आज व्यायाम केला ?

Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16

खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.

मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.

असो. काल ३ किमी चालणे+धावणे, ३० मि. सायकलिंग आणि वेट ट्रेनिंग केले. आज फक्त एरोबिक्स करणार आणि उद्या लोअर बॉडी. {संदर्भ - Body for Life, PDF version}.

काय मग, आज व्यायाम केला का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३ दिवस उशीरा उठल्यामुळे प्राणायाम नाही.या धाग्यामुळे प्राणायाम चालू केला होता.थँक्स टू धागाकर्ता !

हर्पेन,
अभिनंदन !
रन..माहिती बद्दल धन्यवाद्,पण मी उशीरा वाचली.
पुढच्या वेळेस भाग घेण्याचा वि
चार आहे.

काल ८ किमी धावलो, आज अर्धा तास खुल्या जागेत योगासने केली. पाठीवर झोपून करायची आसने करताना दिसणारे आभाळ आणि विविध प्रकारचे आणि प्रकाराने उडणारे पक्षी बघताना गुंग / दंग होऊन गेलो की जणू ध्यान / समाधी Happy

धन्यवाद अनिल७६. आता पुणे मॅरॅथॉन आहे १ डिसेंबरला Happy

पाठीवर झोपून करायची आसने करताना दिसणारे आभाळ आणि विविध प्रकारचे आणि प्रकाराने उडणारे पक्षी बघताना गुंग / दंग होऊन गेलो की जणू ध्यान / समाधी स्मित >>>>>>>>>>>>>

व्वा !

गेले २ महिने रोज सकाळी ८० मिनिट चालले.त्यात १५-१७ मि. जलद
पण दुखणार्‍या स्नायूंमुळे चालणं थांबलय. स्नायू दुखणं अचानक नाही सुरू झालं. रोजच दुखत होते.
काय चुकतय? वय ५३

अवनी जी
मी तुमच्याहून जास्त वयाचा आहे. पण साधारण तुमच्या वयाचा असतांना मी ४५ मि. ४.५ किमी चालत असे. त्याहून अधिक करू नका. स्नायूंना आठवड्यात २ दिवस विश्रांति द्या. ८० मि. माझ्या मते फार आहेत आणि त्यामुळे दुखणे वाढेलच

हा आठवडा छान गेला. ५ दिवस एकूण २२ कि मी चालणे झाले. आता उद्या सुट्ठी!!!
Happy Happy

दसर्‍यादिवशी सकाळी पुणे युनिव्हर्सिटीत मुलांबरोबर १ तास ब्रिस्क वॉक घेतला. मस्त वाटलं. सगळीकडे उत्साही वातावरण, ग्रीनरी मेन्टेन केलेली. पळणारे ग्रूप्स!
नंतर खड्डा कॅन्टीनला इडली सांबार चटणी.
समोरच मिलिंद सोमण आणि त्याचा ग्रूप होता. बाकी रोज योगासने आणि काहीना काही व्यायाम चालूच!

आज मूड नव्हता. कालचा दिवस चांगला न गेल्याने आणि सकाळचा व्यायाम जरा जास्तच झाल्याने निरुत्साह होता. अस्वस्थही वाटत होतं. सुटी घ्याविशी वाटत होती. पण ठरवलं निदान बाहेर पडायचं. मग बाहेर पडलो आणि हळूहळू सगळंच पूर्ण केलं. Happy

अरे वा मानुषी, पुण्यनगरीत आपले स्वागत.

असो, लगे रहो... माझ्याही बाबतीत असे होते, पण बाहेर पडणे महत्वाचे, एकदा का बाहेर पडलो की पुढचे सगळे आपोआप होते. Happy

आज ताकद वाढवणारे व्यायाम प्रकार (फास्ट स्ट्रेंथ वर्क्-आऊट) केले, अक्षरशः १० मिनिटातच घामाघूम व्हायला, दमायला झाले, पुरा कस लागला, पण मजाही आली. Happy

इतक्यात प्रकर्षाने जाणवलेली एक बाब म्हणजे, रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार, मित्रमंडळींच्या साथीने केल्याने व्यायाम करण्याचा उत्साह टिकून रहाण्यास मदत होते आहे Happy

दिवाळीच्या फराळामुळे कॅलरीज वाढणार आहेत ..
आणि सगळेच पदार्थ आवडीचे ..त्यामुळे जीभेचा व्यायम जास्त होणार ..

बराच संयम पाळायला लागणार आहे !!

काल प्रशांती ब्रेस्ट कँसर संदर्भात जागृती साठी अमानोरा मधे एक शर्यत होती. मी १५ किमी पळलो. आज अर्धातास मोकळ्यावर योगासने केली.

हो आज केला व्यायाम. गेले ७-८ पाय लचकल्यामुळे झालाच नव्हता. अर्धा तास ब्रिस्क वाकींग केले. हळू-हळू जॉगिंग सुरु करेन.

मी पण सुरुवात केलीये काल पासुन. ऑफिसनंतर फक्त अर्धा तास देउ शकते. काल १.५ किमी पळाले. जीम मधली सायकल आणि एलेप्टिकल बंद पडलयं. त्यामुळे दुसरे काय करु ते कळत नाहिये सध्या.

पेरू अभिनंदन व्यायामाची सुरुवात झाल्याबद्दल. Happy तुम्ही ट्रेड मिल करू शकता.
आज मी अर्धा तास जोगिंग केलं.

मी हल्ली नियमीत करतेय. सकाळी दिवसाआड योगा आणि चालणे. सकाळचे स्किप झाले तर संध्याकाळी चालणे. कर्मण्येवाधिकारस्ते एवढाच मंत्र जपतेय.. Happy पुढचे म्हणण्याची हिंमत नाही कारण फळ हवेय Happy

अगदी बरोबरे, दिवाळी संपली मित्रांनो, सकाळी लवकर उठा आणि व्यायामाला लागा.
मी काल योगासने केली. येणार्‍या मित्राची वाट बघत, २ मिनीटाचे ३ सेट प्लँकिंग केले, आज १० किमी धावलो.

Ithe sanganyasathi tari mi uyapasun kinva atta ratripasun karen. He barobar aahe, samvichari lok asaleki li savayi lavkat badalatat

Pages