मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसऱ्या महायुद्धातील रिपोर्टिंगवर चर्चिलने कलेले/लिहिलेले दोन्ही भाग वाचले आहेत.

राय, बरोबर! काही वर्षांपूर्वी बुकगंगाचे डेस्कटॉप ॲप वापरून पाहिले होते. त्यातही अशाच अडचणी होत्या. आता त्यांच्या मोबाईल ॲप मध्ये पण त्याच अडचणी असतील तर कठीण आहे!

बुकगंगा चे अ‍ॅप फार महान नाही पण अगदी वाईटही नाही. मी काही महिन्यापूर्वी वापरत होते तेव्हा त्यांचे सुरुवातीचे लोगो अ‍ॅनिमेशन चालू झाले की अ‍ॅप अडकायचे. (म्हणजे इंटर्नेट नसताना अ‍ॅप चालू करुन ते मुख्य पानावर आले की इंटर्नेट चालू करुन विकत घेतलेली पुस्तकं डाऊनलोड करायची असं करावं लागायचं.)

माझ्या त्या धाग्यावर पोस्ट्स आहेत हे मी साफ विसरले होते! >>> माझ्या पण आहेत आणि मी पण विसरले होते Lol

Sophie's World किंडलवर बघते. हे नाव खूप ऐकल्यासारखं, ओळखीचं वाटतंय, पण रेफरन्स अजिबात आठवत नाही.

अनु, गोट डेज पूर्ण वाचल्यावर आवडेल तुला नक्की.

गोट डेज पूर्ण केले. आवडले. मध्ये मध्ये खूप वाईट वाटले. नबिल च्या कॅस्ट्रेशन च्या वेळी. आणि हकिम मेला तेव्हा.आणि याचा हात मोडतो तेव्हा.
खरंच एक हॉलीवूड पिक्चर बनावा अशी कथा आहे.
हे पुस्तक लिहूनही बरीच वर्षं झाली असतील. अजूनही या बेकायदेशीर स्लेव्हरी बद्दल कोणी काहीच केले नाही का?
जेल मधून आपले गुलाम ओळखून परत घेऊन जाणार्‍या मालकांवर. आणि हे बघत बसणार्‍या पोलीसांवर काहीच अ‍ॅक्शन झाली नाही का?
नजीब सध्या काय करतो?
असे अनेक प्रश्न डोक्यात आहेत.

मूळ पुस्तक लिहून ७-८ वर्षं झाली असावीत. नजीब बाहरीनमध्येच नोकरी करतो. लेखकाला तो तिथेच भेटला.

रिडर अ‍ॅप फ्री आहे, अँड्रॉइड वा अ‍ॅपल आय-ओएस वर फुकटात उतरवून घेता येते - जगातल्या इतर बहुसंख्य अ‍ॅप्स सारखे.
पण पुस्तके मात्र विकतच घ्यावी लागतात.

अ‍ॅमेझॉनचे किंडल अ‍ॅप पण फ्री आहे अँड्रॉइड-आयओएससाठी. पुस्तके तिथेही विकत घ्यावी लागतात (किंवा किंडल अनलिमिटेडचे सभासदत्व). किंडल हे पुस्तक वाचायचे उपकरण घ्यायचे असेल तर ते पैसे देऊन घ्यावे लागते.

>>> अ‍ॅमेझॉनचे किंडल अ‍ॅप पण फ्री आहे अँड्रॉइड-आयओएससाठी. >>>
- हो.
-पण किंडलच्या स्क्रीनचा अनुभव मोबाइल app मधून येत नाही. (तुमच्या मोबाईलचा स्क्रीन ग्रेट असेल तर तसे दिसेल.)

>>>>पण पुस्तके मात्र विकतच घ्यावी लागतात. >>>>
~ पर्याय -
App घेतल्यावर एक Kindle folder दिसू लागेल मोबाइलच्या मेन सिस्टमला. इतर पद्धतीने फ्री डाउनलोड केलेले पुस्तक जर या Kindle folder मध्ये टाकले तर माझ्या किंडलच्या appच्या लाइब्रीत उघडते. प्राइम मेंबरशिपलाच ही सोय दिली आहे का माहिती नाही. मग तिथे टाकल्यावर मेन किंडलला जाते का चेक करा.

इतर ईबुक रीडर apps आणि किंडल app चा फरक विशेष नाही. Moonplus reader , librera मध्ये पुस्तकं ऐकता येतातच.

सध्या मराठी इलियड वाचत आहे, शा नि ओक यांनी भाषांतरित केलेलं. आधीच सगळी ग्रीक विचित्र नावं, त्यात ते लोक बर्‍याचदा एकमेकांना नावाने हाक न मारता, हे अ‍ॅट्रियसपुत्रा वगैरे म्हणतात, (आपल्या पार्थ, कौन्तेय सारखं), आणि त्यावर कडी म्हणजे ग्रीक आणि रोमन नावांची अदलाबदली. ओक एकदा अ‍ॅथिनी म्हणतात आणि एकदा मिनर्व्हा म्हणतात, दुसर्‍या एकीला कधी अ‍ॅफ्रोडाइटी म्हणतात कधी व्हिनस! डोक्याची मंडै झालीये निसती! कुणी इंग्रजी किंवा ग्रीकमध्ये वाचलं आहे का? त्यातही असाच गोंधळ आहे का?

Greek mythology stories शोधा podcast addict किंवा podcast guru appsवरती. सोप्या भाषेत एकेक गोष्ट सांगितली आहे. दोन्ही apps वर डाउनलोड फॉर ओफलाईन आहे. तेही उपयोगी. प्रवासात वगैरेसाठी.
>>अ‍ॅफ्रोडाइटी म्हणतात कधी व्हिनस>> वेगळ्या आहेत.
त्यांच्या पुराणकथांचा मध्य म्हणजे झिऊस आणि त्याची कारस्थानं. देवतांचा आणि अर्धदेवतांचा (सेमिगॉड्स?) उपद्वयाप / मत्सर .शिवाय स्वर्ग - पृथ्वी - पाताळ आणि ओरकल किंवा आकाशवाणी ही सर्वोच्च.
एकेक गोष्ट वाचत जाणे. आपल्या पुराणांप्रमाणेच असंख्य कथानकं - उपकथानकं आहेत. सर्वच लक्षात ठेवणं अवघड.

धन्यवाद Srd. तुम्ही सांगितलेले apps पाहतो.
ह्या ग्रीक देव-देवतांची गंमतच आहे. ते आपल्या देवांप्रमाणे सद्गुणांचे पुतळे नाहीत. त्यांचे स्वभाव माणसांसारखेच आहेत. फक्त त्यांना सुपर पॉवर्स आहेत इतकेच. त्यांच्या स्वभावामुळेच सगळ्या मजा मजा होतात. आता मी ट्रॉय पिक्चर परत पाहिला तर त्यात त्यांनी देव-देवतांचा सगळा भाग बदलून टाकला आहे.

ग्रीक आणि रोमन देवांच्या साम्यरूपाबद्दल वाचले आहे. पण तुम्ही म्हणता की दोन्ही वेगळे आहेत. ते फरकही वाचायला आवडतील.

हे अ‍ॅट्रियसपुत्रा वगैरे म्हणतात >>> Happy अशा पुस्तकांमधे काही पानांनंतर कोण कोणाचा कोण आहे याचे सॉलिड जम्बलिंग होते.

ओडिओ बुक्सची शोधाशोध आणि
Apps चा गोंधळ नको असेल तर ही साइट कुठूनही मोबाइलध्ये/ संगणकात पाहा.
http://www.loyalbooks.com/

http://www.loyalbooks.com/genre/History

इथे एक ओडीओ बुक्स रिडिरेक्ट होईल archive _dot_ org ला.
उदाहरणार्थ -
Heros - first preface -audio Greece to Alexander audio book

Player च्या शेवटी तीन टिंबे दिसतात त्यात डाउनलोड पर्याय आहे.

ग्रीक स्वत:ला हेलेनस( किंवा अथीनीज वगैरे) म्हणतात पण रोमन लोक त्यांना ग्रीक म्हणायचे त्यावरून इंग्रजी भाषेत ग्रीक झाले. देशाचे नाव ग्रीस.

खरं सांगायचं तर मला मराठीतच हे वाचायची इच्छा आहे. ग्रीक भाषा येत असती तर त्यात वाचलं असतं, कारण मुळात त्या भाषेत ते आहे. पण इंग्रजी नको.

मान्य. पण. . . . .

मराठीतली अगदी युद्धांवरील, इतिहासांवरीलही पुस्तकं आधारित अथवा भाषांतरीतच असतात. स्वत:च्या अनुभवांवर फारच थोडी. पुन्हा अमुक एक पुस्तक वाचक घेतील/वाचतील का? ही धाकधुक ठेवून प्रकाशक अंगावर घेतो.
बाबरनामा,शाहनामा ( पर्शिअन/तुर्की) किंवा एकहजारएक गोष्टी (अरेबिक) वगैरेही मूळ हस्तलिखितं ब्रिटिशांकडे आहेत. त्यांचं इंग्रजी भाषांतर झाल्यावर त्यांचं मराठी करावं लागतं.

मराठी उपलब्धता कशी सिमित होते. विषयांची विविधताही संकुचित राहाते.

मकरंद साठे लिखित 'गार्डन ऑफ इडन ऊर्फ साई सोसायटी' हे पुस्तक वाचले. गार्डन ऑफ इडन ही पुण्याबाहेरील एक उच्चभ्रु वसाहत. ह्याच्या आवारात असलेल्या साई मंदिरामुळे ह्याला लोकं साई सोसायटी असं म्हणायला लागतात. पुस्तकातली कथा ही ह्या वसाहतीत रहाणार्‍या लोकांसंबधी किंवा थेट त्या वसाहतीसंबंधी नाही पण तरीही कथेचा ह्या वसाहतीशी संबंध आहे. सहा पात्रे आणि त्यांची पूर्वायुष्ये ह्यांबद्दल सांगत मुळ कथा पुढे सरकते आणि शेवटी सगळे धागे एकत्र गुंफले जातात.
हे पुस्तक वाचताना मला काही ठिकाणी 'दंशकाल'ची आठवण झाली. फक्त हे पुस्तक दंशकाल इतकं भडक नाहीये. 'दंशकाल' वाचतना मला एक गोष्ट जाणवली होती ती म्हणजे चालू कथानकात मध्येच एखादं पिल्लू सोडून देऊन त्याचा पुढे मोठा संदर्भ येतो. ह्यातही थोडसं तसं आहे फक्त ह्यात लेखक अगदी स्पष्टपणे सांगतो की ह्याबद्दलचे आणखी तपशील पुढे येतीलच पण आत्तापुरतं एव्हडं माहिती असू द्या. बाकीच्याची आत्ता गरज नाही. ( म्हणजे ११ वीच्या फिजीक्समध्ये इंटीग्रेशनचा संदर्भ आला की तेव्हा सांगायचे आत्तापुरतं एव्हड फक्त माहिती असू द्या, पुढच्या वर्षी इंटीग्रेशन शिकलात की नीट कळेल.. तसं काहितरी Happy ) अजून एक इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे कथेतले सगळे काळाचे संदर्भ भारतातल्या राजकीय, सामाजिक घटनांच्या संदर्भाने येतात (म्हणजे गांधीहत्येच्या एक वर्षानंतर, शिख हत्याकांडाच्या सुमारास, मोदी सरकार निवडुन आलं तेव्हा वगैरे. कथा सांगता सांगता भारतातल्या राजकीय स्थित्यंतरांबद्दलही भाष्य येतं फक्त त्यातून अधेमधे (स्युडो)सेकुलिरीजम डोकावतं पण ते असो. Happy
एकंदरीत कादंबरीतली 'कथा', सांगण्याची शैली आणि शेवटची गुंफण ह्यामुळे वाचायला आवडली. ह्यावर 'ल्युडो' किंवा 'बेबेल' टाईलचा सिनेमा निघू शकेल.

मकरंद साठे म्हणजे ऑपरेशन यमूचे लेखक का? ते पुस्तक पण असंच काहीसं आहे. वाचलं होतं तेव्हा काहीतरी सॉलिड वेगळं, भन्नाट वाचल्यासारखं वाटलं होतं.

राजहंस प्रकाशनने स्वतःचं ॲप काढलंय - अँड्रॉइड आणि आय ओएस दोन्ही. त्यावर बरीचशी पुस्तकं ई बुक स्वरूपात आहेत. मी ट्रायल म्हणून त्यांची एका महिन्याची लायब्ररी मेंबरशिप घेतली आहे >> जिज्ञासा अ‍ॅप चे नाव राजहंस प्रकाशन असे आहे का ? मला मेंबरशिप चा पर्याय दिसत नाही . बहुधा लोकेशन बघून ठरवत असावेत. बुक क्लब असा पर्याय दिसतोय पण त्यात विकत घेण्याबद्दल सूचना आहेत फक्त म्हणून विचारतोय.

अलीकडे वाचलेल्या fiction बद्दल.

Dan Brown- Origin

Da Vinci Code चा Robert Langdon यातही आहे. सस्पेन्स, रहस्य ,कोडं सोडवणं वगैरे नेहमीचा मालमसाला आहे. ब्राऊनची नेहमीची आवडती थीम- christianity-organized religion- हेही आहे. पण जोडीला science , technology, artificial intelligence, big bang theory, atheism, faith, mythology, architecture याची जी एकत्रित भेळ बनवली आहे ती टेस्टी जमली आहे. स्पेनची वर्णनं इतकी चित्रदर्शी आहेत की (करोना गेल्यावर) पहिले प्रथम तिथेच फिरायला जावंसं वाटेल.

Elizabeth Gilbert -City of Girls

ही माझी अतिशय आवडती लेखिका. सिटी ऑफ गर्ल्स ही तिची कादंबरी वाचली. 40 च्या काळात न्यू यॉर्कमधल्या एक थिएटर कंपनीत कपडेपट करणारी नायिका.एकीकडे शो बिझनेस आणि फ़ॅशनची क्रिएटिव्ह , मुक्त दुनिया. दुसरीकडे क्षितिजावर येऊन थांबलेले महायुद्धाचे ढग. सुरुवातीचा भाग जरा उथळ वाटतो, नायिकेची प्रकरणं आणि scandals वर बराच फोकस असल्यामुळे. मधला भाग सर्वात आवडला- महायुद्धाचा काळ चांगला उभा केला आहे. शेवटचा भाग पुन्हा संथ होतो. एकूणात बायकांना आवडेल.पुरुषांना आवडेल की नाही माहीत नाही. मला 40s मधील न्यूयॉर्क वगैरे historical fiction आवडतं.

येस आय एम गिल्टी-मुन्नवर शाह वाचलं.
पुस्तक वाचताना/वाचुन झाल्यावर एक अनामिक दडपण होतं मनावर. भिती वाटली. भयंकर अभद्र वाटत होतं तसंच स्वाधीन दैवाधीन गोष्टीवर मनात विचारचक्र सुरु झालं.
पुस्तकाच्या शेवटी शाह - गोगटेंची पत्रं आहेत. शरद गोगटेंन पुस्तक प्रकाशित करतना केल्यानंतर बर्‍याच अडचणींना सामोरं जावं लागलं ते ही लिहिलंय.

बापरे.
ते पुस्तक अगदी वाचवत नसेल ना? याच हत्याकांडावर सुहास शिरवळकरांची एक कादंबरी होती. ती वाचल्यावर पण बरेच दिवस रात्री काहीही लहान आवाज झाला तरी दचकून जागी व्हायचे.
किंडल वर इ बुक आहे का यस आय अ‍ॅम गिल्टी? बघते.

असामी, हो, राजहंस चा लोगो आहे ॲपचे चित्र म्हणून. आत्ता माझं ॲप उघडून बघते आहे तर मलाही माझ्या सध्याच्या मेंबरशिप विषयी काही दिसत नाहीये. पुस्तकं वाचता येत आहेत मात्र (थँक गॉड)! येत्या आठवडाभरात एक अपडेट येणार आहे ॲपचा असं कळलंय. बघूया.

पुस्तक वाचताना/वाचुन झाल्यावर एक अनामिक दडपण होतं मनावर. भिती वाटली. भयंकर अभद्र वाटत होतं
>>>
यंदाच्या पुण्यभूषण दिवाळी अंकात शाम भुतकरांचा जक्कलवरचा लेख आहे. अभिनव कॉलेजमध्ये भुतकर आणि जक्कल मित्र होते. मात्र जक्कलच्या इतर उद्योगांबद्दल भुतकरांना फारशी माहिती नव्हती. हत्याकांडानंतर आधीच्या एक-एक घटनांची संगती कशी लागली ते त्यांनी लिहिलं आहे. तो लेख वाचूनही असंच अनामिक दडपण येतं.

शाम भुतकरांचा एक लेख इथे मला वाटतं अतुल पाटील यांनी शेअर केला होता. आठवणीतले पुणे धाग्यावर. डेंजर अभद्र असं काही तरी वाटतं तो वाचून. मला तो लेख वाचेपर्यंत या हत्याकांडाची फारशी माहिती नव्हती. फक्त ऐकून होते.

भूतकरांनी चिन्हच्या एका अंकातही जक्कलबद्दल लिहिले आहे.
>>> हो, मला वाटतं तोच लेख पुण्यभूषणमध्ये पुन्हा प्रकाशित झाला आहे.

Pages