Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चौघीजणी चे कथानक नंतर थोडं
चौघीजणी चे कथानक नंतर थोडं विस्कळीत होतं
मी खूप वर्षांपूर्वी वाचलेली
बेथ चा मृत्यू फार चटका लावून गेला
बेथ चा मृत्यू फार चटका लावून
बेथ चा मृत्यू फार चटका लावून गेला...अगदीच.
पुन्हा Amy च्या मुलीचं नाव पण बेथ ठेवले आणि तीही आजारी असायची असे आहे कथेत मगं तर फारच वाईट वाटले.
चौघीजणी विस्कळीत वाटण्याचं एक
चौघीजणी विस्कळीत वाटण्याचं एक कारण म्हणजे पुस्तकाचे 2 भाग एकाच भागात केले आहेत.मध्ये टाईम लीप पण आहे.
मला विस्कळीत वाटलं नाही.(एकंदर पुरुषांना चौघीजणी आवडत नाही, बायकांना आवडते असं काही आहे का?)
एकंदर पुरुषांना चौघीजणी आवडत
एकंदर पुरुषांना चौघीजणी आवडत नाही, बायकांना आवडते असं काही आहे का? >>>
अस काही नसाव , मला आवडलं चौघीजणी
बेथ चा मृत्यू फार चटका लावून
बेथ चा मृत्यू फार चटका लावून गेला > हो आणि तिच्या चांगुलपणामुळे तिच्यावर ही वेळ येते त्यामुळे जास्तच वाईट वाटत
जस्ट एक आठवलं - Little Women/चौघीजणी वर loosely बेस्ड एक हिंदी वेब सिरीज आली होती 'हक से ' नावाची. काश्मीर पार्श्वभूमीवर .
एकंदर पुरुषांना चौघीजणी आवडत
एकंदर पुरुषांना चौघीजणी आवडत नाही, बायकांना आवडते असं काही आहे का?>>>
नाही हो, मला आवडली आणि मी मुद्दाम बायकोला वाचायला दिली त्याही चार बहिणी आहेत पण कहर म्हणजे तिला नाही आवडली फारशी
Ravan and Eddie ( kiran
Ravan and Eddie ( kiran nagarkar ) वाचलं.
माझगाव चाळीतील दोन प्रातिनिधिक कुटुंबातील मुले घेऊन चाळीतले जीवन चितारले आहोत. सेक्स प्रसंग डिटेलमध्ये वर्णन करण्यामागे परदेशी वाचकांची मागणी लक्षात घेऊन लिहिले असावेत. बाकी नगरकर ( सेप्टेंबर २०१९ वारले) वर्णन करण्यात पटाइत आहेत. भाषेवर चांगली पक्कड आहे. पण एक कादंबरी म्हणून अर्ध्या भागानंतर घटना भरल्या जात आहेत असं वाटू लागलं. शेवट कुठे करावा याचा काही आराखडा दिसत नाही. चाळ जीवनाचे रेकॉर्ड म्हणू शकतो. इतर पात्रे, पारशी, आरएसएस शाखा प्रकरण, मुलांचा वात्रटपणा, पोर्तुगीज आणि इंग्रजांचा संदर्भ इत्यादी वाचल्यावर नगरकर इतिहास रंजक करून लिहू शकतात असे वाटते. एका ठिकाणी माहिती देताना 'you can skip this' असंही आहे.
पुस्तकाच्या शेवटी "या कादंबरीवर हिंदी सिनेमा करता येईल का यावर निर्मात्यांनी विचार केला आणि सोडून दिले." म्हटलं आहे.
कादंबरी अर्धवट वाटली तशी लेखकासही वाटली कारण त्याचे आणखी दोन भाग ( sequel ) लिहिले.
मला माझीच कमेंट वाचून गोलमाल
मला माझीच कमेंट वाचून गोलमाल मधली 'दही वडा आवडणं बंद झालं म्हणजे तू पुरुष बनलीस किंवा बाईच राहून प्रेमात पडलीस' वाली अगाध थिअरी आठवली.
https://youtu.be/oPdHk0x0vpE
चौघीजणी ज्यांना पुस्तकात खूप वेगाने हॅप्पनिंग कहाणी हवं असतं अश्याना आवडत नाही असं असेल.
Srd, रावण आणि एडी बद्दल मलाही
Srd, रावण आणि एडी बद्दल मलाही असेच वाटले होते
गोलमाल मधली 'दही वडा आवडणं
गोलमाल मधली 'दही वडा आवडणं बंद झालं म्हणजे तू पुरुष बनलीस किंवा बाईच राहून प्रेमात पडलीस' वाली अगाध थिअरी आठवली. >>>
रावण आणि एडी मी पण कंटाळून सोडून दिली.
मी नगरकरांची ककोल्ड घेतली
मी नगरकरांची ककोल्ड घेतली होती वाचायला
आणि इतका अगाध होतो की मला त्या शब्दाचा अर्थही माहिती नव्हता
कोणीतरी असेच बोलता बोलता सुचवलेली पुस्तक गृपात
आणि आमच्या ऑफिस ची ऑनलाइन लायब्ररी ची मेम्बर्शीप होती त्यावरून मागवलेलं
भलतंच पुस्तक निघालं ते म्हणजे ज्यांनी वाचलं नाही त्यांनी उगाच भुवया उंचावल्या
प्रत्यक्ष इतकाही स्फोटक वगैरे काही नव्हतं
Cuckold free download घेतली
Cuckold
free download घेतली . वाचतोय.
स्फोटक वगैरे नसली कथा तरी राजस्थान आणि मीराबाई हे फार उत्सुकता वाढवणारे विषय आहेत. एक पहिले प्रकरण वाचले. सर्वच राज्यांत राजकुमारांत सत्तेसाठी संघर्ष, राजकारण चालू असते. कुणी लाडका,कुणी ठरलेला,कुणी प्रतापी पण जनतेत नावडता, कुणी मामाकडून प्रभावी, कुणी परकीयांशी हातमिळवणी गुपचुप करून सत्तेचा पेढा मिळवू पाहणारा. दहा घोडे गुजरातच्या सुलतानाकडे पाठवून विक्रमादित्य त्याच्या मदतीने सत्ता मिळवायच्या प्रयत्नात. पण तो डाव महाराजकुमार ( भोजराज - मीराबाईचा नवरा)हाणून पाडतो.
संवादरूपाने मांडल्याने हे प्रकरण तर खास जमलंय.
_________________________________
नगरकरांची पहिली कादंबरी सात सक्कं त्रेचाळीस (१९७४)- नंतर इंग्रजीत seven sixes are fortythree (1980). वाचायला घेतली. अर्ध्यावर वाचल्यावर सोडली. पात्रं ,प्रसंग, शहरं ,घटना यांची एवढी गुंतागुंत आहे की काही सूत्र लक्षात राहात नाही.
सत्तेचा पेढा <<< हा
सत्तेचा पेढा <<< हा शब्दप्रयोग आवडला.
चौघीजणी आणि Little Women
चौघीजणी आणि Little Women दोन्ही खूप आवडतात. Little Women मधील Under the garret या कवितेचे शांताबाईंनी अतिशय सुरेख भाषांतर केले आहे. Little Women वाचून त्याचे पुढचे दोन भाग Little Men आणि Jo's Boys वाचले पण सपशेल निराशा झाली. दोन्ही पुस्तकं खूप कंटाळवाणी वाटली, ती का लिहिली असाही प्रश्न पडला.
भा रा भागवतांच्या अनुवादाबद्दल सहमत! ज्यूल व्हर्न, वेल्स, रॉबिन हूड अजूनही त्यांची भाषांतरं वाचायला जास्त मजा येते
भा रा भागवतांच्या
भा रा भागवतांच्या अनुवादाबद्दल सहमत >> भारां भाषांतरापेक्षा ही रुपांतर अधिक सरस करत असत. विजय देवधर भाषांतर सुरेख करत. फक्त त्यांचा जॉनर लिमिटेड होता.
गाडगीळांची टॉम सॉयर चे रुपांतर चांगले होते. बंडखोर बंडू किंवा ... चंदू बहुधा. नाव आठवत नाही नक्की.
हो खरं तर इंग्रजी वाचण्याची
हो खरं तर इंग्रजी वाचण्याची आवड विजय देवधर यांच्यामुळेच झाली. त्यांनी भन्नाट पुस्तके भाषांतर केली आहेत आणि त्यामुळे ती मूळ इंग्रजीत वाचण्याचे कुतुहल निर्माण झाले.
ते आणि रविंद्र गुर्जर, बरीच भाषांतरे वाचली आहेत
त्यातल्या भाषेचा बाज वेगळा
त्यातल्या भाषेचा बाज वेगळा आहे >>>> भाषेचा बाज 'वेगळा' असणं आणि कृत्रिम असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना? वर मी एक उदाहरण दिलं आहे. शिवाय बाकी काही सुद्धा वाचतना खटकली होती.
ते आणि रविंद्र गुर्जर, बरीच
ते आणि रविंद्र गुर्जर, बरीच भाषांतरे वाचली आहेत..
मीही अगदी हेच म्हणणार होते.. त्यांचे 'सत्तर दिवस' , युद्धस्य कथा (बहुतेक ) आणि 'हिरोशिमा' वाचून काटा आला होता.
वडिलांना Papillon खूप आवडते. मीही वाचले होते थोडे अंगावर आले पण. तेही उत्तम आहे.
हिरोशिमा - भा द खेर याचं
हिरोशिमा - भा द खेर याचं
आणि वॉर्सॉ ते हिरोशिमा - वि. स. वाळिंबे
नाझी भस्मासुराचा उद्यास्त - वि. ग. कानिटकर
ही सगळी पुस्तके मूळ भाषेत वाचताना अजून मजा येते.
भाषांतर उत्तम आहे यात वादच नाही
विशेषत सध्याची काही भाषांतरीत पुस्तके वाचली तर वेगळ्या अर्थाने काटा येतो अंगावर.
फारच भयानक
पटकन सांगता येईल असे एडमंड हिलरी चे शिखरावरून
शाळकरी वयात वाचली असल्याने
शाळकरी वयात वाचली असल्याने पूर्ण विसरले होते. Thanks.
Papillon आहे फक्त बरोबर..
नाझी भस्मासुराचा उद्यास्त -
नाझी भस्मासुराचा उद्यास्त - वि. ग. कानिटकर
>>>
हे भाषांतर नाहीये, किमान कानिटकरांनी विल्यम शिररच्या पुस्तकाचे भाषांतर आहे असे म्हटलेले मला आठवत नाही.
त्या पुस्तकावर लिहिले आहे का कुठे की हे भाषांतर आहे म्हणून
निम्म्या पुस्तकात तर जशीच्या
निम्म्या पुस्तकात तर जशीच्या तशी वाक्ये भाषांतरीत केली आहेत. आणि मूळ इंग्रजी वाक्ये पण सोबत दिली आहेत.
अजून वेगळं काय लिहायलं हवं?
हे भाषांतर नाहीये, किमान
हे भाषांतर नाहीये, किमान कानिटकरांनी विल्यम शिररच्या पुस्तकाचे भाषांतर आहे असे म्हटलेले मला आठवत नाही.
त्या पुस्तकावर लिहिले आहे का कुठे की हे भाषांतर आहे म्हणून >> मला आठवत नाही पण वाचताना मला तरी खूपच साम्य जाणवलेले अगदी नावासकट.
रविंद्र गुर्जर ह्यांचे अनुवाद चांगले होते हे खरय पण भारा किंवा देवधारांएव्हढे सराईत वाटत नसत (अर्थात खटकत पण नसत इतरांसारखे हेही तितकेच खरेय) - पॅपिलॉन नि बँको पटकन आठवतात.
या लेखाची बरीच पानं झाली आहेत
या लेखाची बरीच पानं झाली आहेत.
गाजलेल्या / प्रसिद्ध पुस्तकांबद्दल दहा ओळींत किंवा थोडक्यात कुठे आहे ते शोधायचं आहे.
वा, वा! बर्याच दिवसांनी या
वा, वा! बर्याच दिवसांनी या धाग्यावर भरपूर पोस्टी पाहून गहिवरून आलं.
त्या पुस्तकावर लिहिले आहे का कुठे की हे भाषांतर आहे म्हणून >>> बहुतेक नाही लिहिलेलं. (शिररच्या पुस्तकावर आधारित - असं वाचल्याचं मला आठवतंय.)
रावण अँड एडी - किंडलवर विकत घेऊन ठेवलंय. सध्या गॉन विथ द विंड वाचते आहे. ते झालं की याचा नंबर आहे.
'ककल्ड'चा मराठी अनुवाद प्रकाशित होणार होता तेव्हा त्यातला एक भाग लोकरंग पुरवणीत आला होता. त्यावरून पुस्तक वाचावंसं वाटलं होतं. पण अजून वाचलेलं नाही. आता वाचलं तर बहुतेक मूळ इंग्रजी पुस्तकच वाचेन.
प्रिती, तू खरे तर पुस्तकाचे
प्रिती, तू खरे तर पुस्तकाचे भाषांतर या विषयावर लेख लिहायला हवा.
विजय देवधर, रवींद्र गुर्जर
विजय देवधर, रवींद्र गुर्जर +१११

अकरावी -बारावी मध्ये त्यांची बरीच पुस्तकं वाचली होती.
सिडने शेल्डन ची पण काही पुस्तक त्यांनी अनुवादित केली आहेत. Bloodline चा अनुवाद वाचला होता.
पुमग्र मध्ये लेखकांच्या नावाचे ड्रॉव्हर्स आहेत/होते, तिथे हा स्टॊक सापडायचा
सत्तर दिवस, डेझर्टर,सिसिलिअन, पॅपिलॉन,बॅन्को
इंग्रजी पुस्तकं न समजण्याचे दिवस
श्रद्धा - अगदी अगदी
श्रद्धा - अगदी अगदी
मी पण तिथेच ही सगळी पुस्तके वाचली आहेत
त्या ड्रावर मधून लेखक आणि त्यातून त्यांची पुस्तके शोधणे, मग तो नंबर काढून तिथल्या माजोरी लोकांकडे देणे हा एक भन्नाट अनुभव होता
हे उपलब्ध नाही ते नाही असे दोन चार वेळेला झाल्यावर मी एक दिवस घालवून एका फुलस्केप कागदावर जी पाहिजे आहेत त्या पुस्तकांची नावे आणि नंबर लिहिले आणि दर वेळी तो कागद त्यांना देत असे
यातलं जे उपलब्ध आहे ते द्या म्हणून
माजोरी हे फारच सॉफ्ट विशेषण
माजोरी हे फारच सॉफ्ट विशेषण झालं त्यांच्यासाठी. भयाण अनुभव असे तिथे पुस्तक बदली करून घेणे हा.
दादर सार्वजनिक वाचनालय आणि
दादर सार्वजनिक वाचनालय आणि मुंमग्रं दादर यांचा अनुभव चांगला होता.
----
ब्रि कॉउन्सल मुंबई इथेही छान. पण ते फार कडक वागत किंवा बोलत चुका करणाऱ्यांना. ( मुले दुसऱ्यांची कार्डे घेऊन येत.)
तिथेच चर्चिलची पुस्तके वाचली होती. न्युटनचीही होती पण त्याची भाषा फारच पल्लेदार आणि भारदस्त असल्याने समजायची नाहीत. त्या काळचे लेखक विषयाची ओळख ,( introduction ) करण्यात बरीच पाने खर्ची घालत आणि ते समजले तर आनंदच. म्हणजे असं की कॉलेजला फिजिक्सचे चालू टेक्सटबुक वाचायचो. परीक्षेतल्या प्रश्नांची उत्तरे आली की झालं एवढाच विचार. पण पुढे एकदा एक सहकारी ओफिसात भेटला. त्याने विचारलं "राजम'चं फिजिक्स वाचलं का?"
"अरर!"
मग त्याने त्या पुस्तकातले चाप्टरच्या सुरवातीला असलेले introductions धडाधड म्हणून दाखवले. (२५ वर्षांपूर्वी वाचलेले.) असे वाचक अभ्यासक असल्यावर लेखकांनाही आव्हान पुढे ठाकते आणि लेखणी सरसावते त्यांची.
Pages