Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. 
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे इथे विचारावं की नाही
हे इथे विचारावं की नाही माहिती नाही....पण...
खूप दिवसांनी भेटणार्या , कॉलेज मधील मित्राला गिफ्ट द्यायला छानशी दोन तीन पुस्तकं सुचवा....
लक्षात राहतील अशी.. आणि आपली चॉइस आणि विचार दृगोच्चर करणारी....
मित्राला भेट देणे >>
मित्राला भेट देणे >>
यात व्यक्तीसापेक्षता भरपूर राहील.
समजा, मी माझ्या मित्राला देणार असेन तर ही दोन पुस्तके :
१. माणसाच्या गोष्टी (कथासंग्रह) : रत्नाकर मतकरी
२. लक्ष्मणझुला (ललित लेखसंग्रह ) : लक्ष्मण लोंढे
<आपली चॉइस आणि विचार दृगोच्चर
<आपली चॉइस आणि विचार दृगोच्चर करणारी...>
हे तुम्हांला नीट ओळखणारंच कोणीतरी सांगू शकेल.
भरत...बरोबर आहे तुमचं... !!
भरत...बरोबर आहे तुमचं... !!
सोडा ते...
जनरल आवडलेली, लक्षात राहतील अशी.... पुस्तकं सांगितलीत तरी चालेल....
दृगोच्चर >> छान, बऱ्याच
दृगोच्चर >> छान, बऱ्याच दिवसांनी वाचला हा शब्द. फक्त तो दृग्गोचर असा पाहिजे.
मित्राला आपली आवड लक्षात राहणे चांगलेच, परंतु त्याची आवड काय आहे हे जाणून निवड करणे महत्त्वाचे. नाहीतर आपण द्यायचो द गॉड डिल्युजन आणि मित्र कुठल्या तरी सत्संगाला जात असायचा!
>>>>> नाहीतर आपण द्यायचो द
>>>>> नाहीतर आपण द्यायचो द गॉड डिल्युजन आणि मित्र कुठल्या तरी सत्संगाला जात असायचा! Wink

वनवास- प्रकाश संत - भेट
वनवास- प्रकाश संत - भेट देण्यासाठी अगदी सेफ बेट म्हणता येईल- सर्वांना खूप आवडेल असे पुस्तक आहे. पण त्यातून चॉईस आणि विचार बहुतेक अधोरेखित होणार नाहीत.
मला माहिती नव्हते..तो शब्द
वनवास....छान आहे. नक्की देईन.
मित्राला भेट देणे >>
मित्राला भेट देणे >>
मित्राच्या किंवा तुमच्या आवडीनिवडीनुसार ह्यातली काही बघू शकता..
उदाहरणार्थ कादंबऱ्या--
रणांगण- विश्राम बेडेकर
सावित्री- पु शि रेगे
सात सक्कं त्रेचाळीस- किरण नगरकर
कोसला- भालचंद्र नेमाडे
रात्र काळी घागर काळी- चि त्र्यं खानोलकर
चक्र-जयवंत दळवी
बनगरवाडी- व्यंकटेश माडगूळकर
रथचक्र- श्री ना पेंडसे
तुंबाडचे खोत- श्री ना पेंडसे
पालखी— दि बा मोकाशी
एकेक पान गळावया- गौरी देशपांडे
कादंबरी एक- विजय तेंडुलकर
मुंबई दिनांक- अरूण साधू
अंताजीची बखर- नंदा खरे
ताम्रपट- रंगनाथ पठारे
हारण- रंगनाथ पठारे
नामुष्कीचे स्वगत- रंगनाथ पठारे
धग- उद्धव शेळके
ओश्तोरीज, ऑक्टोबर एंड- अनंत सामंत
एन्कीच्या राज्यात- विलास सारंग
गौतमची गोष्ट- अनिल दामले
वंश- वि ज बोरकर
आयदान- उर्मिला पवार
रीटा वेलिणकर- शांता गोखले
चारीमेरा- सदानंद देशमुख
मेड इन इंडिया— पुरूषोत्तम बोरकर
ऑपरेशन यमू— मकरंद साठे
हिंदू..जगण्याची समृद्ध अडगळ- भालचंद्र नेमाडे
गवत्या- मिलिंद बोकील
दंशकाल- हृषीकेश गुप्ते
बाकी शून्य- कमलेश वालावलकर
उद्या, संप्रति- नंदा खरे
प्रेम आणि खूप खूप नंतर- श्याम मनोहर
कळ- श्याम मनोहर
आम्ही हळहळ पावलो- श्याम मनोहर
अस्वस्थ वर्तमान- आनंद विनायक जातेगावकर
डॉ. मयांक अर्णव- आनंद विनायक जातेगावकर
व्हाया सावरगाव खुर्द - दिनकर दाभाडे
सातपाटील कुलवृत्तान्त- रंगनाथ पठारे
गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी-मकरंद साठे
पेरूगन मुरूगन-- वर्जेश सोळंकी
आटपाट देशातल्या गोष्टी-- संग्राम गायकवाड
एका लेखकाचे तीन संदर्भ— अवधूत डोंगरे
पान पाणी आणि प्रवाह - अवधूत डोंगरे
नवल - प्रशान्त बागड
आत्मचरित्रं--
स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक
एक झाड दोन पक्षी- विश्राम बेडेकर
मी हिंदू झालो- डॉ. रविन थत्ते
अर्धविराम, माझं संचित - यशवंतराव गडाख
कथासंग्रह--
काजळमाया, सांजशकुन,पिंगळावेळ, रमलखुणा- जी ए कुलकर्णी
ऑर्फियस- दि पु चित्रे
आहे हे असं आहे- गौरी देशपांडे
कांतार- अनिल रघुनाथ कुलकर्णी
तळ्याकाठच्या सावल्या— अनिल रघुनाथ कुलकर्णी
अदृष्ट— भारत सासणे
विवेक मोहन राजापुरे यांच्या कथा- लोकवाड्मयगृह प्रकाशन
लिहायची राहिलेली पाने- पृथ्वीराज तौर
फिनिक्सच्या राखेतून उठला मोर — जयंत पवार
दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी- बालाजी सुतार
क्षुधाशांती भुवन- किरण गुरव
निकटवर्तीय सूत्र, रिबोट- जी के ऐनापुरे
उदाहरणार्थ ललित--
डोह- श्रीनिवास विनायक कुलकर्णी
किमया, जास्वंद, पत्र- माधव आचवल
सांजी- मनोहर सप्रे
मौनराग- महेश एलकुंचवार
त्रिबंध- महेश एलकुंचवार
काही लेखसंग्रह--
व्यासपर्व- दुर्गा भागवत
युगांत- इरावती कर्वे
शिवरात्र, जागर, मनुस्मृती, आकलन, मागोवा, व्यासांचे शिल्प- नरहर कुरुंदकर
कालकल्लोळ - अरुण खोपकर
छान यादी !
छान यादी !
मस्त यादी.
मस्त यादी.
आम्ही हळहळ पावलो - किती सालचं प्रकाशन आहे?
कवितांवर अगदीच खप्पा मर्जी का?
पाचपाटील यांची यादी भारी आहे.
पाचपाटील यांची यादी भारी आहे.
आंबट गोड - मित्र जनरली पुस्तके वाचणारा नसेल तर त्या यादीतील कोणतीही चालतील. पण वाचणारा असेल तर त्यातील अलीकडची प्रकाशित पुस्तके - फिक्शन मधे सातपाटील कुलवृत्तांत, क्षुधाशांती भुवन (हे मला पुण्यात मिळाले नाही पण याबद्दल खूप ऐकले आहे), निशाणी डावा अंगठा, किंवा अभिराम भडकमकरांची अॅट एनी कॉस्ट आणि नुकतेच प्रकाशित झालेले इन्शाअल्ला ई. नॉन-फिक्शन मधे - समकालीन प्रकाशनाची प्लॅटफॉर्म क्र ० वगैरे.
व्हॉट्सअॅपपटू असेल, "आपल्याला हे कोणी शिकवलेच नाही" वाला असेल तर राजदीप सरदेसाईची २०१४ व २०१९ बद्दलची पुस्तके द्या
नाहीतर "अॅक्सिडेण्टल प्राइम मिनिस्टर", "१० जनपथ रोड", गोविंद तळवलकरांचे "भारत आणि जग". यातली बहुतेक पुस्तके गेल्या ८-१० वर्षातील आहेत.
कॉमी, भरत धन्यवाद.
कॉमी, भरत धन्यवाद.
आम्ही हळहळ पावलो - किती सालचं प्रकाशन आहे? >>
हे २०२१ च्या शेवटी आलं आहे..! श्याम मनोहरांच्या नेहमीच्या स्टाईलमधलंच आहे..! ते सदाबहार आहेत..!!
कवितांवर अगदीच खप्पा मर्जी का?
>>
अगदीच काही खप्पा मर्जी नाही, पण इतर साहित्य प्रकारांच्या मानाने कवितांच्या प्रांतात जरा अलीकडेच शिरलो आहे.. तरीही काही आहेत..
उदाहरणार्थ..
गाथा- तुकाराम बोल्होबा आंबिले-मोरे
बहिणाबाईची गाणी- बहिणाबाई चौधरी
मर्ढेकरांची कविता- बा सी मर्ढेकर
मेलडी, देखणी- भालचंद्र नेमाडे
एकूण कविता- दि पु चित्रे
जेजुरी- अरुण कोलटकर
नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता
जंगलझडी- उत्तम कोळगावकर
प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले- द भा धामणस्कर
गोलपिठा- नामदेव ढसाळ
भिजकी वही- अरुण कोलटकर
हे काही अलीकडचे.. :
नंतर आलेले लोक— अरूण काळे
सायरनचे शहर- अरूण काळे
उन्हाच्या कटाविरूद्ध- नागराज मंजुळे
धांदलमोक्ष - स्वप्नील शेळके
काळ्या जादूचे अवशेष- सत्यपालसिंग राजपूत
चष्मांतरे- महेशलीलापंडीत
पदरव- दिनकर दाभाडे
फारएण्ड,
फारएण्ड,
फिक्शन मधे सातपाटील कुलवृत्तांत, क्षुधाशांती भुवन (हे मला पुण्यात मिळाले नाही पण याबद्दल खूप ऐकले आहे),
>>
पौड रोडला 'पुस्तकपेठ' मध्ये मिळेल.
तिथलं कलेक्शन, वर्गीकरण जबरदस्त आहे..!
समर खडसचं 'बकऱ्याची बॉडी' आणि मनोहर श्याम जोशी या हिंदी लेखकाची काही पुस्तकं, शिवाय रिल्केच्या पत्रसंग्रहाचे हिंदी अनुवाद बरेच दिवस शोधत होतो, शेवटी तिथं सापडलं..!
निशाणी डावा अंगठा >> ह्या कादंबरीवरचा चित्रपट फारच सरस आहे.. मी चार पाच वेळा तरी बघितला असेल आत्तापर्यंत, पण तरीही हसू आवरत नाही..!
पाचपाटील, तुमच्या यादीतली
पाचपाटील, तुमच्या यादीतली रंगनाथ पठारे, वर्जेश सोळंकी यांचीही पुस्तकं पुस्तकपेठेत मिळतात का? मला बघायची आहेत, आवडली तर घ्यायचीही आहेत.
Va मस्त यादी.अजून कित्येक
Va मस्त यादी.अजून कित्येक पुस्तके वाचली नाहीत याचे दुःख झाले.
मोनिका गजेंद्रगडकर यांचेही कथासंग्रह चांगले आहेत.
"आर्त" फक्त आठवला.
वाले,
वावे,
रंगनाथ पठारे, वर्जेश सोळंकी यांचीही पुस्तकं पुस्तकपेठेत मिळतात का?
)
>>
पठारेंचं 'गाभ्यातील प्रकाश' सोडलं तर एकूण एक पुस्तकं तिथं आहेत. ( अवांतर: त्या दुकानाचं उद्घाटनच पठारेंनी केलंय..!
वर्जेश सोलंकीचीपण आहेत.. मी ह्या रविवारीच त्याची 'आत्महत्या पडलेली असते तुमच्या टेबलावर' ही छोटेखानी पुस्तिका आणली तिथून.
बाकी पठारेंची सगळी चांगलीच आहेत.. 'हारण' जरूर बघा..!
पाचपाटील, यादी मस्तच आहे. मी
पाचपाटील, यादी मस्तच आहे. मी हल्लीच एक लायब्ररी लावलीय. तिथून पुस्तके आणायला याची मदत होईल.
पिंपरीत वल्लभनगर जवळच आहे. कोणाला माहिती हवी असेल तर इथे देईन.
.
प्र. का.
धन्यवाद पाचपाटील बघते नक्कीच
धन्यवाद पाचपाटील
बघते नक्कीच.
पापा..पौड रोडला कुठे आहे
पापा..पौड रोडला कुठे आहे पुस्तक पेठ दुकान?
ही पुस्तकं वाचनालयातून
ही पुस्तकं वाचनालयातून वाचायची असतात. विकत घेऊन घरी ठेवायला संदर्भ ग्रंथ नव्हेत. पशुपक्ष्यांची निरिक्षणे आवडत असतील तर ती पुस्तके द्यावीत.
पौड रोडला कुठे आहे पुस्तक पेठ
पौड रोडला कुठे आहे पुस्तक पेठ दुकान?
>>
Rajhans Pustak Peth
Sai Sarwswati, Lane no. 7 Shikshak nagar Paramhans Nagar road, Paud Rd, near Vanaz, Pune,
https://g.co/kgs/dSzTpd
केया,
तुम्ही पौड रोडवरून चांदणी चौकाच्या दिशेने निघाला, तर वनाज च्या तिथे उजव्या बाजूला परमहंस नगरकडे वळण्याचा बोर्ड दिसेल, तो राईट टर्न घेतला की ५०० मीटरवरच आहे ते दुकान.
चान
छान यादी , पाचपाटील.. धन्यवाद.
आणि मुख्य म्हणजे अगदी पटापट आठवली हे किती महत्वाचे.... !
फारएंड, तो काँव्हेंट मधे शिकलेला आहे... त्यामुळे मराठी काहीही चालेल... आपणच ठरवायचं....
तुम्ही पौड रोडवरून चांदणी
तुम्ही पौड रोडवरून चांदणी चौकाच्या दिशेने निघाला, तर वनाज च्या तिथे उजव्या बाजूला परमहंस नगरकडे वळण्याचा बोर्ड दिसेल, तो राईट टर्न घेतला की ५०० मीटरवरच आहे ते दुकान.>>>>okey...thnx
आयडियल कॉलनीतही आहे ना.
आयडियल कॉलनीतही आहे ना..पुस्तक पेठ?
आयडियल कॉलनीतही आहे ना.
आयडियल कॉलनीतही आहे ना..पुस्तक पेठ?
ते आता परमहंसनगर रोडवर, वरील पत्त्यावर शिफ्ट झाले आहे.. नवीन जागा आधीपेक्षा ऐसपैस वाटली.
निवृत्त लेफ्टनंट जनरल जमीर
निवृत्त लेफ्टनंट जनरल जमीर उद्दीन शाह यांचे आत्मचरित्र 'सरकारी मुसलमान' वाचत आहे. मुस्लिम समुदायाकडून मुस्लिम सरकारी अधिकाऱयांबद्दल हेटाळणीने वापरला जाणारा हा शब्द आहे. लेखक नसरुद्दीन शाहचे थोरले भाऊ आहेत. पुस्तक अतिशय रोचक आहे.
' एक मनोहर कथा ' हे मंगला
' एक मनोहर कथा ' हे मंगला खाडिलकर लिखित पुस्तक वाचले . मनोहर पर्रीकर यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी सांगितलेल्या आठवणी असे स्वरूप आहे . राजकारणी , नातेवाईक , मित्र , त्यांची दोन्ही मुले यांनी आठवणी सांगितल्या आहेत . स्वतः पर्रीकर यांची छोटी मुलाखत आहे . त्यांच्या लहानपणापासून ते शिक्षण , राजकीय कारकीर्द , गोव्याचा केलेला विकास सगळ्याचा नीट आढावा घेतला आहे . वाचूनच ते किती workoholic होते ते जाणवते . पुस्तकाची भाषा गप्पा च्या स्वरूपात असल्याने चांगले वाटले .
हाच माझा मार्ग (सचिन पिळगावकर
हाच माझा मार्ग (सचिन पिळगावकर) -
किं.अ.मध्ये फुकटात मिळत होतं म्हणून वाचलं, नाहीतर मला या पुस्तकाकडून फार काही आशा नव्हत्या. आणि तेच बरोबर निघालं. शाळकरी निबंधातल्या आठवणी लिहिल्यासारखी एक-एक प्रकरणं आहेत. सगळीकडे स्वत:ची टिमकी वाजवली आहे. खरं सचिनची केवढी प्रदीर्घ कारकीर्द आहे, हरहुन्नरी माणूस आहे तो. त्यावर एक उत्तम पुस्तक झालं असतं.
पण वाया घालवलंय.
-----------------
खेकडा (कथासंग्रह, रत्नाकर मतकरी)
मी मतकरींच्या नाटकांची फॅन आहे. पहिल्यांदाच त्यांचा कथासंग्रह वाचला. जुन्या कथा आहेत, पण जुनाट वाटत नाहीत अजिबात. मला पुस्तक आवडलं.
Pages