मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशुचँप, तुमची किंडल अनलिमिटेड वर सापडलेल्या छान पुस्तकांची नावं द्या ना. मला पण खूप मोह झाला होता सबस्क्रिप्शन घ्यायचा पण चेतन भगत, अमिश त्रिपाठी, आणि इतर इंग्रजी सेल्फहेप कॅटेगरी पुस्तकंच जास्त दिसतात यादीत. If you could list some hidden gems you found that would be great.

चेतन भगत पण वन टाईम रीड असतात.माझा रेकॉर्ड आहे. Happy
मी रिव्हॉल्युशन 2020(अजिबात वाचू नका),हाफ गर्लफ्रेंड(अजिबात वाचू नका) गर्ल इन रूम नंबर काहीतरी, आताचं नवीन(नाव विसरले) वन इंडियन गर्ल ही सर्व वाचली आहेत.वाचून झाल्यावर कळवळून रिव्ह्यू लिहिते.पण त्याची नवी पुस्तकं आली की वाचायचं सोडत नाहीत.2 स्टेटस आणि फाईव्ह पॉईंट समवन ची पुण्याई अजूनही चालू आहे.त्यावर त्याला बरीच पापं माफ.
(सुदीप नगरकर ची पुस्तकं अजिबात वाचू नका.याला चेतन भगत ची नक्कल करायची आहे पण जमत नाही.)

"रोश (roche) विरुद्ध ऍडम" >>> हे पुस्तक मी वाचून किती वर्ष झाली तेच आठवत नाहीये. मला रोश नाव आठवत होतं अधूनमधून पण पुढचं आठवेना. शोधक thank u, आज तुमच्यामुळे पूर्ण नाव समजलं. हे तेच कथानक ना ज्यात त्याची बायको आत्महत्या करते, बाकी family चा देश सोडण्याचा थरार अजुनही आठवतो. जबरदस्त खिळवून ठेवणारे कथानक, बायको जाते त्याचं वाईट वाटतं मात्र फार.

जिज्ञासा - ही माझी यादी

१. गोल्डा एक अशांत वादळ
२. मालगुडीचा संन्यासी वाघ
३. शेरलॉक - द साईन ऑफ फोर
४. थैलीतील खामरा
५. घनगर्द - ऋषिकेश गुप्ते
६. अंधारवारी
७. हिटलरच्या खुनाचा कट
८. शिवराम
९. रत्नपंचक
१०. कार्वालो
११. The Hour of the Leopard
१२. ONLY TIME WILL TELL
१३. THE SINS OF THE FATHER
14. Best Kept Secret
15. BE CAREFUL WHAT YOU WISH FOR
१६. अंधारवारी - ह्रुषिकेष गुप्ते
१७. प्राण्यांचा डॉक्टर - विजय देवधर
१८. स्ट्रीट लॉयर - जॉन ग्रिशम
१९. उत्तरकांड - भैरप्पा
२०. कात
२१. मृत्युद्वार
२२. ऐसी रत्ने मेळवीन - धारप
२३. लास्ट फ्रंटीयर - मॅक्लिन
२४. नागासाकी - क्रेग कोली
२५. कोमा
२६. डार्कर साईड
२७. डिंभक - संजय डोळे
२८. अर्थाच्या शोधात
२९. गन्स ऑफ नॅवरॉन
३०. गोष्ट छोटी डोंगराऐवढी
३१. न्यायमंदीर - धारप
३२. कथा युद्धकौशल्याच्या
३३. फेलुदा कैलासातील कारस्थान
३४ फेलुदा - बंगाल टायगर
३५. व्योमकेश बक्षी
३६ प्रिझनर ऑफ बर्थ - जेफ्री आर्चर
३७. पावणेदोन पायांचा माणूस
३८. एका डेंटीस्टची बत्तीशी -संदेश मयेकर
३९. महाराणी ताराराणी
४०. डोंगरी ते दुबई
४१. भायखळा ते बँकॉक
४२. फेलुदा बादशहाची अंगठी
४३. प्रेमाचा रेणू
४४. मगरडोह
४५. Tigers for Dinner
४६. क्ष शिल्लक
४७. चाणक्य
४८. स्क्रीन टाइम
४९. मालगुडीचा नरभक्षक
५०. माधवी - विजया जहागीरदार
५१. ठगाची जबानी

वाचायला घेतली पण अर्धवट सोडली अशी

ड्रॅकुला, मेघदुत, घणाणतो घंटानाद, महाभारताचे रहस्य, डॉक्टर झिवागो, द वॉचमन, फ्रिडम अॅट मिडनाईट, थाऊजड स्प्लेंडीड सन्स, काईमेरा, गुदगुल्या, रेझोनन्स

वरती “ हिलबिली” बद्दल वाचलं. मागे एकदा घरात मुलाने हा शब्द मला शिकवला होता ते आठवलं. इकडच्या मिडल स्कूलमध्ये कुठलं प्रोजेक्टचं रिसर्च करताना त्याला धाकट्या भावाला तो शब्द चिडवायला वापरायला माझी परवानगी हवी होती आणि मी अरे देवा या वयात काय शोधतोय म्हणून डोक्यावर हात Happy
आता वरच्या दोन्ही पोस्ट पुन्हा वाचते Happy

वरच्या लिस्टmadhalं गोल्डा मायरचं पुस् तक मिळवायला हवं
शेयर केल्याबद्दल धन्यवााद. ___/\___

गोल्डा मध्ये खूप टायपिंग चुका आहेत
अशुद्ध शब्द न तपासता तसेच गेले आहेत
मेरिसन ग्रँडी- मेरिसन ग्रेडी- मेरिसन डॅडी.. असे टायपो पण आहेत
पण पुस्तक छान आहे, विशेषतः तिचे तरुणपण आणि ज्यू लोकांचा पॅलेस्टाईन बद्दलचा दृष्टिकोन छान मांडला आहे

Happy
बाबांना पुस्तक पाठवेन. तसंही ते रिटायर्ड शिक्षक आहेत. मग अजून मज्जा. Happy मी तिथून माझी लिस्ट “शब्द” मध्ये रेंगाळूनच पाहाते.

धन्यवाद. Happy

रोश व्हर्सस अ‍ॅडम्स - हे मूळ पुस्तक बरंच जुनं आहे (माझ्या माहितीनुसार किमान २५ वर्षांपूर्वीचं),
त्याचा मराठी अनुवाद गेल्या ४-५ वर्षात कधीतरी आला आहे.

ललिता-प्रीती, रोश विरूद्ध ॲडम्स नावाचं पुस्तक शाळेत असताना (90s) वाचलं होतं. तो बहुतेक अनुवादच होता. अलीकडे नव्याने अनुवाद केला असल्यास माहिती नाही.

मी देखील तेव्हाच वाचले. होस्टेलवर रात्री उशीरापर्यंत त्यानिमित्ताने बर्‍याच चर्चा वगैरे झाल्या होत्या.

अच्छा, मग मला वाटतं ४-५ वर्षांपूर्वी त्या अनुवादाची नवी आवृती आली असावी. कारण ते नवंकोरं प्रकाशित झालेलं पुस्तक पाहिल्याचं आठवतंय.

मी वाचायला घेतलं गोट डेज
ते दोघे प्रयत्न करून स्वतःला तुरुंगात टाकून घेतात तिथवरच वाचलंय
इंटरेस्टिंग आहे.

गोट डेज ची सुरुवातीची काही पानं वाचली. खूप वाईट आणि उदास वाटलं. असे किती जण मोहाला बळी पडून फसत असतील. तरी आता सरकार याबाबत टिव्हीवर जाहीराती दाखवतं.
आणि तरीही खूप निरागसपणे, कुठेही जास्त संताप किंवा ग्रज न दाखवता लिहीलंय. त्याने अजूनच पोटात कसंतरी होतं.
हे पुस्तक सुचवल्याबद्दल धन्यवाद प्रीती.
आता मला तो माणूस सुखरुप सुटलेला दिसेपर्यंत वाचायलाच हवं.

राजहंस प्रकाशनने स्वतःचं ॲप काढलंय - अँड्रॉइड आणि आय ओएस दोन्ही. त्यावर बरीचशी पुस्तकं ई बुक स्वरूपात आहेत. मी ट्रायल म्हणून त्यांची एका महिन्याची लायब्ररी मेंबरशिप घेतली आहे. यात तुम्ही कितीही पुस्तकं वाचू शकता. गेल्या पाच दिवसांत मी तीन पुस्तके वाचली - चौथे सुरू आहे.
यातील सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे राजहंसच्या ॲप मध्ये असलेला रिडर! त्या ई बुक आवृत्तीला पृष्ठक्रमांक नाहीत आणि जर वाचताना मध्येच तुम्ही ॲप बंद केलत तर पुढच्या वेळी पुन्हा एकदा पहिल्या पानावर उघडतं Sad इतका good for nothing reader असलेलं ॲप राजहंसने का आणावं हे मला पडलेलं कोडं आहे. पण चांगली बाजू ही की खूप छान कलेक्शन ई बुक स्वरूपात आता उपलब्ध तरी आहे. कदाचित पुढच्या अपडेट मध्ये या रिडर मध्ये काही सुधारणा केली जाईल अशी अपेक्षा आहे. असे प्रत्येक प्रकाशन संस्थेने ॲप काढले तर किती छान होईल! इच्छुकांनी जरूर राजहंसचे ॲप वापरून पहा!
तर मी ॲपवर वाचलेली पुस्तकं -
१. ॲट एनी कॉस्ट - अभिराम भडकमकर - टिव्ही मालिका आणि त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांवर आधारित कादंबरी आहे. चांगली गोष्ट फुलवली आहे.
२. इन्शाअल्लाह - अभिराम भडकमकर - कोल्हापूरातील एका मुस्लिम वस्तीत घडणाऱ्या घडामोडी आणि बाहेर जगात घडणाऱ्या घटनांचे वस्तीत उमटणारे प्रतिसाद अशी कथा आहे. ही कादंबरी मला अधिक आवडली.
दोन्ही बऱ्यापैकी शब्दप्रधान आहेत आणि कथानक आणि पात्रे केवळ विविध विचार मांडता यावेत म्हणून योजलेत पण तरीही दोन्ही पुस्तकं वाचनीय आहेत कारण आपल्या आजच्या सद्यस्थितीचं प्रतिबिंब त्यात पाहता येतं.
३. सौर आरोग्य - दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमा कुलकर्णी - आयुर्वेद आणि पर्यावरणस्नेही जीवनशैली या विषयावरचे पुस्तक आहे. मला या विषयात रस असल्याने पुस्तक आवडले.
४. हेडहंटर - सुमेध वडावाला (रिसबूड) - नुकतेच सुरू केले आहे. गिरीश टिळक यांचा हेडहंटर म्हणून प्रवास या पुस्तकात मांडला आहे. जेवढे वाचले आहे तेवढे छान आहे.

हिलबिली एलिजी वर नेटफ्लिक्सने सिनेमा काढला आहे. एमी अ‍ॅडम्स ही यशस्वी कलाकार आहे. मी फक्त ट्रेलर पाहिले.
ट्रेलर पाहून अति नाट्यमय केलेला टिपिकल हॉलिवुडीय चित्रपट झाला आहे असे वाटले.

धन्यवाद जिज्ञासा. फीडबॅक देण्याकरता काही सोय आहे का त्यात? हे "व्हर्जन १" प्रॉब्लेम्स आहेत असे समजून चालू. पुढे फिक्स करतील होपफुली.

अ‍ॅट एनी कॉस्ट छान आहे. मी लिहीले आहे त्यावर सेपरेट बाफ काढून. व पूनमचाही लेख आहे. हेडहंटर वाचले आहे पण आता लक्षात नाही.

फा, हो फिडबॅक देता येतो ॲप मध्ये. मी रीडर बद्दल फिडबॅक दिला लगेच. मला हे ॲप यशस्वी व्हायला हवंय कारण ही खूपच छान सोय होईल मग.
मी शोधते ॲट एनी कॉस्ट चा तुझा आणि पूनमचा धागा! मला तिथे नीट लिहिता येईल. यात मी अगदी त्रोटक लिहिलंय.

जोस्टेन गार्डरची Sophie's World ही कादंबरी एवढ्यात पुन्हा एकदा वाचली. तिचा शेवट चांगलाच खतरनाक आहे. पाश्चात्य तत्वज्ञानाची गोष्टींतून ओळख करून घ्यायला ही सुंदर कृती आहे. तुमच्या घरातील/ओळखील टिनएजर्स मंडळींना जरूर वाचायला भेट म्हणून द्या.

जिज्ञासा, हेडहंटर पुस्तकपरिचय https://www.maayboli.com/node/28526
(माझी रिक्षा आहे Proud लोकरंग पुरवणीत हा लेख प्रकाशित झाल्यावर सुमेध रिसबूड आणि गिरीश टिळकांचा फोन आला होता.)

फारएण्ड, तुझ्या धाग्याची लिंक इथे देशील का? मी वाचलं असणार, पण नेमकं आठवत नाही.

वर्षा, Happy
ललिता प्रीती, मस्तच! तुझं परीक्षण वाचते हेडहंटरचं.
ही फारेंडच्या ॲट एनी कॉस्ट च्या परिचयाची लिंक - https://www.maayboli.com/node/53337
माझ्या त्या धाग्यावर पोस्ट्स आहेत हे मी साफ विसरले होते!

जिज्ञासाने प्रतिक्रिया दिल्याने तो धागा वर आला आहे. थॅन्क्स जिज्ञासा.

हेडहंटर मी नंतर वाचले पण आता जाम आठवत नाही.

जि, बुकगंगा चं पण अ‍ॅप आहे आणि राजहंस अ‍ॅप मध्ये असलेल्या सर्व त्रुटी त्यात पण आहेत. एवढ्यात काही सुधारणा करतील असं वाटत नाही.

युद्ध कौशल्य
दुसऱ्या महायुद्धातील महतवाच्या व्यक्तिमत्वांची ओळख - चर्चिल हिटलर स्टालिन रुझवेल्ट
वाचनीय आहे

Pages