दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशोक जैन ह्यांना श्रद्धांजली. म.टा.मधील त्यांचे 'राजधानीतून' हे सदर फार आवडते होते. त्यांची इतरही पुस्तके वाचनीय आहेत. प्रवाही आणि नेमके लिखाण करणारे पत्रकार होते ते.

अरेरे.. अशोक जैनांचे बोट धरून वर्तमानपत्र वाचायला लागलो. अतिशय वाईट वाटले. कलंदर नावाने ते जे सदर म.टा.मध्ये लिहित असत त्याची तुलना कदाचित फक्त ठणठणपाळाशीच होऊ शकते.

प्राचार्य पी. बी पाटलांना विनम्र श्रद्धांजली.
दक्षिण महाराष्ट्रातलं एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व. एकाद्या योगी-तपस्व्यासारखं फक्त आदरानं आणि श्रद्धाभावनेनंच यांचं नाव लहानपणापासून कानावर पडत राहिलं.. एक-दोनदा बघितलंही आहे त्यांना, त्यांचं बोलणं, दिसणंही त्या सगळ्या लौकिकाला अगदी साजेसं.

अशोक जैन..... वृत्तपत्रे हाती घेऊन ज्या व्यक्तिंचे लिखाण आवर्जुन वाचावे अशा मोजक्या व्यक्तिंपैकी ते एक होते. Sad या निवडक व्यक्तिंमुळेच "वृत्तपत्रे /मिडिया" धन्देवाईक बनलेला असूनही काही आशा शिल्लक होती. एकेक करत हे मोहरे गळाल्यावर "चौथा आधारस्तम्भ" वगैरे गोष्टी निव्वळ भूलथापा ठरतात.

विक्रम सावरकर..... श्रद्धांजली

पीबी पाटील सर..... श्रद्धांजली

प्रफुल्ला डहाणुकरांचे आज निधन झाल्याचे नुकताच समजले . स्वतः उत्तम चित्रकार तर त्या होत्याच पण अनेक चित्रकाराना त्यांनी दिलेले प्रोत्साहन , अनेक संस्थांमधुन केलेले काम मोलाचे . श्रद्धांजली.

अतिशय तरुण वयात उत्कृष्ट ध्वनिलेखक आणि ध्वनिलेखन-संकल्पक म्हणून लौकिक मिळवणार्‍या श्री. निमिष छेडा यांचं काल निधन झालं. गेल्या आठवड्यात त्यांना अपघात झाला होता. 'कमिने', 'गो गोआ गॉन', 'जॉनी गद्दार', 'सांवरीया', 'नमस्ते लंडन' अशा हिंदी आणि 'शाळा', 'आजोबा', 'फॅण्ड्री' या मराठी चित्रपटांचं ध्वनिलेखन / ध्वनिलेखन-संकल्पन त्यांनी केलं होतं.

निमिष छेडा.. सो शॉकिंग!!!!!!!

Sad

श्रद्धांजली..!!

ज्येष्ठ कवी, गीतकार आणि संगीतकार सुधीर मोघे यांचं प्रदीर्घ आजाराने निधन...
श्रद्धांजली..!!

ओह!!! किती तरी सुंदर कविता आणि गीतलेखन सुधीर मोघे यांनी केले आहे! त्यांचे जाणे.. Sad

श्रद्धांजली....

सुधीर मोघे, अरेरे sad news. श्रद्धांजली.

मन मनास उमगत नाही,
आधार कसा शोधावा,
स्वप्नातील पदर धुक्याचा,
हातास कसा लागावा?

हे त्याचं गाणं लगेच आठवलं.

मोघे सर , अस्सल गाण्यांचा खजाना ....

श्रद्धांजली...

खरच आज तारकाही मंद होतील - या ता-याच्या आगमनासाठी
ता-याप्रमाणे तेही कायम चमकत राहो..........

Pages