युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा, मी होस्टेलला असताना वापरायचे पावडर. अर्थात दूधापेक्षा वेगळी चव येते,पण नॉट बॅड Happy मी अमूल किंवा एवरीडे ची वापरायचे. फक्त पाणि थंड असतानाच पावडर ,साखर,पाणी ,चहा मसाला एकत्र करुन मग उकळवायचं.नाहितर चहा फाटतो Happy
पाहुण्यांसाठी चांगला पर्याय आहे. Happy

भरत, इव्हॅपोरेटेड मिल्क नाहीच का मिळत भारतात ? पुर्वी मिळायचे. आम्ही गावाला जाताना थर्मॉस मधे कोरा
चहा आणि बाटलीत हे दूध न्यायचो. एस्टीच्या प्रवासात देखील, न तापवता ते दूध टिकायचे. थर्मॉस ला खाली एक वेगळा कप्पा असायचा, त्यात हि बाटली, रहायची !

हो हो. आम्ही(माझ्या लहानपणी) पण कोकणात जाताना मिल्क पावडर घेऊनच जायचो. आणि साखर, चहा पावडरही. (आमच्या गावच्या घरी तेव्हा गुळाचा चहा असे!)

गेल्या २-३ वर्षांत जंग जंग पछाडूनही मिल्क पावडर दुकानांत दिसलेली नाही.

भरत, क्रॉफर्ड मार्केटमधे निडो या कंपनीची मिल्क पावडर मिळते. आखाती देशात, अगदी लोकप्रिय आहे ती.
तिथेच, रेनबो या कंपनीचे इव्हॅपोरेटेड मिल्क, छोट्या टिनमधे मिळू शकेल.

मी एकटी असले तरिही ऐनवेळेला कुणि आलं तर उगिच दूध आणायला धावाधाव नको म्हणून मी चहासाठी म्हशीचं दूध ठेवते घरी. <<< दक्षे, ऐन वेळेला कुणी आलं तर त्यांना दुधाचा चहा देऊ नकोस... Proud ग्रीन टी / आईस टी दे नैतर सरबताची बाटली ठेव घरी ..:हाहा:

मी सध्या चिनीमातीची लहान साईझची भांडी आणलीत. त्यात सकाळी विरजण लावते. संध्याकाळी मस्त गोड दही तयार होतं . मग घरातील प्रत्यकाला एक्-एक भांडेच हातात द्यायचे. व आपण सिंहगडवर आहोत अशी कल्पना करत दही खायचे. Happy खूप छान लागते.

Lol Rofl
दिनेश ते इव्हॅपोरेटेस ए. मला काही झेपलं नाही. छोटीशी मिल्क पावडर आणून करून पाहते चहा.. कसा जमतो ते.
नंतर नंतर पाव्हणे येतील पण चहा नकोच म्हणतील,
आणि बाहेर जाऊन सांगतील की दक्षी चहा विचारते पण पावडरीचा पाजते. Proud

दक्षे, रेडीमेड चहा/कॉफीची ची पाकिटं आणुन ठेव त्यात चहा, साखर, दूध पावडर सगळं असतच... फक्त गरम पाणी घालायचं.... सोप काम Happy

दक्षे, आधी सांगायचं ना. पर्वा घरी आले होते तेव्हा तुला पावडरवाल्या दुधाचा चहा शिकवला असता. असा बेस्ट की कुणाला पावडर घातलीये कळणार पण नाही.
आमच्या हपिसात पावडरचाच चहा असतो. दूध बिध भानगडी निस्तरत कोण बसणार हपिसात.

ताज्या दुधाच्या चहाची सर पावडरवाल्या, किंवा इव्हॅपोरेटेड वापरुन केलेल्या चहाला बिलकुल येत नाही.
कँपींगला नाईलाजाने प्यावा लागतो. पण जेमतेम पाव कप जातो. त्यातल्यात्यात पावडरचा चहा जरा बरा लागतो इव्हॅपोरेटेड पेक्षा.

दक्षिणा, पाककृती हवी आहे... मधे मोनालिप ने टेट्रा पॅकच्या दुधाबद्द्ल लिहीले आहे. त्यावर इतरांनी अजुन माहिती दिली ती बघ.

पन्नास माणसांसाठी ब्रेकफास्ट्साठी उपमा करायचा आहे. पोटभर होईल असा. बरोबर बर्फी व बटाटेवडा पण करायचा आहे. पहिल्यांदाच घरी एवढा मोठा घाट घातला आहे कारण मदतनीस बर्‍याच जणी आहेत. तर्...रवा व बटाटे किती लागेल ह्याचा काही अंदाज येत नाहीये. खूप उरायलाही नकोय आणि कमीही पडायला नको. म्हणजे थोडे जास्त असले तरी चालेल पण माझा "अंदाज" खूप जास्त होतो नेहमी. मागे कधीतरी एका कार्यक्रमात माझ्या "अंदाजामुळे", निम्याहूनही जास्त अन्न उरले होते. एक्स्पर्ट्स थोडा अंदाज देऊ शकतील का?

१ वाटी रव्याचा उपमा २ ते ३ जणांना पुरेल. एका मध्यम आकाराच्या बटाट्यात साधारण २ वडे होतील. वडे प्रत्येकी किती द्यायचेत की खातील तेवढे यावर आकडा आणि त्यावर बटाटे किती ते पहा. - अन् एक्स्पर्ट अंदाज.

वॉव लोला मस्तच अंदाज.
बायदवे एक वाटीचा उपमा फार तर दोन जणांना पुरेल माझ्यामते. त्यात ३ बसवायचे म्हणजे फारच होईल. पोटभरीचा पॉईंट आहे म्हणून म्हणलं.

२ मोठी २ लहान अशा चौकोनी कुटुंबाला १ वाटेच उपमा नीट पुरेसा होतो असा माझा अनुभव. सोबत ब वडे वगैरे नसताना Happy

आम्हि खूप खातो बहुतेक Wink १ वाटीचा उपमा कधीकधी कमी पडतो आम्हा दोघांना.पण ब.वडे असतील तर बरोबर आहे माझ्यासाठी प्रमाण.

सुमेधा, १ वाटी = २ व्यक्ती , ५० व्यक्तींसाठी २५ वाट्या आणि वर ५ वाट्या रवा एक्स्ट्रा टाक.... म्हणजे कामी पण नको पडायला आणि फार जास्तही नको उरायला Happy

अरे लोक्स, मला पण दही साठी टिप्स सांगा ना? म्हणजे माझी पहिल्यापासुनच सुरुवात आहे. विरजण म्हणजे काय? विकतच दही दुधाला लावणं म्हणजे विरजण का? पण विकतच्या दह्याशिवाय मुळ दुधालाच विरजण घरी लावायचे असल्यास काय करायचे? विकतच दही पावडरमिश्रित असतं, जरा ब्लेण्ड केल तरी भांड्याच्या कडेला पावडर चिकटते. म्हणुन मला घरीच दुधापासुनच (सायीपासुन नाही) दही करायचे आहे , हेल्पा प्लीज ...

३० वाट्या रव्याचा उपमा शंभर माणसांना एकेक मूद घालण्याएवढा होईल.

साधारण एक किलो बटाट्यांचे मध्यम आकाराचे २५ ते ३० वडे होतात.

लोला च्या वाटीत २ व्यक्ती,
मंजुडीच्या वाटीत ४ व्यक्ती......

मंजुडीची वाटी मोठी की लोलाच्या व्यक्ती खादाड Uhoh Lol

Pages