दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदू भेंडे??? अविश्वसनीय बातमी!! देवा..

'माझ्या जगात मी' मधे या गुणी मुलाचं, खरंतर दोन्ही मुलांचं आईने केलेलं कौतुक वाचण्यासारखं आहे.. सगळं कुटूंबच कर्तृत्ववान!
काय झालं असेल भेंडे आई-बाबांचं? Sad देवा, त्यांना ह्या वयात हा आघात पचवण्याचं बळ दे...

वाईट बातमी.

नंदू भेंडे निदान २५ वर्षं आधी जन्मले. त्यांच्या कलेचं चीज झालं नाही म्हणावं तसं, मराठीत तर नाहीच. मात्र तीन पैशांचा तमाशा मधला नंदू भेंडेंचा अंकुश नागावकर विसरता येणार नाही.

आत्माराम जी जवळपास शंभरीच्या आसपास आलेले असावेत....ह्या वयात नंदू त्यांच्यापासून कायमचा निघून जाणे या परते दुसरे आणखीन् काय वाईट असेल ? असो. मराठीतील पहिला रॉकस्टार म्हणून नाव कमाविलेल्या नंदू भेंडे याना भावपूर्ण श्रद्धांजली.

नोबेल पारितोषिकविजेते साहित्यिक गाब्रिएल गार्सिया मार्केस यांचं निधन.

अरे! 'वन हंड्रेड यर्स'वाले?
श्रद्धांजली.

Sad

माऊंट एव्हरेस्टवर खुंबू आईसफॉलच्या वर कँप १ जवळ अ‍ॅव्हलाँचमध्ये १२ शेर्पांचा मृत्यू. ४ शेर्पा अद्याप बेपत्ता. एव्हरेस्टच्या इतिहासातील एक अत्यंत दुर्दैवी अपघात !

शोकांतिका ...दवाखाने बनले पैशे छापण्याचे कारखाने . Sad

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5160183282999899590&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20140426&Provider=- वृत्तसंस्था&NewsTitle=मृत महिलेला आठवडाभर ठेवले व्हेंटिलेटरवर

काल दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व प्रवाशांना विनम्र श्रद्धांजली.

दिवा-सावंतवाडी गाडी...! खूप वर्षांपूर्वी जेव्हा कोकण रेल्वे नव्हती तेव्हा ही गाडी दिवे-रोहे अशी धावत असे. कोकण रेल्वे सुरू झाल्यावर पहिल्यांदा माणगाव, मग वीर, खेड, चिपळूण, रत्नागिरी अशी धावायची. आता सावंतवाडीपर्यंत जाते. मी खूपदा हिने प्रवास केला आहे. सुपरिचित गाडीला अपघात झाला की कससंच होतं! Sad

मृतांना शांती लाभो आणि आप्तेष्टांना दु:खातून सावरायचं बळ मिळो.

-गा.पै.

काल मुंबई गोवा महामार्गा वरुन प्रवास करताना मुंबई च्या दिशेने जाणार्या अ‍ॅम्ब्युलन्सेस दिसल्या . आत जखमी माणसं होती. पोटात गलबललं ते बघुन. सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

भयानक घडलेलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना सावरायचं आणि जखमींना बरं होऊन धक्क्यातून बाहेर यायची ताकद मिळो ही प्रार्थना!

ओह्ह! गोपाळ बोधेसर Sad Sad

रविंद्र नाट्य मंदिरात प्रचि प्रदर्शनावेळेस भेटलो होतो त्यांना. Sad

Pages