीर्तने ब्रम्हानंदे नाचती ||

कोटी ब्रम्हहत्या हरती करिता दंडवत
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात ||

गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी
अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी ||

प्रदक्षिणा करुनी देह भावे वाहिला
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ||

==========================================

इथे पण बरीच स्तोत्रे मिळतील.

गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी
अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी ||
--------
हे कडवे दणदणीत आहे व अनेकजणांच्या मनात उमटणार्‍या विकल्पाचे उत्तर आहे.

प्रदक्षिणा करुनी देह भावे वाहिला
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ||
--------
स्मित तो इथेच असतो. भाव पराकोटीला पोहोचला की त्याला वेगळे पंढरपूराहून यावे लागत नाही.

|| श्री दत्तस्तवस्त्रोत्रम ||
============

भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः ||
दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामि तं || १ ||

यन्नमस्मरणाद्-दैन्यं पापं तापश्च नश्यति ||
भीतिग्रहर्तिदु:स्वप्नं दत्तात्रेयं नमामि तं || २ ||

दद्रुस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका ||
नश्यन्ति अन्येSपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामि तं || ३ ||

संगजा देशकालोत्था अपि सांक्रमिका गदा: ||
शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामि तं || ४ ||

सर्पवृश्चिकदष्टानां विषार्तानां शरीरिणाम ||
यन्नाम शान्तिदं शीघं दत्तात्रेयं नमामि तं || ५ ||

त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनम ||
यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामि तं || ६ ||

वैयादिकृतम्न्त्रादिप्रयोगा यस्य कीर्तनात ||
नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामि तं || ७ ||

यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते ||
य ईश: सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामि तं || ८ ||

जयलाभयशःकामदातुर्दत्तस्य यः स्तवम ||
भोगमोक्षप्रदस्येमं पठेद्-दत्तप्रियो भवेत || ९ ||

इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं
दत्तस्तवस्तोत्रं संपूर्णम ||