आज व्यायाम केला ?

Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16

खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.

मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.

असो. काल ३ किमी चालणे+धावणे, ३० मि. सायकलिंग आणि वेट ट्रेनिंग केले. आज फक्त एरोबिक्स करणार आणि उद्या लोअर बॉडी. {संदर्भ - Body for Life, PDF version}.

काय मग, आज व्यायाम केला का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या प्राणायाम सुरु केलेत.
थंडी वाढली. त्यामुळे बाहेर जाणे थोडे कमी झालय.
जेवतांना खुप हळूहळू जेवण घेतलं, मध्ये घोटभर पाणी, टीव्ही बंद, मोबाईल दुर, ..... पोट बरच कमी झालय. रोजच्या जेवणात (एका वेळच्या) एक पोळी, थोडा भात कमी लागतोय. मात्र दुपारी मग थोडसं खातो.

करुन बघा. Happy

थंडी वाढली आहे ..
Jillian Michaels 30 Day Shred डाउनलोड करून सीडी बनवली आहे ..टी व्ही वर बघत व्यायाम करणं सोपा जाता ..
मस्त एक्सरसाईज आहेत ..शिवाय कोणत्याही साधनाशिवाय ..
३० मिनिटांचा एक भाग आहे ..
३० मिनिट व्यायाम केलात तर मस्त फ्रेश वाटतं ..

कम ऑन ! हेच ४ महिने कसून मेहनतीचे आहेत ,

शाहीर,
३० मिनिट व्यायाम केलात तर मस्त फ्रेश वाटतं ..>> +१
मला youtube वरून download करायला जमले नाहि. कसे करायचे सांगाल का?

@गीतान्जली..
मी टोरेंट वरून डाउनलोड केले ..youtube वरून डाउनलोड करायचे असल्यास पूर्ण ३० मिनिटांचे आहेत का याची खात्री करा ..आणि मोझिला मधे बरेचसे प्लग इन आहेत जे youtube किंवा कुठलेही फ्लॅश व्हिडीओ डाउनलोड करतात..

माझा व्यायाम खुपच अनियमित झालाय .. Sad
योगासने करतेय फक्त ४० मिनिट...

शाहिर .. तुम्हीच एका फोल्डर मधे टाका ना 4shared.com वर .. आम्हा पामरांना लाभ होईल Happy

हे मीही आजपासून सुरू केलाय व्यायाम १५ मि. ट्रेड मिलवर १५ मि. सायकलिंग Happy

शुभस्य शिघ्रम ! आगे आगे देखेंगे होता है क्या ! Happy

शाहिर मी बघितले युट्युब वर जिलिअन मायकेल चे व्हिडीओ. आज लेवल १ करून पाहिली. सोपे वाटतायत व्यायाम.

सध्या व्यायामाला वेगळा वेळ मिळत नाहिये म्हणून सन्ध्याकाळी मुलाना खाली घेऊन गेले की त्याना सायकलवर बसवून त्यान्च्यासोबत पळत आहे. काल केला तसा व्यायाम. थोडा योगासनासाठी वेळ मिळतोय का ते पहाञचे आहे. दुपारी शिवा़जीनगर मधे कुणि योगा क्लासेस घेणारे माहीतेय का? लन्च टाईम मधे जायला?
विद्या.

Mi aaj 6 km cycle xhalavli
Eka damat nahi pan tappya tappyat 1.5 km at a tim

डिसेंबरपासून दिवसा-आड योगासने, पोहणे आणि सायकलींग चालू केलंय.

आज सकाळी अर्धा किमी. पोहलो. Happy

पोहून झाले की सकाळच्या थंड हवेत बाकी सर्वजण कुड्कुडत असताना आपण मस्तपैकी ताजेतवाने झालेलो असतो. अशक्य भार्री वाटते

kaal 5 km cycling. 1.5 km ani 3.5 km hya tappyaat. speed kami aahe. dam suddhaa lagtoy thoda, pan zop mast lagtey. gudhagyaachyaa aajoobaajoolaa dukhatay thoda.

मी गेल्या १० दिवसांपासुन जॉगींग सुरू केलेय. साधारण ६ चकरा मारतो आमच्या अपार्ट्मेंट्च्या आवारात (साधारण ४०० स्टेपस होतील). व त्यानंतर १०० दोरीच्या उड्या व इतर स्ट्रेचींग. बाकीचे लोक सकाळी ७:३०ला स्वेटर घालून असतात तेंव्हा आपण घामेजलेलो असतो त्यावेळी ते आश्चर्यचकीत! Happy

काल ४.७ किमी सायकल चालवली. २.२ किमी चे दोन टप्पे. दम कमी लागला, थोडं गुढग्याजवळ दुखतय पण मला वाटतं ते सवय नसल्याने असणार.

मंगेश देशपांडे - 100 दोरीउड्या. सही. पण तुम्ही लोक्स दोरीउड्या कुठे मारता? घरात तेवढी जागा नसते आणि उंची नसते.

गेले ते दिवस राहील्या त्या फक्त आठवणी, अहा हा!!! तो डंबेल्स चा आवाज आजही हवा हवा वाटतो पण साली आता आपण जीम करु नाय शकत अजुन काही महिने Sad

जीम मधे मस्ती महागात पडली आहे Sad

पंधरा दिवसांत कुणीच व्यायाम केलेला दिसत नाही Wink
मी तीन महिन्यांच्या खंडानंतर १ जानेवारीला (कोणत्याही संकल्पाशिवाय) व्यायामाला पुन्हा सुरुवात केली. आळस, वेळ नाही इ. नेहमीची यशस्वी कारणे होती.
अर्धा तास strengthening exercises, १५ मिनिटे ब्रह्मविद्येचे श्वसनव्यायाम आणि १५ मिनिटे cardiovascular.(spot jogging & side stepping)
strengthening exercises आधी करायचो त्याच्या अर्ध्याच आवर्तनांनी सुरू केले. त्याचा फारसा त्रास झाला नाही. आजपासून आवर्तने आधीच्या दोन तृतियांशाने केली. कार्डियोव्हस्क्युलरने मांड्या भरून आल्या. त्यामुळे दोन तारखेला त्याला दांडी. काल अर्धा तास stroll.
आज पहिले दोन करून झाले. आजपासून आवर्तने आधीच्या दोन तृतियांशाने केली. तिसरा प्रकार आज संध्याकाळी करायचा विचार आहे.
एक एक्सेल शीट बनवून ठेवली आहे. रोजचे व्यायाम (आणि अशीच न आवडणारी इतर कामे) केली की नाही , किती केली त्याचा ट्रॅक ठेवायला.

व्यायामाला फार वेळ देऊन न शकणार्‍यांसाठी, खरे तर सर्वांसाठीच

१५ नोवेंबरपासुन ऑफिसातल्या जीमला नियमीत जायला लागलेय. एक दिवस वेट ट्रैनिन्ग, एक दिवस कार्डिओ. शिवाय दिवसाआड सकाळी तासभर योगा, ज्यात १२ सुन आणि मग ताणाचे प्रकार. संध्यकाळी वेळ मिळाला तर पाउण तास ब्रिस्क वॉक (लेकिला जीमला घेऊन जाते तिथे तासभर बसुन वेळ वाया घालवण्यापेक्षा चाललेले काय वाईट असा विचार करुन चालायला जायला लागले. पण यात एक गोष्ट वाईट ही की चालता चालता वाटेत इस्कॉनचे कृष्णमंदिर लागते. तिथे आत जायचा मोह टाळता आला नाही तर मग तिथला प्रसाद म्हणुन तुपात थबथबलेला द्रोणभर शीरा खाणेही टाळता येत नाही Happy )

. हे सोडता बाकी डायेटवर लक्ष, तळलेले, गोड, आईसक्रिम्स, केक इ. पुर्णपणॅ टाळले. बाकी जेवण नेहमीचेच.

दिड महिन्याच्या मेहनतीनंतर आता वजन ७५ वरुन ७१ वर आलेय, पण अजुन इंचेस मध्ये जाणावण्याइतपत फरक पडलेला नाहीय.... पडेल पडेल.... तेही होईल.

गेले दोन आठवडे उनाडक्यात गेले. डायेट थोडे बोंबलले. आता पुढच्या आठवड्यापासुन परत सुरू.

दोन दिवसापासून morning walk चालू केला आहे. कमीत कमी अर्धा-पाऊन तास तरी चालण होत, पण अजिबात घाम येत नाही आणि दमल्यासारख हि वाटत नाही. तर हे बरोबर आहे का? कि काही चुकतंय?

३० मार्च नंतर सगळेच थंडावलेय माझे. वजन ६९ किलोवर स्थिर झालेय. आता परत चढणार हा काटा. व्यायाम शुन्यावर आलाय जवळजवळ.. कोणीतरी मोराल बुस्टींग करा रे.... Sad Sad

कमीत कमी अर्धा-पाऊन तास तरी चालण होत, पण अजिबात घाम येत नाही आणि दमल्यासारख हि वाटत नाही. तर हे बरोबर आहे का? कि काही चुकतंय

दमल्यासारखे वाटत नाही तोवर वेग वाढवत राहा. तरीही दमल्यासारखे वाटत नाही तर कालचे जेवढे अंतर जेवढ्या वेळात पार केले तेवढेच अंतर आज त्यापेक्षा १५ मिनिटे कमी वेळात पार करायचे उद्दिष्ट ठेऊन चाला म्हणजे वेग वाढेल. बागेत फिरल्यासरखे फिरु नका Happy

.....

Pages