मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या जेम्स हेरिएट या लेखकाचे (पेशाने प्राण्यांच्या डॉक्टरचे) इंग्लंडमधील यॉर्कशायर परगण्यात प्रॅक्टिस करताना आलेल्या हृद्य आणि भन्नाट अनुभवांचे लेखन वाचतोय परत एकदा. फ्लिपकार्ट वर संच माफक किमतीत मिळाला.

120220131327 (1).jpg

आशुचँप,

मी 'हिंदु' एका पक्क्या शत्रुला कधीतरी भेट देण्यासाठी नवी कोरी राखून ठेवली आहे. तुम्हीसुद्धा विकत घेतली असेल तर वाचून खराब करू नका. डोक्याला शॉट लागतील कारण नसताना. Rofl

का, कुणास ठाऊक पण मला भयंकर बोर झालेली गॉन विथ द विंड.... दोनतीनदा वाचायचा प्रयत्न केला आणि मग हे आपल्या नशीबात नाही म्हणून सोडून दिली Happy

जेम्स हेरियट माझाही आवडता लेखक आहे

श्रद्धा : नक्की आवड माहीत नसेल तर पुस्तकाच्या दुकानाचं 'गिफ्ट वाउचर' पण देउ शकता

गॉन विथ द विंड.... मस्त... खूSSSप आवडते. स्कार्लेट ओ हारा आणि इतर मंडळी..

मितान आणि नंदिनी.....

जागतिक वाङ्मयात 'क्लासिक' दर्जा मिळालेल्या कलाकृतीवर [त्या गाजल्या गेल्यानंतर] चित्रपट बनविणे म्हणजे निर्माता आणि दिग्दर्शकांच्या दृष्टीने दुधारी व्यवहार होत असतो. तुम्हा दोघींना 'कादंबरी' सरस वाटते तर दुसर्‍या बेंचवर बसलेल्या मितान१ आणि नंदिनी१ या दोघींना कादंबरीच्या प्रचंड आवाक्याला तीन तासाच्या बंदिस्त मर्यादेत चित्रपट तयार करून दिग्दर्शकाने कमालीच्या कौतुकाचे काम केले आहे असे वाटत असते.

"गॉन...." च्या जोडीला आपण 'वॉर अ‍ॅण्ड पीस' घेतले तरीही हाच मतप्रवाह दिसून येईल. कादंबरी वाचून संपली {सहा महिने लागले होते मला...माझ्या कॉलेजजीवनात} तेव्हा हुश्श झाले होते, पण जेव्हा मी ऑड्रे हेपबर्न आणि तिचा नवरा मेल फरेर अभिनित चित्रपट पाहिला त्यावेळी खरेच वाईट वाटले होते की इतक्या महान साहित्यकृतीची अशी काही मोडतोड पडद्यावर कशासाठी पाहात आहोत आपण ? असेच वाटत राहिले.

मात्र "डॉ.झिवागो" ~ रशियन राज्यक्रांतीच्या इतिहासाची मोठ्या आवाक्याची कादंबरी जितकी भावली....आपली वाटली....तितकाच डेव्हिड लीनचा अप्रतिम म्हणावा असा याच नावाचा चित्रपट. रशियन नसूनही ओमर शरिफने साकारलेला कवीमनाचा झारशाही आणि लेनिनने आणलेली कामगार क्रांतीच्या कात्रीत सापडलेला डॉक्टर झिवागो म्हणजे कॅरॅक्टर सादरीकरणाचे जातिवंत उदाहरण. समसमा संयोग अशा काही तुरळक उदाहरणात घडलेला दिसून येतो....म्हणजे वाचक म्हणून आपल्याला ती कादंबरी जितकी भावते तितकाच त्यावर बेतलेला चित्रपटही आपल्या हृदयी घर करून राहतो.

मुद्दा असा की, कादंबरी आणि त्यावर बेतलेला चित्रपट या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत असे समजून दोन्ही कलाकृतीचा स्वतंत्रपणे आस्वाद घ्यावा असे मला वाटते.

अशोक पाटील

मुद्दा असा की, कादंबरी आणि त्यावर बेतलेला चित्रपट या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत असे समजून दोन्ही कलाकृतीचा स्वतंत्रपणे आस्वाद घ्यावा असे मला वाटते.>> हे मान्य आहे. पण होतं काय आपल्या मनावर आधी एकाचा प्रभाव पडला असेल तर (म्हणजे चित्रपट आधी पाहिला किंवा कादंबरी आधी वाचली असेल तर) दुसर्‍या कलाकृतीचा आस्वाद घेताना नकळत तुलना होतच जाते. शिवाय ज्या कादंबरीचा आवाका मोठा असतो, जिथे शब्दाला महत्त्व असते, त्याचे चित्रपटकरण करताना व्हिज्युली ट्रीट करत असताना थोडाफार तरी फरक पडणारच.

डॉ. झिवागोची आठवण काढल्याबद्दल धन्यवाद. खूप सुंदर सिनेमा होता तो.

ईतक्यात काही नविन विकत घेतले नसल्याने आधीच्या पुस्तकाचे पुनर्वाचन सुरू आहे, गेल्या आठवड्यात रामनगरी - राम नगरकर आणी प्रष्न आणी प्रष्न - अनिल अवचट वाचले.

वुडहाऊस - ह्म्म्म, बरेच दिवसात हात नाही लावलाय. ब्लॅन्डिंग्ज कॅसल ओम्निबसच्या हाताळून पत्रावळ्या झाल्यात. नव्याने घ्यायला पाहिजे Wink
कालच जेराल्ड डरेल चं एन्काउन्टर्स विथ अ‍ॅनिमल्स वाचायला घेतलंय. माझा अगदी सार्वकालिक आवडता लेखक आणि आनंदाचा झरा.

जेराल्डची अ‍ॅनिमल सीरीजमधली काही पुस्तकं माझ्याकडे आहेत, त्या पुस्तकांतील मजकुरासोबतचची कार्टून्सदृश चित्रंही फारच लोभस अशी असतात. मी आणि लेक, दोघीही जेराल्ड पंख्या Happy

श्रद्धा : 'Business Legends' by Gita Piramal - भेट देण्यासाठी चांगले पुस्तक, 'The Last of the Departed' by Bagrat Shinkuba - सुंदर, recommended

नंदिनी अनुमोदन..
मी सिनेमा आधी पाहिला होता म्हणून तुलना झालीच !

पाटील सर, नंदिनी डॉ. झिवागो मिळवून वाचेन आता Happy

काल ही पुस्तक खरेदी झाली-

अकूपार - ध्रुव भट
डोंगरी ते दुबई - झैदी
अंतर्यामी सूर गवसला - दत्ता मारुलकर
सरवा - व्यंकटेश माडगुळकर
वंशवृक्ष - डॉ. भैरप्पा (वाचले आहे पण संग्रहात नव्हते )
तरी बरं! - मंगला गोडबोले.

सद्ध्या अकूपार वाचते आहे. ध्रुव भटांच्या गुजराती भाषेतल्या कादंबर्‍यांचा अंजनी नरवणे अनुवाद करतात, त्यापैकी एक. पुस्तकाच्या सुरुवातीलाच निवेदन आहे, तिथपासून वाचायला सुरुवात केली आहे, आणि आवडतंय. कादंबरीला गीरच्या जंगलाची पार्श्वभूमी आहे, आणि लेखक स्वतः तिथे जाऊन राहिले होते काही काळ. लिहिण्यासाठी.

गॉन विथ द विंड माझी ऑल टाइम फेव कादंबरी आहे..
अशोकमामा, तुमचे मत बरोबर असले तरी ते प्रॅक्टिकली जमणे थोडे अवघड आहे.
माझे असे मत आहे की ज्यांना तपशील वाचायला आवडतात त्यांना बहुतेकवेळा चित्रपटापेक्षा मुळ कादंबरी आवडते. यात परत भाषेचा गोडवा रादर स्टाइल, आवडणारा पदार्थ हळुहळु चाखावा तशी काही पाने परतपरत वाचताना एक चित्र डोळ्यासमोर उथे राहीलेले असते ते जर चित्रपट बघताना मॅच झालेले नसेल तर 'अरे हे काय' असे वाटुन जातेच. अजून एक म्हणजे भल्या मोठ्या कादंबरीला २-२.३० तासात बसवायचे म्हणजे काटछाट आलीच. आपल्या मनात घर करुन गेलेला एखादा प्रसंग, संवाद चित्रपटात नसेल तर त्यामुळेही काहीतरी 'मिसींग' आहे असे वाटते.
तेच जर चित्रपट आधी बघितलेला असेल आणि मग कादंबरी वाचायला घेतली तर चित्र डोळ्यासमोर असतेच फक्त त्यात तपशील भरले जात असावेत.

चिंगी अगदी मनातलं बोललीस.
पी. एस. आय लव यु ही कादंबरी आणि सिनेमा दोन्ही खूप सुंदर वाटले. पण कदाचित मी भाषाप्रेमी असल्याने कादंबरी जास्त आवडली.

शैलजा, मी रसिकला चक्कर मारेन उद्याच. अकूपार घेईन Happy

आज अचानक मला बर्‍याच आधी वाचलेल्या एका सुंदर पुस्तकाचं नाव आठवलं. 'मारा अँड डॅन-अ‍ॅन अ‍ॅड्वेंचर'..लगेच इकडे टाकावंसं वाटलं..
कुणी वाचलंय का अजून? बहुतेक नोबेल जिंकलेलं आहे हे पुस्तक.. खरोखरच सुंदर आहे.

मारा अँड डॅन ! येस्स ! हे पुस्तक वाचल्यावर कितीतरी दिवस ती दोन भावंडं डोळ्यासमोरून जात नव्हती. नोबेल विनर डोरिस लेसिंगचं हे पुस्तक आवर्जून वाचावं, संग्रही असावं असं नक्की आहे.
अबोली, खरंच फार सुंदर पुस्तकाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद !

मितान, डोरिस लेसिंग..हे नावच आठवत नव्ह्तं..धन्यवाद.. Happy
आणि खरंच ती भावंडं आणि ती वर्णनं जातच नाहीत डोळ्यांसमोरुन..मानववंशशास्त्र,इतिहास इ. विषयांत रस असणार्‍यांनी तर आवर्जून वाचावं अगदी.. Happy

सरदेसाई यांचे ब्रिटीश रियासत वाचत आहे. अप्रतिम पुस्तक. कुठल्याही घटनेचे त्रयस्थ विश्लेषण कसे करावे याचे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण. अजून मराठा आणि मुसलमानी रियासत बाकी आहे. खूप वेळ लागणार आहे.

लोक ग्रिफ्फिन वाचलित का?थ्रिलर कादम्बरि आहे.अतिशय अभ्यासपुर्न आहे.इन्ग्लिश कादम्बरिला असतो तसा वेग आहे .

Pages