Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
One Part Woman (मूळ लेखक -
One Part Woman (मूळ लेखक - पेरुमल मुरुगन)
शंभर-एक वर्षांपूर्वीच्या तामिळनाडूतल्या एका खेड्यातल्या जोडप्याची (पोन्ना आणि काली) ही कथा आहे. लग्नाला १०-१२ वर्षं होऊनही त्यांना मूलबाळ नाही म्हणून गावातल्या लोकांकडून, नातेवाईकांकडून त्यांना टोमणे ऐकून घ्यावे लागत असतात. दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम असतं. पोन्ना मूल व्हावं म्हणून बर्यापैकी डेस्परेट असते; कालीचं म्हणणं असतं आपण दोघं एकमेकांच्या साथीला असणं जास्त महत्वाचं.
त्या काळात त्यांच्या गावात, पंचक्रोशीत ज्या प्रथा, परंपरा, रूढी, अंधश्रद्धा असतात त्यानुसार दोघं नाना उपाय करतात.
या पूजाअर्चा, नवस, विविध देवाची सेवा यांची पुस्तकात खूप सविस्तर वर्णनं येतात. माझ्यासारख्या व्यक्तीला एका टप्प्यानंतर त्याचा कंटाळा यायला लागतो. तरी दोघांचं त्यामागचं डेस्परेशन या त्यातल्या एका धाग्याने मला बांधून घातलं. त्या वर्णनातली पोन्ना आणि कालीची इंटरअॅक्शन काही काही ठिकाणी खूप बारकाव्यांसहित आणि नकळत वाचकांसमोर येते. त्यांच्यातलं नातं त्यातून छान समजतं.
या पूजा, उपासतपास, नवस कशाचाच उपयोग होत नाही. शेवटी दोघांच्या आया एक मार्ग सुचवतात. त्या भागातल्या मंदिरात दरवर्षी एका उत्सवाची प्रथा असते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी तरूण स्त्री-पुरुषांवरची सामाजिक बंधनं एका रात्रीपुरती शिथिल करून, सर्व पुरुषांना देवाचं रूप मानून, मूल न होणार्या स्त्रीला आपल्या पसंतीचा एक पुरूष निवडून त्याच्याशी संग करण्याची मुभा असते. पोन्नाने हा मार्ग अनुसरावा असं दोघांच्या आया सुचवतात. पोन्ना हो-नाही करत त्या उत्सवाच्या ठिकाणी पोचते.
तिनं घरातून निघून उत्सवाच्या ठिकाणी पोचणे, वाटेतले प्रसंग, दृश्यं, तिच्या मनातल्या आठवणी, उत्सवाच्या ठिकाणचं वातावरण हे सगळंही खूप सविस्तर आणि प्रभावी लिहिलं आहे. ते सगळं चित्र, वातावरण नजरेसमोर अगदी तंतोतंत उभं राहतं.
पोन्नाला तिच्या पसंतीचा एक पुरूष 'बहुतेक' भेटतो, या नोटवर कादंबरी संपते.
या पुस्तकावरून मोठा गहजब झाला. मुरुगननी 'लेखक मुरुगन मेला आहे' असं जाहीर केलं. या सगळ्या बातम्या वाचलेल्या होत्या. तरी ते पुस्तक म्हणजे हेच, हे मला वाचत असताना माहिती नव्हतं. त्यामुळे मी कोर्या पाटीने वाचू शकले.
मुरुगननी या कथानकाचे दोन सिक्वेल्स लिहिले आहेत, असं मला किंडलवर समजलं. ('A Lonely Harvest' आणि 'Trial By Silence') त्यातलं A Lonely Harvest विकत घेऊन ठेवलं आहे. मला दोन्ही सिक्वेल्स वाचण्याची इच्छा आहे.
हो या पुस्तकावरून झालेला वाद
हो या पुस्तकावरून झालेला वाद आठवतोय. नाव लक्षात नव्हतं.
)

मी आत्ता व्यंकटेश माडगूळकरांचं 'सरवा' हे पुस्तक वाचलं. (ऐकलं नाही
कोरडवाहू पीक काढल्यावर जमिनीवर काही शेंगा, काही दाणे, लोंब्या पडून राहतात. त्या गोळा करतात, त्याला म्हणतात 'सरवा'. माडगूळकरांनी 'सामना' मध्ये हे सदर लिहिलं होतं. लेखक आयुष्यभर लेखन करतो. लेखनाचं पीक काढून झाल्यावर लेखकाकडे जे उरलंसुरलं असतं, त्याचा हा 'सरवा', अशी माडगूळकरांची हे सदर लिहिताना भावना होती.
या सरव्यात दाणे असतील, तशी खडे-मातीही निघेल. सरव्यात हे गृहीत आहे असं त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं आहे
यातील लेखांमध्ये अरण्य, निसर्ग अशा विषयांबरोबर आकाशवाणीत काम करतानाचे काही अनुभव आहेत. त्यात एक श्री. म. माट्यांवरचा लेख आहे, तो मनाला भिडला. तसेच 'अरण्यवाचन' आणि 'सकाळी उठोनी' हे निसर्गनिरीक्षणावरचे लेख, लांडग्याबद्दलचा लेख हे सगळे अर्थातच मस्त आहेत. इतर लेखांमध्ये काही बोधकथा आहेत.
पुस्तकाचा एक मोठा भाग म्हणजे जॉर्ज ऑरवेलच्या स्फुट लेखनाचा व्यंकटेश माडगूळकरांनी केलेला अनुवाद. ऑरवेलच्या कादंबऱ्या जास्त प्रसिद्ध असल्या तरी हे स्फुट लेखनही तितकंच जबरदस्त आहे. या लेखनाचा माडगूळकरांनी केलेला अनुवादही आवडला. पण ते मला वेगळ्या पुस्तकात वाचायला आवडलं असतं आणि या पुस्तकात व्यंकटेश माडगूळकरांचेच निसर्गावरचे जरा जास्त लेख वाचायला आवडले असते.
मलाही ते वर्णन वाचताना
मलाही ते वर्णन वाचताना याबद्दल कोठेतरी वाचल्यासारखे वाटत होते. पूर्ण पोस्ट वाचल्यावर आठवले.
सरवा - हे इण्टरेस्टिंग आहे. पुलं गेल्यावरही - किंवा ते लिहायचे थांबल्यावर- त्यांच्या अनेक लेखांचे किंवा भाषणांचे एकत्रीकरण करून प्रकाशित केल्यासारखी काही पुस्तके वाटली मला - "मित्रहो", "श्रोतेहो" वगैरे. हे त्यासारखेच वाटते.
सरवा छान आहे.
सरवा छान आहे.
स्टोरीटेल वर एवढ्यात
स्टोरीटेल वर एवढ्यात 'माचीवरला बुधा' ऐकलं. खूप पूर्वी वाचलं होतं.
वीणा देव यांचा आवाज खूपच गोड. आजी कडून गोष्ट ऐकतेय असं वाटलं
पुस्तक वाचलं. (ऐकलं नाही) >>>
पुस्तक वाचलं. (ऐकलं नाही) >>> वावे, कंस दिल्याबद्दल थँक्स
सरवा शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. पुस्तक ओळखही आवडली.
फारएण्ड, पु.ल. 'सरवा' पुस्तकांत 'पुरचुंडी', 'उरलंसुरलं' ही पुस्तक सुद्धा येतील (ना?)
पण व्यंकटेश माडगूळकरांनी हे
पण व्यंकटेश माडगूळकरांनी हे लेख सदर लिहिताना नव्याने लिहिलेले आहेत हा फरक आहे. आधीचे अप्रकाशित/इकडेतिकडे प्रसिद्ध झालेले लेख नव्याने एकत्र केलेत असं नाहीये. पुलंची जी 'उरलंसुरलं' प्रकारची पुस्तकं आहेत त्यातले लेख जुनेच होते.
माडगूळकरांचा हा सरवा म्हणजे substantial लिहिण्यासारखं सगळं लिहून झाल्यावर तरीही जे लिहिण्यासारखं थोडंफार मनात इकडेतिकडे शिल्लक होतं, ते लिखाण आहे.
त्यांच्या छोट्याशा प्रस्तावनेत अजून एक वाक्य अशा अर्थाचं आहे की, ज्यांना धान्याचं मोल चांगलं कळलेलं असतं, तो हा सरवा वेचतात!
फारएण्ड, पु.ल. 'सरवा'
फारएण्ड, पु.ल. 'सरवा' पुस्तकांत 'पुरचुंडी', 'उरलंसुरलं' ही पुस्तक सुद्धा येतील (ना?) >> हो ती सुद्धा.
आधीचे अप्रकाशित/इकडेतिकडे प्रसिद्ध झालेले लेख नव्याने एकत्र केलेत असं नाहीये. >> ओके आले लक्षात.
पण व्यंकटेश माडगूळकरांनी हे
पण व्यंकटेश माडगूळकरांनी हे लेख सदर लिहिताना नव्याने लिहिलेले आहेत हा फरक आहे >>> पॉइंट आहे!
आज २ पुस्तके विकत घेतली.
आज २ पुस्तके विकत घेतली. दोन्ही भन्नाट वाटतायत. वाचली की इथे लिहीन.
..........................
The monk who sold his ferrari
The monk who sold his ferrari
हे पुस्तक नेहमी फुटपाथवर ढिगाऱ्यात पडलेले दिसते. काल वाचले. जुलिअन हा हुशार,यशस्वी,श्रीमंत,खूप काम करणारा ,ओफिसातच झोपणारा,पन्नाशीतच म्हातारा दिसणारा वकील आणि त्याचा मित्र असोसिएट जॉन (म्हणजे लेखक रॉबिन शर्मा) यांच्यातील सुखाचा शोध चर्चा. एके दिवशी जुलिएन नाहीसा होतो. त्याने त्याच्या चांगल्या वस्तू विकून टाकलेल्या असतात. फेरारी ही त्याची महागडी कारसुद्धा.
एके दिवशी एक तरुण दिसणारा क्लाएंट जॉनला भेटायला येतो. तोच जुलिएन हे जॉनला ओळखायला अवघड गेलेलं असतं एवढा तरुण आणि उल्हासित दिसत असतो.
तर त्याची सुखाच्या शोधाची कथा तो जॉनला सांगतो. भारतात येऊन हिमालयात शिवाना नावाच्या अज्ञात ठिकाणी त्यास साधू रमण आणि त्याचा आश्रम सापडतो. तिथे त्यास रमणबाबा सुखाच्या सर्व गुप्त गोष्टी शिकवतो. मनावर ताबा, वेळेचे नियोजन, ध्येयाकडे वाटचाल, तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुम्ही काय देता, आहार, दिनचर्या, शाकाहाराचे महत्व वगैरे. प्रश्नोत्तरे. भरपूर उपमा, वैज्ञानिक रूपकं इत्यादी.
( रमण आणि शिष्यांना हिमालयात दुर्गम ठिकाणी ताजे धान्य,फळे,पालेभाज्या ,नवे छान झगे,कपडे कोण कसे आणून देत असतो हे काही कळले नाही. दिलेले नाही.) तर असे अगाध ज्ञान प्राप्त करून जुलिएनसर एक नवजीवन प्राप्त झालेले साधू बनून अमेरिकेत परततात. साधूने फेरारी विकली असा समज होतो पण वकिलाने सुखाच्या शोधात विकलेली असते. (बहुतेक ते पैसे नेट बँकिंग अकाउंटला असतात. त्याशिवाय का हिमालय ट्रिप शक्य आहे?)
असो. जुलिएनचं खरं दु:ख हे त्याची लहान मुलगी एका कार अपघातात मरून त्याच्या ह्रुदयाचा तुकडाच घेऊन गेलेली असते. तर त्या दु:खातून तो कधीच सावरत नाही. खूप काम करून दु:ख विसरायचा प्रयत्न असफल झालेला असतो. बायको कंटाळून सोडून जाते. भारतातल्या अध्यात्मिक गुरुंचा शोध लागल्यावर तो भारतात ती सेवा घेतो. पण ही सर्व कथा ऐकून जॉनसुद्धा शहाणा झाला का माहिती नाही.
अध्यात्मिक ज्ञान खरोखरच संसारी माणसाच्या तुटलेल्या ह्रुदयाला शिवू शकते का हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
(पुस्तक - २००३, जयको पब्लिकेशनचं जुनंच आहे. )
नेमाडपंथी लेखक कोण कोण ? यात
नेमाडपंथी लेखक कोण कोण ? यात नेमाड्यांची नक्कल करणारे, नेमाड्यांपासून स्फुर्ती घेउन लिहिणारे व नेमाड्यांची तळी उचलणारे असे तिन्ही प्रकारचे लेखक / समिक्षक अपेक्षित आहेत.
नेमाड्यांचा फारच प्रभाव
नेमाड्यांचा किंवा कोसला चा फारच प्रभाव असलेले ह्या कॅटेगरीत सुशील धसकटेंचं 'जोहार',.. शिवाय थोडाफार प्रभाव असलेल्या लाईनीत अमुकचे स्वातंत्र्य, किंवा कमलेश वालावलकरांचं 'बाकी शून्य' किंवा प्रशान्त बागडांचं 'नवल'... बाकी रंगनाथ पठारे, वर्जेश सोळंकीही नेमाडेंना मानतात पण त्यांच्या लिहिण्याची जातकुळी एकदम भिन्न आहे.
समीक्षकांमध्ये अशोक बाबर हे एक माहिती आहेत.
रावसाहेब कसबेंचं 'देशीवाद:समाज आणि साहित्य' हे एक पुस्तक आहे. त्यात नेमाडेंवर मनसोक्त वैयक्तिक टिप्पण्या आहेत.
त्याला उत्तर म्हणून अशोक बाबर ह्यांचे 'देशीवादाचे दुश्मन' हे एक खरपूस टोलेबाज पुस्तक आहे.. 'नेमाड्यांची तळी उचलणारे' ह्या कॅटेगरीत फिट्ट बसू शकते हे..! अर्थात आम्ही स्वतःच नेमाडपंथी किंवा अगदी भजैभालचंद्रम् वगैरे कॅटेगरीतले असल्यामुळे भरपूर गुदगुल्या झाल्या वाचताना..
पाचपाटील तुमची शैली अगदी
पाचपाटील तुमची शैली अगदी रारांना नमन करून मग लिहायला घेतले प्रकारातली आहे, मात्र नक्कल नाही.
रंगनाथ पठारे नेमाडपंथी गटातले आहेत का? आमच्या तीर्थरुपांचे म्हणणे आहे की ते नेमाडपंथी आहेत, माझे मत आहे की मुळीच नाही.
फिरोझ रानड्यांचं 'फिरविले
फिरोझ रानड्यांचं 'फिरविले अनंते' आणि मिलिंद बोकिलांचं 'रण-दुर्ग' अशी दोन पुस्तकं नुकतीच वाचली!
फिरविले अनंते हे आत्मचरित्रात्मक आहे. पण त्याचं सूत्र म्हणजे लेखक ज्या विविध ठिकाणी राहिले त्या त्या ठिकाणी आलेले अनुभव. 'अनंता'ने त्यांना एका जागी 'ठेविले' नाही, तर फिरविले. अतिशय प्रांजळ आत्मकथन आहे. स्वतःकडून झालेल्या चुका आणि चांगल्या कामगिऱ्या, दोन्ही प्रांजळपणे सांगितल्या आहेत. भारत सरकारच्या नोकरीत आर्किटेक्ट म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलं. दिल्ली, कलकत्ता, इंफाळ, शिलॉंग,अफगाणिस्तान, ओमान (खाजगी नोकरीत)अशा विविध ठिकाणी ते राहिले. त्या त्या ठिकाणी आलेले रोचक अनुभव त्यांनी रंजकपणे लिहिले आहेत. चीनने भारतावर हल्ला केला तेव्हा रानडे शिलॉंगमध्ये होते आणि रशियाने अफगाणिस्तानवर हल्ला केला तेव्हाही ते काबूलमध्ये होते हा एक विलक्षण योगायोग त्यांच्या वाट्याला आला.
आपसात खून, मारामारी करून कुणी सत्तेवर आलं तर अफगाणांना त्याचं काही वाटत नाही, पण परकीयांची मदत घेऊन जर कुणी सत्तेवर आलं, तर मात्र ते संधी मिळताच त्याचा खातमा करून टाकतात. इतिहास हेच सांगतो आणि भविष्यातही असंच होणार असं त्यांनी पुस्तकात म्हटलंय. २००६ सालच्या या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की आत्ता अमेरिकेच्या मदतीने करझाई सत्तेवर आहेत. पण दहापंधरा वर्षांनी जेव्हा केव्हा अमेरिका परत जाईल, तेव्हा करझाईंचं काही खरं नाही!
मधल्या काळात करझाईंच्या जागी घनी आले, पण हा त्यांचा अंदाज बरोबर होता असंच म्हणावं लागेल.
ओमानला असताना त्यांची अनेक पाकिस्तानी माणसांशी ओळख झाली होती. झुल्फिकार अली भुत्तोंना झियांनी फाशी दिली याबद्दल त्या सर्वांना हळहळ वाटेच. पण रोचक म्हणजे एकजात त्या सर्व पाकिस्तानींचं मत असं होतं की भारतात जर तेव्हा पंतप्रधानपदी इंदिरा गांधी असत्या, तर त्यांनी हे होऊ दिलं नसतं!
असे विविध प्रकारचे अनुभव, भेटलेल्या माणसांबद्दलची निरीक्षणं यांनी हे पुस्तक अतिशय वाचनीय झालं आहे.
प्रतिभा रानडे यांनी लिहिलेलं 'अफगाण डायरी' हे पुस्तक मी वाचलंय, पण फिरोझ रानड्यांचं 'काबूलनामा' वाचायचं राहिलं आहे. ते मी आता नक्की वाचणार आहे!
मिलिंद बोकिलांचं 'रण-दुर्ग'
मिलिंद बोकिलांचं 'रण-दुर्ग' म्हणजे 'रण' आणि 'दुर्ग' या दोन दीर्घकथा आहेत. दोन्ही कथा नायिकाप्रधान आहेत. 'आपल्याला आयुष्यात पुढे नक्की काय करायचं आहे?' या प्रश्नाचा आणि त्याबरोबरच स्वतःचा शोध, हे या दोन्ही कथांचं सूत्र आहे. संवाद, मनातले विचार यांमधून लेखकाने नेमक्या शब्दांत व्यक्तिमत्त्वं उभी केलेली आहेत.
सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेत काम करणारी स्त्री दोन्ही कथांमध्ये आहे. ('उदकाचिया आर्ती' या मिलिंद बोकिलांच्या प्रसिद्ध कथेतली नायिकाही सामाजिक कार्य करणारीच आहे.)
'रण' म्हणजे कच्छचं रण. भूजला झालेल्या भूकंपाची पार्श्वभूमी या कथेला आहे. अनेक अडचणींना तोंड देत तिथे पोचलेली नायिका, तिथे घडलेल्या अनपेक्षित घटना आणि त्यातून तिला लागत गेलेला स्वतःचा शोध अशी ही कथा. यात रणाचा, तिथल्या हवेचा, तिथल्या जंगली गाढवांचा, फ्लेमिंगो पक्ष्यांचा सुरेख उपयोग करून घेतलेला आहे. तसाच तो 'दुर्ग' कथेत पर्वताचा, पर्वत चढताना येणाऱ्या अनुभवांचा आणि वर पोचल्यावर मिळणाऱ्या आनंदाचा आहे.
दुर्ग कथेत मात्र शेवटी येणारा कथाभाग टाळला असता तर बरं असं वाटलं. त्यामुळे कथा जरा चाकोरीबद्ध झाली असं माझं मत.
पण एकंदरीत हेही पुस्तक खूप आवडलं!
मेनी लाइव्हज मेनी मास्टर्स -
मेनी लाइव्हज मेनी मास्टर्स - http://www.tgot.org/images/1_File-PDF-MLMM.pdf
वाचून काढले. पहील्यांदा उत्कंठा वाटली. पुढे तोचतोच पण आला. पण एकंदर पुस्तक आवडले.
https://www.bdk.or.jp/pdf
https://www.bdk.or.jp/pdf/buddhist-scriptures/02_english/TheTeachingofBu...
अप्रतिम पुस्तक आहे. बुद्धाची शिकवण. रोज थोडं थोडं वाचते आहे. खरं तर एकदा वाचण्यासारखं नसून, जीवनशैलीमध्ये भिनवण्याचे पुस्तक आहे. रोज थोडे थोडे वाचलेच पाहीजे.
function at() { [native code] }इशय प्रॅक्टिकल व उपयुक्त. बुद्ध प्रॅक्टिकल होता ..... असा माझा कयास आहे जो पुनःपुन्हा बळकट होतो. त्याची ४ आर्यसत्ये, अष्टांगिक मार्ग .............. फार फार आवडतात.
आर्यसत्य चार हैं-
(1) दुःख : संसार में दुःख है,
(2) समुदय : दुःख के कारण हैं,
(3) निरोध : दुःख के निवारण हैं,
(4) मार्ग : निवारण के लिये अष्टांगिक मार्ग हैं।
अष्टांगिक मार्ग -
सम्यक दृष्टि : चार आर्य सत्य में विश्वास करना
सम्यक संकल्प : मानसिक और नैतिक विकास की प्रतिज्ञा करना
सम्यक वचन : हानिकारक बातें और झूठ न बोलना
सम्यक कर्म : हानिकारक कर्म न करना
सम्यक जीविका : कोई भी स्पष्टतः या अस्पष्टतः हानिकारक व्यापार न करना
सम्यक प्रयास : अपने आप सुधरने की कोशिश करना
सम्यक स्मृति : स्पष्ट ज्ञान से देखने की मानसिक योग्यता पाने की कोशिश करना
सम्यक समाधि : निर्वाण पाना और स्वयं का गायब होना
लायब्ररीच्या ऑडिओ अॅपमधे
लायब्ररीच्या ऑडिओ अॅपमधे पुस्तके होल्डवर ठेवायची सोय ही एकाचवेळी हेल्पफुल आणि प्रॉब्लेमॅटिक आहे. कुठल्या संदर्भातून पुस्तक होल्डवर टाकलेलं ते लक्षात रहात नाही. Jonny Appleseed by Joshua Whitehead हे पुस्तक त्याच कॅटेगरीतले. कधी आणि का हे होल्डवर ठेवले होते ते आठवत नाही. बहुतेक लायब्ररीच्या होमपेजवरचे रेकमेंडेशन असावे. तरी लायब्ररी अॅपमधून रेडी टू बॉरो दिसले तेंव्हा लगेच ऐकायला घेतले.
नेटिव्ह अमेरिकन , टू स्पिरिट जॉनी रीझर्व्हेशन सोडून विनिपेग मधे रहातो. शरीरविक्रय करुन चरितार्थ साधतोय. सावत्र वडील वारल्यावर त्यांच्या फ्युनरल करता रीझर्वेशन वर परत जाण्यासाठी पैसे गोळा करतोय. परत जायची तयारी करतानाचे दिवस आणि त्याच्या लहानपणच्या आठवणी, त्याचा मित्र टियस ( बहुतेक मतियस चा शॉर्ट्फॉर्म असावा, टी एस नव्हे ) , इतर नातेवाईक, रीझर्वेशनमधल्या लोकांचे वागणे असे पुस्तकाचे स्वरुप आहे. माझ्या सारख्या सिस्जेंडर , मोनोगॅमस, हेटरोसेक्षुअल ( भारतीय आणि बर्यापैकी काकूबाई टाइप म्हणायला हरकत नाही ) वाचकाला बर्याच गोष्टी अंगावर येतात. काही काही प्रसंग , वर्णनं ऐकवत नाहीत.
खुद्द लेखकानेच रेकॉर्ड केलेलं आहे. त्याचा ( कदाचित नेटिव्ह कदाचित कॅनेडियन) अॅक्सेंट ऐकताना मजा येते ( उदा - शॅगी / शेगी ) . नेटिव्ह अमेरिकन्स बद्दल आणि गे / टू स्पिरिट लोकांवर आधारित फार कमी वाचलं आहे याची परत एकदा जाणीव झाली. हे पुस्तक संपल्यावर काही काळ काहीच वाचू नये असं वाटत होतं.
लेखकाचे आणि त्याच्या आईचे , आजीचे नाते अगदी हळूवारपणे येते मात्र. तपशील आणि थोडे अपशब्द वगळता लंपन आणि त्याची आजी आठवतात .
आपापल्या जबाबदारीवर वाचा.
मेधा जी तुम्ही नेहमी हटके
मेधा जी तुम्ही नेहमी हटके पुस्तके वाचता. मी वाचलेली पुस्तके असा पॉडकास्ट बनवला तर छानच होईल. परीक्षणे पण मस्त असतात. ही पुस्तके भारतात किंवा इतरही शोधून मिळायला अवघड आहेत.
ही पुस्तके भारतात किंवा इतरही
ही पुस्तके भारतात किंवा इतरही शोधून मिळायला अवघड आहेत.
>>>Z-lib.
सतीश तांबे यांचे मॉलमध्ये
सतीश तांबे यांचे मॉलमध्ये मंगोल आणि मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट हे दोन कथासंग्रह वाचले.
त्यांचं लेखन वाचताना श्याम मनोहरांची आठवण होते. एक - विचित्र नावं. दुसरं कथांतून एक विचार मांडलेला असतो आणि त्या विचारांकडे घेऊन जातात. पात्रं, घटना - त्याही मोजक्याच, कथानक असल़ंच तर, हे निमित्तमात्र.
मनोहरांच्या कादंबऱ्यांचत मुख्य पात्रांच्या दैनंदिन गोष्टींचं कंटाळवाणं वाटावं असं वर्णन असतं. इकडचं तिकडचं फार कमी असतं. बहुतांश प्रवास बोगद्यातून व्हावा तसं.
तांबेंच्या कथांमधील पात्रं सारखा विचार करत असतात. बोलतात तेही विचार मांडायलाच. पण ते आजूबाजूची गंमत दाखवतात. घाटातून प्रवास करावा तसं.
दोघांच्याही कथा काद़ंबरीच्या शेवटी गंतव्य स्थान आल्यासारखा तो विचार समोर लख्ख दिसतो.
यातली मुक्काम पोस्ट.... ही कथा इतकी लांबलचक आहे की मला वाचायचा कंटाळ्यापेक्षाही थकवा आला. दोन दिवस पुस्तक बाजूला ठेवून मग ती पूर्ण केली.
पण त्या थकव्यामुळे उरलेल्या दोन कथा न वाचताच पुस्तक परत केलं.
आता त्यांचंच हळक्षज्ञ हे आपलं महानगरातील सदर लेखांचं संकलन आणलं आहे.
चा‘गली ओळख करुन दिली भरत
चा‘गली ओळख करुन दिली भरत तुम्ही. तांब्यांची पुस्तके वाचायच्या यादीत टाकली
पण त्या थकव्यामुळे उरलेल्या
पण त्या थकव्यामुळे उरलेल्या दोन कथा न वाचताच पुस्तक परत केलं....... हे वाचून बरे वाटले.कधी कधी काही पुस्तकं वाचताना असाच थकवा/ कंटाळा येतो.लायब्ररीत अशा न वाचता दिलेल्या पुस्तकामुळे आलेला gilt आठवला.
कोसलाचे (अतुल पेठेंनी
कोसलाचे (अतुल पेठेंनी दिग्दर्शन केलेले बहुतेक) नाट्यमय वाचन मी एकेकाळी कुठेतरी ऐकले होते. मी केवळ पहिलाच भाग ऐकला होता. ते वाचन आता कुठे मिळत नाहिये. कोणाला काही कल्पना, काही लिंक वगैरे आहे का?
युट्युबवरच मिळाले
शंभु पाटलांनी वाचन केले आहे. https://www.youtube.com/watch?v=SWZYgd12HMA&list=PLz4iAq248k1OAzad-2sNeY...
आजच वडिलांनी कळवले की त्यांनी स्टोरी टेलवर चांगदेव चतुष्टय ऐकले. त्यांना वाचन आवडले. म्हणून मग त्यांना आता हे पण देतो.
त्यांच्या मते अनेक वर्षांनी ही पुस्तके पुन्हा वाचताना त्यांना ते एकांगी वाटले काही ठिकाणी व तोच तोच पणा जाणवला. नेमाडपंथी माणसेही बदलतात हे पाहून मजा आली
पुस्तकाच्या ओळखीबद्दल धन्यवाद
पुस्तकाच्या ओळखीबद्दल धन्यवाद मेधा! लायब्ररीच्या यादीत नोंद करुन ठेवलेय.
कोसला वाचन - २५ भाग प्रत्येकी
कोसला वाचन - २५ भाग प्रत्येकी वीसेक मिनिटे म्हणजे आठ तास झाले. पण आहे चांगले.
>>> सतीश तांबे यांचे मॉलमध्ये
>>> सतीश तांबे यांचे मॉलमध्ये मंगोल >> छान.
वावे, मेधा, पुस्तक ओळख आवडली.
वावे, मेधा, पुस्तक ओळख आवडली.
मॉलमध्ये मंगोल - काही वर्षांपूर्वी हे पुस्तक विकत घ्यायचंच असं ठरवून दुकानात गेले होते, पण पुस्तक चाळल्यावर विचार बदलला, हे आठवतंय.
मुरलीधर खैरनारांची 'शोध'
मुरलीधर खैरनारांची 'शोध' कादंबरी वाचतेय. खिळवून ठेवणारी आहे.
Pages