आज व्यायाम केला ?

Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16

खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.

मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.

असो. काल ३ किमी चालणे+धावणे, ३० मि. सायकलिंग आणि वेट ट्रेनिंग केले. आज फक्त एरोबिक्स करणार आणि उद्या लोअर बॉडी. {संदर्भ - Body for Life, PDF version}.

काय मग, आज व्यायाम केला का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन, तुम्ही मॅरॅथॉन करता ट्रेनिंग म्हणून पळत असाल तर मॅरॅथॉन बाफं ला नक्की भेट द्या.चांगली माहिती आहे तिथे. Happy

हल्लि एक दिवसाआड योगवर्गाला जातेय. तिथे १२ सु न होताहेत. बाकी काही विशेष होत नाहीय Sad

मोटिवेशनसाठी माधुरीचा फोटो लावुन ठेवलाय हॉलमध्ये..... Happy तिच्याकडे बघितले की परत उसळी घेते मन तिच्याएवढे बारिक होण्यासाठी.... ...

>>मोटिवेशनसाठी माधुरीचा फोटो लावुन ठेवलाय हॉलमध्ये.
+१

मी पण विचार करतो आहे ...घरी एखादा बॉडी बिल्डर चा फोटो लावण्याचा ..पण टोमणे बसून डीमोटीव्हेट च्यायची शक्यता जास्त आहे Wink

आज ४ किमी. चालणे फक्त....

वैद्यबुवा - दुवा (लिंक) द्यावा दुवा (धन्यवाद) घ्यावा.

हर्पेन ..... आपला नेम वाचुन टोपी उडाली.....खुप खुप शुभेच्छा ......रोज नियमाने ६० मिनीटे अ‍ॅरोबिक करणे ...हा नियम पाळते आहे ......

अबब! वैद्यबुवा, केवढा मोठा खजिना, अनेकानेक धन्यवाद Happy
खरेतर आता फक्त पहिलेच पान चाळलेय, आज रात्री नीट वाचल्याशिवाय काही झोपत नाही आता..

माझे सिझर होउन २ महिने झलेत. पोट अगदिच वाध्लय. मि सुर्यनमस्कार सुरु करु शकते क? डोकट्रर ला क्रन्चेस करु का विचारले होते. ति म्हणे थिक आहे.त्रास वाटला तर बन्द कर.पोट आटोक्यात येण्यासाठि सध्या कोणते व्यायम सुरु कर्ता येतिल?

मंडळी सध्या पुढे येऊ घातलेल्या आगामी हिवाळ्याच्या तोंडावर 'व्यायामा'वर चर्चा सध्या सगळीकडे हळुहळु रंगु लागली आहेच,त्यातच आपल्या या माबोवरच्या कार्यक्षेत्रात या 'देशमुखांनी' हा उपक्रम चालु करुन एक वेगळं, चांगलं,लोकोपयोगी आणि समाजसेवेच काम केलं आहे, अस मला वाटतं,याचा परिणाम म्हणुन इथल्या शेकडो लोकांचा आळसात, लोळण्यात,टीव्ही पाहण्यात जाणारा वेळ त्यांनी सत्कारणी लावला आहेच,त्यातुन समस्त माणसांच्या तब्येतीत थोडीतरी चांगली वाढ होईल अस आश्वासन इथे देतो.मला इथल्या अनेक व्यायामकर्त्यांकडुन त्यांच्या आनंदात भर पडल्याच नुकतंच समजलं आहे, तरी येणार्‍या 'माबोसभे'मध्ये या कार्याची दखल घेतली जावी आणि त्यांचा (एखाद तिकीट देऊन) योग्य सत्कार केला जावा अशी मी वरिष्ठाना या निम्मिताने विनंती करतो. आपण सर्वांनी (स्व.) दारासिंग्, कर्तारसिंग, मिल्खासिंग, तसेच युवराज,सत्पाल यांनी केलेल्या कामाचा,व्यायामाचा,त्यांनी कमावलेल्या तब्येतीचा आदर्श जरुर घ्यावा आणि आपले आणि इतरांचे जीवन सुखी करावे.
आपली ही घोषणा जमेल त्यांनी लक्षात ठेवावी आणि इतरांनी सांगावी.

ताई,माई,अक्का व्यायाम करा पक्का आणि खर्‍या आनंदावर मारा शिक्का !
व्यायाम हा माझ्या शरीराचा मजबुत अधिकार आहे आणि रोज मी तो करणारच !
शाकाहारच लई भारी, बॉडी बनवी खरी आणि सर्व आजारांना दुर करी !

तरी समस्त व्यायाम सुरु करणार्‍यांनी कुठलीही शंका मनात न ठेवता,आपापल्या परींनं पण जोरदार व्यायाम करावा, कारण शेवटी हा 'विजय' आपलाच आहे.

बोलो ...
वीर,बाहुबली,पवनपुत्र हनुमान की जय !!
Happy

अनिल मस्तच....

शाहीर, डिमोटीवेट करणारे भेटले की 'मी शब्दाने नाही तर कृतीतुन दाखवेन माझा संकल्प' हे मनातल्या मनात म्हणावे. Happy

डिमोटिवेटर्स जर जास्त असतील तर करणेबल फोटो लावा. उगीच आर्नोल्ड्चा लावलात तर टोमणे मारणा-यांना अजुन स्फुरण चढेल. Happy

आज सकाळी खुल्या वातावरणात, कडूनिंबाच्या झाडाखाली, तासभर योगासने केली. Happy व्यायाम करतोय असे वाटलेच नाही.... शब्दातीत अनुभूती Happy

साधना,
मस्तच.अशा सकारात्मक पाठींब्या मुळेच तर जगात चांगल आहे ते टिकुन आहे.

नेहमी वाटतं कि खुप चालावं,पण इथे बाहेर गर्दी, रस्ते पाहुन जाणं होत नव्हतं, मग आता घरीच १०-१५ मि. जॉगींग चालु केलं आहे,आता पुढे जमलच तर चालण्याच्या स्पर्धेत किंवा मैरेथॉन मध्ये देखील भाग घ्यावा अस वाटतयं.....
Lol

रमा,हर्पेन,
छान. किप इट अप.
माझा अनुभव - ताण कमी करण्याचा खास मार्ग म्हणजे चालणे.

अनिल७६ - शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

पुण्यात ६ ऑक्टोबर २०१३ रोजी होणार्‍या 'रन बियाँड मायसेल्फ' ह्या 'चॅरिटी रन' मधे मी माझ्या आयुष्यातली पहिली वहिली लांब अंतराची (१५ किमी) शर्यत धावणार आहे.

ही शर्यत बीएमसीसी पासून चालू होउन बालभारती मार्गे, सेनापती बापट रस्त्यावरून पाषाण रस्त्यावरून मागे फिरून परत बीएमसीसी येथे संपणार आहे.

ज्यांना कोणाला जमणार असेल त्यांनी स्पर्धामार्गावर धावपटूंना प्रोत्साहन देण्यास जरूर उपस्थित रहावे. अर्धमॅरॅथॉन स्पर्धा सकाळी ६ वाजता चालू होणार आहे. बाकी १५किमी, १० किमी, चालणे ई. स्पर्धा त्यानंतर दर १५ मि. च्या अंतराने चालू होतील.
अधिक माहीतीसाठी
http://www.punerunning.com/Running-Beyond-Myself-2013.html

आज दहा दिवसांच्या, कोणतेही योग्य कारण नसतांना बंद पडलेल्या वॉकची पुनः ४.५ किमी, ४५ मिनिटे ने सुरुवात झाली. सातत्यासाठी मला शुभेच्छा आणि प्रोत्साहन द्या बरं!!
Happy

रेव्यु .. गुड जॉब .. कीप इट अप !!

मी पण आज फायनली योगासनं सुरु केलयं .. अ‍ॅल्मोस्ट एक महिन्याच्या ब्रेकनंतर

रेव्यु - अनेकानेक शुभेच्छा,

आज आम्ही ज्या तर्‍हेने पळलो त्याला इंडीयन फाईल असे म्हणतात. या तर्‍हेने पळताना, सगळ्यांनी एका ओळीत (एकामागोमाग) पळायचे आणि जो शेवट असेल त्याने जोरात पळत जाऊन (बाकीचे पळतच असताना त्यांना मागे टाकून) पहिल्या स्थानावर पोचायचे, तो तिथे पोचला की मग जो शेवट असेल त्याने जोरात पळायला सुरुवात करायची आणि तसेच बाकीच्यांना मागे टाकून पहिल्या स्थानावर पोचायचे असे करत करत सर्वांना अग्रस्थानी पळण्याचा मान देत देत चक्करा मारायच्या.

हालत खर्राब होते, वाट लागते, (माझी तरी लागली )..त्यामुळे ३च चकरा मारल्या. एकूण पळणे ६.६ किमी.

काल इंडीयन फाईल प्रकारे धावल्यानंतर काल दिवसभर गुडघे आपल्या अस्तित्वाची अशक्य जाणीव करून देत होते. पण आज ज्याला रिकव्हरी रन म्हणतात ती करणे गरजेचे असल्याने सकाळी उठून पळताना थोडे दुखत असतानाच ३ किमी. अंतर पळलो. नंतर बरे वाटले, सांधे मोकळे झाल्यासारखे.

आणि अशा प्रकारे गेल्या एका महिन्याभरात (माझ्या लॉगनुसार) मी १०० किमी च्या वर अंतर पळलो Happy

हर्पेन
ग्रेट हो!!
मी परत २ दिवस दांडी मारली. आज चाललो
खूप अपराधी वाटतय. खरं तर कारणे वैध होती ( नेहेमीच असतात Happy )

ईथे वाचुन अजुनच अपराधी वाटत आहे.... बाळ लहान ह्या सबबी खाली गेले कित्येक दिवस व्यायाम च नाही होत .... ठरवले तर जमु शकेल खरतर असेही वाटत आहे

हर्पेन ....खुप खुप अभिनन्दन .....आपण बराच सराव करुन ह्या मँरेथॉन मधे उतरला होतात ....कसा वाटला अनुभव? वाचायला आवडेल.

प्राची, वाईट वाटुन घेउ नका.... चक्क धागाकर्ताही सध्या फक्त वाचनाचेच कष्ट घेतोय हो. Sad
सध्या आहाराचा व्यायाम सुरु केलाय. सविस्तर लिहेनच. Happy

Pages