दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या? अपेक्षित होतं तरी वाईट वाटलंच.. केवढी गुणी अभिनेत्री! फक्त देवदास, आँधी हे चित्रपट आणि बंबई का बाबूमधली गाणी पाहिलीयेत. एवढ्यानेच कायमच्या आवडत्या नावांमध्ये जाऊन बसल्या. श्रद्धांजली!!

सुचित्रा- एक इरा- समापन
आमची पिढी- पोरकी होत चालली
श्रध्दां जली

डोळ्यासमोर आता छान आठवणीच राहतील सिनेमाच्या रुपाने. वाईट वाटते जेव्हा असे कलाकार एकाकी रहातात. विनम्र श्रद्धान्जली.

सुचित्रा सेन Sad श्रद्धांजली!

मी त्यांचा आंधी वगळाता एक सुद्धा चित्रपट बघितल्याचे आठवत नाही. ऑल टाइम फेवरेट चित्रपटांपैकी एक. आंधीमध्ये तरुण अवखळ आणि पुढे वय झालेली अशा दोन भुमिका इतक्या सहजपणे केल्या आहेत त्यांनी. आवाजातला बदल खासच.

मी इतक्यातच ममता पाहिला होता. आणि आंधी. बाकी कोणतेच सिनेमे नाही पाहिलेले तरिही आवडत्या अभिनेत्रींत.
सुचित्रा सेनना श्रद्धांजली.

वाईट झाल. नुकतच सुनंदा पुष्कर यांनी घटनेच्या ३७० कलमा बद्दल त्यांना काय वाटत ते- आपले पती शशी थरूर व त्यांचा पक्ष काँग्रेस च्या मता शी असहमती व्यक्त करीत - स्पष्ट पणे सांगितल होत. http://www.ndtv.com/video/player/the-buck-stops-here/article-370-right-n... या व्हिडीओ मधे शेवटी शेवटी त्यांचा कापरा झालेला आवाज सगळ्या काश्मीरी पंडीतांच दु:ख व्यक्त करतोय असच कुणालाही वाटेल. अस स्वतंत्र व्यक्तीमत्व असलेली स्त्री गेली ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो... ( .... आणि काय बोलाव काय बोलूनये याचा विधीनिषेध नसलेले सर्वच पक्षातले नेते व मीडीया वाले यांना थोडी अक्कल ही देवो.)

सुनंदा पुष्कर यांना श्रद्धांजली. Sad
-गा.पै.

अवांतर : त्यांचे सोपोरमधील राहते घर काश्मिरी अतिरेक्यांनी उद्ध्वस्त केले होते.

श्री. द्वारकानाथ लेले यांचा आजच देहान्त झाला. लेले हे सकाळ चे एक निवृत्त संपादक होते. पूर्वी ते स्वराज्य ह्या साप्ताहिकाचे संपादक होते. दै. सकाळची नाशिक आवृत्ती त्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली होती.

श्री लेले हे स्वतः कवी नव्हते; ते स्वतःला रसिक म्हणून घेत असत. तरी त्यांनी कै. डॉ. कल्याण इनामदार यांच्याबरोबर 'काव्यशिल्प' या पुण्यातील कवितेला वाहून घेतलेल्या संस्थेची १९७२ साली स्थापना केली. आजतागायत ते संस्थेशी जोडलेले होते. २५ डिसेंबर २०१३ रोजी त्यांनी संस्थेच्या ४१व्या वर्धापनदिनात सहभाग घेतला होता. ते नेहमी म्हणत असत, "मी शंभर वर्षे जगणार आहे". पण नियतीच्या मनात वेगळेच होते.

एक म्हण आहे... "लडा़ई के मैदान में शहीद सैनिक की लाश नही उठाते.. उसकी तलवार उठाते हैं". काव्यशिल्पचा एक सभासद या नात्याने श्री द्वारकानाथ लेले यांना अपेक्षित असलेले काव्यप्रेम मी असेच पुढे चालू ठेवणे आणि 'काव्यशिल्प' भरभराटीस आणणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असे माझ्या वतीने सांगू इच्छितो!

इश्वर मृतात्म्याला शांती देवो!

सुनंदा यांच्या आत्म्याला शांती लाभो. इतक्या सुरेख व्यक्तिमत्त्वाचा असा दुर्दैवी अंत . मुलगा किती
लहान कोवळा आहे. त्याची आई गेली आज.

सुचित्रा सेन यांना श्रद्धांजली !
भारतातील ग्रेटा गार्बो असे म्हणले जायचे. बरीच प्रसिद्धी असुन देखील १९७८ पासुन आजतागायत एवढी वर्षे अजिबात प्रसिद्धी पासुन लांब रहाणे फार कठिण आणि विरळा.
त्यांनी अध्यात्माला वाहून घेतले होते, तसेच श्री रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी शारदा माँ यांची भुमिका करण्याची त्यांची ईच्छा होती.

सुनंदा पुष्कर आणि द्वारकानाथ लेले यांना श्रद्धांजली !

ह्म्म्म अशोक जैन हे एका महत्वाच्या कालखंडाचे साक्षीदारच नव्हे तर एक प्रकारे त्या कालखंडाचा भाग पण होते.
श्रद्धांजली !

अरेरे अशोक जैन, मी लहान असताना त्यांचे मटामधले दिल्लीवरून लिहायचे ते लेख आठवले.
श्रद्धांजली.

Pages