स्तोत्रांचा अनुभव

Submitted by Anvita on 26 October, 2013 - 10:04

जेव्हा आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतात त्यावेळेस आपण जे कोणी आपल्याला उपाय सांगतात ते करत असतो . त्यात मग स्तोत्र, जप , धार्मिक स्थळांना जाऊन येणे इ . गोष्टी असतात . ह्या सगळ्याने मनोबल वाढते . समस्येला तोंड देण्याची शक्ती येते . हे सगळे तर आहेच . पण एखाद्या गोष्ट करून समस्या/ संकट टळले ह्याचा कोणाला अनुभव आहे का ? उदा . मृत्युंजयाचा जप केल्यामुळे आयुष्य वाढले ,महलक्ष्मी अष्टक रोज म्हटल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली.
मला वाटते कि स्तोत्र म्हटल्याने किंवा जप केल्याने positivity येते आयुष्यात.
पण धन, संतती, आरोग्य इ. ह्या दृष्टीने काही कोणाला अनुभव आले आहेत का

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरुर म्हणावे. कुंजिका स्तोत्र श्री दुर्गा सप्तशतीची किल्ली आहे. हे स्तोत्र म्हणल्याशिवाय सप्तशतीचे फळ मिळत नाही असे त्या स्तोत्रात म्हणले आहे.

साडेसाती असल्यामुळे मी जनरली शनिवारी शनिमहात्म्य वाचत असे. तसे पाहिले तर सा धी गोष्टच आहे ती पण परिस्थिती समजावून घ्यायला, समोरची प्रलोभने लक्षात घेउन त्यापासून स्वतःचे संरक्षण करायची मानसिकता त्यामुळे निर्माण झाली. इट कीप्स वन ग्राउंडेड.

इट कीप्स वन ग्राउंडेड
>>

साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी हे च महत्त्वाचे आहे.

संतती विषयक काही समस्या असतील तर माझ्या मते ह्या जन्मात मुलांविषयी चांगली कामे केली तर जास्त चांगले म्हणजे अनाथाश्रमासाठी काम करणे , यथाशक्ती आर्थिक मदत करणे इ.
पत्रिके मध्ये मंगळ बिघडलेला असेल तर भावंडाना मदत करणे इ.
माझ्यामते ह्या प्रकाराला karmik Healing असे म्हणतात . जे जास्त logical पण वाटते .

>>माझा या प्रकारांवर विश्वास नसतानाही वरीलप्रमाणे अनुभव घेतला.<<
देवकी कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी मधे माईंड डायव्हर्टींग टेक्निक्स साठी स्त्रोत्र, पाढे यासारख्या गोष्टींचा उपयोग होतो. विचारांच्या दुष्टचक्राशी सामना करायला ही टेक्निक्स उपयोगाला येतात. हा माझ्यासारख्याचा देखील स्वानुभव आहे.
आलामंतर कोलामंतर छू हा मंत्र आपण लहानमुलांना दुखापत झाली की वापरतो. त्याला वेदना होत असते पण आपण हा मंत्र म्हणून त्याचे लक्ष वेदनेपासून विचलीत करतो. नंतर तो आपले दु:ख विसरुन हसायला पण लागतो. खरतर आलामंतर कोलामंतर छू या शब्दांना काय अर्थ आहे का? एकदा मला कुणी तरी विचारत होत की गण गण गणात बोते म्हणजे काय? मी त्याला म्हणल आलामंतर कोलामंतर छू! Happy

आमच्या व्यवसायाकरिता सासरे आणि नवरा यांनी मिळून कर्ज घेतलेले आहे. स्तोत्रपठण करायला सांगितल्यास ते दोघेही नित्यनेमाने पठण करतीलच असे नाही. म्हणून मी किंवा सासूबाईनी हे ऋणविमोचन गणपति स्तोत्र पठण केल्यास संपूर्ण घराला आणि व्यवसायात त्याचा फायदा होईल का?

मी किंवा सासु बाईंनी हे स्त्रोत्र म्हणावे का?>> सॉरी पण त्यापेक्षा जास्त मदत अर्थार्जनाने होईल. अर्थात सर्व घरचे लोक्स एक टीम म्हणून लोनच्या अगेन्स्ट काम करत आहेत हे मनात ठासण्यासाठी पॉझिटिव्ह रिइन्फोर्स्मेन्ट म्हणून नक्की उपयोग होइल.
प्रकाश बरोबर सांगत आहेत. हिम्मत मत हारना ह्यासाठी ह्या श्लोकांचा उपयोग नक्की होईल.

कुंजिका स्तोत्र हे एक दुर्लभ स्तोत्र आहे. एक तर ते जास्त प्रचलित नाही.

हे स्तोत्र म्हणण्यासाठी खास वेळेची निवड करावी असा एक संकेत आहे.

नृसिंह ऋणविमोचन स्तोत्र ही दिलेले आहे.
हे स्तोत्र ही फार प्रभावी असे आहे.

http://www.maayboli.com/node/13468?page=26

गणपती हे माझं आराध्यदैवत ! त्याचं कोणतंही स्तोत्र म्हणताना मला आनंदच होतो.
विशेष अनुभव संकष्टनाशनस्तोत्राचा... मी खूप संकटात आहे असं जेव्हा केव्हा वाटलं, तेव्हा तेव्हा मला ह्या स्तोत्रानेच त्यातून बाहेर आणलंय (अशी माझी श्रद्धा आहे)...
बाकी त्याचा सायकॉलॉजिकल इफेक्ट वगैरे.... तर्कशुद्ध गोष्टीही पटतात, पण तरीही मनोमन अशी खात्री आहे की
संकटातून बाहेर आलो/ दिशाहीन असताना दिशा मिळाली ती ह्या स्तोत्राच्या प्रभावानेच...

अवांतर-
बर्‍याच स्तोत्रांची फलश्रुती वाचली की मला असं वाटतं
ज्यांनी कुणी ही स्तोत्रे रचली/ फलश्रुती लिहिली (स्तोत्र रचलेली व्यक्ती आणि फलश्रुती लिहिलेली व्यक्ती वेगळी असू शकते).. त्यांनी धर्म/ धार्मिक गोष्टी/ त्याबद्दलचा आदर किंवा आदरयुक्त भीती इत्यादी गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला असला पाहिजे.
फलश्रुती ही एक प्रकारे स्तोत्राचं मार्केटिंग आहे... पण तेही कसलं जबरदस्त केलंय....
महिम्नस्तवपाठस्य कलां नार्हन्ति षोडशीम् --- इतर काहीही जपजाप्य करा, यात्रा करा, याग करा
पण या सगळ्या गोष्टी महिम्न पठणाच्या एक षोडशांशही नाहीत... क्या बात है..!

हे वरचं मत वयाने मोठा झाल्यावर आणि सारासारविचार (माझ्या मते) वाढल्यावर झालेलं आहे. आधी मात्र स्तोत्रे अगदी भोळ्या श्रद्धेने म्हणायचो....

आता एखादं स्तोत्र म्हणताना त्यांच्यातला प्रास, लयबद्धता, भाषिक लाघव ह्या गोष्टींकडे खूप लक्ष असतं... आणि खरंच, शिवमहिम्न, देव्यपराधक्षमापनस्तोत्र इ. मधला भाव, भाषा, लय, प्रास इतकी सुंदर आहे की तुम्ही नकळत गुंग होताच...

तुम्ही नकळत गुंग होताच...>>> रामरक्षा नादमधुरआहे.अथर्वशीर्ष म्हणताना / ऐकताना धीर्गंभीर वाटते. हे.मा. वै.म.

स्तोत्राचा एक चांगला उपयोग एका जालीय मित्राने सांगितला. अनेक पासवर्ड हे विशिष्ट कालावधीनंतर बदलावे लागतात. प्रत्येक वेळी नवा पासवर्ड तयार करणे तो लक्षात ठेवणे वैतागाच असत. त्याने एक आयडिया केली. उदा. अस्यश्री, त्यानंतरचा पासवर्ड रामरक्षा, त्यानंतर स्तोत्रमंत्रस्य........ चांगला सुरक्षित पासवर्ड झटक्यात तयार होतात. आहे कि नाही भारी आयडिया. बर याचा उपयोग सश्रद्ध व अश्रद्ध लोकांना सारखाच होतो. Happy

"भविष्यावर बोलू काही" ह्या मी मराठी वरील कार्यक्रमात शरद उपाध्ये स्तोत्र सांगण्यासाठी एक पुस्तक वापरायचे त्याचे नाव आता आठवत नाही ,कोणाला माहिती आहे का? त्यात बरीच स्तोत्र होती .

चैतन्य,

फलश्रुती ही एक प्रकारे स्तोत्राचं मार्केटिंग आहे... पण तेही कसलं जबरदस्त केलंय....>>> मार्केटिंग फायद्यासाठी केलं जातं. ही स्तोत्रं, ग्रंथ रचलेल्या ऋषी किंवा अधिकारी व्यक्तींचा काय स्वार्थ होता? त्यांनी लिहून, सिद्ध करुन सामान्यांसाठी मुक्त केली. त्यांचा प्रताधिकारही नाही त्यावर. मुद्रक प्रकाशकांचा असू शकतो.

त्या अधिकारी व्यक्तींच्या हेतुंविषयी तुला शंका नसेल पण वरच्या वाक्यामुळे कुंपणावरच्यांची दिशाभूल वा श्रद्धाभावाची उतरण होऊ शकते. आणि ती स्तोत्रे सिद्ध असल्यामुळे अश्रद्ध आणि श्रद्धावानांना दोघांनाही फायदा होत असला तरी श्रद्धा भाव जास्त असेल तर नक्कीच जास्त ताकद असते त्यात.

त्या अधिकारी व्यक्तींच्या हेतुंविषयी तुला शंका नसेल पण वरच्या वाक्यामुळे कुंपणावरच्यांची दिशाभूल वा श्रद्धाभावाची उतरण होऊ शकते. >>

अश्विनी,
मान्य आहे. मी 'मार्केटिंग' हा शब्द वापरायला नको होता.
त्याला थोडासा निगेटिव्ह वास आहे. मला तो 'सामान्यांनी स्तोत्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ह्या अर्थाने केलेला प्रचार' अशा अर्थाने म्हणायचा होता. त्यासाठीच ज्या अधिकारी व्यक्तींनी फलश्रुती लिहिली त्यांनी सामान्य माणसांच्या सर्वसामान्यपणे असलेल्या इच्छा (जसे की पुत्रप्राप्ती, धनधान्यसंपदा इ.) लक्षात घेऊन फलश्रुती लिहिली. स्तोत्राचा मूळ उद्देश (त्या देवतेची स्तुती, अध्यात्मिक उन्नती) लक्षात घेऊन सगळेच स्तोत्र पठन करतील असे नाही, पण जर त्याला इच्छापूर्तीची जोड दिली तर नक्कीच स्तोत्र वाचतील आणि कालांतराने क्षणिक इच्छांमधला फोलपणा लक्षात येऊन स्तोत्राचा मूळ उद्देशही सफल होईल... असा विचार करून फलश्रुती लिहिली गेली असणार.

ह्या धाग्यावरच्या सर्वांची क्षमा मागतो. कुणाच्याही श्रद्धाभावाला हीन लेखण्याचा माझा उद्देश नव्हता.

>>स्तोत्रांचे पासवर्ड ... ट्रिक मस्त आहे..>>.+१ आता काय उपयोग हे खरेच.<<
का नाही उपयोग? तुमचे स्तोत्र कोणते हे तुम्हालाच माहित.

(मी किंवा सासु बाईंनी हे स्त्रोत्र म्हणावे का?>> सॉरी पण त्यापेक्षा जास्त मदत अर्थार्जनाने होईल. अर्थात सर्व घरचे लोक्स एक टीम म्हणून लोनच्या अगेन्स्ट काम करत आहेत हे मनात ठासण्यासाठी पॉझिटिव्ह रिइन्फोर्स्मेन्ट म्हणून नक्की उपयोग होइल.
प्रकाश बरोबर सांगत आहेत. हिम्मत मत हारना ह्यासाठी ह्या श्लोकांचा उपयोग नक्की होईल.)

अमा, अर्थार्जन करून मी हातभार तर लावतेच आहे पण ते दोघेही नियमितपणे हे स्तोत्रपठण करतीलच याचा नेम नाही म्हणून त्यांच्याकरता आम्ही दोघी हे करू शकतो का असे मला विचारायचे आहे.

अन्विता, शरद उपाध्ये बहुतेक त्यांनी संकलन केलेले 'भक्ती सागर' पुस्तक सांगायचे असे मला ओझरते आठवतं. मला हे पुस्तक माझ्या बहिणीने दिलेय आणि त्याच्यात विविध स्तोत्रे, देवीची अष्टके, देवीची पदे, श्लोक वगैरे विविध प्रकारचे संकलन आहे.

आशिता,
तुम्ही किंवा तुमच्या सासूबाईंनी म्हटले तरी चालेल, शेवटी कुटुंबाच्या कल्याणासाठीच करता आहात ना. बाप्पा नक्कीच ऐकेल तुमची प्रार्थना.

अगदी मिनीटभरात म्हणून होते हे स्तोत्र.

विवाह लवकर ठरावा म्हणून कोणते स्तोत्र आहे का माहित नाही. कोणाला त्या बाबत अनुभव असल्यास सांगावे .पण

पुण्यामध्ये पद्मावती देवीची ओटी भरली तर लग्न लवकर ठरते असा काही जणांना अनुभव आहे. ज्याची लग्न ठरत नाहीयेत

त्यांनी हे करून बघायला हरकत नाही .

Pages