राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>त्या केदारला अतिरेक्यांच्या अंगावर सोडा म्हणावं. परत भारताकडे वाकडा डोळा करून बघायची हिंमत करणार नाहीत. आणि म्हणतील आम्हाला काश्मिर नको, तुम्हीच हवं तर पाकिस्तान घ्या.
>> Biggrin स्वप्ना अशक्य आहेस

मला तर ह्या मालिकेत राधाच काय सगळेच बावरे वाटतात Proud

Happy स्वप्ना......ह ह पु वा.....आणि नीलू......बरोब्बर...... मालिका ही बावरी.....

राधा ही बाहुली झालिये आता. सगळ्यांच्या तालावर नाचणारी. ही इतकी शिकली सवरलेली पण जराही व्यवहारीपणा नाहिये. तो केदार नाटकी आहे हे माहिती असतानाही ती कस्काय विश्वास ठेवु शकते त्याच्यावर? गार्गी तर गिरे तो भी टांग उप्पर अश्यातली आहे.
आज बहुदा ती सौरभला सांगणार असे दिसतेय. अश्या तर्‍हेने घरातल्या एकेकाला सांगत बसली तर गार्गीची डिलिव्हरी होईल तोवर.

ह्या सीरियल्स मधल्या खलनायक आणि खलनायिकांचे पापाचे घडे इतकी कृष्णकृत्यं करून सुद्धा भरण्याचं काही नावच घेईनात की हो ( इकडे केदार आणि त्या तूतिमी मधे ती प्रिया).....पूर्वी १०० चा हिशोब असे........मालिकांच्या 'कलि' युगात मॅक्स अपराधांचा काऊंटर एक्स्पोनेंशियल दराने वाढवून सेट केलेला दिसतोय.......शिशुपाल ,जरासंध, शल्य वगैरे मंडळी कपाळावर हात मारून घेत असतील 'तिकडे' नरकात..आपल्या 'एंट्री' ची वेळ हजारएक वर्षांनी चुकली म्हणून....

शुके तुझा पोस्टला अनुमोदन. मी तर जाऊन ताबडतोब तोंड उचकटून सगळं उघडं करून सांगितलं असतं आणि त्या गार्गीला २-४ कानाखाली पेटवल्या असत्या..

>>मालिकांच्या 'कलि' युगात मॅक्स अपराधांचा काऊंटर एक्स्पोनेंशियल दराने वाढवून सेट केलेला दिसतोय

ह्यातही इनफ्लेशन आहे बॉस Happy

त्या गार्गीने तर बेशुध्द पडायचा उच्चांक गाठलाय. बहुतेक नवा सीन लिहून झाला नसेल की गार्गीला बेशुध्द पाडायचं असं लेखकाने ठरवलंय. मग तिला धरणे, चेहेर्‍यावर पाणी मारणे, बाकी पात्रांनी 'काय झालं?' वगैरे निरर्थक संवाद म्हणण्यात पाचेक मिनिटं निघून जातात. मग लगेच ब्रेक.

दक्षिणा, त्या गार्गीच्या कानाखाली खूप आधी कोणीतरी जाळ काढायला हवा होता. मला सगळ्यात कहर हा वाटला की केदारने मला तू आवडतेस म्हटल्यावर हिला खरं वाटलं. आणि ह्या माठ बाईचं नाव गार्गी! बहुत नाइन्साफी है रे बाबा

नुसतच आवडते नाही.. I love you पण म्हणून झाल दोघांच..
मला तर वाटल की गार्गी नाटक करतीये बेशुध्द पडल्याच..

>>मी तर जाऊन ताबडतोब तोंड उचकटून सगळं उघडं करून सांगितलं असतं आणि त्या गार्गीला २-४ कानाखाली पेटवल्या असत्या

दक्षिणा, आपण पामर माणसं. ही मालिकेतली माणसं महान अवतार आहेत. Happy

>>मला तर वाटल की गार्गी नाटक करतीये बेशुध्द पडल्याच..
इतक्या वेळा? आता 'लांडगा आला रे आला' होणार एक दिवस.

आजचा एपिसोड तर काय वर्णावा? "सौरभ उभा राहिला, आम्ही नाही पाहिला" त्यातली गत. हा माणूस पण वेडा आहे. त्या राधावर ओरडतो काय, तिला सॉरी म्हणतो काय. राधाने त्याला पॅरिसला नेऊन आयफेल टॉवरवरून ढकलून द्यायला पाहिजे Angry

>>> राधाने त्याला पॅरिसला नेऊन आयफेल टॉवरवरून ढकलून द्यायला पाहिजे >>>स्वप्ना Biggrin
दक्षे सावर स्वतःला Proud

धर्माधिकारींच्या घरात किती लोकांना चक्कर येणार आहे? आधी राधा, मग गार्गी आणि आता सीमावहिनी. काय साथ आलेय काय? दुसरं काही सुचत नाही का लेखकाला? सीमावहिनीला ब्रेन ट्युमर असेल बहुतेक Happy

सौरभ चालू लागल्यावर अचानक राधीचा चेहरा पडला आणि तिला सौर्‍याचे जुने शब्द आठवले, एखाद्या तुझ्या तोडीच्या डॉक बरोबर हनिमून कर म्हनून.
मला एकदम तिच्या मनाचा संभ्रम असा वाटला (राधा मनात) "अरे देवा हा तर चालायला लागला, येतोय की काय पॅरिस ला? माझी हनिमूनची संधी हुकली म्हणायची (लायक डॉक सोबत) Proud

>>>एखाद्या तुझ्या तोडीच्या डॉक बरोबर हनिमून कर म्हनून.
अरे हे काय पंजा लढवायचा आहे की कुस्ती खेळायची आहे???? Proud

ह्या कथेचे माकड चाळे पाहून तुषार दळवीने लेखकाच्या पाया पडून ' बाबा मला या कथेतून परागंदा करून टाक' अशी विणंती केली असेल बहुधा Proud

येणार! येणार! येणार!
सीमाचे रिपोर्ट्स पुढच्या भागात येणार..
ती एक प्रेग्नंट नसली म्हणजे मिळवली..

सीमावहिनीला ब्रेन ट्युमर असेल बहुतेक << हाहाहा

गार्गीची गोष्ट ती मैत्रिणीची म्हणून सांगतेय.. आणि हा सौरभ तारे तोडतोय राग
ही राधा वेडपट आहे मुर्ख बावळट <<< +१

सीमाचे रिपोर्ट्स पुढच्या भागात येणार..
ती एक प्रेग्नंट नसली म्हणजे मिळवली..>>>>माझ्याही मनात हा विचार येऊन गेला Happy

ती एक प्रेग्नंट नसली म्हणजे मिळवली.. << तस असेल तर दादांना फक्त मितालीचीच प्रेग्नसी ओळखता आली ! बाय द वे मिताली आणि तिचे बाबा कुठे आहेत? जिवंत आहेत ना? त्यांना केदार ने कसे दुर केले?

स्वप्ना.....आयफेल टॉवर कशाला......मुंबईतल्या कुठल्याही >१० मजली इमारतीवरून ढकलून दिला तरी चालेल....मग पॅरिसचं सिंगलच तिकिट पडेल......;)

Pages