Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26
किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला नाही वाटत तो वर गेला
मला नाही वाटत तो वर गेला आसेल. एकतर त्याला कोमात गेलेलं दाखवतील आणि मग राधाबाई बसतील सेवा करत. किंवा सगळं सुरळित करण्यासाठीच मेल्याचं नाटक असणार. म्हणजे केदारचं ब्लॅकमेल बंद , सिमा वैनी राधाशी चांगलं वागणार टाईप काय वाट्टेल ते.
शिवाय आता शपथ मोडलीच आहे तर लगेहाथ धर्माधिकार्यांच्या घरात नवीन पाहुणा मग त्याच्या पित्रुत्वाचे संशय.
किंवा आपला नेहमी घराघरात होणारा सर्दी इतकाच कॉमन स्म्रुतीभ्रंश नावाचा आजार होणार त्याला.
श्या.. मीच जाते स्क्रिप्ट लिहाय्ला..
आणि तो सौरभ कडून थपडा
आणि तो सौरभ कडून थपडा खाणार्या बुळ्या कोण आहे?


रात्री २ वाजता ह्यांच्या घरी का येतो?
सीमा वहिनी नेमकी तेव्हाच कशी तिथे येते?
त्या बावळट राधाला त्या बुळ्याच्या मिठित शिरून का रडावेसे वाटते? म्हणजे रडतेय सौरभसाठी पण मिठी तिसर्यालाच..
हाईट आहे. सीमा म्हण्तेय की राधा बद्दल रिस्पेक्ट होता... कधी दिसलाच नाही तो..
सानी मान गये आपको पारे
सानी

मान गये आपको
पारे
हम्म! आक्रस्ताळ्या
हम्म! आक्रस्ताळ्या सीमावैनीनंतर सौरभचा नंबर लागला वाट्टे.:अओ:
आक्रस्ताळे लोक दुसर्याला बोलु का देत नाहीत देव जाणे?:अरेरे: त्या हिरोने लंगुरटाईप दिसणार्या सौरभचा मार का खाल्ला? सौरभने त्याला बोलु का दिले नाही? तो जाऊ द्या पण किमान राधाला तरी काही बोलु द्यायचे. नाहीतर गेले बोलायचे राहुनी असे होईल्.:अरेरे:
तुतिमी नंतर संशयाचे बीज पेरलेली ही दुसरी लागण.:खोखो:
त्या बावळट राधाला त्या
त्या बावळट राधाला त्या बुळ्याच्या मिठित शिरून का रडावेसे वाटते? >>> दक्षे, हसून हसून मेले मी
रिया

साने अगं त्या पात्राचं नाव
साने अगं त्या पात्राचं नाव नाही माहित म्हणून बुळ्या.. कारण आल्यपासून फक्त मारच खाल्ला त्याने. इकडे राधा सौरभला थाम्ब थाम्ब म्हणतेय तर सौरभ तिकडे त्याला धुतोय

बालिश कारभार.
मानस गं तो... बुळ्या
मानस गं तो... बुळ्या
अर्रर्र.. काय पण सिरियल
अर्रर्र.. काय पण सिरियल आहे!
मधे एकदा पाहिलं की सौरभ घरी येतो, सीमावहिनी ओवाळते वगैरे, ते काय?
आणि मार्कंड परत सा आ ला गेला का?
मला असं दिसतंय की मला
मला असं दिसतंय की मला मानसोपचारांची गरज आहे कारण आज टीव्ही लावल्यावर असं दिसलं की राधा आणि सौरभचं सीमावहिनी सुहास्य वदनाने आरती ओवाळून स्वागत करतेय. हे नक्की स्वप्न असावं. मी ठीक असेन तर मालिकेचा लेखक बदललाय किंवा मालिकेतल्या कोणालातरी स्वप्नात दिसतंय.
मध्ये एक एपिसोड पाहिला तर राधा आणि सौरभ एका खोलीत आणि 'हिन्दी-पिक्चर फेम' विजा चमकत होत्या. म्हटलं झालं आता पुन्हा नाईट गाऊन बदलीचा एपिसोड होणार. नंतर काही पाहिलं नाही. आणि आज सौरभ एकदम हॉस्पिटलात. ह्याला काय पंडूराजासारखा शाप वगैरे आहे की क्कॉय?
तो सौरभ कडून थपडा खाणार्या
तो सौरभ कडून थपडा खाणार्या बुळ्या कोण आहे? अ ओ, आता काय करायचं<< डॉक्टर मानस, राधाचा चांगला मित्र जो तीच्यावर प्रेम करतो पण कधी सांगत नाही. तो केदारचाही डॉक्टर असतो.
राधा आणि सौरभचं सीमावहिनी सुहास्य वदनाने आरती ओवाळून स्वागत करतेय << त्याच दिवशी तिच्या सासुचे काहीतरी(पुण्यतिथी ?) असते आणि तिला एका कपलला ओवाळायचे असते म्हणुन राधा आणि सौरभ.
आणि मार्कंड परत सा आ ला गेला का?<< हो त्याच्या गर्ल फ्रेन्ड चा काहीतरी प्रोब्लेम झाला म्हणुन फोन येतो आणि तो सा. आ. ला परत जातो. तसाही तो सीमाला सपोर्ट करण्याशिवाय काही करत नव्हता
राधा आणि सौरभ एका खोलीत आणि 'हिन्दी-पिक्चर फेम' विजा चमकत होत्या<<< राधाला "सगळ" होउन अगदी त्यानंन्तर झोपही झाल्यावर आपण आपली शपत मोड्ली असा साक्षात्कार होतो आणि मग ती सौरभशी रडत ओरडत भांडते.
सगळ्यांना अस रात्री २ वाजता गोळा करण्याचा केदारचा प्लान असतो.
ह्याला काय पंडूराजासारखा शाप वगैरे आहे की क्कॉय?>>LOL
स्वप्ना काय
स्वप्ना

काय ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग
ती मराठीण जर आरडत ओरडत चुकुन
ती मराठीण जर आरडत ओरडत चुकुन त्या सौरभवर पडली तर त्याचा चक्काचूर होईल.
स्वप्ना .......बुल्झाय हो
स्वप्ना .......बुल्झाय हो अगदी......
गुगु......अनुमोदन ......त्या राधेचा 'ढाइ किलोका हाथ ' पडला त्या पेद्रू सौरभवर तर आसमंतात उडून जाईल......आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे झालं तर टॉम अँड जेरी मधे होतात तसा फ्लॅटच होईल.
स्वप्ना आता सौरभ ला बघितलं
स्वप्ना
आता सौरभ ला बघितलं की मनात येणार... पंडु रे पंडु (आठवा: बे दुणे ... मराठी सिरीयल मधला मधला लीलाधर कांबळी) 
>>राधाला "सगळ" होउन अगदी
>>राधाला "सगळ" होउन अगदी त्यानंन्तर झोपही झाल्यावर आपण आपली शपत मोड्ली असा साक्षात्कार होतो आणि मग ती सौरभशी रडत ओरडत भांडते.
आई ग! खरं की काय? काहीही दाखवतात हे लोक
आत्ता लावलाय आमच्या घरी
आत्ता लावलाय आमच्या घरी एपिसोड. सीमावहिनीने राधा किंवा सौरभला बुध्दिमान होण्यासोबत 'शक्तिमान' होण्याचा आशिर्वाद दिला. सौरभला दिला असेल तर ठीक आहे. पण राधा आणखी 'शक्तिमान' झाली तर सौरभ स्वर्गवासी होईल.
सीमावहिनीने राधा किंवा सौरभला
सीमावहिनीने राधा किंवा सौरभला बुध्दिमान होण्यासोबत 'शक्तिमान' होण्याचा आशिर्वाद दिला<<< इथे मुकेश खन्ना गेस्ट म्हणून येउन जाईल एका दोन एपिसोडमध्ये.
काय चालु आहे केदारच?
काय चालु आहे केदारच? सुधारण्याचा प्लान तर नाही ना त्याचा?
राधा तिच्या त्या 'पिल्लु'ला आता 'अहो..' वगैरे म्हणतिये.....किती पकाउ वाट्त ते!
पण राधा आणखी 'शक्तिमान' झाली
पण राधा आणखी 'शक्तिमान' झाली तर सौरभ स्वर्गवासी होईल>>>>>>>>.. शक्तीमाआआआआन शक्तीमाआआआन शक्तीमाआआआन....शक्ती शक्ती शक्तीमान शक्ती शक्ती शक्ती मान.....अर्रे बापरे टायटल साँग आठवलं....आणि लाल ड्रेस मधे राधा......
प्रोमोज मधे पाहिल की राधा
प्रोमोज मधे पाहिल की राधा उपमा करते आणि सीमा वहिनी तिला म्हणते की "केदार आणि रंजुला उपमा नाही आवडत. रवा तेल गेल ना वाया? या पुढे काही करायच्या आधि मला विचारत जा" आणि मग मधे राधा बावरीच्या टेलिकास्ट्ची वेळ दाखवुन नंतर सीमा वहिनी म्हणते "आता काय मी आहे ना"
मला तर शंका येतेय की आता पुढचे काही एपिसोड्स सीमा वहिनी राधा संसार करायला कशी नालायक आहे वगैरे दाखवण्यात जाईल. सीमा वहिनी म्हणजे "कुत्र्याच शेपुट वाकड ते वाकडच" अशी आहे. घरी आणताना दाखवलेला समजुतदारपणा लगेच संपला
ह्या बाफाची लिंक योग्य
ह्या बाफाची लिंक योग्य व्यक्तीला पाठवण्यात येत आहे..
सीमा वहिनी म्हणजे "कुत्र्याच
सीमा वहिनी म्हणजे "कुत्र्याच शेपुट वाकड ते वाकडच" >> +१००
थोडं अवांतर: परवा सासरेबुवांनीसुद्धा मला "ती सीमा बघ कशी फॅमीलीची वेल विशर आहे" असा डोस दिलाय..
आता तिच्यासारखं वागायचं म्हणजे सासर्याला स्वतःच्याच सक्ख्या मुलाच्या घरातून त्यांच्या मनाविरुद्ध वृद्धाश्रमात शिफ्ट करायचं.. कसं काय जमवायचं बुवा :विचारात पडलेली बाहुली:
पियू हिम्स म्हणजे कुणाला?
पियू
हिम्स म्हणजे कुणाला?
पियुपरी
पियुपरी
खरंच मुर्ख शिरेल आहे. मी रोज
खरंच मुर्ख शिरेल आहे. मी रोज त्या वक्ताला हापिसचं काम करत असते म्हणून एकिकडे मनोरंजन सुरू असते. होणार सून मी त्या घरची जरा बरी सुरू आहे पण भयानक स्लो.. त्यात त्या ६ बायका... वैताग आणतात. शिंकला तरी काळजी ने निम्म्या होतात..
राधा केव्हढाली दिसते त्या सौरभ समोर
>>सीमा वहिनी म्हणजे
>>सीमा वहिनी म्हणजे "कुत्र्याच शेपुट वाकड ते वाकडच
मीही हेच लिहायला आले होते की एक वेळ कुत्र्याचं शेपूट सरळ होईल पण ही बाई सुधारणं अशक्य.
पियु परी
>>राधा केव्हढाली दिसते त्या
>>राधा केव्हढाली दिसते त्या सौरभ समोर
सौरभ राधाचा बेटर 'हाफ' आहे
कालच्या एपिसोडात ती साडीत
कालच्या एपिसोडात ती साडीत दाखवलिये आणि तो कॉटवर तिला जवळ ओढतो
मनात म्हणलं झाला दुसर्या हाताचा चुराडा आता
बेटर हाफ <<<<
बेटर हाफ <<<< हाहाहा
dailymotion.com वर ही उपलोड करन बंद झालाय वाटत ह्या आता. कुठे बर पहाव्यात ?
आहे की डेलीमोशनवर.. सिरियलचं
आहे की डेलीमोशनवर.. सिरियलचं नाव आणि तारिख देऊन शोधून पहा अदिती आणि ते दिल्यावरही भरपूर व्हिडिओज दिसत असतील, तर तिथे List Options मध्ये जाऊन Most Recent हे सिलेक्ट कर मग दिसेल.
Pages