Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. 
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाब तुम्हीच लिवा. मला लैच
हाब तुम्हीच लिवा. मला लैच आवडलं गॉड ऑफ स्मॉल थिन्ग्ज. तसाही मी अरुंधती रॉयच्या नॉन-फिक्शन लिखाणाचा फॅन आहे. पण फॅन बॉय झाल्याने मला तटस्थपणे नाही लिहिता येणार. क्राफ्ट (कारागिरी) अत्त्युच्च दर्जाची आहे यात वादच नाही. कथेच्या गाभ्याशी रिंगण घालत लेखिकेचा बैल हळूहळू केंद्राकडे सरकतो. आषाढीच्या वारीतल्या रिंगणाची मला आठवण आली ते वाचताना. कथेचा गाभा क्षुल्लक आहे की खोल यावर मनात खल झाला. आमच्या आवडत्या पुस्तकावर जसे "नुसतीच कारागिरी, खोली (बाकी नव्हे) शून्य" असा आरोप होतो तो वाद आठवला. मला लिखाणाची कारागिरी आवडते.
पुस्तक संपल्यावर पुस्तकाच्या आकाराचे भोक मागे राहिले.
सेन्स ऑफ अॅन एन्डींगः भाषेचा उत्तम उपयोग, काही काही अवतरणे फार आनंद देतात वाचताना. पुस्तक आपल्या संथ गतीने पुढे सरकते, किमान तसा प्रयत्न केला आहे. शेवट मात्र थ्रिलर सारखा झाला. अँटीक्लायमॅटिक हवे होते असे मला सारखे वाटून राहिले.
"नुसतीच कारागिरी, खोली (बाकी
"नुसतीच कारागिरी, खोली (बाकी नव्हे) शून्य" >> अरे अजून लक्षात आहे तुझ्या हे ?
अँटीक्लायमॅटिक हवे होते असे मला सारखे वाटून राहिले >> +१
मला वाटले कि तू एका वाक्याचीपोस्त लिहिलीस हाच तुझा रिव्ह्यू आहे
हा बला सांगायचे कि हि अनुभवायची गोष्ट आहे वगैरे 
सेन्स ऑफ ऍन एंडिंग स्वतःहून
सेन्स ऑफ ऍन एंडिंग स्वतःहून कळलं का तुम्हाला की इतरांनी केलेली चिरफाड वाचावी लागली?
त्यातले आईची व्यक्तीरेखा तुम्ही कशा नजरेने पाहिली?
चित्रपटातदेखील तसेच दाखवले आहे का?
एकानेही उत्तर दिलं नाही.
What do people think of the ending? (SPOILER ALERT)
@ॲमी
@ॲमी
चित्रपट पाहिलेला नाही.
थोडेफार समजले, थोडेफार चिरफाड वाचल्यावर अजून उलगडले. विशेषतः ते समीकरण. ते टोनी म्हणजे अंथोनी हे आपल्या चटकन डोक्यात येत नाही.
ते समीकरण आणि एकोणच थ्रिलर टाईप शेवट मला फारसा भावाला नाही.
आईची व्यक्तिरेखा इतकी त्रोटक मांडली आहे की तुम्हाला हवे ते तुम्ही समजून पुढे उकल्लू शकता. सेक्शुअल लिब्रेटेड आहे की सेक्शुअल प्रिदेतर, की निव्वळ (म्हणजे pure या अर्थी) स्वतंत्र आहे हे समजणे तुमच्या हातात आहे असे मला वाटले. मी ती बाई निव्वळ स्वतंत्र या नजरेने पाहिली
हम्म.
हम्म.
ते समीकरण आणि साराःचे वागणे याची नीट उकल करता येणे हे भारतीय/मराठी माणसाला जवळपास अशक्य आहे असं माझं मत झालं होतं
https://rakebeforewriting.wordpress.com/2017/03/22/the-sense-of-an-endin...
ही लिंकपण चांगली आहे.
Interesting!
Interesting!
मलाही तो मुलगा हा टोनी अन साराचा आहे असेच वाटले पुस्तक संपल्यावर
यावेळी भारतवारीमधे चक्क
यावेळी भारतवारीमधे चक्क गोट्याचे तिन्ही भाग मिळाले. अप्पा बळवंत चौकात सरस्वती बुक डेपोमध्ये.
असाराम लोमट्यांचा साहित्य
असाराम लोमट्यांचा साहित्य अकादमी पुरस्कार विजेता 'आलोक' हा कथासंग्रह वाचला >>> पराग, https://www.maayboli.com/node/67145 या रिक्षात बसला होतास का?
गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज - मलाही खूप आवडलं होतं. आधी मी अपर्णा वेलणकरनी केलेला अनुवाद वाचला. तो आवडल्यावर मूळ इंग्रजी पुस्तकही वाचलं. दोन्हीला तितकीच मजा आली. मी बहुतेक मिवापु-१ धाग्यावर त्याबद्दल लिहिलं होतं.
माय नेम इज रेड (ओरहान पामुक,
माय नेम इज रेड (ओरहान पामुक, अनुवाद - गणेश विसपुते)
मी वाचलेलं पहिलं-वहिलं नोबेलविजेतं पुस्तक म्हणून हे माझ्या लक्षात राहील. १६व्या शतकातली वातावरणनिर्मिती खूप छान आहे. १२-१५ पात्रांच्या प्रथमपुरुषी निवेदनातून कथा पुढे सरकते. त्यात निर्जीव वस्तूही आहेत, अगदी चित्रातलं झाड, घोडा, सोन्याचं नाणं वगैरे गोष्टीही वाचकांशी बोलतात. मृत्यू, रक्ताचा लाल रंग देखील बोलतात. ते वाचायला आवडलं.
या गोष्टी सोडल्या तर हे पुस्तक मला तसं जडच गेलं.
हे पुस्तक समजण्यासाठी, झेपण्यासाठी आणि मग आवडण्यासाठी प्राचीन चित्रकला, लघुचित्रकला, त्यांचा इतिहास, त्या काळातली चित्रं, कला समजून घेण्याची दृष्टी आणि मुळातच चित्रकलेविषयीची बारीकसारीक उपजत जाण - ही सगळी prerequisites आहेत.
गणेश विसपुतेंनी केलेल्या मराठी अनुवादाबद्दल फेसबूकवर वगैरे खूप ऐकलं/वाचलं होतं. म्हणून मी आवर्जून हे पुस्तक विकत घेतलं होतं. काही काही शब्दयोजना खरंच आवडल्या; पण एकूण 'अप्रतिम अनुवाद' असं काही वाटलं नाही. शिवाय तुर्की-इंग्रजी-मराठी प्रवासामुळे lost in translation झालेलं असावं असंही वाटलं.
पुस्तकात इस्तंबूल हा शब्द मूळ तुर्की उच्चारांप्रमाणे 'इस्तान्बूल' असा वापरला आहे, असं विसपुतेंनी सुरूवातीला मनोगतात म्हटलं आहे. पण प्रत्यक्ष पुस्तकात 'इस्तंबूल' आणि 'इस्तान्बूल' दोन्ही प्रकारे वापर दिसला.
पुस्तकासाठी वापरलेला फाँटही मला फारसा आवडला नाही. कदाचित पानांची संख्या कमी करण्यासाठी हे केलं असावं.
The Diary of a Young Girl :
The Diary of a Young Girl : Anne Frank वाचलं. सुरुवातीला परदेशी तरुण मुलीची नेहमीची कहाणी आहे, असं वाटत होतं. पण नंतर जशीजशी अँन तिच्या आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीसोबत जुळवून घेताना व्यक्त होत गेली, तसंतसं तिच्याशी बऱ्याच बाबतीत रिलेट करत गेले. तिचं तिच्या आई-वडिलांसोबतचं नातं आणि त्यातून उद्भवणारे वाद, याकडे त्रयस्थपणे पाहून, आत्मपरीक्षण करून तिने स्वतःचा स्वभाव बराच बदलला; हे खूप भावलं. पीटरसोबतचं नातंही तिने खूप मोकळेपणाने मांडलं आणि स्वतःच्या भविष्याविषयी खूप ठाम मत होती तिची. एकूणच अँनचं व्यक्तिमत्त्व खूप आवडलं. शेवटी तिचा कॉन्सन्ट्रेशन कँपमध्येच अंत झाला, हे वाचून गलबलून आलं.
The Guide - R K Narayan
The Guide - R K Narayan
गाईड चित्रपट पाहिला नव्हता. कथा साधारण माहिती असल्याने, मूळ पुस्तक वाचायची इच्छा झाली. कथानक छान वाटलं. सामान्य माणूस ते श्रीमंती आणि मग छानछौकीचे आयुष्य जगताना हरवत गेलेली नैतिकता. शेवटी मिळालेली अनपेक्षित कलाटणी हा 'रेल्वे राजू'चा प्रवास छान वाटला. रोझीची व्यक्तिरेखाही आवडली. (फक्त रोझी वाचताना डोळ्यासमोर वहिदा रहमान ऐवजी वैजयंतीमाला येत होती.)
पुस्तक वाचून झाल्यावर उत्सुकतेपोटी चित्रपट पाहिला. कदाचित, यू ट्यूब वर खूप एडिट केला असावा, पण मूळ पुस्तक सरस वाटलं.
या धाग्यावर बरेच दिवसांत
या धाग्यावर बरेच दिवसांत यायला जमले नव्हते. अलीकडे माझे पुस्तक वाचन खूप कमी आहे. पूर्वी जेव्हा बऱ्यापैकी असायचे, तेव्हा मी वाचलेल्या पुस्तकाचा सारांश एक परिच्छेद इतका वहीत लिहून ठेवत असे. अशाच एका पुस्तकाचा हा परिचय:
.......
नाव : मुखवटे / कलेवर
लेखक : लक्ष्मण लोंढे
प्रकाशन वर्ष : २००१
..............
पुस्तकाच्या नावावरून लक्षात येईल की या २ दीर्घकथा आहेत.
मुखवटे
यात एका देवळातील मूर्तीचा सोन्याचा मुखवटा चोरीस जातो. त्यानंतर गावातील विविध प्रकारच्या माणसांनी आपल्या चेहऱ्यावर चढवलेल्या ‘मुखवट्यांचे’ यथार्थ चित्रण केले आहे. थोडक्यात ‘देऊळ’ चित्रपटात जे दाखविले आहे, अगदी तसाच हां कथापट आहे. लोंढे हे विज्ञानकथालेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या अन्य लिखाणातही वैज्ञानिक दृष्टीकोन अगदी उठून दिसतो. या कथेत महेश हे जे पात्र आहे, त्याच्या तोंडून लेखक जुन्या रूढी, अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक समजुती यांवर चांगले कोरडे ओढतो. एक उदा. देतो. एकदा महेशची आई सकाळी त्याला सांगते की आज अमुकतमुक तिथी असल्याने घरात सर्वांनी ‘उपास’ करायचाय. त्यावर तो तिला सांगतो, “ आई, घरात तुला दोन वेगळे स्वयंपाक करायला लागू नयेत, म्हणून मी साबू-खिचडी खाईन. पण बाहेर पडल्यावर जर मला मित्र भेटला आणि त्याने कांदाभजी खाऊ घातली तर ती पण मी प्रेमाने खाईन !”
.........
कलेवर
मुंबईत एक जुनी नावाजलेली मराठी माध्यमाची शाळा बंद करून तिच्या जागी व्यापारी संकुल उभे करायचा शासननिर्णय झालेला आहे. ही शाळा एकेकाळी लो. टिळकांनी स्थापन केली होती. या निर्णयाशी संबंधित सर्वजण कलेवराप्रमाणे वागून त्यास मूक संमती देतात. ही शाळा बंद होण्याचे कुणालाही सोयरसुतक नसते. अशा निर्णयामागची कारणे आपण सर्व जाणतोच ! एकदा का एखाद्या प्रकल्पात हितसंबंध आले की माणसे कशी टोपी फिरवतात, हे पुस्तकात छान चितारले आहे.
विकत घेतलेली पुस्तके
विकत घेतलेली पुस्तके वाचल्याशिवाय पडून असणे यालाही एक संज्ञा आहे, असा शोध लागला. Tsundoku
याचेही 'फायदे' सांगणारा एक लेख वाचला होता. आपण जितकं वाचलंय त्यापेक्षा कितीतरी पट अधिक वाचलेलं नाही आणि वाचणं शक्य नाही, ही जाणीव राहते, असं काहीतरी.
आपण जितकं वाचलंय त्यापेक्षा
आपण जितकं वाचलंय त्यापेक्षा कितीतरी पट अधिक वाचलेलं नाही आणि वाचणं शक्य नाही, ही जाणीव >>> लीळा पुस्तकांच्या या पुस्तकात या विषयावर एक प्रकरण आहे.
मला खूप आवडलं होतं ते.
माझ्या काउंटीच्या फ्री
माझ्या काउंटीच्या फ्री लायब्ररीमधून फोन ( किंवा इतर मोबाइल उपकरणांवर ) ऑडिओ पुस्तके पण घेता येतात हा मला अलिकडेच शोध लागलेला आहे. तर अशा पुस्तकांना पण वेट लिस्ट आहे. क्राइम, थ्रिलर आणि मिल्स अॅण्ड बून पुस्तके मात्र कायम ' अव्हेलेबल टु बॉरो नाउ' असतात.
अव्हेलेबल टु बॉरो आणि क्राइम / थ्रिलर नसलेली पुस्तके या दोन क्रायटेरिया मधे बसणारी पुस्तके ऐकली गेल्या महिन्याभरात
रॉबिन स्लोन यांचे Sourdough . मिशिगनमधून सान फ्रांसिस्को मधे आलेली Lois Clary . रोबोसाठी सॉफ्टवेअर बनवणार्या कंपनीत प्रोग्रॅमर आहे. तिचे आई वडील पण सॉफ्टवेअर मधे असतात . पण त्यांची, किंवा तिची सुद्धा मिशिगनमधली लाइफ स्टाइल आणि बे एरियातली लाइफ स्टाइल यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. दिवसातले जागेपणीचे सर्व तास कामाच्या ठिकाणी घालवणारे तिचे कलीग्ज ( कधी कधी तिथेच दिवसरात्र रहाणारे सुद्धा) मील रिप्लेसमेंट स्लरीज क्लब चे मेंबर्स आहेत .
एका टेक आउट ओन्ली फूड प्लेस मधून ती सँडविच मागवते. लव्ह अॅट फर्स्ट बाइट! लवकरच ती त्यांची नंबर वन कस्टमर बनते. इमिग्रेशन इशूजमुळे रेस्टॉरंट चालवणारे दोन्ही भाऊ अमेरिका सोडून निघतात. जाता जाता त्यांच्या ब्रेडचं स्टार्टर ते तिला देऊन जातात. घरी अजिबात स्वैपाक न करणारी, घरात साधं पीठ सुद्धा न ठेवणारी लोइस सावरडो ब्रेड करायला लागते. तिच्या कंपनीच्या कॅफेटेरियाला ब्रेड सप्लाय करते. स्वतः वूड फायर्ड ब्रेड अव्हन बनवते आणि बे एरिया मधल्या फार्मर्स मार्केट मधे शिरकाव करण्याचा प्रयत्न करते. त्यात तिला कोण कोण भेटतात, त्या ब्रेड स्टार्टरची स्टोरी किती गुंतागुंतीची आहे हे सर्व फार मस्त लिहिलंय.
ते पुस्तक वाचून ( ऐकून ) संपल्यावर त्याच लेखकाचं पहिलं पुस्तक Mr. Penumbra's 24-Hour Bookstore: हे पण ऐकलं. नोकरीच्या शोधात असलेला वेब डिझायनर क्ले जॅनन एका २४ तास चालू असणार्या पुस्तकाच्या दुकानात शिरतो. व्हॉट डु यू सीक म्हणणारा निळ्या डोळ्यांचा मिस्टर पेनंब्रा. त्याच्या पुस्तकांच्या दुकानातले मिस्टरियस कस्टमर्स, त्यांची सिक्रेट सोसायटी. थ्री डी मॉडेल्स करणारा रूममेट्,
आर्किओलॉजी मधे पी एच डी करणारा कलीग, शाळकरी मित्र , गूगल मधे काम करणारी मैत्रीण आणि डंजन गेम्स / ड्रॅगन्सची पुस्तके यातून मिळालेलं व्यवहारज्ञान हे सर्व घेऊन क्ले ५०० वर्षं जुनी मिस्टरी कशी सोडवतो याची गोष्ट आहे.
( नॉट सो )यंग अडल्ट मंडळींसाठी एकदम पर्फेक्ट रीड आहे . प्रोफॅनिटी नाही, मर्डर्स नाहीत. एखाद वेळेस कोणाच्या तरी घरी असलेला 'लिंगरिंग स्मेल ऑफ पॉट' सोडल्यास ड्रग्ज नाहीत. २२-२३ वर्षांचा प्रॉटॅगनिस्ट आणि साधारण त्याच वयाचे त्याचे साथीदार. एकदम हलकी फुलकी गोष्ट आहे .
@मेधा- इंटरेस्टिंग वाटतायत
@मेधा- इंटरेस्टिंग वाटतायत दोन्ही पुस्तकं..छान परिचय!
मी वाचून संपवलं (एकदाचं!)- Thank you for being late - Thomas Friedman
हे वाचायला मला लेट झाला . पुस्तक २०१६ मध्ये लिहिलं. मी आत्ता वाचलं. करंट ग्लोबल ट्रेंड्सबद्दल कमेंट्री अशा टाईपचं पुस्तक आहे. दोन मेजर समस्या आहेत- १. पुस्तक ऑलरेडी कालबाह्य झालेलं आहे. जग इतकं बदलतंय की २०१५-१६ तले संदर्भ २०२० मध्ये जुने व निरुपयोगी वाटू लागतात. २. दोन वाक्यात सांगता येईल अशा मुद्याला ४ पानं या रेटने पाणी ओतलंय. प्रचंडच लांबण लावली आहे. मी आपलं पुस्तक संपवण्याची सवय आणि 'नंतर चांगलं असेल' ही फोल ठरलेली आशा- यामुळे वाचून पूर्ण केलं इतकंच. नॉट रेकमेंडेड.
ढोबळ मानाने ४ भाग आहेत-
१. टेक्नॉलॉजी- हा बराचसा कालबाह्य पार्ट आहे कारण ४-५ वर्षात टेक्नॉलॉजी खूप बदलते.
२. क्लायमेट चेंज - अगेन थोडं कालबाह्यच कारण यातही रोज परिस्थिती बदलते आहे. शिवाय या विषयावर इतकं सगळीकडे लिहून येत असतं की लेखक त्यात काही नवीन भर घालत नाही.
३. निर्वासित क्रायसिस- यात जरा मला नवीन माहिती कळली. आपल्याला ढोबळ मानाने वॉरमुळे लोक निर्वासित होतात हे माहित असतं पण इथे एकॉनॉमि, क्लायमेट चेंज यामुळे लोक-विशेषतः तरुण पुरुष- युरोपात जात आहेत- ही नवीन माहिती कळली. युरोप इतक्या सगळ्या लोकांच्या ओझ्याखाली दबून जाईल असं भाकित लेखक करतो.
४. लेखकाचं गाव- हा शेवटचा भाग काहीतरी यडचाप स्मरणरंजन आहे. लेखक मिनिसोटातील कुठल्या गावात राहत होता त्याबद्दलच्या आठवणी (उगाचच) पानंच्या पानं लिहिल्या आहेत. एकेकाळी बहुतांशी अमेरिकन गोरे ख्रिस्ती आणि ज्यू राहायचे त्या मिनिसोटात आता सोमाली मुस्लिम लोकांची संख्या वाढते आहे. मग लेखक या नवीन रहिवाश्यांसाठी स्थानिक लोक कसे वेलकमिंग आहेत ते सांगत बसतो. म्हणजे सोमाली किंवा ज्यू बायकांना स्विमिंग पूल वापरता यावा म्हणून पूल ठराविक तास पुरुषांसाठी बंद ठेवणे वगैरे. सगळ्यांनी कसं मिळून मिसळून राहिलं पाहिजे असं काहीतरी गोल गोल आदर्शवादी लिहित लेखक पुस्तक एकदाचं संपवतो (हुश्श्य!).
रॉबिन स्लोन यांचे Sourdough >
रॉबिन स्लोन यांचे Sourdough >>> इंटरेस्टिंग दिसतंय, किंडलवर शोधते.
Mr. Penumbra's 24-Hour Bookstore >>> हे ब्राऊज केल्याचं आठवतंय.
मेधा,
मेधा,
रॉबिन स्लोन Sourdough - हे पुस्तक किंडल डील्समध्ये विकत घेतलंय. हे आधी वाचून मग Mr. Penumbra's 24-Hour Bookstore वाचलं तरी चालू शकतं ना? (अर्थात, तुझा क्रमही तसाच होता असं दिसतंय; त्यामुळे चालावं बहुतेक.)
इथे वाचून (आणि सहज मिळालं
इथे वाचून (आणि सहज मिळालं म्हणून) Sourdough ऐकतेय. कदाचीत हे पुस्तक वाचताना मी काही डिटेल्स स्कीप केले असते. ऐकायचंय म्हणून जमतंय. ओव्हरआॅल इंटरेस्टिंग आहे.
ललिता- प्रीति . दोन्ही
ललिता- प्रीति . दोन्ही पुस्तकं इंडिपेंडंट आहेत. कुठल्याही क्रमाने वाचली( ऐकली ) तरी चालतील
@मेधा, ओवरड्राइव्ह हे अँप
@मेधा, ओवरड्राइव्ह हे अँप यूएसमधल्या सर्व लायब्रऱ्या वापरतात. त्यामधून ऑडिओ बुक्स आणि इ बुक्स चाळता येतात, चेक आउट करता येते, वाचता/ऐकता येते. तसेच जवळपास सर्व पब्लिक लायब्रऱ्यामधून इश्यू केलेली इ बुक्स किंडलवर वाचता येतात.
मला ऑडिओ बुक्स साठी ओव्हरड्राइव्ह अँप उपयोगी पडते, द्रायविंग करताना ऐकता येतात. वाचायला मात्र किडल सोयीचे आहे, मोबाईल वर पुस्तके वाचून डोळे दुखायला लागतात.
मल्याळी लेखक बेन्यामिन यांची
मल्याळी लेखक बेन्यामिन यांची गोट डेज ही एक उत्कृष्ट कादंबरी वाचली. कादंबरी म्हणण्यापेक्षा स्मृतिचित्र (memoir) म्हणावे लागेल. आखाती राज्यात मोठी स्वप्ने ऊराशी बांधून गेलेल्या नजीब या तरुणाची ही दुर्दैवी कहाणी.
पुस्तकाची सुरुवात नजीबच्या तुरुंगात कसेतरी करून आत जाण्याच्या खटपटीपासून होते. भारतात मागे गरोदर बायको, आई, वडील केरळात सोडून आखाती देशात खूप पैसे कमवायचे स्वप्न घेऊन नजीब आलेला असतो. पण त्याला काम मिळते ते बकऱ्या/मेंढ्या राखण्याचे आणि वागणूक मिळते गुलामाची. बकऱ्यांच्या आयुष्याचा तो आणि बकऱ्या त्याच्या आयुष्याच्या अविभाज्य भाग बनतात, इतके की पुस्तक वाचताना आपणही विसरुन जातो की नजीबची कहाणी वाचतोय की बकऱ्यांची. तुरुंगातले स्वातंत्र्य शोधणे असो की बकऱ्यांतील माणुसकी असो, पुस्तकातले हे विरोधाभास आपसूक तुम्हाला धक्के देत जातात. त्याचवेळी जगण्याची दुर्दम्य इच्छा माणसाला/प्राण्याला कशी विपरीत परीस्थितीत तगवून ठेवते तेही जाणवते.
पुस्तकाची भाषा एका जेमतेम शिकलेल्या कामगाराच्या तोंडची आहे, तो बाज कधी सुटत नाही. मात्र त्यातून येणारा अनुभव अस्सल आहे. पुस्तक मूळ मल्याळम भाषेत आहे व भाषांतर उत्तम जमलेले आहे.
आनद यादवांच्या 'गोतावळा'ची
आनद यादवांच्या 'गोतावळा'ची आठवण झाली.
बुकगंगा साईटवरील इ पुस्तके
बुकगंगा साईटवरील इ पुस्तके किंडलवर वाचता येतात का? इथे कोणाला अनुभव? मी बुकगंगा साईटवर प्रश्न विचारला होता पण काही उत्तर मिळाले नाही
नाही वाचता येत.बुकगंगा चा
नाही वाचता येत.बुकगंगा चा फॉरमॅट वेगळा आहे.
गोट डेज - इंटरेस्टिंग!
गोट डेज - इंटरेस्टिंग!
बुकगंगाबद्दलचा प्रश्न मलाही पडलेला आहे.
इ-बुक आणि किंडल आवृत्ती हे एकसारखंच की वेगवेगळं, हा माझा गोंधळ आहे.
ललिता, किंडल हा अॅमॅझॉनचा
ललिता, किंडल हा अॅमॅझॉनचा स्वतःचा इबुक फॉरमॅट आहे. दुसरा इबुक फॉरमॅट - EPUB. यात बाकीच्या सगळ्यांची इबुक्स येतात, म्हणजे अॅपल, गुगल, नुक वगैरेंकडची इबुक्स. आमच्या इथल्या लायब्ररीजमधे पूर्वी फक्त EPUB फॉरमॅट मधली पुस्तके असत आता किंडल वर्जनही असते.
बुकगंगावरून घेतलेले पुस्तक
बुकगंगावरून घेतलेले पुस्तक किंडलच्या file format मध्ये बदलता येते का?
किंडल हा अॅमॅझॉनचा स्वतःचा
किंडल हा अॅमॅझॉनचा स्वतःचा इबुक फॉरमॅट आहे. दुसरा इबुक फॉरमॅट - EPUB. यात बाकीच्या सगळ्यांची इबुक्स येतात
>>> ओक्के! अब जा के स्याही फूटी...
Pages