राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमा प्रेग्नंट नसली म्हणजे मिळवली.......खरंच असली तर......घारुअण्णांची रिअ‍ॅक्शन काय होईल नै? चंबूगबाळं आवरून काशीयात्रेला निघतील ते.....

एका अ‍ॅवॉर्डेस च्या प्रोमो मध्ये सौरभ आनि वैभव बनवा बनवी च्या डो.जे च्या गाण्यावर नाचताना दाखवलेत.. सौरभने लक्ष्याचा रोल केलाय.. Uhoh राधाच्या आधीच स्वतःच हौस करुन घेतली...

तुम्हाला दादांची रिअ‍ॅक्शन म्हणायचे आहे का?.......घारुण्णा शेजारी राहतात ते.>>> अबोली ना घारुअण्णाच म्हणायचं असेल....नाहीतरी ते ह्याच्याच घरात पडून असतात......

काही दिवसांनी/महिन्यांनी राधाची दुसरी बहीण तुषार दळवी बरोबर लग्न करुन येईल बहुतेक>>> मॅक्स ते शक्य नाहि कारण तुषार दळवीची आधिच एक मैत्रीण आहे साउथ आफ्रिकेत. सीमाला ब्रेन ट्युमर होउन ती गेली म्हणजे ही दोघ बँडबाजा वाजवायला मोकळी.....

स्वप्ना..... तु नेहमीप्रमाणे रॉकिंग.......

तुम्हाला दादांची रिअ‍ॅक्शन म्हणायचे आहे का?.......घारुण्णा शेजारी राहतात ते.>>> अबोली ना घारुअण्णाच म्हणायचं असेल....नाहीतरी ते ह्याच्याच घरात पडून असतात......>>>>>>>>>>>>आणि त्या घारू ला माहित आहे न कि ती आणि तिच्या नवऱ्यात काहीच संबंध बनू नाही शकलेत.

येस्स मधुरा...... कडकलक्ष्मी सीमादेवी आणि तिचा बोलाचा नवरा यांचं गौडबंगाल आपण सगळे सोडलं तर घारुअण्णांनाच माहित आहे...म्हणून त्यांची रिअ‍ॅक्शन ......
बाकी गार्गी केदारचं लग्न आणि त्यानंतरचं कथानक पाहून लहानपणी ऐकलेलं एक गाणं आठवलं
" बाहुलीचं लगीन झोकात लागलं, नवरोबानं भांडण काढलं"
आणि आजचा एपिसोड पाहता बाहुलीनंही भांडण काढलं
बापरे, कुठली नवीन लग्नं झालेली नवरी सासरी स्वैपाकघरात असे तारे तोडते? माहेरच्या आदिकाल ते भविष्य या सर्व पिढ्यांचा उद्धार होणार की हो......

मुग्धा.रानडे.......तुषार दळवीच्या SA मधल्या मैत्रिणीलाच कॅन्सर झालाय म्हणून त्याने पळ काढला होता ना?
तुषार दळवींनी कदाचित एक्झिट मारली असेल सीरियल्मधून वैतागून Wink शक्य आहे.....

सीमाला कसला ब्रेन टयुमर होतोय..... इतने अपने भाग कहाँ....

गार्गी म्हणते मला फक्त लिंबू सरबत बनवता येतं. ते पण साखर आणि मीठ (का लिंबाचा रस?) ह्यांचं प्रमाण कोणी सांगितलं तर. त्यात साखर आणि मीठ घालतात हे तरी माहित आहे हे नशिब Proud

माझी आजी एक म्हण वापरायची.....नीटशी आठवत नाही पण 'हडळीला नव्हता नवरा आणि समंधाला नव्हती बायको' अशी काहीतरी.....केदार आणि गार्गी ह्यांचं लग्न तश्यातलं आहे.

अदिति, ओरडले की.. सीमा राधाला ओरडली किचन मध्ये पसारा केला म्हणून, रंजूने ट्राय केल ओरडायला गार्गीला

त्या सीमाचे रिपोर्टस आले का? आता बरी टुणटुणीत दिसतेय की. कालचा सगळा एपिसोड बाप्पाच्या आरतीत गेला. तो दीड दिवसात जाणार असेल तर बरं. नाहीतर त्याचं बिचार्‍यचं काही खरं नाही.

रच्याकने, केदारने डोक्यावरचे केस का काढलेत?

राधा जाऊन आली वाटतं पॅरिसला. निदान आयफेल टॉवरचा एक लॉन्ग शॉट तरी दाखवायचा. शोनाहो! काय काय आणलंन म्हणे पॅरिसवरून???

'हडळीला नव्हता नवरा आणि समंधाला नव्हती बायको' अशी काहीतरी.....>>>>>> अगदी बरोबर स्वप्ना! फक्त माझी आजी "समंधा"ऐवजी खवीस म्हणायची.

सटवाईला नाही नवरा आणि म्हसोबाला नाही बायको अशी म्हण पण आहे.

असो, आरती करताना ती राधी टाळ्या डाव्या हातानं वाजवत होती.. Angry

राधा जाऊन आली वाटतं पॅरिसला. << हो जाउन आली. पण तिने तिथे फोटो काढला नाही कारण नंतर नवर्‍याबरोबर जायचा आहे तिला.

गौरी आणन्यामागचे "शास्त्रीय" कारण कळलं का?

काय आणलंन म्हणे पॅरिसहून? >>>>>>> अगो.......माणशी एक या हिशोबाने 'मिनी' आयफेल टॉवर.....हे ऐकून घरचे (धर्माधिकार्यांच्या) गहिवरले हो...... 'आय' (मी) मात्र 'फेल' (पडले) हो जमिनीवर राधेचं पॅरिसयात्रा वर्णन ऐकून...... बावर्या राधेची बावरी पॅरिस सहल....ह ह पु वा.......
रच्याकने......त्या गार्गीला आरतीला बाहेर यायला काय धाड भरलीये? तिचे बहीण, आजोबा आणि वडील येऊन एका शब्दानेही विचारत नाहीत, आमचं दिव्य कन्यारत्न कुठे आहे म्हणून....अजब सोहळा !!!!!

मुद्दाम कालचा भाग आज रिपीट टेलिकास्टला पाहिला. रसप यांची कविता आणि सादरीकरण दोन्ही छान होते. त्यांच्या सादरीकरणाच्या दरम्यान सौरभच्या माकडचेष्टांना ऊत आला होता. काल कविसंमेलन झाले. आज गायनाचा कार्यक्रम असेल.

>>त्या गार्गीला आरतीला बाहेर यायला काय धाड भरलीये? तिचे बहीण, आजोबा आणि वडील येऊन एका शब्दानेही विचारत नाहीत

गटारात दगड टाकून कशाला घाण पाणी अंगावर उडवून घ्या असा विचार केला असेल. Happy

>>'आय' (मी) मात्र 'फेल' (पडले) हो जमिनीवर राधेचं पॅरिसयात्रा वर्णन ऐकून

काय म्हणाली?

रसप यांची कविता आणि सादरीकरण दोन्ही छान होत>> हो, खरय.

मला खरतर कुतुहल वाटल....!!! ते पण सिरीअल मध्ये जातायत हे रसपनी सान्गितल होत का
इथे?

अग मलापण नीट कळल नाहीये म्हणुन विचरलं. पण त्यांचा संवाद असा झाला
रंन्जु: पाणवठ्यावरुन माहेर वासीण गौरी आणते तेव्हा तोंडात चुळ भरुन येते, ह्याच कारण अस की तिने पाणवठ्यासारख्या हेवि ट्राफीकच्या ठिकाणी सासर बद्दल वाईट बोलु नये. म्हणजे तिला बोलता येउ नये. (जस ह्या एवढ्यासाठीच ती पाणवठ्यावर जाणार आहे.)
राधा: रंजुताई तुम्ही ह्या रुढी मागचे "शास्त्रीय" कारण अगदी छान सांगितलत Happy

>>रसप यांची कविता आणि सादरीकरण दोन्ही छान होते.

रसप कोण? चित्रपटांची परिक्षणं लिहितात ते का? ते ह्या सिरियलीत होते? Uhoh

कालच्या एपिसोडच्या शेवटी केदारने गाणं म्हटलं. आता धर्माधिकारींनी घराबाहेर बोर्ड लावायला हरकत नाही.

आमच्या येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य असून त्यांच्या प्रवेशिका (महाराष्ट्र वॉच कंपनी, शिवाजी मंदिर, दीनानाथ वगैर) कोठेही उपलब्ध नाहीत. प्रवेश 'प्रथम येणार्‍यास प्राधान्य' ह्या तत्त्वानुसार देण्यात येईल ह्याची रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. टोपी किंवा हातरुमाल ह्यांचा जागा अडवण्यासाठी उपयोग करू नये तसंच कार्यक्रम सुरु असताना मोबाईल बंद ठेवावा अशी समस्त धर्माधिकारी कुटुंबाकडून कळकळीची विनंती.

कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहेतच. आम्ही निमित्तमात्र!
-- आज्ञेवरुन

गुरुवार, दिनांक १२ सप्टेंबर, रात्रौ ९ - डॉ. सौ. राधा सौरभ धर्माधिकारी - व्याख्यान 'माझी पॅरिसयात्रा'
शुक्रवार, दिनांक १३ सप्टेंबर, रात्रौ ९ - आयुर्वेदाचार्य श्री दादा धर्माधिकारी - व्याख्यान 'नाडीपरिक्षेवरून व्याधीचे निदान'
शनिवार, दिनांक १४ सप्टेंबर, रात्रौ ९ - सौ. रंजू आणि श्री यश - व्याख्यान 'एका प्रेमविवाहाची गोष्ट'
रविवार, दिनांक १५ सप्टेंबर, रात्रौ ९ - श्री. सौरभ दादा धर्माधिकारी - व्याख्यान 'द आर्ट ऑफ डूइंग नथिंग'
सोमवार, दिनांक १६ सप्टेंबर, रात्रौ ९ - श्री घारुअण्णा - व्याख्यान 'ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या'
मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर, रात्रौ ९ - सौ. सीमा मार्तंड धर्माधिकारी - तांडव नृत्य

हो स्वप्ना, कविसंमेलन होते ना..नलेश पाटील, अरुण म्हात्रे ..इ.इ. त्यांच्याबरोबर...
सौरभच्या मनातले आणि राधाच्या मनातले भाव कवितेत मांडले...तिचे पाहणे की तिला पाहताना असे काही शब्द होते.

ओह असं होय. कालच्या एपिसोडमध्ये सौरभ टूथपेस्टची जाहिरात करत असल्यासारखा हसत होता.

Pages