Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाम भुतकरांचा लेख इथेच
शाम भुतकरांचा लेख इथेच मिळालेल्या लिंक मुळे वाचला होता.
त्यामुळेच पुस्तक वाचावं वाटलं.
अनु, वाचवत नाही असं नाही. मला वाचायचं होतंच. पण वाचताना मनात असं का व्हावं? का झालं असेल असं? एक सुरळीत चालणारं अयुष्य असं का भरकटलं असेल? असे विचार चालले होते.
शाह ने हे पुस्तक लिहितांना काही लपवलेलं नाही. सगळं सत्य सांगितलेलं आहे असा दावा केला आहे.
पुस्तक वाचुन भयंकर गुन्ह्यात तो सामील होता हे माहित असुनही शाहबद्दल,नियतीबद्दल, दैवाबद्दल, नशीबाबद्दल मन विचार करतंच. मी तरी करत होतेच काही दिवस.
आता माफीचा साक्षीदार बघायचा
आता माफीचा साक्षीदार बघायचा आहे.
ज्ञानेश्वर मुळे यांचं
ज्ञानेश्वर मुळे यांचं नोकरशाईचे रंग हे साधना प्रकाशनाचे पुस्तक वाचले. यापूर्वी त्यांचे काही लेख वाचले होते . ते बहुतांशी मॉरिशस मध्ये राजदूत म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांबद्द्ल होते. हे पुस्तक २००९ साली प्र्काशित झाले. त्यात त्यांची जपानमधली दोन पोस्टिंग्ज, वाणिज्य मंत्रालयातला अनुभव व मॉस्कोतील पोस्टिंगबद्दल लिहिले आहे.
जपानमधल्या पहिल्या पोस्टिंगमध्ये जपानी भाषा शिकण्याचा प्रवास आणि तिथल्या भारत महोत्सवाचे आयोजन हे दोन्ही भाग रोचक आहेत.
वाणिज्य मंत्रालयात निर्यात वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न आनि त्यात नोकरशाहीने लावलेल्या लाल फितींचे वर्णन आहे. १९८९ ते १९९२ या काळात ४ पंंतप्रधान आणि अर्थातच ४ वाणिज्य मंत्री झाले. सुब्रमण्यन स्वामींबद्दलचा किस्सा रोचक आहे.
त्यांचे रशिया पोस्टिंग १९९३ म्हणजे रशियाच्या विघटनाशी जोडून, त्यामुळे हाही भाग इंटरेस्टिंग आहे. परदेशातही पोचलेल्या भारतीय अपप्रवृत्तींबद्दल वाचून खेद वाटला.
पुस्तकात उल्लेख झालेल्या व्यक्ती उच्च पदस्थ त्यामुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबद्दल जिथे चांगले लिहिले आहे, तिथे नावे दिली आहेत. पण कटु अनुभव नोंदवताना गाळली आहेत.
शेवटी नोकरशाही - नागरी सेवांच्या तीन शाखांतली हा यरार्की, त्यांच्या बॅचचे महत्त्व आणि केंद्रातल्या मंत्रालयांतली पसंतीची आणि सत्ताबलाची हायरार्की याबद्दल लिहिले आहे.
दूतावासात काम करताना आलेल्या अनुभवांब द्दल आणि कामाबद्दलच लिहिले असल्याने त्या त्या देशांतल्या समाजजीवनाबद्दल क्वचित काही लिहिले आहे. अपवाद जपानची कार्यसंस्कृती.
मला पुस्तकाचे शीर्षक ओढून ताणून दिल्यासारखे वाटले. नोकरशाही बद्दल लिहिले असले तरी ते टिप्पण्णी स्वरूपात. मुख्य प्रवाह लेखकाच्या कामाचा आणि अनुभवाचा आहे.
जपान भारत मैत्री संबंधाबाबात इंटरेस्टिंग गोष्टी -
दुसर्या महायुद्धात पराभूत झालेल्या जपानला भेट देणारे पंडित नेहरू हे पहिले शासन प्रमुख. त्यांनी इतर आशियाई देशांचा विरोध पत्करून १९५२ च्या दिल्ली आशियाड मध्ये जपानला सहभागी करून घेतले.
१९४९ मध्ये नेहरूंनी जपानी मुलांसाठी (समस्त भारतीय बालकांकडून जपानच्या समस्त बालकांसाठी) एक हत्तीण भेट म्हणून पाठवली. तिचे नाव इंदिरा!
गेल्या काही दिवसात वाचलेली
गेल्या काही दिवसात वाचलेली पुस्तके:
द डॉक्टर अँड द सेंट - अरुंधती रॉय
आप अँड डाउन - मयांक गांधी
बियाँड द ट्रीज - अॅडम शोअल्ट्स
कास्ट मॅटर्स - सुरज येंगडे
द इन्क्रेडिबल हिस्टरी ऑफ इन्डियाज जिओग्राफी - संजीव सन्याल
सावरकर - द ट्रु स्टोरी ऑफ द फादर ऑफ हिंदुत्व - वैभव पुरंदरे
जमेल तसे सविस्तर लिहीन.
>>द इन्क्रेडिबल हिस्टरी ऑफ
>>द इन्क्रेडिबल हिस्टरी ऑफ इन्डियाज जिओग्राफी >>
हे आणि 'इंडिका' - प्रणय लाल, साधारण एकच विषय आहे का?
कास्ट मॅटर्स - सुरज येंगडे >>
कास्ट मॅटर्स - सुरज येंगडे >>> याबद्दल आणखीही १-२ ठिकाणी वाचण्यात आलंय. यंदाच्या साधना दिवाळी अंकात या लेखकाची मुलाखत आहे.
नुकतंच मी 'ऐकलेलं' पुस्तक -
नुकतंच मी 'ऐकलेलं' पुस्तक - व्यंकटेश माडगूळकरांचं 'कोवळे दिवस', स्टोरीटेल ॲपवर, संदीप खरेच्या आवाजात. मजा आली ऐकायला. आवडलं पुस्तक.
रूढार्थाने 'मार्गाला' लागेपर्यंतच्या आयुष्यात तुडवलेल्या आडवाटा, त्या वाटांवरचे खाचखळगे, काटेकुटे, अशा वाटांवरून चालताना वाटलेली एक प्रकारची झिंग यांच्या या आठवणी आहेत. ४२ च्या चळवळीत भाग घेऊन नंतर भूमिगत असतानाचे दिवस, काही काळ गावाला राहून काढलेले निवांत दिवस, अशाच एका तुरुंगात गेलेल्या देशसेवकाच्या घरी त्याच्या पत्नीच्या मदतीला राहून काढलेले दिवस आणि शेवटी प्रेसमध्ये आर्टिस्ट म्हणून नोकरी करतानाचे दिवस, असे हे सगळे कोवळे दिवस आहेत.
व्यंकटेश माडगूळकरांची नेमकी, चित्रदर्शी शब्दयोजना, त्यांच्या लिखाणातून जाणवणारं एक रगेल, रसिक, त्याचबरोबर कोमल व्यक्तिमत्त्व याही पुस्तकात जाणवतं. मला
गो नी दांडेकरांच्या भ्रमणगाथेची बऱ्याच वेळा आठवण झाली हे पुस्तक ऐकताना.
संदीप खरेच्या कविता आणि गाणी आवडतात, तसंच त्याचं नक्षत्रांचे देणे कार्यक्रमात ऐकलेलं कवितावाचनही आवडायचं. त्याने या पुस्तकाचं सुंदर अभिवाचन केलं आहे. रांगड्या भाषेतल्या संवादांपासून हळुवार प्रसंगांंच्या वर्णनापर्यंत सगळे भाव आवाजात नेमके उतरवले आहेत.
एकंदरीत छान अनुभव. चालता चालता, काम करता करता एकीकडे पुस्तक ऐकून झालं.
त्यातल्या त्यात तोटा म्हणायचा, तर पुस्तक वाचताना मधेच आपण मागे जाऊन परत एखादं पान चाळतो, एखादं वाक्य परत वाचतो, तसं करणं इथे तेवढं सोपं नाही. पण तेवढं चालतं
पुस्तक वाचताना मधेच आपण मागे
पुस्तक वाचताना मधेच आपण मागे जाऊन परत एखादं पान चाळतो, एखादं वाक्य परत वाचतो, तसं करणं इथे तेवढं सोपं नाही. पण तेवढं चालतं Happy
podcast मध्ये mp3 file download होतात त्यांना तसं करता येतं. पण ते फ्री असतात ना त्यामुळे. ओडिओ बुक्स विकत घेतो ती app च्या आत असतात.
रूढार्थाने 'मार्गाला'
रूढार्थाने 'मार्गाला' लागेपर्यंतच्या आयुष्यात तुडवलेल्या आडवाटा, त्या वाटांवरचे खाचखळगे, काटेकुटे, अशा वाटांवरून चालताना वाटलेली एक प्रकारची झिंग यांच्या या आठवणी आहेत. ४२ च्या चळवळीत भाग घेऊन नंतर भूमिगत असतानाचे दिवस, काही काळ गावाला राहून काढलेले निवांत दिवस, अशाच एका तुरुंगात गेलेल्या देशसेवकाच्या घरी त्याच्या पत्नीच्या मदतीला राहून काढलेले दिवस आणि शेवटी प्रेसमध्ये आर्टिस्ट म्हणून नोकरी करतानाचे दिवस, असे हे सगळे कोवळे दिवस आहेत. >>> अल्फा मराठी किंवा झी मराठी सुरु झालं तेव्हा लगेच पिंपळपान नावाची कथांची सिरीयल होती, त्यात पहीलीच ही कथा होती बहुतेक. समीर पाटील हे यंग व्यंकटेश माडगुळकर होते .
@अन्जूताई, पिंपळपान लागायची
@अन्जूताई, पिंपळपान लागायची हे आठवतंय, पण बघितली नव्हती. त्यात जयवंत दळवींची 'बॅरिस्टर' पण होती का एकदा?
@srd, मागे जाऊन परत ऐकता येतं इथेही, पण पुस्तक वाचताना जसं पटकन मागचं एखादं पान शोधतो तसं इथे पटकन शोधता येत नाही.
त्यात जयवंत दळवींची 'बॅरिस्टर
त्यात जयवंत दळवींची 'बॅरिस्टर' पण होती का एकदा? >>> हो. भक्ती बर्वे, अतुल कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक होते.
बॅरिस्टरमध्ये 'बॅरिस्टर' कमी
बॅरिस्टरमध्ये 'बॅरिस्टर' कमी आणि ब्याचलर जास्त तीच का?
व्हाईटहॅट ऍड आणि व्हॉट किल्ड
व्हाईटहॅट ऍड आणि व्हॉट किल्ड इंजिनीरिंग धाग्यातील काही प्रतिसाद वाचून मागच्या वर्षी वाचलेले Shoshana Zuboff यांचे The Age of Surveillance Capitalism हे पुस्तक आठवले. गार्डीयनमध्ये त्यावर एक फार भारी लेख/मुलाखत आली होती जी वाचल्यानन्तरच पुस्तक वाचले होते.
https://www.theguardian.com/technology/2019/jan/20/shoshana-zuboff-age-o...
https://www.theguardian.com/books/2019/oct/04/shoshana-zuboff-surveillan...
किती वाचनीय आहे हे पुस्तक? मी
किती वाचनीय आहे हे पुस्तक? मी एका पॉडकास्टवर याची माहिती वाचली होती.
बाई विद्वान वाटल्या म्हणून मी
बाई विद्वान वाटल्या म्हणून मी पुस्तकाला हात घातला आणि एका दमात संपण्यासारखे अजिबात नाही कारण भरपूर जार्गन्स आहेत त्यात. मी एकेक प्रकरण वाचून संपवले महिनाभरात. ऍमेझॉनमध्ये पब्लिकने लिहिलेले रिव्ह्यूजस फायदेशीर वाटतील तुम्हाला ठरवण्यास. मी तीच पद्धत वापरतो बहुतेक पुस्तकांना. आता कॅथी ओ''निल यांचे बिग डेटा वरचे ''वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन'' वाचायचा विचार करतोय.
धन्यवाद या पुस्तकाशी संबंधित
धन्यवाद
या पुस्तकाशी संबंधित चर्चा TWIT - This Week In Tech या पॉडकास्ट मधे झाली होती आणि ती प्रचंड इंटरेस्टिंग होती. त्यामुळे कुतूहल आहे.
सध्या गाजत असलेली The
सध्या गाजत असलेली The Vanishing Half संपवली. छान आहे.
अमेरिकेत गोरे आणि काळे अशा दोन रेसेस असल्या तरी काळाच्या ओघात त्यांचा संकर होऊन ब्लॅक लोकांमध्ये ब्राऊन, निमगोरे ते डार्क अशी रेंज निर्माण झाली. गोऱ्या पुरुषांनी आपल्या गुलाम ब्लॅक स्त्रियांचं लैंगिक शोषण करण्यातून हा प्रकार झाला.
गोरे म्हणजे प्युअर गोरे. आणि बाकी सगळे काळे. मग काळ्यांमध्येच जे उजळ होते ते स्वतःला श्रेष्ठ समजत अशी एक वर्णावर आधारित उपव्यवस्था निर्माण झाली. काही वेळा एखादी mulatto व्यक्ती इतकी गोरी दिसत असे की स्वतःला प्युअर गोरी म्हणून खपवू शकत असे. याला passing as white म्हणत.
कादंबरीत दोन जुळ्या mulatto बहिणी आहेत. त्यातली एक गोरी म्हणून वावरू लागते. दुसरी मात्र आपल्या रुट्सशी प्रामाणिक राहते. ब्लॅक ही आयडेंटिटी ठेवते. अर्थात दोन बहिणींची आयुष्ये खूप वेगळी होऊन जातात.
कादंबरीची सुरुवात दमदार होते. नंतर जरा बोअर होते. मग परत खूप थरारक बनते. शेवट मात्र विस्कळीत आहे. पण लिखाण छान आहे.4/5
यात उगाचच LGBTQ ट्रॅक घुसडला आहे. अमेझॉनवर रिव्ह्यूजमध्येही वाचलं की या उपकथानकाची काहीच गरज नव्हती. मूळ स्टोरीच इतकी थरारक आहे की त्यावरच फोकस ठेवणं योग्य होतं.हल्ली काय कादंबरी किंवा वेबसिरीजमध्ये एकतरी LGBTQ ट्रॅकचं आरक्षण ठेवतात काही कळत नाही.
कादंबरीवर मिनिसिरीज बनवण्याचे हक्क एचबीओ ने विकत घेतले आहेत.
>>वेबसिरीजमध्ये एकतरी LGBTQ
>>वेबसिरीजमध्ये एकतरी LGBTQ ट्रॅकचं आरक्षण ठेवतात काही कळत नाही. >> ---
एका पुस्तकात वाचलं DADT (DON'T ASK DON'T TELL) अकरा हजार लोक अमेरिकी संरक्षण दलात आहेत. म्हणजे 'ट्रॅक घुसडला' तर ठीक.
कादंबरीत काही शक्य आहे पण ब्राऊन किंवा कॉपर टोनड ब्राझिलकडच्यांना म्हणतात का?
Such a fun age
Such a fun age
यावर्षीच्या बुकरच्या long list मध्ये असलेली कादंबरी. एकदम चटपटीत धमाल आहे. Chicklit कॅटेगरी म्हणता येईल.
खरंतर विषय गंभीर आहे- racial dynamics चा पण satirical पद्धतीने मांडला आहे. एक इंस्टाग्राम influencer असलेली गोरी श्रीमंत बाई. तिच्या मुलांना सांभाळणारी काळी बेबीसीटर. एक दिवस या सीटरवर मिसेस इंस्टाच्या बाळाला किडनॅप केल्याचा आरोप होतो. आणि मग बरंच काही होतं. आरोप अर्थात खोटा असतो. बाळ लगेचच आईबापाच्या ताब्यात सुरक्षित दिलं जातं. पण racial tensions , आरोप प्रत्यारोप आणि बाळाच्या आईचा भूतकाळ या सर्वांच्या मधून कथानक पुढे सरकत जातं.
मी ओडियोबुक ऐकलं.
मी पहिले राइज अँड फॉल ऑफ द र
मी पहिले राइज अँड फॉल ऑफ द र थर्ड राइख वाचले. मग त्यातून ज्यु धर्म, संस्कृती याबद्दल जास्त माहिती हवी असे वाटले. त्यातून
एंशंट रोम हा रोमन साम्राज्याचा इतिहास वाचला. त्यात जेरुसलेम व ज्युइश मंदिराम्ची झालेली लुटालूट वगैरे वाचले . मग अधिक माहिती साठी
सायमन सेबाग माँटेफिओरे ह्यांनी लिहिलेले जेरुसले म नावाचे पुस्तक ऐकले/ वाचले. हे अतिशय सुरेख आहे.
जेरुसलेमची अगदी सुरुवातीपासूनची म्हणजे सिटी कशी वसली तिथून सुरुवात करून सध्याच्या स्थितीपरेन्त लेखक आणतो. व त्या अनुषंगाने
ज्युडाइज्म, जीझसचा कार्यभाग. ख्रिस्ती धर्माची स्थापना, रोमन आक्रमणे, जोसि फस पुढे जाउन इस्लाम चा उदय, अरब युद्धे व आक्रमणे
ओसामा बिन मुंडीक, अब्बासिद घराणे( हे पूर्वी फक्त अन्न वै प्राणा: वाचूनच माहित होते) सलादिन, चार्लमेन, इंग्रजी राजे क्रुसेडस ओटॉमान एंपायर करत करत सद्य काळा परेन्त येतो. रंजक व रोचक आहे. गेम ऑफ थ्रोन्स ह्या खर्या इतिहासा पुढे काहीच नाही.
फारच मारामार्या विध्वंस धार्मिक स्थळांची तोड फोड असे सेन्सिटिव्ह विषय आहेत. व ज्यु समाजाच्या एकंदरीत परसेक्युशनचा च इतिहास आहे. बाय द रिवर्स ऑफ बॅबिलॉन गाण्याचा अचानक संदर्भ मिळाला.
हे व एन्शंट रोम साइड बाय साइड ऐकले की एकाच घटनेचे विरुद्ध बाजुंनी पदर व परि णाम समजून येतात. राजे रजवाड्यांचे वाग णे व जनतेचे सफर होणे अन्नान्न होउन मरणे हा एक कायम सलग थ्रेड वाटला मला तरी.
गेम ऑफ थ्रोन्स ह्या खर्या
गेम ऑफ थ्रोन्स ह्या खर्या इतिहासा पुढे काहीच नाही.
रैट. अशी काही पुस्तके आणि हिस्ट्री चानेलच्या डॉक्युमेंट्स आहेत.
वावे, स्टोरी टेल वर आपल्या
वावे, स्टोरी टेल वर आपल्या मायबोलीकर नंदिनी देसाईच्या पण एरोटीका आहेत. नक्की ऐका
टीप :- ही जाहिरातच आहे पण यात माझा काहीही फायदा नाही. मला नंदिनीचं लिखाण आवडतं म्हणून मी प्रमोट करतेय
Such a fun age - माझ्या विश
Such a fun age - माझ्या विश-लिस्टमध्ये आहे, पण तरी घ्यावं की नाही ठरत नव्हतं. आता इथला रिव्ह्यू वाचून घ्यावंसं वाटायला लागलं.
वावे, स्टोरी टेल वर आपल्या
वावे, स्टोरी टेल वर आपल्या मायबोलीकर नंदिनी देसाईच्या पण एरोटीका आहेत. नक्की ऐका>> ओके रीया
अरुण साधूंची 'मुखवटा' ही कादंबरी आज वाचून संपली. मला त्यांच्या फक्त सिंहासन आणि मुंबई दिनांक या दोनच कादंबऱ्या माहिती होत्या. सिंहासन खूप वर्षांपूर्वी वाचली होती.
मुखवटा ही कादंबरी विदर्भातल्या एका खेडेगावात राहणाऱ्या अक्षीकर कुटुंबाभोवती केंद्रित आहे. शेकडो वर्षांपासून त्या कुटुंबात चालत आलेल्या परंपरा, रीतीभाती, कालांतराने मूळचं वैभव जाऊन मागे राहिलेली केवळ हे सगळं पुढे चालू ठेवण्याची अपरिहार्यता, आजूबाजूचं बदलणारं जग, ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचे गुंतागुंतीचे संबंध, राजकारण, विस्तारित कुटुंबातली गुंतागुंत वगैरे वगैरे मूळ कथेत गुंफलेलं आहे. कुटुंबात लग्न होऊन येणाऱ्या सुनांचा कुटुंबाला आकार देण्यात मोठा वाटा असतो, पण स्मरण मात्र पूर्वज पुरुषांचंच मुख्यतः केलं जातं, हाही एक विचार कादंबरीत मांडला आहे. जिचं सख्खं कुणीच गेली कित्येक वर्षं घरात जिवंत शिल्लक नाही, अशी एक म्हातारी सावत्र काकू स्वतःच्या स्वभावातल्या मायेने सगळ्या गोतावळ्याशी जोडली गेलेली आहे. सगळ्या परंपरांंचा, रीतीभातींंचा वस्तुनिष्ठ भूमिकेतून विचार करू पाहणारे एक चुलत घराण्यातले तात्याजी आहेत.
कादंबरी आवडली. पण मूळ कुटुंबाच्या कथेच्या जोडीला जे इतर विषय आले आहेत (राजकारण, जातींचा विचार वगैरे) ते सविस्तर आले असले तरी त्या मानाने ते पुढे डेव्हलप होत नाहीत असं मला वाटलं. मग त्याचं प्रयोजन काय, असंही वाटलं. तुंबाडचे खोतसारख्या कादंबरीत राजकारण, सामाजिक परिस्थिती या गोष्टी ओघाने येत राहतात आणि कृत्रिम वाटत नाहीत. इथेही कृत्रिम वाटत नसल्या, तरी मूळ कथेशी सांधा चांगला जुळत नाही असं वाटलं.
परंपरा आणि चालीरीतींंचा, डोळसपणे विचार करू पाहणाऱ्या तात्याजींंवरून भैरप्पांच्या 'वंशवृक्ष' मधले श्रीनिवास श्रोत्री आठवले. पण तात्याजींचं व्यक्तिमत्त्व का कोण जाणे, पण श्रीनिवास श्रोत्रींंइतकं आदरणीय वाटलं नाही.
विदर्भातलं अघळपघळ वातावरण, वऱ्हाडी बोली, पानतंबाखू खाण्याची सवय वगैरे मस्त उभं राहिलं आहे. विदर्भातला खेडेगावातला जुना वाडा, बंदिस्त विचारसरणीतून होणारी मुलींची घुसमट वाचून 'वाडा चिरेबंदी' चीही आठवण झालीच. तिथली प्रभा तिथेच अडकून पडते, इथली शोभा मात्र सुटका करून घेते.
एकंदरीत 'ग्रेट' वाटली नसली तरी नक्कीच आवडली.
वावे, परिचय आवडला. पुस्तकाचं
वावे, परिचय आवडला. पुस्तकाचं नाव ऐकलं आहे, वाचलेलं नाही. (मी सुद्धा सिंहासन आणि मुंबई दिनांक हीच दोन पुस्तकं वाचली आहेत.)
पहिला पॅरा वाचताना तुंबाडचे खोत कादंबरीची आठवण झाली. आणि पुढे तू देखील त्याचा उल्लेख केलाच आहेस.
----------------
Reykjavik Noir Trilogy (SNARE, TRAP, CAGE) पैकी पहिलं SNARE वाचलं.
स्टोरी चांगली आहे. सोनिया, एक घटस्फोटित आई, लहान मुलगा आळीपाळीने आई आणि वडिलांकडे राहत असतो. मुलाची पूर्णवेळ कस्टडी मिळवण्यासाठी आईला व्यवस्थित घर, इन्कम याची गरज असते. त्यातूनच ती ड्रग ट्रॅफिकिंगमध्ये ओढली जाते. नेटाने त्यात ती तरबेजही होते. विमानतळावर कस्टम्समधून पार होण्यासाठी ती कोणकोणत्या युक्त्या करते ते थ्रिलरचा एक भाग म्हणून इंटरेस्टिंग आहे.
Reykjavik विमानतळावरचा एक कस्टम्स ऑफिसर हे आणखी एक प्रमुख पात्र आहे. कस्टम्सवाले प्रवाशांकडे कशा प्रकारे लक्ष ठेवतात, त्यांच्या सराईत नजरा काय-काय आणि कसं-कसं टिपत असतात, त्याला सोनियाचा संशय कसा येतो, संशयाची खातरजमा करण्यासाठी तो तिच्यावर कशी कशी पाळत ठेवतो, तिची देहबोली, वेषभूषा, तिचं सामान यातून काय काय अंदाज बांधतो हे सगळं तर फारच इंटरेस्टिंग आहे.
पुस्तक वाचताना कस्टम्सचे हे सीन्सच चालू रहावेत, बाकी उपकथानकं मध्येमध्ये नकोत असंच मला वाटत होतं.
याच्या जोडीला सोनिया आणि तिच्या नवर्याची एक कॉमन मैत्रीण Agla हिचाही ट्रॅक आहे. ते उपकथानक मला जरा बोअर झालं. पुढे पुढे तर त्यावरच जास्त फोकस येत जातो. त्याअर्थी किंडलवरच्या सिनॉप्सिसने पुन्हा एकदा माझी जरा दिशाभूल केली.
ठराविक पैसा हातात आला की सोनियाला ते काम सोडायचं असतं. पण (अपेक्षेप्रमाणे) ते शक्य होत नाही.
नेटवर ज्या प्रमाणात थ्रिलर म्हणून रेटिंग्ज आहेत त्या तुलनेत मला पुस्तक ठीकठाक वाटलं. किंवा त्या रेटिंग्जमुळेच मी फार अपेक्षा ठेवून वाचायला सुरुवात केली असावी.
शेवटाकडे दोन ट्विस्ट्स आहेत. दुसर्या भागात काय होतं बघायचं.
ललिता,
ललिता,
रोचक आहे पुस्तक परिचय.
मी सध्या काहीच नवीन नाही वाचलं.
मनोहर शहाणे ह्यांचं 'लोभ
मनोहर शहाणे ह्यांचं 'लोभ असावा आणि एखाद्याचा मृत्यू' (मौज प्रकाशनगृह) खूप दिवसांपासून संग्रहात आहे. काल कपाटातून काढलं आणि वाचलं. दोन लघु कादंबऱ्या किंवा दोन दीर्घ कथा असं त्याचं स्वरूप आहे.
'लोभ असावा'ची धाटणी वेगळीच आहे. नायकानं विविध व्यक्तींना लिहिलेली पत्रं आहेत त्यात. ही सारी पत्रं टुमदार बंगल्याच्या स्वप्नाची सुरुवात आणि ते उद्ध्वस्त होण्यापर्यंतचा प्रवास सांगतात. फारच सुंदर. न राहावून आज संध्याकाळी मग शहाणे ह्यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांचे आभार मानले. श्री. दा. पानवलकर ह्यांनी 'अर्धसत्य'चं चित्रीकरण पाहिलं आणि त्या नोंदीवर पुस्तक लिहिलं. ते एकदा वाचलं असूनही आज पुन्हा वाचायला सुरुवात केली.
फायनली एक पुस्तक संपवलं!
फायनली एक पुस्तक संपवलं! Murder in Old Bombay.
अमेरिकेत राहात असल्यामुळे जी फिक्शन पुस्तकं वाचायला सहज उपलब्ध असतात ती अमेरिकेत घडणारी असतात. किंवा मग युरोप.
त्यामुळे मुंबईत घडणारं कथानक म्हणून Murder In Old Bombay बद्दल उत्सुकता वाटली. मुखपृष्ठावर राजाबाई घड्याळ टॉवरचं चित्र आहे!
1890 च्या आसपास दोन पारसी तरुण स्त्रियांचा मुंबईच्या राजाबाई घड्याळ टॉवरवरून पडून मृत्यू होतो. या मृत्यूंच्या मागे असलेलं रहस्य (आत्महत्या? खून? अपघात?) शोधून काढण्याची जबाबदारी ब्रिटिश आर्मी कॅप्टन जेम्स अग्निहोत्री घेतो. मग पुढे कथानक उलगडत जातं.
जास्ती काही लिहित नाही पण मजा येते वाचायला. मला दक्षिण मुंबईचा एरिया अतिशय आवडतो. (पण आताचा नाही, जुना). त्यामुळे जुन्या काळातील राजाबाई टॉवर, चर्चगेट, बॉम्बे युनिव्हर्सिटी, हँगिंग गार्डन्स, मलबार हिल या भागात घडणारं कथानक वाचायला खूप आवडलं. तत्कालीन मुंबईवर पारसी समाजाचं वर्चस्व होतं. The book gives us a front row seat to see their world.
सुरुवातीला शेरलॉक होल्म्स स्टाईल वाटणारं कथानक पुढे जरा वेगवेगळी वळणं घेत जातं. त्यात मग त्या काळातील राजकीय, सामाजिक संदर्भ येत जातात. 1890 चा काळ म्हणजे राजकीयदृष्ट्या तसा स्थैर्याचा आहे. 1857 चा उठाव आताच्या नवीन पिढीला फारसा लक्षात नाही. नवीन आक्रमक राजकीय चळवळ ठोस उभी राहिलेली नाही(म्हणजे टिळकांनी काँग्रेस जस्ट जॉईन केली होती 1890 ला). प्लस ब्रिटिश राज आणि संस्थानं यात परिस्थितीत फरक आहे, इत्यादी.
त्यात पुन्हा जेम्स अग्निहोत्रीची बॅकस्टोरी आहे. इंग्रज बाप आणि भारतीय आईचा हा अनाथ, अनौरस मुलगा. अँग्लो इंडियन असल्यामुळे जरी इंग्रज त्याला जवळ करत असले तरी तो भारतीयही आहे. आवडावा असाच हा हिरो आहे.
मर्डर मिस्ट्री फारशी थरारक नाही. प्रत्येक पेजवर काहीतरी कलाटणी मिळतेय असं काही नाही.
लेखनात काही ठरलेले फॉर्म्युलाज वापरले आहेत - जसं आर्मीतील हिरो असल्यामुळे मग त्याला PTSD असणार, हिरोला तपासकामात मदत करणारी एक सुंदर, हुशार तरुणी असणार , कथेतील पारसी कुटूंबाची काही फ़ॅमिली सिक्रेट्स असणार, etc.
पण त्या संथ काळात रमायला आवडलं. मस्त हातात कॉफीचा मग, फायरप्लेसशेजारी बसून 1890 च्या मुंबईत time travel करून यायचं.
सनव, परिचय आवडला
सनव, परिचय आवडला
मर्डर मिस्ट्री फारशी थरारक
मर्डर मिस्ट्री फारशी थरारक नाही.
Agatha च्या सुद्धा साचेबंद असतात. पण तो काळ वेगळा होता. इतर करमणूक साधने नसतानाचा.
Pages