राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सानी दिसतय. धन्यावाद.

सौरभला असच क्वालिफीकेशन नसतांना ५० हजाराचा जॉब देण्याइतके केसरचे बाबा मुर्ख आहेत?

सौरभला असच क्वालिफीकेशन नसतांना ५० हजाराचा जॉब देण्याइतके केसरचे बाबा मुर्ख आहेत?>>>>>> लेखक आणि दिग्दर्शक हे पण विसरले आहेत की याच मालिकेत काही एपिसोड पूर्वी केसरच्या बाबांना हा सौरभ डोळ्यासमोर पण नको होता.... जॉब देण आणि तोही ५०,०००चा शक्यच नाही.....

लेखक आणि दिग्दर्शक स्वतः बावळट आहेत की प्रेक्षकांना बावळट समजतात काय माहित? :रागः

सौरभला नोकरी मिळाली? Uhoh
ती केसर किती तर्कट आहे. एक तासाचा स्पेशल भाग राहाबा चा पण होता का काल?
असेल तर मी मिसला.

मी हि सिरीयल बघायचे बंदच केलं, नुसता डोक्याला ताप देते. माझी सख्खी भाची ह्यात रंजुचे काम करते ती (माधवी सोमण). तिला मी माझी नाराजी कळवणार आहे, त्या रंजुच्यापण साड्या घरात काठ-पदराच्या दाखवल्यात आणि किती मेकअप बाळंतीण असून, मला तर काही पटतच नाही.

माझी सख्खी भाची ह्यात रंजुचे काम करते ती (माधवी सोमण). तिला मी माझी नाराजी कळवणार आहे

>> तिला फक्त ह्या बाफची लींक पाठवा. तिला काय कळायचे ते कळेल.. Happy

ए पण ती यश ची बायको छान आहे, आवडते मला. इव्हन यश पण.>> +१

यश>> अनिल गवस.

रंजू, यश, सीमावहिनी(कविता लाड), दादा(शरद पोंक्षे), घारुआण्णा वीरेन अ‍ॅन्ड टीम चे लाडके कलाकार दिसतात.. उंच माझा झोकातपण हे सगळे होते. Happy

असो, राधा एकदम बावळट दाखवली आहे.. केसरच्या बाबांकडे सौरभला कशी काय कामाला पाठवू शकते ती??? एकजात सगळ्या नायिका चांगल्या दाखवायच्या म्हणून चांगूलपणाच्या नावाखाली त्यांना इतके बावळट का दाखवायला हवे? हेच कळत नाही..

आता उं मा झो संपली तर वीरेन आणि टीमला ह्या मालिकेकडे लक्ष द्यायला नको का, असे वाटते!>>> तेच तर... एकदम बंडल चालू आहे ही मालिका.. सध्या हाताशी एकच मालिका असूनही त्यावर नीट लक्ष दिल्यासारखं वाटत नाही.. सारखी राधा-सौरभची गाणी दाखवून वेळ मारुन नेणं चाल्लय...

आता उं मा झो संपली तर वीरेन आणि टीमला ह्या मालिकेकडे लक्ष द्यायला नको का, असे वाटते!>>> तेच तर... एकदम बंडल चालू आहे ही मालिका.. सध्या हाताशी एकच मालिका असूनही त्यावर नीट लक्ष दिल्यासारखं वाटत नाही.. सारखी राधा-सौरभची गाणी दाखवून वेळ मारुन नेणं चाल्लय...>>>>>>>+११११११

रंजू आवडली काही जणांना, धन्यवाद मी तिला सांगेन पण तिच्या साड्या आणि मेकअप हेवी आहे असे मला वाटते प्रत्यक्षात ती जास्त चांगली दिसते आणि ती टीकाही खूप मोकळेपणाने घेते. यशनेपण चांगले काम केले आहे आणि रंजुनेपण- सहमत. घारूअण्णा सहनिर्माते असतात नेहेमी विरेनबरोबर (स्वानंद जोशी नाव आहे बहुतेक त्यांचे),

रंजू आवडली काही जणांना, धन्यवाद मी तिला सांगेन>>>>म्हण्जे??? तुम्ही ओळखता का त्या नायिकेला?

हो मृनीश. इथे माझी भाची त्यात काम करते हे मी सांगणार नव्हते पण ती काम करत असूनसुद्धा मला काही गोष्टी खटकतात आणि हि सिरीयल आवडत नाही. मी हल्ली बघत नाही एवढंच सांगायचे होते.

इथे माझी भाची त्यात काम करते हे मी सांगणार नव्हते>>>>>का बर? उलट बर केलत सांगितलं ते! त्यात लपवण्यासारखं काय आहे? उलट ती अभिमानाची गोष्ट आहे, नाही का?

माधवी, 'योगेश सोमण'-लेखक,दिग्दर्शक,कलाकार आहेत. आता त्यांचे 'एकदा पहावं न करून' हे नाटक येतंय रंगमंचावर त्यात रिमा मुख्य भूमिकेत आहे. पूर्वी त्यांची 'केस नंबर ९९' ,अचानक हि नाटके येऊन गेली, त्यांच्या एकांकिका प्रसिद्ध आहेत आणि ते पुण्याचे आहेत, पुण्यातच राहतात.

दिल्या घरी तू सुखी राहा ह्या सिरीयलमध्ये ते नायिकेचे सासरे होते.
(अवांतर वाटत असेल ह्या बाफवर तर आधीच माफी मागते.)

Dont watch everyday but somehow I think मी हीच सिरियल सगळ्यात जास्त बघते. टायमिन्ग मुळे असेल. मधे बन्द केले होते. अति आचरटपणा दाखवतयत असं वाटून. पण ती एकापेक्शा एक नन्तर लागत असल्यामुळे त्याच्या समोर बरी वाटायला लगते. तो यश मला पण आवडतो. रंजूच्या अवताराबद्दल सहमत. ऊगच काठपदर का ते कळलं नाही. आजकाल खेड्यात पण मुली ड्रेस घालतात. हे तर मुम्बईला राहून. असू शकेल म्हणा.

हो पारिजाता, घरात काठ-पदराच्या झगमगीत साड्या, छोट्या बाळाची आई असताना खटकते, साड्याच दाखवायच्या तर सुतीतरी दाखवायच्या साध्या(बाळंतीण आहे म्हणून).

ती पुण्याचीच आहे.>>>> अन्जू मी पाहिलय माधवी सोमण ना कोथरुड च्या आसपास....त्या सिरीयल पेक्शा अशाच जास्त छान दिसतात.............

Pages