Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26
किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सौरभ काल न एका डिस्को मध्ये
सौरभ काल न एका डिस्को मध्ये गेला होता तो डिस्को कमी आणि सार्वजनिक गणपतीच्या कार्यक्रमाचा स्टेज जास्त वाटत होता
सौरभ काल न एका डिस्को मध्ये
सौरभ काल न एका डिस्को मध्ये गेला होता तो डिस्को कमी आणि सार्वजनिक गणपतीच्या कार्यक्रमाचा स्टेज जास्त वाटत होता????????? बापरे
सौरभ ना चीपांजीसारखा दिसत
सौरभ ना चीपांजीसारखा दिसत होता....आणि राधा तिचं रोजचं काम करत होती....'रडण'!!!
या असल्या फालतू प्रसंगांवर जर
या असल्या फालतू प्रसंगांवर जर शिरेल निभावून न्यावी लागत असेल तर कठिणे...
काल आम्हाला लागलेला एक शोध,
काल आम्हाला लागलेला एक शोध, अप्सरा आली मधे राधा बारिक दिसते आणि ह्या सिरेलीत जाड असे का? तिने वजन कमी केलय का महाग्रुंकडे गेल्यावर??
नाचुन नाचुन झाली असेल बारिक.
नाचुन नाचुन झाली असेल बारिक. पण कोणत्याही अँगलने थोराडच दिसते ती
दक्षे, कुठे पत्ता आहे हल्ली
दक्षे, कुठे पत्ता आहे हल्ली तुझा???
(सॉरी विपुतली गोष्ट इथे केल्याबद्दल)
शुके आहे इथेच, फक्त रोमात.आणि
शुके आहे इथेच, फक्त रोमात.आणि हापिसात लई कामात.
सौरभ दारू पिउन डिस्कोत नाचतो
सौरभ दारू पिउन डिस्कोत नाचतो आणि हि राधा , अप्सरा आली मध्ये महागुरून पुढे नाचते
बर आहे ....................
आर्पित आमच्याघरी राधाचे
आर्पित
आमच्याघरी राधाचे टायटल ट्रॅक लागल्यावर झोपायचे असा नियम आहे लेकीचा रात्री १०.३०चा त्यामुळे तेव्हडीच बघते मी ती सिरियल.
सगळ्या शिरेलच्या हिरॉईनी एकदम
सगळ्या शिरेलच्या हिरॉईनी एकदम सोज्वळ, सद्गुणी आणि सोशिक वगैरेच असायला हव्यात का? एखादी तरी कजाग दाखवायची. :रागः
दक्षे , मग तुलाच हिरवीन
दक्षे , मग तुलाच हिरवीन म्हणून घ्याचे का?

शुभांगी ती राधा त्या tital
शुभांगी
ती राधा त्या tital song मध्ये काय ती हसताना दिसते. आणि एपिसोडभर भर भरून रडता
काल आम्हाला लागलेला एक शोध,
काल आम्हाला लागलेला एक शोध, अप्सरा आली मधे राधा बारिक दिसते आणि ह्या सिरेलीत जाड असे का? तिने वजन कमी केलय का महाग्रुंकडे गेल्यावर??
>> मे बी शुटिंग खुप आधी करुन ठेवले असेल राहीबा चं..
आम्ही रोज ह्या मालिकेचे
आम्ही रोज ह्या मालिकेचे शीर्षकगीत बघतो. मुलाला फार आवडते. विशेषतः शेवटच्या 'राधा बावरी ह्या ओळी'. एक दिवस प्रश्न आला, "आई, बावरी हे राधाचे सरनेम आहे का ?"
बहुतेक मालिकांची शीर्षकगीतं
बहुतेक मालिकांची शीर्षकगीतं छान असतात, हाच मालिकांचा प्लस पॉइंट. अगो, बावरी सरनेम वाट्णं तुमच्या मुलाला साहजिकच आहे, लहान असेलना तो. त्याची प्रतिक्रिया एकदम क्युट आहे.
सौरभ चिंप्ससारखा दिसतो?
सौरभ चिंप्ससारखा दिसतो?:फिदी: त्याचा डान्स भारी होता. चेकाळल्यासारखा वाटला.:खोखो:
काय तो सौरभ शिरा ताणताणून
काय तो सौरभ शिरा ताणताणून राधाच्या नावाने ओरडत असतो सारखा. आणि प्रत्येक वाक्याच्या शेवटी 'यार'. वैताग नुसता! राधाचं ना 'आसमा से गिरे खजूर मे अटके' झालंय. आणि त्या दादांच्या मित्राला घरदार नाहिये का? सदोदित ह्यांच्या घरात असतो.
आज फार हसले... दादांच्या
आज फार हसले... दादांच्या तोंडी कसले विनोदी डायलॉग्ज होते..
राधा सूप आणते. दादा यशला म्हणतात... हं ह्याला तर द्यावंच लागणारे.. यश म्हणतो, मला चमचा? तर दादा त्यांचा पांढरा चमचा त्याला देतात आणि म्हणतात, मला आणि घारुला-माझ्या मित्राला तो हिरवा सेम सेम चमचा असूदे, ह्याला दे पांढरा चमचा..
त्यावर यश म्हणतो, हो हो.. माझी पँटपण पांढरी आहे ना.. बरोबर
खरं म्हणजे सगळ्यांचेच पायजामे पांढरे असतात..
शरद पोंक्षे, तुस्सी व्हेरी फनी हो.. 
साने मी पण लय हसले या सिन ला
साने मी पण लय हसले या सिन ला

धर्माधिकार्यांकडे एका नोकराची
धर्माधिकार्यांकडे एका नोकराची खुप गरज आहे!
अरे तो सौरभ काय डोक्यात जातो
अरे तो सौरभ काय डोक्यात जातो "यार" शी. वसावसा सारखा ओरडत असतो. ती राधा चांगलं माणूस म्हणजे स्वाभिमान नसलेलं आणि बावळट असं दाखावायची पराकाष्ठा करते. अरे हल्ली कोण इतकं ऐकून घेतं? हा आपला मुक्तहस्ते खेकसतोय हां तिच्यावर आणि ती लगेच ते त्यागी smile दाखवत पिल्लू बिल्लू म्हणते. त्या केदार बरोबर राधा आणि सौरभ ला पण psychiatric treatment द्या म्हणाव. किंवा खरं तर खास psychiatrist आहेच तर family pack घ्या म्हणाव therapy chaa. त्या यशचा ऊठसूटच लोक अपमान करतात. एकूणच बाहेरून आलेल्या समस्त नागरिकंचा अपमान करायचा असं एक ब्रीदवाक्य आहे बहुतेक धर्माधिकारी कुटूम्बाचं.
आणि ती केसर एक दात ओठ खात डोळे फिरवत असलेली दाखवतात कायम. आम्हाला दिसतं ते बाकी कुणाला दिसत नाही का? का बघते रे बाबा मी हे असलं?
आणि त्या दादांच्या मित्राला
आणि त्या दादांच्या मित्राला घरदार नाहिये का? सदोदित ह्यांच्या घरात असतो.>>>>>>>>>>>+१०००००
>>तर दादा त्यांचा पांढरा चमचा
>>तर दादा त्यांचा पांढरा चमचा त्याला देतात आणि म्हणतात, मला आणि घारुला-माझ्या मित्राला तो हिरवा सेम सेम चमचा असूदे, ह्याला दे पांढरा चमचा..
दादांच्या डोक्यावरच्या विगचा रंग यशच्या पॅन्टीपेक्षा जास्त पांढरा असेल.
दादांच्या डोक्यावरच्या विगचा
दादांच्या डोक्यावरच्या विगचा रंग यशच्या पॅन्टीपेक्षा जास्त पांढरा असेल.>>
अगदी खरं..
आणि त्या दादांच्या मित्राला घरदार नाहिये का? सदोदित ह्यांच्या घरात असतो.>>>> अरे लोक्स असं काय करताय, तुमचे सुरुवातीचे भाग मिसलेले दिसतात.. घारूआण्णांची सून त्यांच्याशी नीट वागत नाही, जेवायलाही धड देत नाही.. म्हणून ते मित्राकडे हक्काने येतात.. सगळे त्यांना घरातलीच एक व्यक्ती मानतात.. हे त्यांचे घरच आहे...
घारूआण्णांची सून त्यांच्याशी
घारूआण्णांची सून त्यांच्याशी नीट वागत नाही, जेवायलाही धड देत नाही<<< वाटत नाही हो. मधे एक दोन एपीसोड मधे होती ती पंचमी. चांगली वागत होती.
घारूआण्णांची सून त्यांच्याशी
घारूआण्णांची सून त्यांच्याशी नीट वागत नाही, जेवायलाही धड देत नाही<<< वाटत नाही हो. मधे एक दोन एपीसोड मधे होती ती पंचमी. चांगली वागत होती.
>>>>>> हां.....हां......हां.......आदिति, अहो जपून लिहा हो.......झी मराठी क्रिएटिव्ह टीम पैकी कुणीतरी वाचलंच तर.......घारुअण्णांची सून नक्की कशी वागते ह्यावर एक उपकथानक सुरु करून आपल्याला पीळ पीळ पिळतील.......
आणि तसं झालंच तर....घारुअण्णा किंवा त्यांची सून यापैकी एक किंवा दोघंही मनोरुग्ण निपजतील की नाही बघा.......
अगदी बरोबर अबोलीजाह्नवी आणि
अगदी बरोबर अबोलीजाह्नवी
आणि अदिती, कशावरुन ते तिचे दाखवायचे दात नसतील? ती सीमाची मैत्रिण दाखवलीये, मग तिच्याशी छानच वागणार ना?
सुरूवातीच्या भागात दाखवले, की घारुआण्णा सांगतात, मुलगा सून बाहेर जेवायला गेले आणि त्यांच्यासाठी कालची बिर्यानी की काय ते फ्रिजमध्ये ठेऊन गेले. ती फार तुसडेपणाने वागते.. इ. मग दादा म्हणतात, हे तुझेच घर आहे, कधीही ये, इथेच जेवत जा.. स्वत:ला एकटं समजू नकोस...
सौरभपण फार तुसडा आणि अत्यंत मुर्ख माणूस दाखवलाय आणि ती सीमा.. किती पझेसिव्ह आणि दुष्ट बाई आहे.. राधाला नुसती पाण्यात पाहते... राधापण नुसती पुढे-पुढे करते तिच्या.. जे आपले नाही त्याला कवटाळण्याचा भारी सोस त्या सीमाला..
ती सीमा.. किती पझेसिव्ह आणि
ती सीमा.. किती पझेसिव्ह आणि दुष्ट बाई आहे.<<
हो एक वेळ सासु असती तर समजु शकत पण सीमा अतीच करते आहे. स्वतःचा नवरा कंट्रोल मधे नाही आणि बाकीच्यांवर शिरजोरी करतेय.
सौरभपण फार तुसडा आणि अत्यंत मुर्ख माणूस दाखवलाय<<< हो कदाचीत शेवटी तो कसा आहे हे राधाला कळते आणि ती त्याला सोडते असा गोड शेवट असेल
मे बी गौतम कडे जाईल ती.
केदार ने प्रपोज केला तर राधा लगेच चांगली झाली का? उलट केदारचे इश्युज तिने त्यांना सांगायला पाहीजे होते.
हो कदाचीत शेवटी तो कसा आहे हे
हो कदाचीत शेवटी तो कसा आहे हे राधाला कळते आणि ती त्याला सोडते असा गोड शेवट असेल स्मित मे बी गौतम कडे जाईल ती.>>>
आणि सीमाच्या चेहर्यावर छद्मी हसू पैज जिंकल्याचे.. मग सीमा आणि तिचा मानलेला मुलगा-सौरभ- लिव्हड हैपीली एव्हर आफ्टर.. वा वा काय मस्त शेवट आहे 
Pages