राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनीमामी, अग सगळ्यांची तोंडे पण नाही ना म्हणाली ती तोंडं अस म्हणाली.
एक तोंड - अनेक तोंडं अस आहे का?? Uhoh
असोच. उगाच ते तोंड, सोंड अस काहीतरी विचित्र मनात येतय Lol

केदार सुधारला आहे का ? त्याचं मिताली का कोणाशी लग्न ठरलं होतं त्याचं काय झालं ?
मधे बरेच दिवस न बघितल्याने कळत नाहीये अरेरे>>>> केदार सुधारला आहे अस दाखवल आहे. खर खोट माहीत नाही... त्याने मितालीला सगळ खर खर सांगुन टाकल आणि तिच्या बाबांना तिच्या हवाली केलं आणि आता राधाच्या सावत्र लहान बहिणीशी लग्न करतो आहे. तिच जी प्रेग्नंट आहे भलत्याच कडुन. पहिल्यांदा राधाच्या घरच्यांशी बोलला तेव्हा म्हणाला की हे मुल माझ आहे अस मी सांगणार आहे सीमावैनीला पण अजुन काही बोललेला नाहिये पठ्ठ्या, लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे घरी आणि येणार्‍या वादळाची पण..... अगदी घराला नवा रंगबिंग देउन Biggrin बघु काय होतय ते.

अग केली की तिने वचवच दक्षे. राधाला दरादरा ओढत बाहर घेऊन गेली मग घारुअण्णांनी यशला बाहेर बोलावुन शहानिशा करुन घेतली.
मग सिमाने तिच्यावर झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचला आणि पुन्हा राधाने माफी मागितल्यावर त्या एक झाल्या.
राधाच्या बहिणीने केदारला लग्नानंतर वेगळे राहु असे सांगितले. हा चम्या तर राधासाठी तिच्याशी लग्न करतोय पण राधाची बहिण म्हणजे गीरे तो भी टांग उप्पर कॅटॅगिरीतली.

एकूणात ही सिरियल म्हणजे 'पागलके दो आगे पागल, पागलके दो पिछे पागल, आगे पागल, पिछे पागल, बोलो कितने पागल' असा मामला आहे.

राधाला पुरस्कार मिळाला, ती हॉस्पिटलमधे जाते तरी का? मी मधेच कधीतरी सर्फिंग करते तेव्हा ती घरीच असते, मी मालिका बघत नाही त्यामुळे तसा मला बोलायचा अधिकार नाही.

आणि काल सौर्‍याशी बोलताना उगिच बोटं बडवत बसलेली लॅपटॉपवर. डॉकला स्टेथॅस्कोप आणि कात्र्या सुर्‍या सोडून काय लागतं? फार फार तर एक प्रिस्क्रिप्शन पॅड आणि पेन.. हॅण्ड्ग्लोव्ह्ज..
ही लॅपटॉपवर काय दिवे लावत होती म्हणे? Uhoh

आणि कमॉन हा शब्द बोलून बोलून वीट आणला.
रंजूने मस्त मीठ चोळलं सीमाला, मोठी खोली तुला कशाला हवी.... आणि राधाने त्या म्हातार्‍याला किती जवळ केलंय इतक्यातच, नाहीतर ११ वर्षात तुझं अजिबात ऐकलं नाही असं प्रांजळपणे बोलली..

काही म्हणा तो यश, तो आप्पांचा मित्र आणि रंजू हेच तिघं काय ते मला सेन्सिबल वाटतात या मालिकेत, बाकी सगळे येडे धोंडे नुसते.

>>ही लॅपटॉपवर काय दिवे लावत होती म्हणे?

ह्या बीबीवर आपल्याबद्दल काय लिहिलंय वाचत असेल Proud

>>राधाला पुरस्कार मिळाला, ती हॉस्पिटलमधे जाते तरी का?

तिने तो पुरस्कार का मिळाला ते सांगितलं. पण ते एकूणात इलेक्शनच्या आधी आपण कशी विधायक कार्यं केली ते सांगणार्‍या भारत सरकारच्या रेडिओवरच्या जाहिराती असतात तश्या छापाचं काहीतरी होतं. माझे कान आपोआप बंद झाले.

एकूणात ही सिरियल म्हणजे 'पागलके दो आगे पागल, पागलके दो पिछे पागल, आगे पागल, पिछे पागल, बोलो कितने पागल' असा मामला आहे.>>+१
मलातर पहिल्या पासूनच ही वेड्यांची सिरीयल वाटत्ये.

<< मलातर पहिल्या पासूनच ही वेड्यांची सिरीयल वाटत्ये.>> आणि इतरानाही वेडाचे झटके आणणारी [संदर्भ - पृ.क्र.२वरचं व्यंचि ].

केदार चा नक्की प्लॅन काय आहे? राधाच्या बहिणीशी लग्न करतोय पण ती ऑलरेडी प्रेग्नंट आहे हे त्याने सांगितलेलंच नाहिये कुणाला. Uhoh

बहुतेक ऐन लग्नात गार्गी प्रेग्नंट आहे अस सांगुन सगळ्यांसमोर गार्गीचा आणि पर्यायाने राधाचा पाण उतारा करायचा प्लान असेल केदारचा. सुधारल्याचे नाटक करतोय पन बॅकग्राउंडला धधक धक च म्ञुझिक लागत म्हणजे प्लानच करत असावा.

सौरभच करीयरच काही झाल्याशिवाय गोड बातमी देण्यासाठी काही करायचा नाही अस ठरल होत ना?

गार्गीको treat करते करते
राधा बेहोष होकर गिरी
लगता है पाव है भारी
'मै तुम्हारे बच्चेका बाप बननेवाला हु'
बोलेगा क्या सौरभ धर्माधिकारी

प्रेग्नंट होण्याची साथ जणू हो आली
आधी मिताली, मग गार्गी आणि आता राधा ही बावरी
देवा रे राधा ही बावरी!!!

>>सौरभच करीयरच काही झाल्याशिवाय गोड बातमी देण्यासाठी काही करायचा नाही अस ठरल होत ना?

काही केलं तरी लगेच गोड बातमी येणार नाही असं वाटलं असेल त्यांना. फक्त हवामान खात्याचाच अंदाज चुकावा असं थोडंच आहे? Wink

Pages