मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुप्ते सुरुवात करणार असल्यास थेट दंशकाल ने न करता अंधारवारी,कालनिर्णय,दैत्यालय ने केलेली बरी.>> ओके. अंधारवारी बघते मग.

<कालनिर्णय किंग च्या वन पास्ट मिडनाईट(लँगोलियर्स) वर आधारित असू शकेल.>

होय. सगळा प्लॉट, पात्रे जशीच्या तशी उचललीत. (मी किंग चं मूळ पुस्तक किंवा त्यावरची मालिका पाहिलेली नाही. कालनिर्णय वाचल्यावर कुतूहल वाटल्याने स्टोरिलाउन गुगल् केली तर या मालिकेबद्दल कळलं - विकि पेज)
श्रेय देण्याचा प्रश्नच नाही. वर त्यातल्या विज्ञानातील संकल्पना एका प्राध्यापकाकडून तपासून घेतल्यात असं छापलंय. फक्त किंगचं नॉव्हेल बरंच लांबलचक आहे. हे कन्डेन्सड.

याबद्दल धारपांच्या पुस्तकांच्या धाग्यावर चर्चा झाली आहे. तिथेही गुप्तेंचं नाव आलं होतं. अ‍ॅमींचा प्रतिसाद.

हो.तो डिबेट नंदादीपाप्रमाणे अखंड तेवता आहे Happy
मला फक्त त्यातला 'यांनी चोरी केली तर यांची पुस्तकं पायरसी करून फुकट का वाचू नयेत' हा मुद्दा तेव्हाही पटला नव्हता, आताही पटला नाहीय.पुढील चर्चा त्याच धाग्यात करू.इथे विषयांतर होईल.

Lol मला तो अधिकच पटला. चोराच्या घरी चोरी.
धारपांच्या काळात प्रताधिकाराचं प्रस्थ एवढं नसेल. आता तसं नाही. असो. थांबतो.

ला तो अधिकच पटला. चोराच्या घरी चोरी.>> हो ना.

मी तर हे सर्व उ तकर्ष प्रका शन चे जोशी ह्यांना प्रत्यक्ष सांगितले होते.

य देण्याचा प्रश्नच नाही. वर त्यातल्या विज्ञानातील संकल्पना एका प्राध्यापकाकडून तपासून घेतल्यात असं छापलंय>.>>>आयला, मला विचरायचं ना.
ते सोडून द्या .मी अशीच एक कथा रॉड सर्लिग नावाच्या महान लेखकाची वाचली आहे. कथेचे नाव आहे
The Odyssey of Flight 33
This is an episode of the original Twilight Zone -- "The Odyssey of Flight 33" aired February 24, 1961. All of these episodes were published in short story collections, under the pseudonym of Rod Serling (who as far as I know was involved in writing the scripts for the show, but did not himself rewrite those into story form for publication), and per comments, this specific one was also published (many years later) as a graphic novel.

A commercial airliner (a Boeing 707) slips through a time barrier (internally hypothesized to be due to entering "a freak jet stream") and finds itself in the past. The deep past, with dinosaurs and jungle and no long, flat, paved landing strips, then the 1930s, where there would be no compatible control radios or navigation systems (never mind jet fuel) and the runways at La Guardia are too short for a 707 -- and running low on fuel, they ascend once more to the altitude and heading that took them through time before -- and there the episode ends.
Twilight Zone ह्या पुस्तकात अश्या अनेक कथा आहेत. विचित्र चमत्कारिक सुरस.अवश्य वाचावे असे पुस्तक!!
कधी कधी मनात येत आपण पण पाडावी एका कथा .कॉपी पेस्ट करून.

हं. हीच संकल्पना वापरली आहे. फक्त इथे विमानातले त्या वेळी झोपलेले प्रवासी तेवढे पर्यायी जगात पोचतात. मग तिथून काही युक्त्या लढवून व्हिलनला मारून मूळ जगात येतात. तेव्हाही वरचीच संकल्पना.

हो.
त्यातली लँगोलियर्स ची कल्पना चांगली आहे.

स्टोरिटेल अ‍ॅपमध्ये उपलब्ध मराठी पुस्तकांची यादी कुठे पाहता येईल का?
माझ्या वडिलांना आता पुस्तक (छापील तसेच इ-बुक्स) वाचण्याइतकी दृष्टी राहिलेली नाही. ते आता हळु हळु स्टोरी टेल अ‍ॅपवर पुस्तके ऐकू लागले आहेत. त्यांना पटकर सर्च करणे वगैरे जमत नाही. म्हणून मी शोधून सुचवणार आहे. मला अ‍ॅपवर लॉगिन न करता पुस्तकांची यादी दिसत नाहिये. अ‍ॅपचा लॉगिन व पासवर्ड वडिलांच्या लक्षात नाही (दुसर्‍या कुणीतरी त्यांना ते डाउनलोड व सब्क्स्राइब करुन दिले आहे).

श्रीलिपी, राखीव सावल्यांचा खेळ - किरण गुरव -- अतिशय आवडल्या कथा. फार फार सुंदर. रोजच्या वापरातल्या, शेतातल्या/गावातल्या भाषेचा अकृत्रिम वापर. कैक दिसांनी सशक्त कथा वाचल्या.

सातपाटील कुलवृत्तांत - केहना क्या चाहते हो असे झाले. एक झळझळीत निखार्‍यासारखी संकल्पना लेखकाच्या मनात आली मात्र फुंकणीने तो निखारा खूप वेळ फुलवत ठेवल्यावर तो पार कसानुसा गरीब चिपाड होतो तसे झाले आहे पुस्तकाचे.

टवणे सर,
https://www.storytel.com/list/eacdcdc2554f439d9de0589cbc975868?appRedire...
ही यादी दिसत असेल तर सांगा. Award-winning या सदरातली पुस्तकं आहेत. (तुम्हाला ही दिसत असतील तर तुम्हाला हवं असलेलं सदर सांगा. ती लिंक देते.)

श्रीलिपी, राखीव सावल्यांचा खेळ - किरण गुरव -- अतिशय आवडल्या कथा. फार फार सुंदर. रोजच्या वापरातल्या, शेतातल्या/गावातल्या भाषेचा अकृत्रिम वापर. कैक दिसांनी सशक्त कथा वाचल्या.>> +११
टवणे सर,
गुरवांच्या 'क्षुधाशांती भुवन'ची पण जोरदार शिफारस करून ठेवतो..
आणि वर्जेश सोळंकींच्या 'हुसेनभाय और गणपतभाय व्हाया अमेरिका'ची ही..!

ललिता-प्रिती धन्यवाद.
नाईट-ब्लाईंड आधी मिळाले, त्यामुळे ते आधी वाचले. एकदम पेज-टर्नर आहे. शैली एकदम थेट आहे. आवडलं मला. आज स्नो ब्लाईंड मिळालंय. ते आणि सिरिज मधली इतरही एक एक करुन वाचेनच.
नाईट ब्लाईंड मध्ये विवाहबाह्यसंबंध इ. च्या उल्लेखाने मुलाला इतक्यात देणार नाही असं ठरवलेलं. तू ही तेच लिहिलं आहेस. Happy
ह्यावर शॉर्ट सिरिज मस्त बनेल. टीव्ही राईट्स विकले आहेत वाचलं, म्हणजे येईल कदाचित लवकरच.
सगळे एकमेकांना ओळखत असतील असं लहान गाव आणि क्राईम इ. वाचुन मला एकदम ब्रॉडचर्च आठवली. सिरिज केली तर इंग्रजी साठी ब्रिटिश अ‍ॅक्सेंट वापरा. अ‍ॅरी थॉर साठी डेव्हिड टेनंट बघा मिळतो का? Wink Proud

मी वर हृषीकेश गुप्तेंच्या दिवाळी अंकात वाचलेल्या कथेबद्दल लिहिलं होतं ती कथा 'हाकामारी' या नावाने स्टोरीटेलवर आहे, ती ऐकली. सोनाली कुलकर्णी (सीनियर) च्या आवाजात. छान वाचली आहे तिने.

'ऐकणे आणि वाचणे' याबद्दल थोडं.

ऐकण्याबद्दल-
चालता चालता, काम करता करता भरपूर ऐकून होतं. ज्यांना एरवी वेळ मिळत नाही, त्यांच्यासाठी हे खूपच फायदेशीर आहे.

अभिवाचन चांगलं असेल, तर मूळच्या दर्जेदार लिखाणाची लज्जत वाढते. संदीप खरे, अतुल कुलकर्णी , किशोर कदम, संदीप कुलकर्णी, विक्रम गोखले असे कलाकार, मूळचं चांगलं असलेलं लिखाण जेव्हा उत्कृष्टपणे वाचतात, तेव्हा त्यातला आनंद द्विगुणित होतो.

पण याचाच तोटा असा की मूळ लेखन जर आवडलं नाही तर अभिवाचन चांगलं असूनही मजा येत नाही आणि मूळ लेखन चांगलं असूनही अभिवाचन आवडलं नाही तरीही मजा येत नाही हाही अनुभव मी घेतला!! छापील किंवा किंडलवरच्या पुस्तकाच्या बाबतीत असा दुसरा कुठला ' फॅक्टर' नसतो.

अजून एक तोटा म्हणजे पुस्तक जसं आपण चाळून बघतो, तसं करता येत नाही. 'प्ले अ सँपल' असतं, पण तेवढ्यावरून नाही अंदाज येत. मी काही पुस्तकं ऐकायला सुरुवात करून मग आवडेनात म्हणून सोडून दिली.
पुस्तकात मागचा एखादा संदर्भ आपण परत त्या पानावर जाऊन शोधतो, तसं सहजासहजी नाही करता येत.

बाकी किंडलचा जो फायदा आहे तो इथेपण आहेच, कितीही पुस्तकं 'घेतली' तरी जागा कमी पडत नाही! आणि ज्यांना हातात पुस्तक धरून वाचण्याचा आनंद किंडलमध्ये मिळत नाही असं वाटतं त्यांना तो इथेही मिळणार नाहीच. पण जशी किंडलची सवय होते, तशी ऑडिओ बुक्सचीही सवय होते हाही माझा अनुभव आहे!

सिरिज केली तर इंग्रजीसाठी ब्रिटिश अ‍ॅक्सेंट वापरा >>> भारी सूचना! Lol

रीडिंग पार्टीसारखं वाटतंय आता मला.
या सिरीजमधली बाकी पुस्तकं माझ्याही विश-लिस्टमध्ये आहेत. शिवाय अ‍ॅन होल्टचीही २-३ आहेत. त्यातल्या टोकाच्या थंड हवामानाच्या वर्णनाचा वाचताना आपल्यावर अंमल चढतो, त्यातून चट्कन बाहेर पडावंसं वाटत नाही, असा अनुभव आला मला.

--------------

वावे, 'दुसरा फॅक्टर' हा मुद्दा एकदम पटला. आवडला. असं कुणी सांगितल्याशिवाय डोक्यात आला नसता.

'ऐकणे आणि वाचणे याबद्दल थोडं' लिहिलंयस, आणखी सविस्तर आवडेल, उदाहरणांसहित, तेव्हाच्या तुझ्या अनुभवांसहित. Happy

वावे आणि इतर जनहो:

माझ्या वडिलांना स्टोरी टेल अ‍ॅप वापरुन आता पुस्तके ऐकणे जमू लागले आहे. धन्यवाद. त्यांच्या आयुष्यात ही फार मोलाची सुधारणा आहे.

छान टवणे सर.
ते भारतात असतील तर भारतात मराठी, हिंदी बरोबरच बरीच (मला ऐकायची आहेत अशी) इंग्रजी पुस्तकेही स्टोरी टेलवर आहेत. कॉपिराईट मु़ळे इंग्रजी इकडे उपलब्ध नाहीत.
वावे, पुस्तक चालू करुन चांगलं वाटलं तर सुरू ठेवायचं नाही तर दुसरं, असं करता येतं. #पुस्तकांचं बंधन नाही. त्यामुळे चाळता येत नसलं तरी थोडा वेळ ऐकून ठरवता येतं. अर्थात ते सिक्वेंशनल होतं आणि नंतर पकड घेतय का असं तपासता येत नाही.... खरंतर येऊ शकतं की!. Happy

टण्या,
ऑडिबल हेही चांगलं आहे. तिथे मराठी कमी, पण इंग्रजी पुस्तकं बरीच आहेत. प्राईमची मेम्बरशिप असेल तर बरंच स्वस्तात मिळतं.

टवणे सर, छान झालं.

अमितव, थोडा वेळ ऐकून ठरवता येतं बरोबर आहे. पण पुस्तकाची अधलीमधली पानं आपण जितकी सहज चाळतो, तितकं सहजपणे नाही ना करता येत. दुसरं म्हणजे अभिवाचन ज्याने/जिने केलंय त्याच्या/तिच्या वेगानेच आपल्याला जावं लागतं. पुस्तक चाळताना आपण झर्रकन नजर फिरवतो अधल्यामधल्या रँडम पानांवरून, तसं नाही करता येत.

ओळखीच्या, प्रसिद्ध लेखकांची पुस्तकं असली की जरा सोपं असतं. पण आधी ज्यांची पुस्तकं वाचलेली नाहीत, त्यांच्या बाबतीत अंदाज यायला वेळ लागतो.

आता मला इथे अभिवाचकाचं नाव लिहायचं नाहीये, पण व्यंकटेश माडगूळकरांचं एक पुस्तक ऐकताना मला ते अभिवाचन आवडेनाच. वाचनात चुका नव्हत्या, पण माडगूळकरांच्या भाषेला, त्यातून जाणवणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा 'टोन' मला तरी त्यात जाणवला नाही. मग मला ऐकायला मजा येईना. शेवटी नंतर कधीतरी पुस्तक थेट वाचू, असं ठरवून मी ते ऐकणं थांबवलं. संदीप खरेने वाचलेलं माडगूळकरांचंच 'कोवळे दिवस' मात्र मला खूप आवडलं होतं. याउलट संदीप खरेनेच वाचलेलं दि. बा. मोकाशींचं एक पुस्तक मला मुळात फार आवडलं नाही, त्यामुळे अभिवाचन चांगलं असूनही सोडून दिलं.

माडगूळकरांचं सत्तांतर आधी वाचलेलं असूनही संदीप कुळकर्णीने वाचलं आहे आणि पुलंचं 'एका कोळियाने' आणि मूळ हेमिंग्वेचं द ओल्ड मॅन अँड द सी हे दोन्ही वाचलेलं असून विक्रम गोखलेंनी अभिवाचन केलं आहे म्हणून मी ही दोन पुस्तकं ऐकली आणि ऐकायला मजा आली Happy

The Passengers (John Marrs)

भविष्यकाळात घडणारी कादंबरी आहे.

ब्रिटनमध्ये स्मार्ट, ड्रायव्हरलेस कार्सचा वापर वाढलेला असतो. तो आणखी वाढावा असा सरकारचा प्रयत्न असतो. लेव्हल-१ ते लेव्हल-५ अशा या कार्स असतात. त्यात लेव्हल-५ कार्सना मॅन्युअल कंट्रोलचा पर्यायच नसतो. याच कार्स पुढच्या दहा वर्षांत ब्रिटनमध्ये सगळीकडे आणायच्या, माणसांना चालवता येतील अशा कार्स बाद करायच्या, असा सरकारचा प्लॅन असतो.

त्या दृष्टीने स्मार्ट कार्सचं decision making, A.I. कसं असावं यावर चर्चा, संशोधन म्हणून समाजातल्या वेगवेगळ्या गटातल्या लोकांना आमंत्रण देऊन आळीपाळीने काही panels तयार होत असतात. त्यात सरकारतर्फे एक प्रतिनिधी असतो. देशात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या स्मार्ट कार्स अपघातांचा अभ्यास करून A.I. मध्ये कोणकोणते बदल करायला हवेत त्यावर चर्चा होत असतात.

कादंबरीची नायिका अशाच एका चर्चागटात बोलावली जाते. तिचा लेव्हल-५ स्मार्ट कार्सना विरोध असतो. (आणि अशा चर्चांनाही ती फारशी अनुकूल नसते. त्याची कारणं कथेत येतात.) या चर्चागटाचं काम सुरू होतं आणि दुसर्‍याच दिवशी ८ स्मार्ट कार्स हॅक होतात. त्या गाड्यांना एकसमान destination ठरवून दिलं जातं. पुढच्या दोन-अडीच तासांत या गाड्या एकमेकींवर आदळून नष्ट होतील अशी हॅकरची योजना असते. आणि या सगळ्याचं टीव्ही, सोशल मिडियावर थेट प्रक्षेपण सुरू होतं.

त्या प्रत्येक कारमध्ये एक-एक प्रवासी असतो. त्यांच्या बॅक-स्टोरीज, हॅकिंगबद्दल समजल्यानंतरची मनःस्थिती हे सगळं सविस्तर आणि उत्कंठा वाढवणारं आहे. सोशल मिडियाच्या ट्रेंड्सनुसार शेवटी कुणीतरी एकजण जिवंत राहू शकतं, अशी हॅकरकडून मुभा मिळते. पॅनलमधल्या लोकांना त्या ८ प्रवाशांशी ऑनलाइन, जाहीर संवाद साधण्याचीही मुभा असते.

Plot मध्ये अनेक इंटरेस्टिंग twists आहेत. त्यामुळे वाचायला मजा येते. माणूस आणि मशीन, राजकारणी आणि सर्वसामान्य लोक, यांत्रिकीकरण आणि भावभावना असे अनेक debates कथानकात गुंफलेले आहेत. प्रत्येक पात्राचं खूप बारकाईने वर्णन केलेलं आहे. शेवट आला म्हणता म्हणता त्यातही ३-४ twists आहेत; आणि ते चांगले आहेत. शेवट, रहस्याची उकल, हॅकर कोण असतो, तो हे सगळं का करतो, हे सगळं वाचकांचा इंटरेस्ट टिकवून ठेवत लिहिलं आहे.
तरी, उत्तरार्धात कादंबरी मला जरा ताणल्यासारखी वाटली. जवळपास ४०० पानी आहे, ती तीन-एकशे पानांमध्ये आणखी crisp करायला हवी होती असं वाटलं. टाइमलाइनचा कुठेकुठे घोळ असल्याचाही संशय आला. काही रेफरन्सेसमुळे कथानक ५०-६० वर्षांनंतरचं असावं असं वाटलं; तर काही ठिकाणी त्याहून पुढचा काळ असणार, असंही वाटलं.
A.I.वर आधारित जरा वेगळी स्टोरी, फिक्‍शन-फँटसी म्हणून मला पुस्तक आवडलं.

उगवतीच्या दिशेला हे श्यामल कुलकर्णी यांचे अनुवादित पुस्तक वाचले . मूळ पुस्तकाचे नाव East of the Sun आहे . तीन ब्रिटिश तरुणींची ही कथा आहे . तिघीही लंडन हुन भारतात बोटीने यायला निघतात . तिघींचे भारतात यायचे कारण वेगवेगळे आहे . कथा साधारण 1920 च्या सुमारास ची आहे. त्या काळातील इंग्रज आणि भारतीय लोकांची एकमेकांबद्दलची मते कळतात .

जापनीज रोज हे रेई किमुरा यांनी लिहिलेले पुस्तक वाचले . मराठी अनुवाद स्नेहल जोशी यांनी केला आहे . एका कामीकाझी स्त्री पायलट ची कथा आहे . अतिशय ओघवत्या शैली तील पुस्तक आहे .युद्धाचे आणि युद्धात जखमी झालेल्या लोकांचे वर्णन अंगावर काटा आणते . कदाचित अशा प्रकारचे पुस्तक मी पहिल्यांदा वाचले म्हणून असेल . स्वतः चे मरण समोर दिसत असून सुद्धा केवळ देशभक्ती श्रेष्ठ या भावनेने कामिकाझी पायलट प्रशिक्षण घेणे , त्याप्रमाणे युद्धात सहभागी होणे हे अतिशय उत्तम प्रकारे लिहिले आहे .

स्टोरीटेलवर पु. शि. रेगे यांची 'रेणू' ही कादंबरी ऐकली. आवडली.
मुंबईतून दिल्लीला नोकरी शोधण्यासाठी गेलेली रेणू, ती ज्यांच्याकडे राहते ती दूरची मावशी आणि तिचे उच्चपदस्थ यजमान, दिल्लीतलं त्यांचं आणि नंतर सहजगत्या तिचंही झालेलं, कलाकार, लेखक, कवी यांचं वर्तुळ, रेणूमध्ये घडत गेलेले बदल असा विषय. सगळ्या व्यक्तिरेखा अगदी ठळक उभ्या केलेल्या आहेत. व्यक्तींच्या निमित्ताने अधेमध्ये येणारं वैचारिक भाष्यही खूप आवडलं.
'दिल्ली' हीदेखील जणू एक व्यक्तिरेखा असावी असं त्या शहराचं व्यक्तिमत्त्व जाणवतं. भैरप्पांच्या 'तंतू' नावाच्या कादंबरीतही ते तसं जाणवतं.

(या पुस्तकाचं अभिवाचन मात्र मला अजिबात आवडलं नाही. कादंबरीच्या समृद्ध भाषेला ते अजिबात न्याय देत नाही, उलट कंटाळवाणं, रटाळ आहे. पण दोन सव्वादोन तासांचं छोटं पुस्तक असल्यामुळे मी ते तसंच ऐकून संपवलं. जेव्हा कधी ही कादंबरी पुस्तकरूपात वाचायला मिळेल तेव्हा मी नक्की वाचणार आहे!)

‘२१२१ : अ टेल फ्रॉम द नेक्स्ट सेंच्युरी’ या कादंबरीचा ( लेखिका : ब्रिटिश संसदेच्या खासदार असलेल्या सुझॅन ग्रीनफिल्ड) इथे दिलेला परिचय रोचक आहे. त्यातून पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण होते. इथल्या दर्दी वाचकांपैकी कोणी हे कधी वाचले तर त्यावर जरूर लिहा.

https://www.loksatta.com/sampadkiya/athour-mapia/symptoms-of-screenwriti...

पुस्तक सारांश : तंत्रज्ञानाचा वापर ‘अति’ होत गेला तर काय होईल याचे चित्र या कादंबरीत रेखाटले आहे. आजपासून बरोबर १०० वर्षांनंतर आपला समाज कसा असेल? प्रेम, कुटुंब, स्वातंत्र्य, स्वत्वाची जाणीव या संकल्पनांचे काय स्वरूप असेल?

Pages