Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26
किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो मानस आहे ना त्याची बायको
तो मानस आहे ना त्याची बायको दाखवलीये शिरीएल मधे....
मालिकेचे नाव राधा ही बावरी
मालिकेचे नाव राधा ही बावरी च्या एवजी सीमा ही वेडी हवे होते...
>>आयला, वयाची अट नसती आणि
>>आयला, वयाची अट नसती आणि कथेत बाबा, आजोबा ही नाती नसती तर ह्या सीरीयल मधले झाडून सगळे पुरूष राधाच्या प्रेमात पाडले असते लेखकाने
अगदी अगदी. सध्या तरी ही संख्या ४ आहे - केदार, गौतम, सौरभ आणि मानस. त्या कुठल्याश्या डिओच्या जाहिरातीत रणबीर कपूर काऊन्ट दाखवत असतो ना तसा काऊन्टर द्या त्या राधाच्या हातात. काय पण दाखवतात. आणि मानस हिच्यावर प्रेम करतो ते म्हणे ह्या बाईसाहेबांना माहितच नाही. एव्हढी मठ्ठ मुलगी मी तरी पाहिलेली नाही.
रिया, अग तू नाही ग
रिया, अग तू नाही ग बाळ.....मानसच्या बायकोचं नाव आहे 'रिया' सिरीयल मधल.
त्या कुठल्याश्या डिओच्या जाहिरातीत रणबीर कपूर काऊन्ट दाखवत असतो ना तसा काऊन्टर द्या त्या राधाच्या हातात>>>>>>
अच्छा तरीच म्हणलं विदिपा मला
अच्छा

तरीच म्हणलं विदिपा मला असं कसं म्हणतील (तोंडावर)
सुरुवातीला सीमा जेव्हा
सुरुवातीला सीमा जेव्हा मार्कंडला लपून भेटत असते तेव्हा सासरेबुआला संशय येतो..तेव्हा तो तिला जाब विचारतो आणि घराबाहेरही काढायला लागतो पण हिला काही फरक पडत नाही. उलट केदारला त्रास नको म्हणून हिच त्याला व्रुद्धाश्रमात पाठवणार असते.....आणि त्या यशवंतच्या कितीतरी वेळा कानाखाली दिली..त्याला सुद्धा त्याच्या घरी जायला सांगितले होते.....जरा जास्तच दादागिरी दाखविली आहे.
मधुरा....हे वाहते पान आहे ना...ते बदलून लेखनाचा धागा कर ना.
ह्या राधासारखीच २ आणखी
ह्या राधासारखीच २ आणखी कॅरॅक्टर्स आहेत ज्यांच्यावर अनेक लोक फिदा आहेत.
१. तूतिमी मधला सत्यजित - ह्याच्यावर बायकोचं प्रेम आहे, त्याच्या आईच्या मैत्रिणीची मुलगी त्याच्यावर लट्टू आहे. परत ऑफिसमधली कोणी एक बया आहे ती आता त्याच्यामागे आहे.
२. बालिकाबधूमधला जग्या - आनंदी त्याची बायको होती. मग ती गौरी झाली. आता साक्षी आणि गंगा दोघी त्याच्यावर मरत आहेत.
मधुरा....हे वाहते पान आहे
मधुरा....हे वाहते पान आहे ना...ते बदलून लेखनाचा धागा कर ना.>>>>>> ते कस करतात? 'संपादन' वर क्लिक मारून प्रयत्न केला पण नाही जमलं.....
बहुतेक ADMIN ला जमेल. 
हो मधूरा, तुला अॅडमीनना तसे
हो मधूरा, तुला अॅडमीनना तसे विपुत कळवावे लागेल.
आजच्या भागात सौरभ-राधाच्या संसाराला 'खर्या अर्थाने' सुरुवात झाली म्हणायची! मला त्या रंजूचा रागच आला.. हा सौरभ घरी नुसता बसून राहतोय, काहीही करत नाही, शिवाय त्याला स्वयंपाकही येत नाही, याचा राग तिला नाही तो नाही.. वरुन राधा सकाळी उठून क्लिनिकला जात असेल, तिला स्वयंपाक येत नाही आणि ती सौरभला उपाशी ठेवत असेल, याचाच राग तिला आलेला दिसला...
हो मधूरा, तुला अॅडमीनना तसे
हो मधूरा, तुला अॅडमीनना तसे विपुत कळवावे लागेल.>>>कळवले आहे. बघू आता किती वेळ लागेल ते.
स्वप्ना, तू पाहत नाहीयेस का
स्वप्ना, तू पाहत नाहीयेस का ही सिरिअल?
मधूरा, कसे कळवलेस? इमेलने का?
मधूरा, कसे कळवलेस? इमेलने का? अॅडमीनचा विपुपत्ता http://www.maayboli.com/user/3/guestbook हा आहे. तिथे तुझे पोस्ट दिसत नाहीये.
रिया, आमच्याकडे 'ससुराल
रिया, आमच्याकडे 'ससुराल सिमरका' आणि 'राधा ही बावरी' ह्या सिरियल्स पॅरलली पाहतात.
त्यामुळे 'कतरा कतरा मिलती है' तशी 'तुकडा तुकडा' सिरियल दिसते. त्या सौरभने चक्क ग्लासभर दूध ओतून दिलं.माझी आजी म्हणायची तसं 'किसका फाटा, किसका तूटा, धोबीका चांगभला'. स्वतः कमवायला लागेल तेव्हा कळेल पैश्याचं महत्त्व. शी! आणि ते अंडं कसं फोडलंन. मला बघवलं नाही अगदी. त्या कट्ट्याला किती वास येत असेल असंच वाटत राहिलं सारखं.
स्वप्ना, सौरभ हा एक वाया
स्वप्ना, सौरभ हा एक वाया गेलेला, आळशी मुलगा आहे, असे त्याचे कॅरेक्टर फक्त डायलॉग्ज मधून ऐकू यायचे. दिसायचे मात्र विशेष नाही. आता प्रत्यक्ष पाहतांना जाणवतेय, राधाला संसाराचे जोरदार चटके बसणार आहेत. 'बावरी' राधा ते 'बिचारी' राधा असे ट्रान्सफॉर्मेशन दाखवणार, असे दिसते एकंदरीत..
आजचा भाग पहायची उत्सुकता आहे. राधा हे सगळं कसं टॅकल करते बघू.
सानी, मी ईमेलने कळवले आहे.
सानी, मी ईमेलने कळवले आहे.
. त्या सौरभने चक्क ग्लासभर
. त्या सौरभने चक्क ग्लासभर दूध ओतून दिलं.>>>> मलाही नाही पटल त्याचं ते वागण.
वा वा! विरेनच्या
वा वा! विरेनच्या मालिकांमधल्या नायिकांना स्वयंपाक येत नाही आणि त्यांच्या मदतीला नेहमीच शेजारी न विचारता धावून येतात..
सौरभ धन्य आहे. दिवसभर नुसता बसून राहिला. एक काडीही इकडची तिकडे केली नाही आणि राधा आल्या-आल्या स्वयंपाकाला लागली, सौरभवर काडीचेही न चिडता (आणि चिडली तरी तसे न दाखवता)!!! __/\__
तर्रीच आम्ही लोकं तुझ्या महान
तर्रीच आम्ही लोकं तुझ्या महान पोस्टींना मुकतोय

पहात जा ना रोज
सौरभवर काडीचेही न चिडता (आणि
सौरभवर काडीचेही न चिडता (आणि चिडली तरी तसे न दाखवता)!!!>>>अजुन प्रेमाचा ताप उतरला नाही म्हणुन हा उत्साह....नाही तर खूप कॉम्प्लिकेटेड केस आणि मोबाईल बघायलाही वेळ मिळत नाही एवढे काम करुन घरी आल्यावर कोण घर आवरुन स्वयंपाक करेल?
एवढी बिझी असते तर थोडे-फार पैसे मिळत असतिल कि तिला! डबा लावावा, मेस लावावी किंवा स्वयंपाकाला बाई ठेवावी...नाहीतर शेजारची बाई आहेच कि तिला कामाला लावावी पण नाही.
हा सौरभ एक पदार्थ चार-चार वेळा करायला लावायचा सीमा वैनीला? काहिही!!!
हाक्का नूडल्स करण्यासाठी ती राधा रेफ्रिजरेटर मधून काहितरी बाहेर काढते......बहुतेक नूडल्सचे पाकिट. ते तिथे ठेवतात? मला माहितच नव्हते!!!
चौकोनी कापलेला कांदा, बारिक चिरलेला टोमॅटो अन मटार... जबरी रेशिपी दिसतेय.
राधा हावरी...
राधा हावरी...
राधा हावरी... >>>
राधा हावरी... >>>
@ सानी..... अगदी..अगदी....
@ सानी..... अगदी..अगदी.... सौरभ म्हणजे आळस शिरोमणि आहे. बायकोच्या घरात आयता 'गॄहप्रवेश' मिळाल्यावर ही इकडची काडी तिकडे करणे नाही.... कालीमाता वहिनीने डोक्यावर बसवला होता वाटत...... घराची सफाई देखील मित्रांना बोलावून त्यांच्याकडून.....हे नुसते माकड उड्या मारणार ढुढ्ढाचार्य.... थोड्याच दिवसात ' राधा ही बिचारी' होऊन तिला सुनील बर्वेंचं कॅरॅक्टर हा ऑप्शन मिस केल्याबद्दल पश्चात्ताप होणार.... (बाय द वे....सर्व प्रेक्षकांना (चाणाक्ष किंवा नॉनचाणाक्ष) हे दोन महिने आधीच सुधरले होते हो)
ही मालिका म्हणजे वेड
ही मालिका म्हणजे वेड लागण्याची स्पर्धा आहे का? पोक्षेचे आणि ची केसही जरा ऑडच वाटतात/वाटते. कधी त्याच्या अंगात येत, कधी केदार, आता सिमा, बाकिचेही रंग दाखवतात अधून मधून. तो यशवंत फक्त नॉर्मल दाखवला आहे ते ही थपडा खाऊन. मार्कंडचा वापर रमीतल्या जोकरासारखा केलाय, गोष्ट अडली की पुढे सरकवायला.
राधा-सौरभचं नातं आता 'वेक अप
राधा-सौरभचं नातं आता 'वेक अप सिड' सिनेम्याच्या ट्रॅकवर धावणार असे दिसतेय..
राधा-सौरभचं नातं आता 'वेक अप
राधा-सौरभचं नातं आता 'वेक अप सिड' सिनेम्याच्या ट्रॅकवर धावणार असे दिसतेय..>>> +११११
तो कालचा सीन ज्यात राधा घरी आल्यावर सौरभने केलेला पसारा आवरत असते; आणि ते "तू काही खाल्ल नाहीयेस ना?" हे सग्गळं सेम 'वेक अप सिद' मधून उचलल्यासारखं वाटत होतं!!
राधा-सौरभचं नातं आता 'वेक अप
राधा-सौरभचं नातं आता 'वेक अप सिड' सिनेम्याच्या ट्रॅकवर धावणार असे दिसतेय..>>> +१
राधाची शेजारीण म्हणजे
राधाची शेजारीण म्हणजे सह्याद्री वाहिनी वर हॅलो सखी कार्यक्रमा मधे असते ती मालविका मराठे आहे..
सौरभच्या वागण्याला कंटाळून
सौरभच्या वागण्याला कंटाळून राधा वर्षाच्या आतच त्याच्यापासून डिव्होर्स घेणार आणि सीमावैनी पैज जिंकणार. आणि मग परत 'राधा ब्रम्हचारी' बनणार; असे दिसते.
अग्ग बाई मालविका मराठे का
अग्ग बाई मालविका मराठे का ह्या ! कित्ती ते मधाळ बोलणं !
कित्ती ते मधाळ बोलणं ! >> +१
कित्ती ते मधाळ बोलणं ! >> +१
Pages